◼️ दिनविशेष :- भाऊबीजेची कथा


सूर्याला दोन अपत्य होती. मुलाचे नाव यम आणि मुलगी यमुना अशी त्याची नावे होत. सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला खूप कमी जात असे. यमाला माहीत होते की तो मृत्यूची देवता आहे म्हणून आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्या वर कोणतेही संकट यायला नको आणि म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा. यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे त्यांच्या घरी येणे अजिबात आवडत नव्हते, पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती लहानपणापासून एकत्र राहिलेले, पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नसे, आणि त्यामुळेच यमुनेचे यमाला खूप कळकळीची विनंती केली. त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले. ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला, तो दिवस म्हणजेच कार्तिक शुध्द द्वितीया होय..!! यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुने नेे त्याचे अगदी आनंदाने आदरतिथ्य केले. पाटावर बसवून त्याला ओवाळले..! यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला, यमुने माग अजुन काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून! तेव्हा यमुना म्हणाली "मला तर कसली कमी नाही, नको धन नको आणखी काही पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा..! आणि हो, या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल त्या तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको ..! त्यांचे मृत्यू पासून संरक्षण करावे." यमाने यमुनेला तथास्तु म्हटले, आणि म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरी करतात. या दिवशी बहीण भावाला ओवाळत आपल्या भावावर कोणत्याही प्रकार चे संकट येऊ नये आणि आलेल्या संकपासून त्याचे रक्षण व्हावे हाच यामागील उद्देश होय.
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !