ज्ञानी व अज्ञानी - बोधकथा

आगगाडीचा प्रवास करीत असताना, एका प्राध्यापकाला आपल्या शेजारी एक आडाणी शेतकरी बसला असल्याचं आढळून आलं. स्वत:च्या ज्ञानाची घमेंड बाळगणारा तो प्राध्यापक थोडय़ाच वेळात त्या आडाणी शेतकर्‍याची थट्टा करून आजूबाजूच्या बसलेल्या प्रवाशांची करमणूक करू लागला. थोडा वेळ ती थट्टा निमूटपणे सहन केल्यावर तो शेतकरी त्या प्राध्यापकाला म्हणाला, साहेब, काही झालं तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अज्ञानी. तरीसुद्धा आपला गाडीतला वेळ चांगला जावा, म्हणून आपण एकमेकांना कोडी घालूया. मी आडाणी व गरीब असल्याने कोडं सोडवण्यात जर मी हरलो, तर मी तुम्हाला फक्त पाच रुपये द्यायचे आणि जर तुम्ही हरलात, तर तुम्ही मात्र मला पंचवीस रुपये द्यायचे. आहे कबूल?
 
शेतकर्‍यानं विचारलं, ज्याला उडताना तीन पाय, चालताना दोन पाय आणि बसला असता फक्त एक पाय असतो, असा पक्षी कोणता?
या कोडय़ाचं उत्तर देता न आल्यानं प्राध्यापक काहीसा ओशाळून म्हणाला, बाबा रे, मी हरलो. हे घे पंचवीस रुपये, आणि या कोडय़ाचं उत्तर तू मला सांग. प्राध्यापकानं दिलेल्या पंचवीस रुपयांपैकी वीस रुपये स्वत:च्या खिशात टाकून, उरलेले पाच रुपये त्या प्राध्यापकाच्या हाती देत तो शेतकरी म्हणाला, मला सुद्धा या कोडय़ाचं उत्तर देता येत नाही, म्हणून मी हरल्याचे पाच रुपये तुम्हाला देत आहे.
एक आडाणी शेतकर्‍याने हातोहात चकविल्यामुळे फजिती पावलेला तो प्राध्यापक झटकून तिथून उठला व दुसर्‍या डब्यात गेला.
 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !