हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ
हिरव्या हिरव्या श्रावणात
***************
हिरव्या हिरव्या श्रावणात
बरसती पाऊस धारा
अंगाभोवती पिंगा घालतो
गार गार वारा
हिरव्या हिरव्या श्रावणात
हिरवे झाले रान
हिरव्या हिरव्या डोंगराचे
किती गाऊ गुणगान
हिरव्या हिरव्या श्रावणात
पाऊस झाला शिरजोर
खळखळ वाहे झरे झिरवे
थुईथुई नाचतो मोर
हिरव्या हिरव्या श्रावणात
काय हिरवळीचा थाट
हिरवळीच्या कुशीत
शिरली नागमोडी वाट
हिरव्या हिरव्या श्रावणात
गारव्याची मिठी
दऱ्याखोऱ्यात झाली
झाडे झुडपांची दाटी
हिरव्या हिरव्या श्रावणात
मैना मंजूळ गाणे गाते
चिंबचिंब भिजताना
कळी हळूच उमलते
हिरव्या हिरव्या श्रावणत
बहर फुलांचा फुलतो
पाना फुलांच्या वेलीवर
झुला लाजाळूचा झुलतो
हिरव्या हिरव्या श्रावणात
सुगंध देते माती
निळ्या निळ्या आभाळात
पाखरे सैरभैर होती
हिरव्या हिरव्य श्रावणात
झाले कोवळे ऊन
इंद्रधनुच्या सप्तरंगात
उजळून गेला श्रावण
संजय धनगव्हळ
९४२२८९२६१८
Comments
Post a Comment
Did you like this blog