घडवणूक माणसाची - बोधकथा

एका गुरूकडे एक अभ्यागत बसले होते.

काही शास्त्रचर्चा सुरू होती.

एक शिष्य आत आला.
दार लावलं. पादत्राणं काढून ठेवली.
गुरूंच्या समोर येऊन बसला.

गुरू थोडा वेळ शांत राहिले.
मग अगदी मृदू स्वरात म्हणाले, बेटा ; 
जा, दाराची आणि जोड्यांची माफी मागून ये.

शिष्य उठला, दारापाशी गेला, माफी मागितली,
जोड्यांचीही माफी मागितली.

पाहुणे अचंबित झाले. म्हणाले, हा काय प्रकार ?
दाराची आणि जोड्यांची माफी?

गुरू म्हणाले, तो आला तेव्हा घुश्शात होता,
त्याने दार जोराने आपटलं आणि जोडे रागाने भिरकावले होते.

पाहुणे म्हणाले, पण म्हणून निर्जीव वस्तूंची माफी मागायची?

गुरू म्हणाले, निर्जीव वस्तूंवर राग काढता येतो,
तर त्यांची माफी का नाही मागायची?

पाहुणे म्हणाले, पण, याच्या रागाचा किंवा माफीचा
दरवाजावर किंवा जोड्यांवर काय परिणाम होणार?

गुरू म्हणाले ; पण , मी कुठे दरवाजा किंवा जोडे घडवतोय?
मी तर याचा गुरू आहे, *मी माणूस घडवतोय.*.


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !