◼️बोधकथा :- निसर्गाचे न फिटणारे ऋण
कथेचे शीर्षक : निसर्गाचे न फिटणारे ऋण...
कथेचे स्वरूप : संवाद
कथेतील पात्र :
१.अरुण
२.रोहन
३.रामुकाका
४.पाटील सर
▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️
अरुण आणि रोहन शाळेला निघाली असतात त्यांच्या सोबत रामुकाका पण शेतापर्यंत चालत येतात त्यांच्या खांद्यावर कुऱ्हाडी पाहून रोहन विचारतो ?
रोहन : काका हि कुराड कशासाठी नेत आहात .
काका : अरे रोहन ही कुराड जनावराच्या गोठ्यासाठी कुरमड आणाया जात आहे .
अरुण : काका त्यासाठी तुम्हाला झाड तोडावे लागेल .
काका : हो रे अरुण पण हे सर्व का विचारतोस .
अरुण : याचे कारण काका कदाचित तुम्हाला माहीत असेल नसेल पण मी सांगतो ,आज पृथ्वीतलावर सजीव सृष्टी असण्याचे एकमेव कारण वृक्ष आहेत .
काका : अरे उगाच काय म्हणतो.
रोहन : अरुण खरं बोलतो काका झाडं आहेत ,म्हणून पाणी पडतं ,झाडं आहेत म्हणून सजीव जगतात ,त्यांनी निर्माण केलेल्या ऑक्सीजन वरच, खरंतर आपल्याला निसर्गाचे कधीच ऋण फेडता येणार नाहीत. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या हिश्श्याचे एक तरी झाड नक्की लावावे. तुम्ही विचार करा काका ऑक्सीजन नसते तर माणूस जगू शकला असता का ? "असे जर असते तर अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग चंद्रावर राहिली असती घर बांधून ते परत पृथ्वीवर आले नसते".
अरुण : आणि काका झाडे आपल्याला अजून कितीतरी गोष्टी देतात जसे - की फळे, सावली ,औषधे ,डिंक इत्यादी .
रोहन : काका झाडे हे देताना कधीच पाहत नाहीत की घेणारा त्यांचा मित्र आहे की शत्रू, ते सर्वांशी समान वागतात.
काका : मला समजतं रे पोरांनो हे, पण गुरांच्या गोठ्यासाठी कुमरड पण तितकेच महत्वाचे आहे की .
अरुण : काका त्यासाठी मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत ,जसेकी सिमटी कुरमड ,लोखंडी कुरमड .
रोहन : आणि काका हे लाकडी कुरमडापेक्षा जास्त मजबूत आणि टिकाऊ असतात .
काका : बाळांनो तुम्ही आज मला खूप चांगली माहिती दिलीत ती मी नक्की वापरीन आणि गावात पण सर्वांना सांगेन .खरंच आज मला तुमचा खूप अभिमान वाटतो, तुम्ही आपल्या गावाचे नाव नक्की मोठे कराल असं वाटतं .मी आजच बाजारातून सिमटी कुरमड विकत आणतो .आता तुम्हाला उशीर होईल लवकर शाळेत जावा .
रोहन : खरंच काका शाळा भरायला पाच मिनिटे राहिली आहेत जातो आम्ही ,आता बाय .
(असे म्हणून अरुण रोहन शाळेकडे व रामुकाका घराकडे परत जातात . शाळेत उशीर झाल्याने पाटील सर अरुण रोहनला दरवाजातच थांबवतात आणि उशिरा येण्याचे कारण विचारतात तेव्हा अरुण सांगू लागतो .)
अरुण : सर आम्ही शाळेत येत असताना रामुकाका आमच्या समवेत शेताकडे येत होते, त्यांच्या खांद्यावर कुऱ्हाड होते .कुऱ्हाड पाहून आम्ही काय ते समजलो त्यांना विचारले असता कळले गोठ्यासाठी मुरमड आणायला निघाले आहेत. आम्ही त्यांना झाडाचे महत्व समजावून सांगितले आणि त्या बदल्यात लाकडी कुरमडा ऐवजी लोखंडी किंवा सिमटी कुरमड वापरण्यास सांगितले ते त्यांना खूप आवडले त्यामुळेच आम्हाला उशीर झाला हे ऐकून पाटील सर व सारा वर्ग त्या दोघांचा टाळ्या वाजवून सत्कार करतो आणि पाटील सर त्यांना वर्गात येण्यास सांगतात .
▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️
तात्पर्य : निसर्गाचे आपणावर मरेपर्यंत ऋण असतात ते आपणाला कधीच फेडता येणार नाहीत .
माझ्याविषयी :-
लेखक : अर्जुन अप्पाराव जाधव
पत्ता : मु.नंदनशिवनी ता .कंधार जि .नांदेड
मो : 7887766849
असेच लेख.
वाचण्यासाठी आमचा ब्लॉग
फॉलो करा
Comments
Post a Comment
Did you like this blog