नमस्कार मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर ( डॉ, राजेंद्र भारुड )_ ___ माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं. जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती. अभिनेता अमीर खान आणि मी मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली का...
★★★★★★★★★★★★★★★★★★ सखाराम व लक्ष्मी हे दोघे पती-पत्नी हे एका गावामध्ये त्यांच्या 9 वर्षाच्या मुलासोबत राहत असतात. त्यांचा मुलगा श्रेयस हा अभ्यासात खूप हुशार होता पण तितकाच खोडकर ही होता. तो आईचे कधीच ऐकत नसे. पण तो आपल्या वडिलांचे मात्र ऐकत असे. श्रेयसला नवनवीन गोष्टी शिकायला खूप आवडतं असे. श्रेयस एकुलता एक असल्यामुळे त्याला दोघेसुद्धा काहीही बोलत नसत. तो लाडात वाढला होता. त्या गावामध्येच त्याच्या वडिलांचे एक छोटेसे इस्त्रीचे दुकान होते. ते नेहमी आपल्या घरचं काम आटपले की आपल्या दुकानात नियमित जात असत. जेव्हा श्रेयसच्या शाळेला सुट्टी असायची तेव्हा तो वडिलांच्या बरोबर दुकानात जाऊन बसत असे. वडील काय करतात याचे निरीक्षण करत असे. त्याला सारखे वाटत असे की आपणास आपल्या वडिलांसारखे कपड्यांना इस्त्री करण्यास जमेल का ? तो जेव्हा जेव्हा दुकानात जाई, तेव्हा तेव्हा त्याच्या मनात सारखा हाच प्रश्न येत असे. एके दिव...
🌸💐🌸 Plzzzzzzz वाचा रडणार म्हणजे रडणार माझ्या शहिद जवानांना ही कविता अर्पण ..... _______________ _________ ___________________ बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झालीय... तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय... घायाळ जरी झालो तरी अजूनसुद्धा लढतो आहे आई...इंच इंच जखमा छातीवर घेऊन पत्र शेवटचं लिहतो आहे, पत्र शेवटचं लिहतो आहे... लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई जशाच्या तश्या आठवतात या बर्फ़ावरती माझ्या डोळ्यातली आसवंसुद्धा गोठवतात खुपदा वाटतं आई तुझ्या कुशीत येऊन निजावं तुझ्या प्रेमाच्या वर्षावात पुन्हा एकदा भिजावं पण मला ठाऊक आहे, असं आता होणार नाही आली वेळ मला सोडून, रित्या हाती जाणार नाही आपलं घर आठवून आई, एकटाच रडतो आहे रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे... तुमच्यासाठी बाबा... बरंच काही करायचं होतं तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं पहा ना बाबा ! दैवानं आपला कसा घात केला माझ्या प्रेताचा भार सुद्धा तुमच्याच खांद्यावरती दिला तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून... मारणाआधीच मारतो आहे मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे.. तुझ्या स...
काय सांगू दादा, तुला दारुड्याची दशा, आंबील घेऊन बसतो, नी बुडवितो मिशा... दारुड्याला नाही, कुणी घालत भीक, त्याच्या पासून काही तरी, तू धडा शिक... नाही देत त्याला अन्न, नाही ठेवत भरवसा, उखळात घालून तोंड, भरून घेतो घसा... बनतो हा राक्षस सणा-सुदाच्या दिशी, बायको मुले जेवून, राहे हा उपाशी... थोडीशी पिऊनी, डरकाळ्या फोडतो, नशा चढली की, नालीत लोळतो... नशेच्या धुंदीत, मारतो बढाया खूप, पूजेला नाही मिळत, अगरबत्ती नि धूप... रुपेश शामसुंदर आक्केवार गडचिरोली
काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली : चेन्नईचा एक भिकारी रस्त्यावर मरून पडला. त्याचा पंचनामा करताना रस्त्याकडेच्या त्याच्या झोपडीत पैशांनी भरलेली काही पोती सापडली. पोत्यांत भरलेले पैसे पोलिसांनी मोजले तर ती रक्कम एक कोटी ८६ लाख आणि काही हजार इतकी होती. एवढी संपत्ती गोळा करून बिचारा भिकारी रस्त्यावर बेवारशी मरून पडला. या बातमीने विचारचक्र सुरू झालं: भिकार्याने आपल्या भिकारीच्या व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती घेतली असती तर? (व्यवसाय हा शब्द इथं मुद्दाम वापरला आहे.) साचवलेल्या पैशांत तो मरेपर्यंत चांगलं खाऊन (पिऊन नव्हे) जगला असता. किती छान वाटलं असतं त्याला भिकारीपणातून बाहेर येऊन. अनेक नवोदित भिकार्यांना तो भीकही देऊ शकला असता. पण नाही. ते त्याला जमलं नाही. याचं कारण असुरक्षितता, सवय आणि भीती. आपण जमवलेले पैसे नक्की किती, हेच त्याला स्वत:ला माहीत नसावं. आपण भीक मागणं बंद केलं तर आपण जमवलेले पैसे आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत नक्की पुरतील की नाही याची भीती त्याच्या मनात असावी. समजा जमवलेले पैसे खर्च करून ...
कृषी ग्रुप 1 : https://chat.whatsapp.com/Cjk5s983tMDCN8Lg4B9D2k कृषी ग्रुप 2 : https://chat.whatsapp.com/LOpsQHSSFCA3dpMezAYVBp किसान सन्मान निधी किसान सन्मान निधी कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे. १ हेक्टर = १०००० चौ. मी . १ एकर = ४० गुंठे १ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे १ आर = १ गुंठा १ हेक्टर = १०० आर १ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट १ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
झाडीबोली साहित्य मंडळ हास्य काव्य स्पर्धा दिनांक-१५-५-२०२० 😀😁😅😂🤣🤪😜🙄 हास्य काव्य रचना म्हातारा चाललंय लंडनला टकल्यावर टोपी नी पांढरी मिशी, नेसून धोतर घेऊन काठी, म्हणे आणीन एक जीवनसाथी, म्हातारा निघाला लंडन साठी... म्हाताऱ्याला लई झाली गडबड, करे मनातल्या मनात बडबड, जाईन मी आता लंडन, जरूर आणीन रविना टंडन... म्हातारा फिरवतो मिशिवरून हात, नाही त्याच्या तोंडात दात, सुपारी खायला जडजड होई, तरी म्हाताऱ्याला लग्नाची घाई... म्हाताऱ्याने बघितली एक मुलगी, करू लागला तिच्याशी सलगी, मुलीने विचारले म्हाताऱ्याच नाव, म्हातारा करू लागला काव-काव... म्हाताऱ्याला वाटली लग्नाची हौस, वाटेत पडला जोरदार पाऊस, गारपीठ वादळ आणि पाऊस भरभिर, टकल्यावर पडली भली मोठी चीर.. राकेश प्रभाकर धोटे, गडचिरोली. मो-९४०५१९४६३० 😀😆😅😂🤣😇😋 😛😳
एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की 'तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल'. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो. इंद्र त्याला म्हणतो, की 'तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो. त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास ? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते...
दादांच्या कार्यालयात त्यांचाच भाचा कामाला होता. दूरचे नाते असले तरी कामात मात्र दोघांचे सगळेच पटायचे. कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग हे रोजचेच झालेले. दादांना परिस्थिती सोसेनाशी झालेली. ‘ऑफिसमध्ये त्रास आहेच आणि घरीदेखील शांतता नाही,’ असे पुटपुटत दादा निघाले. संध्याकाळी घरी जायची वेळ होती. भाचाही घरी जाण्याच्या तयारीत होता. दोघे एकदमच उतरले. दादांनी भाच्याला म्हटले, बस माझ्या गाडीत ‘घरी सोडतो तुला.’ भाचा दादांच्या गाडीत बसला. कार्यालयापासून २०मिनिटांवर भाच्याचे घर होते. गाडी सुरू झाली व भाच्याचे घरही आले. वीस मिनिटे कशी गेली कळलेच नाही. गाडीत मौन होते, पण दोघांच्याही डोक्यात विचारांचा गोंधळ होता. घरी पोहोचल्यावर भाच्याने दादांना ‘चहा घेऊन जा’ असे म्हटले. उशीर झालेला तरी दादा उतरले. घराजवळ येऊनही आत न जाणे बरे दिसले नसते म्हणून दादा ‘पाच मिनिटांकरिता येतो’ असे म्हणाले. घराच्या दाराशी एक झाड होते. भाच्याने त्या झाडावर हात फिरवला, काहीतरी केले. दादांना काही कळले नाही. दाराची बेल मग त्याने वाजवली. दार उघडताच भाच्याच्या चेहर्यावरचे भाव एकदम बदलूनच गे...
Comments
Post a Comment
Did you like this blog