मराठी माणूस मागे असण्याची २3 कारणे

मराठी माणूस स्पर्धेच्या युगात मागे का पडतो आहे, आर्थिकद्रुष्ट्या का कमकुवत होत आहे, बेकारी व गरिबी का वाढतच चालली आहे, मी हि त्यावर बरेच संशोधन केले व माझ्या निरीक्षणातून व शेकडो लोकांशी संपर्क साधून २3 कारणे शोधून काढली, जी मराठी माणसांनी समजून घ्यावीत . आपण स्वतःला विचारावित व त्यावर स्वतःच उपाय योजना करावी . ह्या गोष्टी सकारात्मकतेने घेतील हि विनंती. मागासलेपणाची २3 कारणे -

१) कमी प्रवास -     प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही , अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही 

२) अति राजकारण - मराठी सामाज राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो . व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का ? 

३) दोनच हाथ कमवणारे-   सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे . 

४) सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला -   कुटुंबात एकी नसते बाप एका दिशेला,मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच . प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे . 

५) खोटं  बोल पण रेटून बोल -     सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते . 

६) आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष -   आरोग्याकडे अत्यंत दुर्लक्ष, महागाईमुळे उपचारही परवडत नाही, देशी व थातुरमातुर उपचार केले जातात . 

७) आर्थिक निरक्षरता -    पैसे काय आहे तो कसा वापरायचा, शेअरमार्केट, डिमॅट, फॉरेन एक्ससेंज, डॉलर, आय टी याची खूप कमी माहिती शिकलेल्या लोकांनाही नाही. ९०% महिलांचे तर साधे पॅनकार्ड सुद्धा नसते . 

८) दूरदृष्टीचा अभाव -   पुढील ५, १०, २० वर्षाच्या योजना आखाव्या लागतात त्यावर आजपासूनच काम करावे लागते. अशा दृष्टीमुळे नियोजन होते व माणसे कामाला लागतात . 

९) *ऐतिहासिक स्वप्नात* -  अजूनही मराठी माणूस ऐतिहासिक स्वप्नात जगत आहे. तेव्हा सत्य परिस्थितीचे भान ठेऊन उद्योग करून पैसे कमावला पाहिजे . 

१०) *गृहकलह, कोर्टकचेरी* -   गृहकलहाचे प्रमाणही प्रचंड आहे .भावाभावातच वाद. संपत्तीवरून भावकीत वाद , वादावादी, मारामारी, खून, कोर्टकचेऱ्या सामंजस्य पणें निपटावे व प्रगतीच्या मार्गे लागावे . 

११) *समाज अर्थपुरवठा पद्धत* -  नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दरात किंवा बिनव्याजी ताबडतोब अर्थपुरवठा करण्याची व समाजातील सर्वाना वरती आणण्याची पद्धत गुजराती, मारवाडी, सिंधी, समाजात आहे. तशी मराठी समाजात आढळत नाही . 

१२) *जनरेशन गॅप* - खूप मोठा जनरेशन गॅप कुटुंबात जाणवतो, एखादा हुशार तरुण उद्योग करतो म्हटले कि त्यालाच येड्यात काढले जाते. जुन्या लोकांच्या डोक्यातून नोकरी अजून जात नाही . 

१३) *ज्ञानापेक्षा सर्टिफिकेट* -   प्रत्यक्ष व प्रॅक्टिकल ज्ञानापेक्षा पदवीच्या सर्टिफिकेट ला जास्त महत्व आहे, काहीतरी करून पदवी मिळवायची बस त्यामुळे सिविल इंजिनियर झाले बेरोजगार फिरतो व बाहेरच्या राज्यातून आलेला प्लंबर, गवंड्यांचे काम करून झाले महिना ५० हजार कमवतो . 

१४) *धरसोड वृत्ती* - हे प्रमाण प्रचंड आहे, थोडे दिवस खासजी संस्थेत नोकरी आता शेती करतो, ते हि अशा धरसोड वृत्तीमुळेच आयुष्यातील १० वर्ष निघून जातात. एकदाच ठसून एखाद्या क्षेत्रात टिकून राहिले पाहिजे . 

१५) *कष्टाची लाज* - विशेषतः सुशिक्षित तरुणांना कष्टाची लाज वाटते, मी एमए, बीइ, बीएड, झालोय म्हणजे मला इस्त्रीचे कपडे घालून फिरण्याचा अधिकार आहे असे समजतात. स्वतःच्याच शेतात कष्टाची कामे करण्यास लाज वाटते. 
व्यसनाधीनता + रुबाब = Attitude

१६) *फालतू बाबींना महत्व* - एकत्र येणे प्रगती साधणे, उद्योग उभारणे हे मुख्य विषय बाजूला राहिलेत, पण मराठी माणूस अजून लग्नपत्रिकेत नाव नाही टाकले, लग्नात आहेर नाही केला, अशा फालतू बाबींमध्ये मराठी माणूस अडकला आहे. 

१७) *दुसऱ्यांच्याच अपयशात आनंद* - भावाचा ऊस जळाला, म्हैस गेली कि दुसऱ्या भावाला भलताच आनंद व उकळ्या फुटतात, अगदी आपल्या सख्ख्या भावाचं चांगले झाल्यावरही बघवत नाही हे आश्चर्य. मराठी माणूस मराठी माणसाचा शत्रू आहे. 

१८) *इंग्रजी कच्चे* - मराठीचा अभिमान जरूर बाळगावा पण जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व पुढे जाण्यासाठी अस्सलिखित इंग्रजी बोलने, लिहिणे, वाचणे आलेच पाहिजे, अति उत्तम इंग्रजी आलेच पाहिजे . 

१९) *संवादकौशल्याचा अभ्यास* - जीवनात व उद्योगात पुढे जाण्यासाठी आपण दुसऱ्यांशी संवाद करतो ह्या कौशल्याचे खूप मोठे महत्त्व आहे . मोठे प्रोजेक्ट मिळवणे, काम मिळवणे , विविध स्थानिक अधिकारी वर्ग इतर व्यक्ती यांनाही आपण प्रत्यक्ष पत्रव्यवहार, इ -मेल द्वारे, फोने वर असा उत्कृष्ठ संवाद साधतो हे शिकले पाहिजे . 

२०) *चाकोरी मोडत नाही* - जुन्या पद्धतीने काम चालू आहे . त्यामुळे प्रगती होत नाही , मतदार संघात काहीही काम न करता कित्येक दशके तोच आमदार निवडून येण्याचे प्रकार दिसतात . 

२१) *जाती प्रथा* - जाती प्रथेचा पगडा प्रचंड आहे. एकाच गावात व एकाच गल्लीत १० वेगवेगळ्या जातीचे पुढारी आहेत . संपूर्ण समाज अनेक जातीत विभागला गेला आहे, त्यामुळे अशा समाजाची ताकद तीक्ष्ण झाली आहे . 

२२) *वेळेची किम्मत* - वेळेचे महत्व समजलेले नाही अनेक व्यक्ती आयुष्याच्या वेळेचा प्रचंड अपव्यय करताना दिसतात . बारसे ,साखरपुडा , मुलगी बघणे, विवाह, यात्रा, मयत, प्रचार सभा, निवडणूक, वारी, देवदर्शन, राजकारण, या अनेक बाबींसाठी एका व्यक्तीचे सरासरी वर्षातले १०० दिवसाहून अधिक काळ जातो.

23) *भावकीच राजकारण* - पुढारीपण करतात भावकीच्या ताकतीवर, राजकारण ज्ञान कमी, गावामध्ये वेगवेगळ्या भावकीच्या पुढारी, गाव सोडून बाहेर नाहीत, फक्त गावामध्ये मोठे पणा मिरवण्यात (वेळ) दिवस वाया घालवतात, नंतर भावकी भावकी मध्ये मोठे कोण ह्या मध्ये ईर्षा चालते, त्यावेळी प्रगतीची वेळ निघून गेलेली असते.

मित्रांनो कडवट आहे पण सत्य आहे !
कधीही कष्टाची लाज बाळगू नका !
आणि जो दुसरा कोणी 
कष्ट करून खातो आहे....
त्याला विनाकारण त्रास देऊ नका
स्वतःच्या प्रगतीसाठी धडपड करा !




            असेच लेख.          
वाचण्यासाठी आमचा ब्लॉग
         फॉलो करा              

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...