जाणून घ्या एका आमदाराचे वेतन किती?

खासदार आणि आमदारांच्या वेतनाबद्दल नेहमीच चर्चा होत असते. खासदार-आमदारांना मिळणारे वेतन व भत्ते हे जास्त असल्याचा सामान्य नागरिकांचा आक्षेप असतो. त्याच वेळी लोकप्रतिनिधींना मात्र हे वेतन व भत्ते कमीच वाटतात. 
राज्य सरकारमधील प्रधान सचिवाला अनुज्ञेय असलेले वेतन व भत्ते आमदारांना देण्याची तरतूद आहे. अर्थात प्रधान सचिवाला सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणाऱ्या वेतन व भत्त्यांनुसार सदस्यांना तेवढी रक्कम दिली जाते. केंद्रात व राज्यात सातवा वेतन आयोग लागू झाल्याने प्रधान सचिवांच्या वेतन व भत्त्यांमध्ये वाढ झाली असणार. नव्याने निवडून येणाऱ्या आमदारांकडून वेतन व भत्त्यांमध्ये वाढ करण्याची मागणी होऊ शकते. 
राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना दरमहा १ लाख ८३ हजार ४४० रुपये एवढे वेतन व भत्ते मिळतात. याशिवाय आणखी काही सोयीसुविधा मिळतात. दरमहा दोन लाखांपेक्षा जास्त वेतन, भत्ते व अन्य सुविधांच्या माध्यमातून आमदारांना मिळत असतात. 
आमदारांचे वेतन, भत्ते व अन्य सुविधा यांची संक्षिप्त माहिती 
मूळ वेतन – ६७ हजार 
महागाई भत्ता – ८८,४४० (मूळ वेतनाच्या १३२ टक्के) 
दूरध्वनी भत्ता – आठ हजार 
स्टेशनरी व टपाल भत्ता – १० हजार 
संगणक चालकाचा भत्ता – १० हजार 
दरमहा वेतन व भत्ते – १ लाख, ८३ हजार, ४४० रुपये 
अन्य भत्ते व सुविधा 
दैनिक भत्ता – दोन हजार रुपये (अधिवेशन कालावधी आणि समितीच्या बैठका. समितीच्या बैठका दरमहा किमान चार तरी होतात) 
स्वीय सहाय्यकाचा भत्ता – २५ हजार 
दूरध्वनी – निवासस्थानी बसविलेल्या दूरध्वनीचे दरमहाचे देयक खर्च 
रेल्वे प्रवास – राज्यांतर्गत मोफत, राज्याबाहेर ३० हजार किमी पर्यंत 
एस टी प्रवास – राज्यात सर्वत्र मोफत प्रवास. आमदारांची पत्नी किंवा पतीलाही मोफत 
बोटीचा प्रवास – मोफत 
विमान प्रवास – राज्यांतर्गत ३२ वेळा एकेरी प्रवास मोफत , राज्याबाहेर वर्षांत आठ वेळा एकेरी प्रवास 
संगणक – प्रत्येक सदस्याला त्याच्या आमदार निधीतून एक लॅपटॉप / डेक्सटॉप, लेझर प्रिंटर 
वाहन कर्जावर व्याज शासन फेडणार – आमदाराला पाच वर्षांच्या कालावधीत वाहन खरेदीसाठी १० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्याचा हक्क आहे. या कर्जावर दहा टक्क्य़ांपर्यंत व्याज शासनाकडून फेडले जाते. 
आमदार निधी – मतदारसंघातील कामांसाठी दर वर्षांला दोन कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी मिळतो. या रक्कमेत वाढ करण्याची आमदारांची नेहमीची मागणी असते. 
आरोग्य सेवा – सरकारी रुग्णालयांमध्ये आमदारांना मोफत वैद्यकीय सेवा. खासगी रुग्णालयात उपचार घेतले असल्यास औषधोपचाराकरिता ९० टक्के रक्कम. खासगी रुग्णालयातील तीन लाखांपेक्षा जास्त खर्चाचे देयक सादर केल्यास त्याची उच्चाधिकार समितीकडून छाननी. 
निवृत्ती वेतन – पाच वर्षे आमदारकी भूषविल्यास ५० हजार रुपये निवृत्ती वेतन. पाच वर्षांपेक्षा जास्त काळ आमदारकी भूषविली असल्यास पाच वर्षांवरील प्रत्येक वर्षांसाठी दरमहा दोन हजार रुपये जास्त. 
कुटुंब वेतन – माजी आमदाराच्या निधनानंतर त्याची पत्नी वा पतीस दरमहा ४० हजार रुपये निवृत्ती वेतन

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...