◾News : महासंग्रामात' साहित्यिक बाबा चन्ने व इंजिनियर श्रध्दा चोबे यांनी सत्य इतिहासावर प्रकाश टाकला

  'महासंग्रामात' साहित्यिक बाबा चन्ने व इंजिनियर श्रध्दा चोबे यांनी  सत्य इतिहासावर प्रकाश टाकला


पुणे/प्रतिनिधी :

        कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे यावर्षी 'महासंग्राम' ग्रुपमार्फत ऑनलाईन वैचारिक महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी करण्यात आली. या ग्रुपचे प्रमुख संग्राम सलगर यांनी वैचारिक जयंतीसाठी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी तथा वर्ड लॅन्ड पब्लिसिंग हाऊसचे संपादक बाबा चन्ने व सुप्रसिद्ध कवयित्री, रेडिओफेम तथा इंजिनियर श्रध्दा चोबे यांची निवड केली होती. 

         कार्यक्रमाच्या सुरवातीलाच बाबा चन्ने यांनी अकबर किती क्रूर होता. हे पुराव्यानिशी मांडले. तसेच इतिहास लिहितांना इतिहासकारांनी क्रूर अकबराला 'द ग्रेट अकबर' का सिध्द केले असावे. असा प्रश्न देखील उपस्थित केला. त्याचप्रमाणे ज्या महाराणा प्रतापसिंहानी हिंदुस्थानचा इतिहास आपल्या रक्ताने लिहिला त्यांना इतिहासकार, लेखक का विसरतात ही खंत देखील बाबा चन्ने यांनी व्यक्त केली. 

     बाबा चन्ने यांनी महाराणा प्रतापसिंहांविषयी मत मांडताना दिल्लीच्या तख्तापूढे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत न झुकणारा राजा, हिंदुस्थानचे सोनेरी पान म्हणजेच महाराणा प्रतापसिंह, त्यांचा त्याग, त्यांचे बलिदान, मातृभुमीविषयी त्यांची आस्था, कला, साहित्य, संस्कृतीवर मनापासून प्रेम करणारा राजा, अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण विचार मांडले.

       तसेच इंजिनियर श्रध्दा चोबे यांनी पण महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनचरित्रावर विविध विषय मांडले. त्यात हळदीघाटी युध्द, महाराणा प्रतापसिंहांचा पराक्रम, भिल्लाची महाराणा प्रतापसिंहांना साथ, कर्नल टाॅडने लिहिलेला महाराणा प्रतापसिंह यांचा इतिहास असे वेगवेगळे पैलू श्रध्दा चोबे यांनी मांडले 

      ऑनलाईन कार्यक्रम महासंग्राम या साईटवर चालू असतांना अनेकजन साईटवर उपलब्ध होते. तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन संग्राम सलगर व धनराज गमरे यांनी केले होते.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !