स्टीव जॉब्स यांची जीवनी

एप्पल फाउंडर स्टीव जॉब्स चे जीवन प्रत्येका करता प्रेरणादायक आहे. ज्या तऱ्हेने त्यांनी आपल्या जीवनातील तमाम संघर्षांना आणि अडथळयांना पार करत जीवनात यशाचे नवे कीर्तिमान रचलेत ते अत्यंत प्रशंसनीय आहे. जॉब्स च्या जीवनातील एक काळ असा देखील होता ज्यावेळी त्यांना मंदिरात मिळणाऱ्या अन्नावर भूक भागवावी लागली आणि मित्राच्या घरी रात्र जमिनीवर काढावी लागली.
ही संकटं कमी होती की काय तर एक वेळ अशी देखील आली कि त्यांना त्यांच्याच एप्पल कंपनीतून बाहेर पडावे लागले, पण या तमाम संघर्षांचा सामना करतांना त्यांनी कधी हार मानली नाही आणि पुढे जात राहीले. स्टीव जॉब्स यांच्या प्रेरणात्मक जीवना विषयी अधिक माहिती या लेखात घेऊया.

एप्पल फाउंडर स्टीव जॉब्स यांचा जीवन परिचय – Steve Jobs Biography in Marathi

Steve Jobs Biography in Marathi

स्टीव जॉब्स यांचा थोडक्यात महत्वपूर्ण परिचय – Steve Jobs Information in Marathi

पूर्ण नांव (Name)स्टीव पॉल जॉब्स
जन्म (Birthday)24 फेब्रुवारी 1955, सेंट फ्रांसिस्को, कैलिफोर्निया
वडील (Father Name)अब्दुलफत्त: जन्दाली, पॉल जॉब्स (यांनी दत्तक घेतलं होतं)
आई (Mother Name)जोअन्नी सिम्पसन, क्लारा (यांनी दत्तक घेतलं होतं)
पत्नी (Wife Name)लोरिन पॉवेल (1991-2011), किस्टर्न ब्रेन्नन
मुलं (Childrens Name)लिसा ब्रेन्नन, एरीन जॉब्स, ईव जॉब्स, रीड जॉब्स
मृत्यू (Death)5 ऑक्टोबर 2011 (कैलीफोर्निया)

स्टीव जॉब्सचा जन्मकुटुंब आणि सुरुवातीचा काळ – Steve Jobs History

स्टीव जॉब्स चा जन्म आणि लहानपणीचा काळ इतरांपेक्षा अगदी भिन्न आहे. त्याचा जन्म 24 फेब्रुवारी 1955 ला कैलिफोर्निया मधील सेंट फ्रांसिस्को येथे सिरीया येथील मुस्लिम अब्दुलफत्त: जन्दाली यांच्या घरी झाला. जोअत्री सिम्पसन च्या पोटी त्यांनी जन्म घेतला पण त्या दरम्यान तिचा विवाह झाला नसल्याने तिने स्टीव ला दत्तक देण्याचा निर्णय घेतला.
पॉल आणि क्लारा नावाच्या दाम्पत्याला या अटीवर तिने स्टीव ला दत्तक दिले की ते स्टीव ला शिक्षणाकरता महाविद्यालयात पाठवतील. पॉल…ज्यांनी स्टीव ला दत्तक घेतलं होतं ते स्वतः एक मैकेनिक होते तर त्यांची पत्नी क्लारा अकौंटंट होती. या दाम्पत्याने पुढे गैरेज सुरु केले.
जॉब्स ला देखील सुरुवातीपासून इलेक्ट्रॉनिक्स मधे रुची होती. त्यामुळे तो कायम इलेक्ट्रॉनिक वस्तूंशी खेळत नवनवीन शिकण्याचा प्रयत्न करीत असे. बालपणातच त्याने वडिलांकडून इलेक्ट्रॉनिक्स संबंधित बऱ्याच गोष्टी शिकल्या, जॉब्स लहानपणापासून विलक्षण प्रतिभेचे धनी होते. पण त्यांना शाळेत जाऊन शिकण्यापेक्षा घरी बसून पुस्तकं वाचायला जास्त आवडत असे.

स्टीव जॉब्स चे शिक्षण आणि सुरुवातीची कारकीर्द –  Steve Jobs Education

स्टीव जॉब्स च्या आई-वडिलांनी मोठ्या तडजोडीने त्याच्या शालेय शिक्षणाचा खर्च तर उचलला पण त्यानंतर जेंव्हा त्याचा प्रवेश ऑरगेन च्या रीड कॉलेज ला झाला त्यावेळी मात्र तो खर्च त्यांच्या आवाक्या-बाहेरचा होता. त्यांची संपूर्ण मिळकत कॉलेज फीस मधेच खर्च व्हायला लागली. त्यामुळे पहिल्या सेमिस्टर नंतरच आर्थिक अडचणीमुळे स्टीव जॉब्स ने कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला.
कॉलेज सोडल्यानंतर देखील स्टीव कैलीग्राफी (Calligraphy) क्लास नियमित अटेंड करत असे. कैलीग्राफी, ही अक्षरांना क्रिएटीव आणि सुरेख पद्धतीनं लिहिण्याची कला आहे. या दरम्यान स्टीव जॉब्स ची मैत्री वोजनियाक शी झाली. त्याला देखील स्टीव प्रमाणे इलेक्ट्रॉनिक आणि कंप्युटर ची आवड होती.
आर्थिक तंगी मुळे स्टीव ला सुरुवातीचा काळ अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. पोटभर जेवण्या एवढे देखील पैसे त्यांच्या जवळ नसायचे. कोक बॉटल विकून त्यांचा कसा तरी उदरनिर्वाह भागत असे. प्रत्येक रविवारी तो कृष्ण मंदिरात फक्त एवढ्यासाठी जायचा कि तिथे पोटभर जेवण मिळायचं, इतकेच नव्हे तर स्टीव ने कित्येक रात्री मित्राच्या घरी फरशीवर झोपून काढल्या.
वास्तविक स्टीव जॉब्स मधे दृढइच्छाशक्ती आणि प्रतिभा ठासून भरली होती, यामुळे त्याला 1972 मध्ये व्हिडीओ गेम बनविणाऱ्या एक डेवलिंग कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. परंतु स्टीव जॉब्स या कामाने समाधानी नव्हते, आणि मग त्यांनी हा जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. या नौकरीत त्याने जेवढे पैसे साचवले होते त्या पैश्यातून ते भारत फिरायला आले.
वास्तविक स्टीव ला भारतीय संस्कृती कायम प्रभावित करत आलीये आणि त्यांना येथे येऊन आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करायचे होते. म्हणून त्यांनी 1974 साली जवळ-जवळ 7-8 महिने भारतातील उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत व्यतीत केले आणि येथे बौद्ध धर्माची शिक्षा घेतली. पुढे ते अमेरिकेला परतले, आता ते पूर्वीचे जॉब्स राहीले नव्हते, ते पूर्णतः बदलले होते आणि त्याचं मन देखील एकाग्रचित्त झालं होतं. परतल्यानंतर त्यांनी पुन्हा जॉब जॉईन केला.

सर्वाधिक प्रतिष्ठित एप्पल कंपनी च्या फाउंडर रुपात स्टीव जॉब्स – Steve Jobs Apple Founder

स्टीव जॉब्स च्या जवळच्या वोजनियाक या मित्राने स्वतः साठी कम्प्युटर ची निर्मिती केली, ते पाहून स्टीव जॉब्स अत्यंत खूष झाले आणि त्यानंतर त्यांना कम्प्युटर बनविण्याच्या व्यवसायाची कल्पना सुचली. 1976 साली जॉब्स ने मीत्रासमवेत आपल्या वडिलांच्या गैरेज मधे कम्प्युटर बनविण्याचे काम सुरु केलं.
गैरेज मध्ये सुरु झालेल्या कंपनीचे नामकरण “एप्पल” असे झाले. यानंतर या कंपनीने नवनवे आविष्कार करीत नवे उच्चांक स्थापित केले. 1980 साल येता-येता जॉब्स ची एप्पल कंपनी एक प्रतिष्ठित आणि विश्वातील नामांकित कंपनी बनली होती.

स्टीव जॉब्स यांना जेंव्हा स्वतःच्याच कंपनीतून बाहेर काढले गेले – Steve Jobs fired from his company

असा देखील काळ स्टीव जॉब्स च्या जीवनात त्याला पाहावा लागला जेंव्हा स्वतःच्याच कंपनीचा राजीनामा देण्यास त्याला बाध्य करण्यात आले. खरंतर सतत यशाचे नवनवे कीर्तिमान स्थापित करणाऱ्या एप्पल ला त्यावेळी ब्रेक लागला जेंव्हा त्यांनी एप्पल 3 आणि त्यानंतर लिसा कम्प्युटर (हे नांव स्टीव च्या मुलीच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं) लॉन्च केलं. हे दोन्ही प्रोडक्ट अत्यंत अयशस्वी ठरले.
पुढे स्टीव ने मैकिनटोश बनविण्याकरता कठोर परिश्रम घेतले आणि 1984 साली लिसा वर बेस्ट सुपर बाउल बनवून त्याला मैकिनटोश समवेत लॉन्च केलं. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा यश मिळालं. पुढे एप्पल आणि IBM एकमेकांसोबत मिळून कम्प्युटर बनवू लागले. चांगल्या गुणवत्तेमुळे बाजारात याची मागणी तुफान वाढल्याने जास्त उत्पादनाचा कंपनीवर अतिरिक्त ताण पडू लागला.
वास्तविक स्टीव जॉब्स ने आपल्या कंपनीची मूळ कल्पना कधी इतरांपासून लपवून ठेवली नाही त्यामुळे याचे दुष्परिणाम देखील त्याला भोगावे लागले, कारण कित्येक दुसऱ्या कंपन्यांनी यांची कॉंन्सेप्ट चोरून कम्प्युटर बनविले आणि ग्राहकांना कमी किमतींमध्ये विकले.
त्यामुळे एप्पल ला बरच नुकसान सोसावं लागलं, या सगळ्याला स्टीव जॉब्सला जवाबदार धरून त्यांच्याच कंपनीने त्यांना कंपनीतून बाहेर पडण्यास बाध्य केलं. त्यामुळे स्टीव जॉब्सने 17 सप्टेंबर 1985 ला एप्पल चा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या 5 निकटतम सहकाऱ्यांनी देखील एप्पल चा राजीनामा दिला.

संघर्षाच्या काळात बनविला नेक्स्ट कम्प्युटर – Next Computer Company Steve Jobs

असं म्हणतात की संघर्ष आणि अपयश मनुष्या करता यशाची नवी दारं खुली करतं स्टीव जॉब्स च्या बाबतीत देखील हेच झालं. स्वतःच्या कंपनीतून बाहेर पडल्यानंतर देखील ते निराश झाले नाहीत, उलट त्यांनी या संधीचा फायदा उचलत नेक्स्ट कम्प्युटर च्या रुपात नवी सुरुवात केली, त्या दरम्यान त्यांच्या नशिबाने देखील चांगलीच साथ दिली आणि त्यांच्या या कंपनीत एक बडे बिजनेसमैन पेरॉट यांनी गुंतवणूक केली.
पुढे 12 ऑक्टोबर 1988 ला एका मोठ्या इवेंट मधे नेक्स्ट कम्प्युटर लॉन्च करण्यात आले, खरंतर नेक्स्ट देखील एप्पल सारखंच फार एडवांस होतं, त्यामुळे ते बरंच महाग देखील होतं, त्यामुळे नेक्स्ट ला मोठं नुकसान सोसावं लागलं. याची जाणीव ज्यावेळी स्टीव जॉब्स ला झाली तेंव्हा त्यांनी नेक्स्ट कम्प्युटर कंपनीला एक सॉफ्टवेयर कंपनी बनविलं. यात देखील त्यांनी मोठं यश संपादन केलं

डिज्नी या ग्राफिक्स कंपनी सोबत जॉब्स ची भागीदारी – Graphic Disney Companies  Partner Steve Jobs

1986 साली स्टीव जॉब्स यांनी पिक्सर मूवी ही ग्राफिक्स कंपनी विकत घेतली आणि डिज्नी समवेत भागीदारी केली. यानंतर स्टीव यशाची एक-एक पायरी चढत गेले आणि पुन्हा कधी आपल्या आयुष्यात मागे वळून पाहिलं नाही.

सीईओ च्या रुपात एप्पल मधे परतले – Apple CEO  Steve Jobs

एप्पल ने 1996 साली नेक्स्ट कंपनी विकत घेण्याकरता स्टीव शी चर्चा केली, ही डील 427 मिलियन डॉलर मध्ये फायनल झाली. यावेळी स्टीव जॉब्स एप्पल मध्ये सीईओ म्हणून परतले. परंतु तेंव्हा एप्पल मोठ्या कठीण परिस्थितीशी झगडत होती स्टीव च्या मार्गदर्शनात कंपनी ने एप्पल IPOD म्युझिक प्लेयर आणि I Tunes लॉन्च केलं.
त्यानंतर 2007 मधे एप्पल ने स्वतःचा पहिला मोबाईल फोन लॉन्च केला व मोबाईल जगतात जणू क्रांती आणली, पुढे एकामागोमाग एक नवे प्रोडक्ट लॉन्च करून एप्पल सतत यशाची नवनवीन शिखरं गाठत आहे.

स्टीव जॉब्स चा विवाह आणि वैयक्तिक जीवन – Steve Jobs Life Story

स्टीव जॉब्स ला 1978 साली त्याची प्रेमिका किस्टन ब्रेन्नन हीच्यापासून लिसा ब्रेन्नन ही मुलगी झाली. त्यानंतर त्यांनी 1991 साली लौरेन पावेल समवेत विवाह केला. दोघांना रीड, एरिन, आणि ईव नावाची तीन मुलं झाली.

स्टीव जॉब्स ला मिळालेले पुरस्कार – Steve Jobs Awards

एप्पल कंपनीचे संस्थापक स्टीव जॉब्स ला त्यांच्या जीवनात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय…त्यातले काही असे आहेत-
  • अमेरिकेचे राष्ट्रपती यांच्याद्वारे स्टीव जॉब्स ला “नेशनल मैडल ऑफ टेक्नॉलॉजी” ने गौरविण्यात आलंय.
  • स्टीव जॉब्स ला “कैलिफोर्निया हाल ऑफ फेम” ने सन्मानित करण्यात आलंय.
  • स्टीव जॉब्स ला त्यांच्या प्रतिष्ठित एप्पल कंपनी करता 1982 मध्ये “मशीन ऑफ द इयर” पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्टीव जॉब्स चा मृत्यू – Steve Jobs Death

जगातील सर्वात मोठ्या एप्पल कंपनीचे फाउंडर स्टीव जॉब्स यांना आपल्या जीवनातील अखेरच्या काळात पेनक्रियाटिक कैंसर सारख्या आजाराशी लढावं लागलं, अनेक वर्ष या आजाराशी झुंज दिल्यानंतर 2 ऑक्टोबर 2011 ला कैलिफोर्निया मधील पालो ऑल्टो येथे अखेरचा श्वास घेतला आणि या जगाचा निरोप घेतला.
आपल्या मृत्यूपूर्वी स्टीव जॉब्स यांनी 24 ऑगस्ट 2011 ला टीम कुक यांना एप्पल चा नवा सीईओ बनविण्याची घोषणा केली होती. आज स्टीव जॉब्स जरी आपल्यात नसले तरीसुद्धा एप्पल सारख्या प्रतिष्ठित कंपनीचा पाया रचणाऱ्या महान व्यक्तीला विसरता येणं सहज शक्य नक्कीच नाही.

स्टीव जॉब्स संबंधित काही विशेष तथ्य – Facts About Steve Jobs

  • वयाच्या 12 व्या वर्षी स्टीव जॉब्स ने पहिल्यांदा कम्प्युटर पाहीला होता.
  • स्टीव जॉब्स एकदा एप्पल च्या बागेत बसले होते, तेंव्हाच त्यांनी आपल्या कंपनीचे नाव एप्पल ठेवण्याचे मनोमन नक्की केले होते.
  • स्टीव जॉब्स च्या महान आणि प्रेरणात्मक जीवनावर आधारीत “जॉब्स” हा चित्रपट तयार झाला आहे, याव्यतिरिक्त डीज्नी पिक्सर चा “ब्रेव” देखील त्यांच्याच जीवनाला समर्पित चित्रपट आहे.
  • आध्यात्मिक ज्ञानाच्या प्राप्ती करता स्टीव जॉब्स भारतात आले होते. भारतीय संस्कृती आणि येथील राहणीमान त्यांना फार आकर्षित करीत असे.
  • स्टीव जॉब्स 1974 साली भारतात आले होते व कित्येक महिने त्यांनी हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, आणि दिल्ली येथे घालवले होते.
  • महान वैज्ञानिक आईनस्टाईन ला स्टीव जॉब्स आपला आदर्श मानीत असत.
  • स्टीव जॉब्स ने Apple’s IPOD चे सैम्पल ज्यावेळी प्रथम पाहीले तेंव्हा त्याला पाण्यात टाकून दीले आणि हवेच्या बुडबुड्यांनी हे सिद्ध केलं की या IPOD ला आणखीन लहान व आकर्षक बनविलं जाऊ  शकतं.
  • स्टीव जॉब्स ला 1984 साली त्याच्याच एप्पल कंपनीतून बाहेर काढण्यात आलं होतं.
  • स्टीव जॉब्स जवळ देखील मार्क जूकरबर्ग आणि  प्रमाणे कॉलेज डिग्री नव्हती.
  • स्टीव जॉब्स ची आणखीन एक विशेष गंमत म्हणजे ते नंबर प्लेट नसलेली गाडी चालवीत असत.
  • स्टीव जॉब्स बौद्ध धर्माचे अनुयायी होते.

एप्पल फाउंडर स्टीव जॉब्स चे प्रेरणात्मक विचार- Steve Jobs Quotes

  • “तुमच्याजवळ ठराविक वेळ आहे, त्यामुळे हा वेळ दुसऱ्या कुणाचे आयुष्य जगून अजिबात व्यर्थ गमावू नका”.
  • “कदाचित मृत्यूच या जीवनाचा सर्वात मोठा आविष्कार आहे”.
  • “ज्यांना वाटतं की ते जग बदलू शकतात, ते वेडे असतात…ते खरंच जग बदलून टाकतात”.
  • “डिजाइन केवळ ती नाही की जी फक्त कशी दिसते किंवा आपल्याला कशी जाणवते तर डिजाइन म्हणजे ती वस्तू काम कशी करते”..
  • “कधी-कधी आयुष्य तुमच्यावर नकळत फार मोठा आघात करतं, परंतु तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावू नका”.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !