व्यक्त व्हा...नाहीतर...

व्यक्त व्हा...नाहीतर...


    काल वृद्धाश्रमात गेले असताना एक लेडी आतुन बाहेर आली .. तिचं चालणं , बोलणं ७० च्या पुढचं पण वय वर्षे फक्त आणि फक्त ४६.. खुप वाईट वाटलं त्यांना पाहुन.. अप्रतिम सौंदर्य, नवरा भारताबाहेर म्हणजेच आर्थिक परिस्थिती उत्तम, सडपातळ बांधा पण त्यात बिलकुल जान नाही.. दोन मुलं या सुंदरीकडे सगळं काही आहे पण दोन मुलं आणि नवरा यापलीकडे तिला एकही मित्र किवा मैत्रीण नाही.. मुलं मोठी असल्याने ती त्यांच्या व्यापात त्यामुळे तिच्याशी बोलायला कोणी नाही Now she is underdepression.. व्यक्त व्हायला कोणी नाही .. हे सांगण्यामागे एकच कारण आहे.. कितीही उत्तम कुटुंब असलं आणि पैसा असला तरीही आपल्याला माणसं हवीतच .. आज अनेक लोक अनाथ आहेत, वृध्द मंडळी आहेत त्यांना आपल्या प्रेमाची आपल्या वेळेची गरज आहे.. प्रत्येकवेळी खुप पैसा असलाच पाहिजे असं नाही.. ज्यांना कोणाला हा प्रश्न पडत असेल त्यांनी अशा लोकांना वेळ द्या.. प्राणी आणि वयस्कर मंडळी यांच्या डोळ्यात पहा त्यांना फक्त हवय प्रेम..

   मित्रांनो एकटे राहु नका.. फेसबुक वर असंखय चांगली मंडळी एकत्र येतात.. अनेक गेटटुगेदर होतात .. पार्टीज होतात.. विचारांची देवाणघेवाण होते.. त्यातुन काही बिझनेस पुढे जातात काही नवीन नाती  तयार होतात.. मानसिक रुग्ण बनु नका.. देवाने प्रत्येकाला काही ना काही दिलय त्याचा आनंद घ्या आणि आनंद द्या..

     सोशल मिडीया फक्त वाईट नाही तर त्याकडे पहाण्याची आपली नजर वाईट आहे.. डोळे उघडे ठेवुन नाती वाढवली तर सगळेच सुखी होतील.. तुम्हाला हवय तेच दुसऱ्याला द्या कारण रिटर्न गिफ्ट म्हणुन तुम्हाला तेच मिळणार आहे.  काय द्यायचे हे तुमच्या हातात आहे..

विचार बदलले तर सगळं शक्य आहे..


सोनल गोडबोले

लेखिका.. बियॉन्ड सेक्स कादंबरी

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◾कविता :- नवरा माझा

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◾ललित लेख :- स्ञी

◼️ कविता :- मी कुणाला कळलो नाही | ✍️सुरेश भट ...