त्या युवकांची वर्षाची उलाढाल आहे 2 कोटी

  *_व्यवसाय करणे कधी सहज शक्य होत नाही, त्यासाठी खूप मेहनत आणि त्याचबरोबर पैशांचे पाठबळ असणे गरजेचे असते. व्यवसाय करण्याच्या नवनवीन कल्पना नेहमीच अनेक लोकांच्या डोक्यामध्ये येतात, काही त्यामध्ये यशस्वी होतात तर काही अयशस्वी होतात.तुम्ही एखादा व्यवसाय करायचे ठरवले, तर तुम्हाला त्याच्यासाठी लागणारा  खर्च आणि भविष्यात होणार फायदा व तोटा यांचा अंदाज लावणे गरजेचे आहे._* 
पण जर तुमच्या व्यवसायाची संकल्पना चांगली असेल, तर तुम्ही कमी भांडवलामध्ये खूप नफा मिळवू शकता. याचेच एक उत्तम उदाहरण कानपूरमधील दोन युवकांनी दिले आहे. 
त्याच्या या भन्नाट कल्पनेमुळे खूप कमी भांडवलामध्ये त्यांनी  एक व्यवसाय सुरु केला आणि ते आज कोटींमध्ये नफा मिळवत आहेत. 

नदीमध्ये फेकली जाणारी फुले पाहून दोन मित्रांना एक अशी कल्पना सुचली, ज्याच्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलले. कचऱ्यामध्ये फेकले जाणाऱ्या या फुलांच्या मदतीने त्यांनी एक कंपनी उभी केली. ज्या कंपनीची सध्याची उलाढाल वर्षाला  जवळपास दोन कोटींची आहे. 

त्यांनी ‘हेल्प अस ग्रीन’ नावाची कंपनी सुरु केली आहे. ‘हेल्प अस ग्रीन’ कंपनीबद्दल कंपनीचा फाउंडर अंकित अग्रवालने सांगितले कि, कानपुरपासून २५ किमी दूर असलेल्या भौंती गावामध्ये त्यांचे ऑफिस आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत शहरातील २९ मंदिरांमधून दररोज जवळपास ८०० किलो टाकून दिलेली फुले एकत्र केली जातात आणि त्यांना अगरबत्ती आणि जैविक वर्मी कंपोस्टमध्ये बदलले जाते. 
यामुळे नदी-नाल्यांमध्ये घाण पसरत नाही. यातूनच या कंपनीचा व्यवसाय सुरु झाला. 
*लोक वेडे म्हणत हसले होते.* 
अंकितने अकरावीमध्ये त्याच्याबरोबर शिकलेल्या करण रस्तोगी या २९ वर्षीय मित्राबरोबर याबद्दल चर्चा केली. त्यावेळी करण फॉरेनमधून शिक्षण घेऊन भारतामध्ये परत आला होता. त्या दोघांनी गंगेमध्ये फेकल्या जाणाऱ्या फुलांबद्दल चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ठरवले की, नद्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रदूषणमुक्त करण्यासाठी काहीतरी वेगळे करावे लागेल. जेव्हा त्यांनी लोकांना सांगितले की, ते नद्यांना फुलांमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून वाचवण्यासाठी काही वेगळे करू इच्छित आहेत. तेव्हा लोकांनी त्यांना वेडे म्हणून त्यांची मस्करी केली. पण त्यांनी कोणाचीही पर्वा केली नाही. 
*७२ हजारांमध्ये सुरु केली कंपनी* 
अंकितने सांगितले की, 
“२०१४  पर्यंत मी पुण्यामधील एका सॉफ्टवेयर कंपनीमध्ये ऑटोमेशन साइंटिस्टच्या स्वरूपात काम करत होतो.  तर करण हा मास्टर्सच्या शिक्षणानंतर भारतामध्ये येऊन आपले स्वतःचे काम करत होता.”
अंकित आणि करण यांनी आपली जुनी कामे सोडून २०१५ मध्ये ७२ हजार रुपयाच्या भांडवलामध्ये ‘हेल्प अस ग्रीन’ कंपनी लॉंच केली. या दरम्यान त्यांना ओळखणारे लोक त्यांना वेडे म्हणत होते. दोन महिन्यानंतर ते आपले पहिले वर्मी कंपोस्ट उत्पादन घेऊन आले. ज्याला त्यांनी ‘माती’ असे नाव दिले. 
या त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल सध्या जवळपास सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त आहे. कानपूर, कन्नौज, उन्नाव यांच्या व्यतिरिक्त इतर काही ठिकाणी देखील त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे. 

२९ मंदिरांमधून दररोज जवळपास ८०० किलो टाकाऊ फुले एकत्रित केली जातात आणि त्यानंतर त्यांना अगरबत्ती व जैविक वर्मी कंपोस्टमध्ये रुपांतरीत येते. 
पहिल्यांदा त्यांच्या टीममध्ये दोन लोक होते. आज नऊ लोक आहेत. आज त्यांच्या ‘हेल्प अस ग्रीन’ या कंपनीला आयआयटीकडून चार कोटींपेक्षा जास्त रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. 
अशाप्रकारे एका भन्नाट कल्पनेमुळे या २८ वर्षीय तरुणाने कमी भांडवलामध्ये जास्त नफा मिळवणाऱ्या व्यवसायाची निर्मिती केली आणि त्याचबरोबर पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्यासाठी देखील हातभार लावला. 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !