विश्वात श्रेष्ठ आहे ती सर्वदा मराठी | मराठी भाषा दिवस कविता | योगेश चाळके

 मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!


मुक्तासुत अर्थात योगेश चाळके


हृदयात नित्य पुजतो मी ज्ञानदा मराठी

विश्वात श्रेष्ठ आहे ती सर्वदा मराठी

अनमोल लाभली मज धनसंपदा मराठी

ओठांवरी फुलू दे भाषा सदा मराठी


इतिहास शौर्यशाली मज सांगते मराठी

सुविचार स्वाभिमानी समजावते मराठी

संस्कार नित्य मौलिक मज दावते मराठी

महती परंपरांची साकारते मराठी


नृत्यात मुग्ध होई...नृत्यांगना मराठी

गाण्यातुनी फुलवते संवेदना मराठी

देवालयात घुमते ती प्रार्थना मराठी

स्मरणार्थ भावनांची आराधना मराठी


साकारल्या कथा अन् कादंबरी मराठी

रुळल्या अनेक ओव्या ओठांवरी मराठी

रुजल्यात प्रेमकविता हृदयावरी मराठी

गौळण अभंग पुजती त्या पंढरी मराठी


रस वीर रोज देई शक्ती  इथे मराठी

कायम मनात करते वस्ती इथे मराठी

वदती चरित्र कायम महती इथे मराठी

करते मनामनावर भक्ती इथे मराठी


कणखर मुळात आहे बळवंत ही मराठी

सुखदुःख पेलणारी ती आग्रही मराठी

ना वाकली जरापण ती कालही मराठी

झुकणार ना उद्याही ना आजही मराठी


अलवार स्पर्श आहे शब्दामधे मराठी

श्वासासमान आहे जगण्यामधे मराठी

झुंजारपण टिकवते देहामधे मराठी

जपली म्हणून भाषा हृदयामधे मराठी

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ हास्य कविता :- म्हातारा चाललंय लंडनला ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

त्रासाचे झाड - बोधकथा