ओढाताणीच राजकारण | कविता | संजय धनगव्हाळ

 सत्तेवर कोणीही असुदेत

ओढाताणीच राजकारण 

लगेच सुरू होते

सत्तेसाठीच तर नेत्यांची 

आदलाबदली होत रहाते


एकतर  सत्ता आल्यावर 

दिलेली आश्वासन

 त्यांना आठवत नाही

विकासाचा बोलबाला 

कुठेच दिसत

एकमेकांवर आरोप करून

एकमेकांचे घोटाळे बाहेर 

काढतात

जनतेची दिशाभूल करून

सत्ता मिळवून घेतात

 

आहो ईथे रोज आधंळे 

घोटाळे होतात

कोणी भ्रष्टाचार तर कोणी

 अत्याचार करतात

कुठे खुन तर कुठे घातपात 

घडतो

तर कुणाच्यातरी मागे

चौकशीचा फेरा फिरतो


एव्हढ्या मोठ्या देशात

राज्यकर्त्यांशिवाय

सुरक्षित कोणीच नाही

निवडणूक जवळ आल्याशिवाय

हात कोणी जोडत नाही


सत्ता मिळवण्यासाठीच तर 

एकमेकांवर आरोप करून 

स्वच्छ प्रतिमेचे पुरावे देतात

स्वतःच काळ कर्तृत्व

कोणाला कळू नये म्हणून

देवदर्शनाला जातात


या देशात दिवसेंदिवस  

राजकारणी श्रीमंत

 तर जनता गरीब होते

रहाते

एका मतामुळेच तर 

सत्तेवर असणाऱ्यांची

संपत्ती वाढते 


या लोकांनी कितीही 

चिखलफेक केला तरी

त्यांचा नुसता देखावा असतो

आरडाओरडा करून 

बदं खोलीत तो त्यांच्या

मांडीला मांडी लावून बसतो


या राजकारणात

कोणी मंथरा तर 

कोणी  कैकयी आहे

कोणी रावण तर कोणी 

कंस आहे

राम आणि श्रीकृष्ण 

कुठेच दिसत नाही

रामायण झाल्याशिवाय

महाभारत कळत नाही.


*संजय धनगव्हाळ*

धुळे

९४२२८९२६१८

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...