अध्यात्म पुढे आहे का विज्ञान पुढे आहे ?

खूप छान प्रश्न आहे ।। यावर बोलायला आणि लिहायला जेवढा वेळ देणार कमीच ! 
अध्यात्माला "सुपर-सायन्स"म्हणतात . 
मी तरी अध्यात्मालाच पुढे म्हणेन ।।। 
अध्यात्मात नव-नवीन विचार-प्रवाह सतत येत असतात .१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात विवेकानंद ,योगानंद आणि इतर अनेक योगीजनांनी भारतीय अध्यात्माची विजय-पताका युरोप-अमेरिकेत फडकवल्या नंतर तेथील अनेक जिज्ञासू साधकांनी अध्यात्माचे वैज्ञानिक पृथ:करण करून प्राचीन भारतीय अध्यात्म एका नवीन दृष्टीकोनातून मांडले. नंतरच्या काळात २० व्या शतकात आणि २१ व्या शतकात सुद्धा अध्यात्माचे अनेक पाश्चात्य अभ्यासक भारतीय अध्यात्म नव्या दृष्टीकोनातून मांडत आलेले आहेत. 
२१ व्या शतकात अन्तरिक्ष आणि विश्व यासंदर्भात झालेल्या नवीन संशोधनातून मिळालेली माहिती आणि पचिन भारतीय अध्यात्मिक तत्त्वज्ञान यांची सांगड घालून पहिले असता काही आश्चर्यकारक तथ्ये समोर येतात .आपल्या पूर्वजांचे अवकाश,काल आणि मिती यासंदर्भातील ज्ञान हे आधुनिक वैज्ञानिक संशोधनाशी बर्याच प्रमाणात मिळते-जुळते आहे. तसेच विश्वात अनेक ब्रह्मांडे आहेत ,हे स्टीफन हॉकिंग यांनीही मान्य केले आहेत . 
याच्यावर आपण थोडा सखोल विचार करायला हवा की 
आपण पूर्वीपासून विष्णुलोक ,शिवलोक ,गणेशलोक इत्यादी नावे पुराण-कथा मधून ऐकत आलो आहोत. प्रत्यक्षात ही नावे विश्वातील अनेक ब्रह्मांडातील अन्य स्थानांची असू शकतात .कदाचित येणाऱ्या काळात आपण त्यांचे भौगोलिक स्थान ही निश्चित करू शकू .उदा. शिवलोक हा पृथ्वी पासून ५ अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहे इ. 
आपल्या विविध उत्सवातील गणपतीसारखी देवते ,त्यांच्या पूजा ,मंत्र इत्यादी गोष्टी या "त्या" मिती तून देवतांशी (म्हणजेच थोडक्यात ब्रह्मांडातील गणेश-लोकातील रहिवाश्यांशी) संपर्क साधण्याची साधने असू शकतात. नास्तिक विज्ञान-वाद्यानां ह्या भाकड-कथा वाटतील ,पण जरा विचार करा ,आपण आज ज्या वायरलेस तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी साध्य करतो, त्या गोष्टी इ.स.१८२० मध्ये जर कोणाला सांगितल्या असत्या तर त्यावर त्यांचाही विश्वास बसला नसताच! 
याचा अर्थ देव आहे ! फक्त विज्ञानाला देवाचा शोध लागायला आणि देव समजून घ्यायला काही वेळ जावा लागेल इतकेच 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !