शिवकालीन वजने(मापे)
- * अठवे- शेराचा 1/8
- * अडशेरि- अडीच शेर
- * अदपाव- अर्धा पावशेर
- * अदमण- अर्धा मण
- * अदशेर- अर्धा शेर
- * अधोली- अर्धी पायली
- * अंजली- ओजळभर पानी
- * आटके- अर्धा शेर
- * आढक- चार शेर, पायली
- * कर्ष- सोळा माषांचे एक परीमाण
- * कार्त- पाव रत्तल
- * किळवे- अर्धा छटाक, अर्धे निवळे
- * कुडव- आठ शेर
- * कुंभ- वीस खंडी
- * कोथळी- मुंबईत 6 मणांची गोनी
- * कोड- खंडी, वीस मण
- * कोळवे- शेराचा अष्ठमांश
- * खारी- 16 द्रोण, एक खंडी
- * गरांव- अर्ध गूंज माप
- * गिधवे- धान्य मोजन्याचे एक माप
- * गुंज- एक वजन परिमाण
- * चंपा- दोन शेर धान्याचे माप
- * चवाटके- छटाक
- * चवाळामण- एक प्रकारचा मण
- * चाटंक- पांच तोळे वजनाचे परिमाण
- * चाळीसा- चाळीस शेरांचे माप
- * चिटके- अर्ध्या कोळव्याचे माप
- * चिपटे- पावशेराचे माप
- * चिमटी- हाताचा अंगठा व तर्जनी याच्या पकडित मावनारा पदार्थ
- * चिळवे- कोळव्याचा निम्मा भाग
- * चोथवा- एक पायली
- * चौटके- चार टाकांचे माप,छाटाक, चवटके
- * चौशेरी- चार शेरांचे माप
- * छटाकी- छटाक
- * छतिसी- छत्तीस परिमानाचे वजन
- * टवणा- पांच शेरांचे माप
- * टांक- एक तोळा
- * टिपरी- मापी पावशेर
- * टोमणे- पांच शेरांचे तेल मोजन्याचे माप
- * टवका- दोन्ही हातात मावेल एवढे परिमाण, कवटा
- * डवक- वस्तुवर पाचही बोटे पसरुन मारून घेतलेले परिमाण
- * डोळा- 16 शेरांचे माप
- * धडा- दहा शेरी वजन केलेल्या मापाचे परिमाण
- * धरण- सुमारे 24 गूंजाइतके वजन
- * नकटे- अर्ध्या पावशेराचे माप,निपटे,नवटाक,10 तोळ्यांचे वजन
- * नग- कापसाचे वजन करण्याचे एक परिमाण
- * नाकटी- दीड पावशेराचे माप
- * नाळके- एक माप
- * निउटके- शेराचा बत्तीसावा हिस्सा
- * तोळा- 96 भार गुंजांचा तोळा
- * पक्का शेर- 80 तोळ्यांचा शेर
- * पड- मापी 2 शेर, पाउन शेर
- * पल- 40 मासे वजन, 380 गुंजांचे वजन
- * पल्ला- 30 पायली किंवा 120 शेर, 120 शेरांचे अडीच मणाचे पक्के वजन
- * पान- पावशेर
- * पाभ- एक प्रकारचे माप
- * पायली- चार शेरांचे माप
- * पायली- 48 शेरांची खानदेशि एक पायली
- * पिक्कल- 5320 सुरती रूपये भार वजन
- * पिटके- अदपाव
- * फरा/फरी- धान्य मोजन्याचे साधन
- * बेताळामण- 1568 सुरती रुपयांचे एक माप
- * भरा- धान्याचे एक माप
- * भरो- चार खंडीचे कुडाळ प्रांतातिल एक माप
- * भार- आठ हजार तोळे वजन
- * मणखाण- सुमारे एक मण
- * मणका- एक मणाचे माप
- * मापटे- अर्धा शेर
- * मापारी- धान्य ई. मोजन्याचे फरां नावाचे एक माप
- * माष- पांच, आठ किंवा दहा रत्तीच वजन
- * मासा- आठ गुंजांचे वजन
- * मुटला- सहा शेराची गुळाची ठेप
- * मूठ- मुठभर धान्य
- * रत्तल/रतल- सुमारे 15 औसांचे म्हणजे 36 सुरती रूपयांइतके वजन
- * रोवळा- एक माप
- * लिक्षा- मोहरीच्या दाण्याच्या एक षोडशांश वजनाइतके परिमाण
- * वाल- तिन गूंजाभर वजन
- * वैताद- एक तृतयांश तोळा
- * शणपो- भात मोजन्याची मोठी ओंजळ
- * शिरिद- पावशेर
- * शीग- धान्याचे माप भरले असता मापाच्या वर येणारी निमुळती रास
- * शिगवर- अगदी शीग लोटून सपाट केलेले माप
- * शेर- पदार्थ तोलावयाचे किंवा मापावयाचे एक प्रमाण
- * साक- एक हाताची ओंजळ
- * सामाशी- सहा मासे वजनाचे
- * सोट- सुमारे 20 पायली धान्य भरून तोंड शिवलेले पोते.
सौजन्य : व्हाट्सअप
अशाच नवीन नवीन
माहितीसाठी आमच्या
ब्लॉगला फॉलो करा
असेच लेख.
वाचण्यासाठी आमचा ब्लॉग
फॉलो करा
Comments
Post a Comment
Did you like this blog