◾विशेष लेख :- पर्यावरणाचे करा रक्षण , उज्वल भविष्याचे हेच धोरण

“ पर्यावरणाचे करा रक्षण , उज्वल भविष्याचे हेच धोरण ”


      पर्यावरणाशी संबंधित विविध विषय , घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरुकता निर्माण करणे , पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पाऊल उचलणे असा पर्यावरण दिवस साजरा करण्या मागचा हेतू आहे म्हणून दरवर्षी आपण ५ जून हा दिवस  "जागतिक पर्यावरण दिन"  म्हणून साजरा करतो . मानव हा पर्यावरणाचाच एक कुशाग्र घटक आहे . आपण खातो ते अन्न , श्वास घेतो ती हवा , पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टीमुळे आपण पृथ्वीवर राहू शकतो . या सर्व गोष्टी आपल्याला निसर्गाकडून मिळत आहेत . 

     सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय स्वत : ची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे . जगातील जवळपास शंभर पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो . यामागील मुख्य उद्देश इतकाच की , जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे . जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळया पध्दतीने साजरा करता येऊ शकेल . जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करुन वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल . हवामान बदलातील फरक लक्षात घेता शितगृहातून निघणाऱ्या क्लोरेफ्ल्युरो कार्बन ( CFC ) वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे . 

     पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी आज सभा , संमेलने , चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे . घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे , घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे , कारखान्यांच्या धुरांडयापासनू तसेच वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनाची रासायनिक तपासनी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे . सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे सरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमाणसात पटवून देणे गरजेचे आहे . 
*“ दररोज पाणी द्या झाडांना , भविष्य मिळेल मुलाबाळांना ”* . 

     नदयांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत . त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुध्दीकरणाची यंत्रणा उभारणे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत . त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुध्दीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे .. पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करुया . पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणाऱ्या वस्तू जसे पेपर , काचेच्या वस्तू , अल्युमिनियम , मोटरऑईल अशांची पुनःनिर्मिती करुया . जे काम हातांनी होते अशा कामांना इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करुया . शक्य असल्यास गरम पाण्याएवजी थंड पाण्याचा उपयोग करुया . प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर टाळूया . पाण्याचा गैरवापर करणे थांबवूया . गरज नसल्यास घरातील टी.व्ही . , बल्ब , पंखे तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवूया . घरातून बाहेर पडतांना पाण्याचा हिटर , पंखा विजेचा दिवा बंद करण्याची सवय लावूया . आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असतांना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करून चालणार नाही . असे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि खऱ्या अर्थाने समृध्दीच्या दिशेने वाटचाल करु . आज पर्यावरण शिक्षणाची फार गरज आहे . यात पर्यावरणाविषयी ज्ञान , आकलन , कौशल्य , जागृती आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्येकाने आपली सकारात्मक मनोभूमिका निर्माण करणे आवश्यक आहे . तसेच पर्यावरण शिक्षण ही एक सातत्यपूर्ण जीवनभर चालणारी प्रक्रिया आणि हे शिक्षण सर्व शालेय स्तरावर औपचारिक व अनौपचारिक स्वरुपात असेल . जेणेकरुन पर्यावरणविषयक एकसंध आणि संतुलित दृष्टिकोण प्रत्येक मानवामध्ये निर्माण होईल . 

     आपल्या देशात पर्यावरणाची गुणवत्ता विकसित करणे , जनतेमध्ये पर्यावरण संरक्षणाची व संधारणाची उर्मी निर्माण करणे आणि निर्णय घेण्याची पात्रता विकसित करणे ही पर्यावरण शिक्षणाचे मुख्य ध्येय ठरविण्यात आलेले आहेत . 
" प्रत्येकजण पर्यावरणाची काळजी घेईल , तर आपला देश महान होईल " . 

     कोरोनाशी लढणाऱ्या जगाने लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारल्यानंतर आपल्या पृथ्वीने घेतलेला मोकळा श्वास वेगवेगळया माध्यमांनी टिपला . कुठे ओझोनच्या थराला पडलेलं भोक भरुन यायला लागलं , तर कुठे हवेतलं प्रदूषण निवळून वातावरण स्वच्छ झालं , जालंधरसारख्या शहरांना तर अनेक वर्षानी हिमालयाचं दर्शन घडलं , दिल्लीमध्ये कितीतरी दिवसानंतर सर्व वातावरण साफ होऊन तिथली यमुना नदी स्वच्छ झाली . एकीकडे हे होत असताना दुसरीकडे याच पर्यावरणातल्या एका घटकाकडून दुसऱ्याकडे आलेल्या एका विषाणूने जगभर थैमान घातलय . पर्यावरणाचा आणि आपल्या आयुष्याचा किती जवळचा संबंध आहे हे या जागतिक साथी दरम्यान सगळयांच्याच लक्षात आले . आज सर्वाच्या लक्षात आले आहे की सर्वानी पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी . सर्वानी आपल्या आजूबाजुला झाडं लावून त्याची निगा राखायला हवी . 
“ वृक्षतोड करु नका , भविष्य धोक्यात टाकू नका ". 

=======================

महेन्द्र सोनेवाने
गोंदिया
दिनांक : ०१/०५/२०२१

=======================


टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...