आंतरिक रंग - बोधकथा
एका रस्त्याने दोन वाटसरू चालले होते. त्यांच्यापैकी एकाला झाडाच्या खोडावर बसलेला एक सरडा दिसला. तो कोणता प्राणी आहे हे पाहण्यासाठी तो मनुष्य त्या झाडापाशी गेला असता, त्याला तो सरडा पिवळ्या रंगाचा दिसला. त्या वाटसरूने यापूर्वी कधीही सरडा पाहिला नसल्याने तो दुस-या वाटसरूकडे गेला व म्हणाला,'' अरे मित्रा पटकन बघ, त्या झाडाच्या खोडावर बघ कुठलातरी पिवळ्या रंगाचा प्राणी बसला आहे.'' दुसरा वाटसरू त्या झाडापाशी गेला तर तर त्याला तो प्राणी लाल रंगाचा असल्याचे आढळून आले. दुसरा वाटसरू पहिल्याकडे जाऊन म्हणाला,'' अरे मूर्खा, तुला तर लाल आणि पिवळा यातील फरक देखील कळेनासा झाला की काय? तो प्राणी तर लाल रंगाचा आहे,'' त्या सरड्याच्या रंगावरून दोघांमध्ये भांडण सुरु झाले, व दोघेही मोठमोठ्याने भांडू लागले. तिथून जाणा-या एका तिस-या वाटसरूने हे भांडण ऐकले व तो त्या दोघांच्या भांडणामध्ये पडला. दोघांनी तिस-याला विचारले,''तुम्ही शहाणे दिसता, तुम्हीच ठरवा की झाडावर दिसणा-या त्या प्राण्याचा रंग कोणता आहे.'' तिस-याने लांबूनच त्या प्राण्याकडे पाहिले व तो प्राणी म्हणजे सरडा आहे हे ओळखून तो म्हणाला,'' तुम्ही दाखवता तसाच एक प्राणी मी कालच पकडून माझ्याजवळच्या डबीत ठेवला आहे. तेव्हा प्रत्यक्ष तुम्ही दाखवता त्या सरड्यापाशी न जाता मी माझ्या सरड्याच्या रंगावरून तुम्हाला सांगतो की त्याचा रंग काळसर पांढरा आहे.''
असे बोलून तिस-या माणसाने आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ आपल्याजवळची डबी उघडून त्यातला सरडा बाहेर काढला तर त्या सरड्याचा रंग काळसर पांढरा होता. हे माणसांचे चालणारे
विनाकारणचे भांडण ऐकून सरड्याने विचार केला,'' मी तर एक रंग बदलणारा प्राणी आहे, मात्र एवढा माणसासारखा शहाणा प्राणी माझ्या बदलण्याच्या क्रियेवर किती मूर्खपणे विचार करतो आहे.''
तात्पर्य - आजच्या रंग बदलणा-या या दुनियेत जो कुणी रंग बदलणा-यांच्या नादी लागतो तो निश्चित तोंडघशी पडतो. वरच्या रंगाकडे न पाहता अंतरंगाकडे लक्ष दिल्यास माणुसकी वाढण्यास मदत होईल.
"माणुस मनापासून स्वच्छ अंतरंगाचा असावा."

Comments
Post a Comment
Did you like this blog