तिला त्याचे खरे प्रेम कळलेच नाही... | लघु कथा | संजय धनगव्हाळ
(संजय धनगव्हाळ)
******************
तो तिला बघायचा ती त्याला टाळायची असे बरेच दिवस चालले.
मग एकदिवस त्याने तिच्याजवळ त्याचे प्रेम व्यक्त केले. तिने त्याला नकार दिला.मग काही वर्षांनी तिला त्याने स्वतःची एक किडनी देवून तिचे प्राण वाचवले.ज्याने किडनी दिली त्याचे नाव न सांगता हातावर 'जय हो' असे गोंधलेले असल्याचं डॉक्टरांनी सांगीतल्यावर तर तिला जबरदस्त धक्काच बसला.करण ज्याने हातावर 'जय हो' असे लिहले होते त्या जय होळकरने कॉलेजला असताना तिला प्रपोज केले होते पण तिने त्याला नकार दिला होता आणि आता त्याच 'जय होळकर'अर्थात 'जय हो ने' तिला स्वतःची एक किडनी दान करून तिचे प्राण वाचवले.त्याला नकार देण्याचा आता तिला पश्चताप होतोय. अर्थात तिने त्याला नकार देवूनही त्याने स्वतःची किडनी दान करून आजही तिच्यावर असलेलं प्रेम सिध्द केले म्हणजे तिने प्रेमास नकार देवूनही तो जिंकला आणि त्याची किडनी घेवून तिचे प्राण वाचल्यावरही तिचा पराभव झाला.
तिला त्याचे खरे प्रेम कळलेच नव्हते.
आता ती त्याला शोधतेय.......
Comments
Post a Comment
Did you like this blog