हरवलेला फोन कसा शोधायचा ?

🌀 *आता तुमचा मोबाईल शोधणं कठीण नाही* 

🌀 *तुमच्या हातातला मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन एव्हाना तुमची 'जान' बनला असेल*... अनेक जणांना तर एक फोन अपुरा पडतो... त्यामुळे ते नेहमीच आपल्यासोबत दोन-तीन फोन बाळगतात. पण, हीच गोष्ट चोरांच्या फायद्याची ठरते. गर्दीच्या वेळी, ट्रेनच्या प्रवासात मोबाईल चोरण्यासाठी चोरांना फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत... किंवा कधी-कधी आपल्या निष्काळजीपणामुळेच आपण आपला महागडा मोबाईल गमावून बसतो... आणि त्यानंतर आपली जी अवस्था होते ती तुम्ही एकदा तरी अनुभवली असेल किंवा आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींची अवस्था पाहिली असेल... अशावेळी तत्काळ तक्रार कुठे दाखल करायची हे लक्षात येत नाही... आणि मग या स्मार्टफोनचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

🌀यावर उपाय म्हणून भारत सरकारकडून एक हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे हरवलेला किंवा चोरी झालेला स्मार्टफोन लवकरात लवकर मिळणं किंवा कमीत कमी त्याचा गैरफायदा होऊ नये याची खात्री करणं सोप्पं झालंय.  

🌀सरकारकडून एक सेन्ट्रल इक्विपमेंट आयडेन्टिटी रजिस्टर तयार करण्यात आलंय. यानुसार, हरवेलेल्या फोनचा आयएमईआय नंबर आणि मोबाईलशी निगडीत सर्व माहिती मिळू शकेल. तक्रारीनंतर हा फोन कोणत्याही नेटवर्कवर काम करणार नाही... पण, पोलीस मात्र सहजगत्या या फोनच्या लोकेशनपर्यंत पोहचू शकतील. दूरसंचार विभागाकडून पुढच्या काही आठवड्यांत ही सुविधा सुरु होऊ शकते. सुरुवातीला महाराष्ट्र सर्कलपासून सुरू करण्यात येणारी ही सुविधा लवकरच देशभरात लागू होईल.  

🌀 *कुठे तक्रार दाखल करणार?* 

त्यामुळे, तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर तुम्हाला केवळ *14422* या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. हा हेल्पलाईन क्रमांक सरकारकडून जाहीर करण्यात येणार आहे. या क्रमांकावर तुम्ही तुमची तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा पोलीस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागणार नाहीत... परंतु, तुमच्या स्मार्टफोनचा शोध सुरू झाला असेल. 

🌀 *कसा लागणार तुमच्या फोनचा शोध* 

सेन्ट्रल इक्विपमेंट आयडेन्टिटी रजिस्टरमध्ये तुमचा मोबाईल क्रमांक, सीम क्रमांक तसंच आयएमईआय क्रमांकाची नोंद असेल... हे रजिस्टर सर्व राज्यांतील पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलंय. त्याद्वारे, तक्रार दाखल झाल्यानंतर तुमच्या या मोबाईलमध्ये दुसरं सीमकार्ड वापरण्याचा प्रयत्न करण्यात आला तरी त्यात कोणतंही नेटवर्क काम करणार नाही... पण, या फोनचं लोकेशन मात्र तत्काळ पोलिसांच्या हाती लागू शकेल. 
✔️✔️✔️ 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !