◼️उपाय आणि अपाय :- घरगुती बारीक-सारीक गोष्टीवर इलाज


🦂 साप- विंचू चावल्यास हे घरगुती उपाय करा ...

🧐 पावसाळ्यात घराच्या आसपास गवत झाडेझुडपे तयार होतात. यामुळे साप-विंचू असे प्राणी आपल्या घराच्या आसपास असण्याच्या शक्यता वाढतात. यातील एखादा किटक जर आपल्याला चावला तर तुम्ही पटकन घरगुती उपायांनी त्यावर उपचार करू शकता.

👉 जर तुम्हाला विंचू चावला तर हळद गरम करून विंचूने जिथे डंख मारला तिथे लावा.

👉 जर तुम्हाला सापाने दंश केलं असेल तर ज्या ठिकाणी उभे आहात तिथेच थांबा. अजिबात चालू नका. कारण चालल्याने विष पटकन शरिरात पसरतं. जिथे सापाने दंश केला तिथला भाग घट्ट बांधा, ज्यामुळे विष वर शरीरात चढणार नाही.

👉 जर मुंगी किंवा मधमाशी चावली तर विक्स किंवा कांद्याचा रस चावलेल्या भागावर लावावा यामुळे आराम मिळतो.

👉 उंदराने चावले असता घरात असलेला जुना नारळ जो लाल होऊन खराब झाला असेल तो थोडा किसून घ्या आणि त्यात मुळ्याचा रस मिसळून चावलेल्या भागावर लावा.

👉 जर तुम्हाला कोळीने चावलं तर सर्वात आधी तो भाग स्वच्छ धुवून घ्या. आमचूर अर्थात आंब्याची पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट चावलेल्या भागावर लावा.

👨‍⚕ *आरोग्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आहार टिप्स आणि बरंच काही हवंय?


घरगुती उपायांनी पळवा घरातील ढेकूण, माशा, झुरळ आणि उंदीर...



तुमच्या घरात ढेकूण, माशा, झुरळ तसेच उंदीर या आजार पसरविण्याऱ्या जीवांनी थैमान घातले असेल तर जाणून घ्या काही खास उपाय घेऊन आलो आहे. ज्यामुळे

1. उंदीर* : उंदरांना पेपरमिंटचा वास बिल्कूल पसंद नाही. घरात कापसावर थोडे पेपरमिंट (अस्मंतारा) टाका, त्याने तेथे उंदीर येणार नाहीत, पळून जातील. या वासाने श्वास गुदमरतो, त्यामुळे ते मरून जातात.

2. झुरळ* : काळी मिरे, कांदे आणि लसूनची पेस्ट करून त्यात पाणी टाका आणि एक सोल्युशन तयार करा. ते झुरळ असलेल्या जागांवर स्प्रे करा. याचा वासाने झुरळ घर सोडून पळून जातील.

3. *घरमाशां* : घरमाशांना घरापासून दूर ठेवण्यासाठी कापसाच्या बोळ्याला एका उग्रवास असलेल्या तेलामध्ये बुडवून दरवाज्याजवळ ठेवा. तेलाच्या वासाने घरमाशा दूर पळतात. हा उपाय करून पाहा माशा त्वरीत पळून जातील.

4. *ढेकूण* : कांद्याचा रस ढेकणाला मारण्यासाठी नैसर्गिक औषधी आहे. याच्या वासाने त्यांचे श्वास बंद होतो आणि ते त्वरित मरतात.


🌱 गवत व त्याचे अनेक महत्वपूर्ण फायदे...जाणून घ्या...


💁‍♂ 'दुर्वां' चे अनेक औषधी गुणही आहेत ज्यामुळे आपण अनेक आजारांवर मात करू शकतो. दुर्वांचा उपयोग यकृताचा आजार, लैंगिक आजार, बद्धकोष्ठता अशा अनेक आजारांमधून आराम मिळण्यासाठी होतो.

🧐 *जाणून घ्या दुर्वांचे फायदे*

👉 आयुर्वेदानुसार दुर्वांची चव ही तुरट असते. पण यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, पोटॅशियम यांची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. दुर्वा खाल्ल्याने तोंडाचा अल्सरचं दूर होतो असं नाही तर पित्त आणि बद्दकोष्ठता यांसारखे आजारही दूर होतात.

👉 दूर्वाच्या सेवनामुळे इम्यून सिस्टम मजबूत होते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात ही फार उपयोगी आहे.

👉 दुर्वा आणि हळदीची पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्वचेवर लावल्यास, मुरमं, काळे डाग यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते आणि त्वचा सतेज होते.

👉 कडूलिंबाची पानं आणि दुर्वा यांचा प्रत्येक एक चमचा रस एकत्र करून दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतला तर मधुमेह नियंत्रणात राहतो.

👉 याशिवाय दुर्वा या डोळ्यांसाठीही अत्यंत फायदेशीर आहेत. दररोज सकाळी अनवाणी गवतावर चाललात तर त्याचा डोळ्यांना फायदा होतो.




📍 माश्या घालवण्याच्या काही उपयुक्त टिप्स...

*LetsUp | Tips & Tricks*

माश्यांमुळे हैराण आहात? मग या टिप्स चा वापर करून माश्यांना करा बाय बाय...

▪ घरातील झाडांना अतिप्रमाणात पाणी घालू नका.

▪ धूपसोबत कापूर जाळून घरात फिरवा किंवा कापराच्या गोळ्या घरातील चारी कोपर्‍यात ठेवा.

▪ घरात तुळशीचे रोप लावल्याने माश्यांचा वावर कमी होतो.

▪ नीलगिरी, लॅव्हेंडर, पेपरमिंट, आणि यासारखी नैसर्गिक तेलांनी फायदा होईल. घरात तेल शिंपडावे किंवा तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून हवाबंद डब्ब्यात ठेवा. अधिक माश्या असतील तेथे हा डबा उघडा करून ठेवा.

▪ घरात झेंडूचे फूल ठेवावे. झेंडूच्या फुलांच्या वासाने माश्या दूर होतात.







*बौद्धिक क्षमता कशी वाढवायची?*

आहार :-

  गाईचे दूध, तूप, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा रोजच्या रोज आहारात समावेश असावा.
   आयुर्वेदानुसार गाईचे तूप, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा रोजच्या आहारात समावेश असावा.
  आयुर्वेदानुसार गाईचे दूध, बदाम, अक्रोड  हे खाद्यपदार्थ बुद्धी वाढवणारे आहेत.
    शिळे पदार्थ, गवार, तोंडली, दही, म्हशीचे दूध हे पदार्थ बुद्धीमांद्यकर असल्याने ते खाण्याचे टाळावेत.
    बेकरी उत्पादने, आंबवलेले पदार्थ, चायनीज, पचायला जड पदार्थ खाऊ नयेत.
    कांदा, लसूण, म्हशीचे दूध हे ‘तम’ वाढवणारे असल्याने खाऊ नयेत.
    चहा, कॉफी अशा उत्तेजक पदार्थांचे अतिसेवन कालांतराने अपायकारक ठरते.


उपाय :-

  उत्तम स्मरणशक्तीसाठी व्यायामाची नितांत    आवश्यकता असते.
    चालणे, पळणे, सूर्यनमस्कार यासारख्या व्यायामामुळे मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो. परिणामी स्मरणशक्तीही वाढते.
    अनुलोम, विलोम, प्राणायाम, भ्रामरी, ॐ कार जप हे एकाग्रता वाढवण्याचे साधन आहे.
    6 ते 8 तासांची झोप उत्तम स्मरणशक्तीसाठी आवश्यक असते. डोके व तळपायाला रोज तेलाने मालिश केल्यास गाढ झोप लागून मेंदूला आराम मिळतो. स्मरणशक्ती तल्लख होते. झोपताना टीव्ही बघू नये. त्याने गाढ झोप लागत नाही.
    कोडी सोडवणे, सुडोकू, शब्दकोडी सोडवणे असे उपाय स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. अभ्यास करताना नेहमी टेबल, खुर्ची किंवा संतरंजीवर बसून अभ्यास करावा. झोपून अभ्यास करू नये.


औषधी:-
आयुर्वेदात उत्तम बुद्धी व स्मरणशक्तीसाठी अनेक औषधींचे वर्णन केलेले आढळते. विशेषत: वचा, ब्राह्मी, शंखपुष्पी, ज्येष्ठमध ही औषधे तल्लख बुद्धीसाठी अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने या औषधांच्या वापराने स्मरणशक्ती वाढवता येऊ शकते.



Comments

Post a Comment

Did you like this blog

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !