नमस्कार मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर ( डॉ, राजेंद्र भारुड )_ ___ माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं. जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती. अभिनेता अमीर खान आणि मी मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली का...
*देतो तो देव* ही गोष्ट आहे विनोबा भावे यांची. विनोबाजी ना आई विनू म्हणायची, विष्णूच्या घरामागील परसामध्ये आंब्याची, फणसाची झाडे होती. झाडावरचा पिकलेला फणस काढून आईने कापला. त्यातील रसाळ गरे काढले. वेगवेगळ्या द्रोणांमध्ये भरून ठेवले. विनू पाहतच होता. रसाळ गऱ्यांचा पहिला द्रोन आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती. पण आईने त्यातले दोन द्रोन विनू च्या हातात दिले व शेजार्यांकडे पोहोचविण्यास सांगितले. विनूने दोन्ही घरी द्रोन नेऊन दिले. पण तो नाराज होऊन म्हणाला, " आपल्याच घरचे फळ नीआपल्याला मात्र सगळ्यात शेवटी." आई हसली आणि म्हणाली, " अरे आपल्या जवळ जे असतना त्या अगोदर इतरांना द्यावे आणि मग आपण घ्यावं. इतरांना विसरून आपण एकट्यानेच घेणे हे बरोबर नाही. लक्षात ठेव देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. देणे हा देवाचा उत्तम गुण आणि फक्त स्वतःसाठीच राखून ठेवणे हा राक्षसांचा दुर्गुण आहे. आता तूच ठरव तुला देव व्हायचं आहे, की राक्षस? " विनू ची समजूत पटली. त्याने आनंदाने गरे खायला सुरुवात केली. तात्पर्यः स्वतःसाठी तर सर्वजण जगतात परंतु इतरांसाठी ही जगून पहाव
🌸💐🌸 Plzzzzzzz वाचा रडणार म्हणजे रडणार माझ्या शहिद जवानांना ही कविता अर्पण ..... _______________ _________ ___________________ बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झालीय... तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय... घायाळ जरी झालो तरी अजूनसुद्धा लढतो आहे आई...इंच इंच जखमा छातीवर घेऊन पत्र शेवटचं लिहतो आहे, पत्र शेवटचं लिहतो आहे... लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई जशाच्या तश्या आठवतात या बर्फ़ावरती माझ्या डोळ्यातली आसवंसुद्धा गोठवतात खुपदा वाटतं आई तुझ्या कुशीत येऊन निजावं तुझ्या प्रेमाच्या वर्षावात पुन्हा एकदा भिजावं पण मला ठाऊक आहे, असं आता होणार नाही आली वेळ मला सोडून, रित्या हाती जाणार नाही आपलं घर आठवून आई, एकटाच रडतो आहे रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे... तुमच्यासाठी बाबा... बरंच काही करायचं होतं तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं पहा ना बाबा ! दैवानं आपला कसा घात केला माझ्या प्रेताचा भार सुद्धा तुमच्याच खांद्यावरती दिला तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून... मारणाआधीच मारतो आहे मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे.. तुझ्या स...
काय सांगू दादा, तुला दारुड्याची दशा, आंबील घेऊन बसतो, नी बुडवितो मिशा... दारुड्याला नाही, कुणी घालत भीक, त्याच्या पासून काही तरी, तू धडा शिक... नाही देत त्याला अन्न, नाही ठेवत भरवसा, उखळात घालून तोंड, भरून घेतो घसा... बनतो हा राक्षस सणा-सुदाच्या दिशी, बायको मुले जेवून, राहे हा उपाशी... थोडीशी पिऊनी, डरकाळ्या फोडतो, नशा चढली की, नालीत लोळतो... नशेच्या धुंदीत, मारतो बढाया खूप, पूजेला नाही मिळत, अगरबत्ती नि धूप... रुपेश शामसुंदर आक्केवार गडचिरोली
आज स्त्रियांचा जन्मच मुळात नाकारतला जातो. पण स्त्रीयांमुळेच कुटुंबाचा वंशाचा वारसा पुढे-पुढे चालत राहतो हे समाज सोयिस्करपणे आज विसरला आहे. एक स्त्रीच पुर्ण कुटुंबाला शिक्षित करु शकते. आई बनुन, एका वटवुक्षाच्या सावलीप्रमाणे कुटुंबाचा मानसिक आधार बनुन. ऐतिहासिक काळापासून आईचं महत्त्व सर्वपरिचित आहे. महाराष्ट्राचे लढवय्या राज्यकते शुरवीर शिवाजी महाराजांची आई जिजाऊबाई ह्या शिस्तप्रिय आई म्हणून ओळखल्या जात. त्यांच्या ह्या शिस्तप्रियतेचा फार मोठा वाटा शिवाजी महाराजांच्या यशात आहे. तसेच साने गुरजींच्या कथेतील शामची आई तिच्याविषयी कितीही लिहिले तरी शब्द अपुरेच पडतील. ती तर साक्षात वात्सल्याची मुर्तीच होती. असे इतिहासातील कितीतरी दाखले आपल्याला देता येतील. स्त्री ही विविध भावनांनी नटलेली आहे. दैवानं मातुत्वाचं दान तिच्या पदरात टाकून तिचं श्रेष्ठत्व सिद्ध केल़ं आहे. तिच्या मनात वात्सल्याची भावना निर्माण केली.स्त्रीच्या या विविध भावनांच्या शुंगारानं स्त्रीचं सौदर्य आधिकच खुलून दिसतं. आई या शब्दात मुळातच आप आणि ईश्वर...
एक सत्य घटना विक्रम साराभाई यांच्यासोबत घडलेली स काळची वेळ होती.. त्रिवेंद्रमचा समुद्र किनारा शांत वाटत होता. फारशी गर्दी नव्हती. काही लोकांचीच ये-जा होती. एक बऱ्यापैकी वृद्ध गृहस्थ किनाऱ्यावर आसन टाकून एकाग्रतेने श्रीमद् भगवत गीता वाचत होते. तेवढ्यात एक उच्च शिक्षित पण देव धर्म न मानणारा तरुण तिथे येऊन त्यांच्याजवळ मुद्दाम टिंगल करण्याच्या उद्देशाने बसला, आणि त्या तरुणाने टोमणे मारायला सुरुवात केली. गीता वाचणारी व्यक्ती मात्र शांत होती. तो तरुण म्हणाला, एवढा वेळ जर अभ्यास करून देशासाठी काही केले असते तर आज देश कुठल्या कुठे प्रगती पथावर उंच गेला असता. त्या व्यक्तीने ते एक पान वाचून पूर्ण केले व त्या तरुणास अगदी शांतपणे माहिती विचारली की कुठून आलास, शिक्षण किती , व पुढे काय करणार आहेस ? इ. त्या तरुणाने थोडेसे गुर्मीतच उत्तर दिले की तो कलकत्याहून आला आहे. सायन्सचा उच्च शिक्षित आहे आणि भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेत पुढील संशोधन करण्यासाठी आला आहे.. पुढे मोठ्या तुसडेपणाने - तुम्ही बसा इथे पोथ्या पुराणे वाचत, तुम्हाला देशाच...
एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की 'तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल'. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो. इंद्र त्याला म्हणतो, की 'तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो. त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास ? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते...
काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली : चेन्नईचा एक भिकारी रस्त्यावर मरून पडला. त्याचा पंचनामा करताना रस्त्याकडेच्या त्याच्या झोपडीत पैशांनी भरलेली काही पोती सापडली. पोत्यांत भरलेले पैसे पोलिसांनी मोजले तर ती रक्कम एक कोटी ८६ लाख आणि काही हजार इतकी होती. एवढी संपत्ती गोळा करून बिचारा भिकारी रस्त्यावर बेवारशी मरून पडला. या बातमीने विचारचक्र सुरू झालं: भिकार्याने आपल्या भिकारीच्या व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती घेतली असती तर? (व्यवसाय हा शब्द इथं मुद्दाम वापरला आहे.) साचवलेल्या पैशांत तो मरेपर्यंत चांगलं खाऊन (पिऊन नव्हे) जगला असता. किती छान वाटलं असतं त्याला भिकारीपणातून बाहेर येऊन. अनेक नवोदित भिकार्यांना तो भीकही देऊ शकला असता. पण नाही. ते त्याला जमलं नाही. याचं कारण असुरक्षितता, सवय आणि भीती. आपण जमवलेले पैसे नक्की किती, हेच त्याला स्वत:ला माहीत नसावं. आपण भीक मागणं बंद केलं तर आपण जमवलेले पैसे आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत नक्की पुरतील की नाही याची भीती त्याच्या मनात असावी. समजा जमवलेले पैसे खर्च करून ...
Nice इन्फॉर्मशन
ReplyDelete