रात्री आवर्जून लाईट असते | मराठी कविता | संजय धनगव्हाळ
रात्री आवर्जून लाईट असते
म्हणून अंधार पांघरूण
शेतकरी शेतात जातो
पाण्यावाचून तळमळणाऱ्या
पिकांना पाणी पाजवतो
तहाणलेली पिक
घटाघटा पाणी पिऊन
उभारी घेतात
त्या चांदण्यारात्री शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरच हासु बघतात
पाणी कुशीत शिरून
सुगंध मातीला येतो
मान उंचावून बघणाऱ्या
पिंकाना
दादा माया लावतो
त्या गर्द काळोखातही नसते
त्याला कसलीच भिती
वाट पहात असते
तहाणलेली माती
औत खांद्यावर घेवून
वाट शेताची धरतो
माती कपाळी लावून
मातीत राबतो
घाम कष्टाचा उपसून
मातीत सोन उमलते
भाव मिळत नाही पिकाला
दोष नशीबाला असते
गाठ भुकेला मारून
शेतकरी कसातरी जगतो
काळोख पांघरून
स्वप्न सुखाचे बघतो
फाटक्या थोतराला
बांधून वेदना
व्याथा त्याच्या कुणा
सांगत नाही
शेतीमातीत जगणारा शेतकरी
दुःख त्याच मातीला
कळू देत नाही
*संजय धनगव्हाळ*
धूळे
९४२२८९२६१८
Comments
Post a Comment
Did you like this blog