जे शून्यातून विश्व निर्माण करू पाहतात त्यांना कधीच शून्यात आणायचा प्रयत्न करू नका, कारण त्यांना शून्यातून विश्व कसे निर्माण करतात हे या मातीत जन्मताच माहीत असते.
नमस्कार मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर ( डॉ, राजेंद्र भारुड )_ ___ माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं. जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती. अभिनेता अमीर खान आणि मी मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली का...
एका जंगलाभध्ये बरेच प्राणी, पक्षी रहात होते.. त्यात वाघ, सिंह, हत्ती, जिराफ, रानगवे, हरिणे, माकडे हे सर्व आपापल्या कळपा बरोबर.. थव्यां बरोबर आनंदाने रहात होते. त्या जंगलात एक तळे होते. त्या तळ्यावर सर्व प्राणी पाणी पिण्यासाठी येत असत. एकदा काय झाले, रानगव्यांचा कळप पाणी पिण्यासाठी तळ्यावर आला. त्यात तरुण, म्हातारे रानगवे होते. तसेच त्यांची छोटी छोटी बछडीही होती. सर्वांनी आनंदाने पोटभर पाणी प्यायले. पाणी पिऊन तो कळप परत जायला लागला.. तेंव्हा दबा धरून 2-3 वाघ शिकार करण्या- साठी बसलेले त्यांनी पाहिले.. त्या बरोबर सर्व रानगवे धावू लागले.. बछडीही धावू लागली..पण त्यात एक छोटे बछडे होते. त्याला काही जोरात धावता येईना..ते तळ्याच्या काठाने पळत असल्याने त्याचा पाय घसरला व ते पाण्यात पडले. झालं!! वाघांना वाटलं चला आपल्याला आता आयतीच शिकार मिळालीये.. पण त्या बछड्याचा आवाज ऐकून ते रानगवे थांबले.. त्यांनी पाहिले की.. बछड्याला आता ते वाघ मारणार.. म्हणून ते जोरात परत मागे फिरले व वाघांवर धावून गेले.. सर्वांनी मिळून वाघांवर हल्ला ...
मी कुणाला कळलो नाही --------------------------------------- मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही.. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही... सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही.. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही.. केला सामना वादळाशी त्याच्या पासून पळालो नाही.. सामोरा गेलो संकटाना त्यांना पाहून वळलो नाही.. पचऊन टाकले दु:ख सारे कधीच मी हळहळलो नाही.. आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही.. कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही... रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही...! मी कुणाला कळलोच नाही...! कवी...
कृषी ग्रुप 1 : https://chat.whatsapp.com/Cjk5s983tMDCN8Lg4B9D2k कृषी ग्रुप 2 : https://chat.whatsapp.com/LOpsQHSSFCA3dpMezAYVBp किसान सन्मान निधी किसान सन्मान निधी कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे. १ हेक्टर = १०००० चौ. मी . १ एकर = ४० गुंठे १ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे १ आर = १ गुंठा १ हेक्टर = १०० आर १ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट १ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की 'तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल'. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो. इंद्र त्याला म्हणतो, की 'तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो. त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास ? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते...
काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली : चेन्नईचा एक भिकारी रस्त्यावर मरून पडला. त्याचा पंचनामा करताना रस्त्याकडेच्या त्याच्या झोपडीत पैशांनी भरलेली काही पोती सापडली. पोत्यांत भरलेले पैसे पोलिसांनी मोजले तर ती रक्कम एक कोटी ८६ लाख आणि काही हजार इतकी होती. एवढी संपत्ती गोळा करून बिचारा भिकारी रस्त्यावर बेवारशी मरून पडला. या बातमीने विचारचक्र सुरू झालं: भिकार्याने आपल्या भिकारीच्या व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती घेतली असती तर? (व्यवसाय हा शब्द इथं मुद्दाम वापरला आहे.) साचवलेल्या पैशांत तो मरेपर्यंत चांगलं खाऊन (पिऊन नव्हे) जगला असता. किती छान वाटलं असतं त्याला भिकारीपणातून बाहेर येऊन. अनेक नवोदित भिकार्यांना तो भीकही देऊ शकला असता. पण नाही. ते त्याला जमलं नाही. याचं कारण असुरक्षितता, सवय आणि भीती. आपण जमवलेले पैसे नक्की किती, हेच त्याला स्वत:ला माहीत नसावं. आपण भीक मागणं बंद केलं तर आपण जमवलेले पैसे आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत नक्की पुरतील की नाही याची भीती त्याच्या मनात असावी. समजा जमवलेले पैसे खर्च करून ...
------------------------------------------------------- 🔴 थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – विचार बनाये जिंदगी! ------------------------------------------------------- त्या घटनेला आज एकतीस वर्ष झाले. तीन दशकांपासुन बॉलीवुडमध्ये आपलं स्टारपद अढळपणे मिरवणारा आमिर खान तेव्हा आपल्या वयाच्या विशीत होता, त्याचा चुलत काका मन्सुर खान ह्यांनी त्याला हिरो म्हणुन हिंदी सिनेमामध्ये लॉन्च करायचे ठरवले होते, फिल्मचे नाव होते, कयामत से कयामत तक, आणि ती एक लो बजेट फिल्म होती, चित्रपट पुर्ण झाला, पण सिनेमा बनवातानाच संपुर्ण बजेट संपले होते, सिनेमाची प्रसिद्धी आणि प्रमोशन करण्यासाठी निर्माता-दिग्दर्शक ह्यांच्याकडे पुरेसे पैसेच उरले नाहीत. त्याकाळात तर केबल नेटवर्कही नव्हते, इंटरनेटही नव्हते, त्यामुळे चित्रपटांची प्रसिद्धी मुख्यतः पोस्टरमधुनच व्हायची. अमिर खान नवखा असला, कुमारवयीन असला, आणि पहील्याच सिनेमाचा हिरो असला तरी, लहानपणापासुन ह्या क्षेत्रात वावरल्याने त्याला सिनेमाच्या तंत्राची चांगली जाणीव होती. कसलाही खर्च न करता, आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी...
नवरा माझा पहिले होता कुंकवाचा धनी, आता मात्र, तो आहे फक्त...... माझ्यासाठी ब्लॅक अँण्ड व्हाइट मनी, पहिले होता तो, माझ्या घराचा पहारेकरी, आता मात्र, आहे नुसताच तो... माझ्या प्रेमाचा वाटेकरी, त्याच्यामुळे बसली आमच्या विस्कटलेल्या संसाराची घडी, आता मात्र, नुसताच आहे तो... माझ्यासाठी एक 'घरगडी', पहिले होता तो माझ्यासाठी, संकटी धावुन येणारा 'देव', आता मात्र, वाटतो मला तो... नको-नकोशी वाटणारी 'ठेव', म्हणायचे पहिले मी, त्याला आदराने 'पंत', आता मात्र, तो झाला... माझ्या सहनशिलतेचा अंत, पहिले होता, नवरा माझा भोळा, आता मात्र, वाटतो तो मला... संसारी माझ्या, आकार-उकार नसलेला फक्त एक... मातीचा 'गोळा', मंगेश शिवलाल बरंई. पंचवटी, नाशिक ४२२००३.
देव - देवाचा जन्म कसा झाला. देवानी माणसाला जन्माला घातला कि माणसानं देवाला जन्माला घातलं. फार पूर्वी जेव्हा माणूस इतर प्राण्यांसारखा जंगलात राहत होता तेव्हा त्याला भूकंप, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट ह्याची अनामिक भीती वाटायची. ह्या गोष्टी कशामुळे होतात जे त्याला माहित नव्हतं. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते आणि त्यांना उत्तरं नव्हती. मग त्याने त्या नैसर्गिक शक्तींना देव बनवलं. सुर्य, वारा , पाऊस ह्यांना प्रसन्न करण्यासाठी तो त्यांची प्रार्थना करू लागला नंतर जेव्हा तो शेती करू लागला तेव्हा तो जमिनीलाच आपली आई समजू लागला. चांगला पिक हे सुपीक जमीन, पाऊस आणि सूर्यावर अवलंबून आहे हे कळल्यावर तो त्याची पूजा करू लागला. सध्या आपण ज्याला देव - धर्म म्हणतो ह्या पाच दहा हजार वर्षात निर्माण झालेल्या घटना आहेत. देवाची कल्पना माणसानं निर्माण केली आहे. आणि माणसानं निर्माण केलेल्या देवाला कसं मान्य करणार. माणसांनी त्याच्या कल्पना शक्ती आणि प्रतिभेतून देवाला जन्माला घातले. सगळ्या देवांची, देव कल्पनांची उपज माणसाच्या मेंदूतून झाल...
एक सत्य घटना विक्रम साराभाई यांच्यासोबत घडलेली स काळची वेळ होती.. त्रिवेंद्रमचा समुद्र किनारा शांत वाटत होता. फारशी गर्दी नव्हती. काही लोकांचीच ये-जा होती. एक बऱ्यापैकी वृद्ध गृहस्थ किनाऱ्यावर आसन टाकून एकाग्रतेने श्रीमद् भगवत गीता वाचत होते. तेवढ्यात एक उच्च शिक्षित पण देव धर्म न मानणारा तरुण तिथे येऊन त्यांच्याजवळ मुद्दाम टिंगल करण्याच्या उद्देशाने बसला, आणि त्या तरुणाने टोमणे मारायला सुरुवात केली. गीता वाचणारी व्यक्ती मात्र शांत होती. तो तरुण म्हणाला, एवढा वेळ जर अभ्यास करून देशासाठी काही केले असते तर आज देश कुठल्या कुठे प्रगती पथावर उंच गेला असता. त्या व्यक्तीने ते एक पान वाचून पूर्ण केले व त्या तरुणास अगदी शांतपणे माहिती विचारली की कुठून आलास, शिक्षण किती , व पुढे काय करणार आहेस ? इ. त्या तरुणाने थोडेसे गुर्मीतच उत्तर दिले की तो कलकत्याहून आला आहे. सायन्सचा उच्च शिक्षित आहे आणि भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेत पुढील संशोधन करण्यासाठी आला आहे.. पुढे मोठ्या तुसडेपणाने - तुम्ही बसा इथे पोथ्या पुराणे वाचत, तुम्हाला देशाच...
Comments
Post a Comment
Did you like this blog