कुठेच दिसत नाही | संजय धनगव्हाळ | मराठी कविता
कुठेच दिसत नाही
एकनाथ तुकाराम नामदेव
कुठेच दिसत नाही
भगतसिंग राजगुरू सुखदेव
कोण होते हे संत महंत
देशभक्त
कोणालाही सागंता
येणार नाही
अरे या महामहिंचे
नाव घेतल्याशिवाय
सुर्योदय होणार नाही
पण आता काळ बदलला
माणूस बदलला
बदलली माणसाची मती
कुठेच दिसत नाही संस्कार
आणि संस्कृती
कोणाला कळेल या
राष्ट्रमातेच्या वेदना यातना
गर्भार झालेल्या जखमा
तिला झाकता आल्या नाही
अश्रु पुसायला तिच्या डोक्यावर पदरही ठेवला नाही
हा शांततेचा देश आता
अशांत झाला आहे
अनैतीकच्या जाळ्यात
विणला गेला आहे
आता हा देशा पुन्हा
सुजलाम सुफलामता
होण्यासाठी
कोणीच होवू शकत नाही
सावरकर
आणि कोणालाच होता
येणार नाही
टिळक गोखले आगरकर
*संजय धनगव्हाळ*
धुळे
९४२२८९२६१८
Comments
Post a Comment
Did you like this blog