◼️ बोधकथा :- झाकली मुठ सव्वा लाखाची...


       मराठीचा तास वर्गात चालू होता. शिक्षिक मुलांना एक एक करुन म्हणी व त्याचा अर्थ समजवित होते. मराठी माध्यामचा

तीसरी चौथी इयत्तेचा वर्ग. 

     शिक्षिकांनी म्हण वाचली .झाकली मुठ  सव्वा लाखाची .व म्हणाले," जो पर्यत  चोरी उघकडीस येत नाही  वा गुपित उघडकीस येत नाही, तो वर गुपित ठेवलेल्या वचनांना वा शब्दांना ..मान असतो ..विश्वास असतो. "

    वर्गात मंदा विचारात पडली ...तिची शाळा व घर अगदी जवळ होते. इतके की धावत जाऊन घरी दोन मिनीटात परत शाळेत येऊ शकायची. तिच्या मैत्रीणीची घरे लांब होती. त्या रोज 2/3 आणे कधी कधी घेऊन यायच्या व शाळेजवळ विकायला बसणा- या फेरी वाल्याकडून कधी लिमलेटची गोळी ...कधी दाणे फुटाणे ....तर कधी विलायती चिंच विकत घ्यायच्या. मंदाला पण सहज एकदा मन झाले तिने घरून कपाटातून 1 आणा घेतला. हो घरात आई वडील तिचे कधी बंद कपाट ठेवत नव्हते .

त्या मुळे सोईचे झाले . 

तिने पण तिला जे मनात आले ते  फेरीवाल्याकडून विकत घेतले व त्या घेतलेल्या वस्तूचा आनंद घेतला. पण मग पुन्हा  हात सरसावला असे करता असता तिने घेतलेली वस्तू घरी येऊन आजीला पण दिली ..

आजीने विचारता सरळ खोटे सांगितले  की मैत्रीणीने दिले .आजीचे फार प्रेम नातीवर ..असे बरेच दा केले पण कोणास कळले नाही .पण....

  आज वर्गात शिक्षक शिकवत असता त्या बाल मनास प्रश्न पडला ...

      अरे मी पण न सांगता घरातून पैसे घेत आहे ...ही चोरी आहे.  अजून कोणास कळली नाही ...आज पासून बंद 

नाहीतर आपली झाकली मुठ सव्वा लाखाची उघडी होईल.. तो दिवस व पुढे आयुष्यभर ती नेक राहिली. असा परिणाम शिकवलेल्या म्हणीचा मंदा वर झाला . व सहजच तिला तिच्या चुकूचा बोध झाला .चूक उमजली. म्हणतात ना झाकली मुठ सव्वा लाखाची


लेखिका :- वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

गुजरात

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾ललित लेख :- स्ञी

◾कविता :- नवरा माझा

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

खगोल शास्त्रातील मराठी साहित्य - Knowledge