जपानमध्ये होते हिंदू दैवतांची पूजा - देव धर्म

🔹 जपानमध्ये होते हिंदू दैवतांची पूजा, जतन केला जातोय भारतीय वारसा!🔹 

आपणांपैकी फार कमी जणांना हे माहिती असेल की जपानमध्ये कमीत कमी २० हिंदू दैवतं नियमीत पूजिले जातात. 

सरस्वती मातेची अगणित मंदिरं जपानमध्ये आहेत. सरस्वती शिवाय लक्ष्मी माता, इंद्रदेव, ब्रह्मा, गणेश ह्यांची उपासना जपानमध्ये प्रामुख्याने होते. एवढंच नाही, तर भारतीय हिंदू ज्या दैवतांना विसरून गेले आहेत, त्यांचीसुद्धा जपानमध्ये आराधना केली जाते. 
जपान फाउंडेशन आणि चित्रपट निर्माते तथा art-historian – Benoy K Behl ह्यांनी जपानमधल्या Indian Museum मध्ये काही दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन आयोजित केलं होतं,  ह्या फोटोंमधून जपानचं भारतीय पुरातन वारस्यासोबत असलेलं नातं दिसलं. 
Behl आपल्या research मधे म्हणतात, “गौतम बुद्धांच्या शिकवणीचा जपानी जीवनमानावर प्रभाव आहे. रोज अनेक लोक बौद्ध मंदिरांमध्ये जातात. गौतम बुद्धांशिवाय अनेक पुरातन भारतीय देवतांची आराधना जपानमध्ये होत असते. (ह्यामुळे) भारतीयांना जपानमध्ये घरी (भारतात) असल्यासारखं वाटतं. 
जपानने भारतीय वारसा जपल्याचं एक उदाहरण म्हणजे ६ व्या शतकातील संस्कृतची “सिद्धम” लिपी भारतातून नामशेष झाली असली तरी जपानमध्ये ती टिकवून ठेवली गेली आहे. 
एवढंच नाही तर ह्या लिपीतील संस्कृत बीजाक्षरंसुद्धा जतन केल्या गेली आहेत. प्रत्येक देवतेचं एक बीजाक्षर आहे, त्यामुळे ह्या बिजाक्षरांचा अर्थ जरी समजत नसला तरी त्यांना पवित्र मानलं जात Ⓜ 
Behl ह्यांच्या research नुसार, आजही कोयासन इथे “सिद्धम” लिपीत संस्कृत शिकवली जाते. 
अनेक जपानी शब्द संस्कृतमधून उगम पावतात. हेच काय, जपानमधे “सुजाता” नावाचा मोठा दूधाचा brand आहे. 
माहिती सेवा गृप पेठवड़गावची पोस्ट, Behl ह्यांच्या मतानुसार, Colonial education system मुळे भारताचा स्वतःच्या इतिहासाशी जसा संबंध तुटला, तसं जपानचं झालं नाही. म्हणूनच जपानमध्ये ऐतिहासिक वारसा जपल्या गेला आणि भारताला आपलाच इतिहास पाश्चात्यांकडून जाणून घ्यावा लागतो.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !