आणि तिने त्याच्याशीच लग्न केले | एका सैनिकाच्या आयुष्याची भावनिक कथा | संजय धनगव्हाळ

 'आणि तिने त्याच्याशीच लग्न केले'

एका सैनिकाच्या आयुष्याची भावनिक कथा

(संजय धनगव्हाळ)

******************

जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच आयुष्यात  काहीतरी ध्येय असतं एक स्वप्न असतं कुणाला मोठा अधीकारी व्हायचं असतर तर कुणाला राजकारण,नाहीततर समाजीक कार्यात सक्रिय व्हायचं असते.प्रत्येकाची काही ना काही ईच्छा असुन तो त्याच अनुषंगाने वाटचाल करत असतो.पण सागरने देशसेवेसाठी स्वतःला अर्पण करायच ठरवले आणि त्याप्रमाणे तो प्राथमिक प्रशिक्षण घेवू लागला.देशसेवा त्याच्या नसानसात भिनली होती जेव्हा जेव्हा समाजकंटका कडून देशावर आपत्ती यायची किंवा काही घातपात घडवून यायचा त्यावेळी सागरची देशभक्त उफाळून यायची त्याच्या अंगातल रक्त उकळायचं आपण देशासाठी काहीतरी केलेच पाहिजे म्हणून तो खूपच भावनिक व्हायचा.

खर तर सागर हा वामनरावांचा एकुलता एक मुलगा घरची परिस्थिती उत्तम वामनराव सदन बागायतदार शेतकरी,व समाजकार्यातही नावाजलेले,पैशांची आवक भरपूर कुठेच काही कमी नाही.काही न करता नुस्त बसून जरी खाल्ले तरी सागर त्याचे आयुष्य सुखासुखी  घालवू शकला असता. पण एखाद्याने जे ठरवले ते त्याला स्वस्थ बसु देत नाही.असचं काही सागरच्या बाबतीत होतं त्याच ध्येय,त्याची स्वप्न महासागरासारखी विशाल होती,उतुंग होती तो देशाच्या सेवेसाठी तत्पर होता.प्रसंगी विरमरणही पत्करावे लगते हे माहीत असतानाही

शहीद होण्याची जराही भिती सागरला नव्हती

*देशासाठी जन्मलो*

*देशासाठीच मरणार*

 *हिमालयाच्या उंच शिखराव*

*फक्त तिरंगाच फडकणार*

एव्हढे देशप्रेम,देशभक्ती सागरच्या रक्तात ओतप्रोत भरलेल होती

तरीही आईवडीलांसह अनेकांनी त्याला समजावले पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता.

शेवटी काय वयाच्या विसाव्या वर्षीच सागरला  मिल्ट्रीत नौकरी मिळाली.

थोडा आनंद जराशी नाराजीचा भाव चेहऱ्यावर असताना आईवडीलांसह साऱ्या गावकऱ्यांनी जल्लोषात सत्कार करून सागरला रवाना केले.आणि  त्याच्या देशसेवेच्या कार्याला सुरवात झाली.दऱ्याखोऱ्या वेगवेगळ्या बॉर्डरवर सागरची बदली होत गोली.

  नौकरी लागल्यानंतर सागर पहिल्यांदाच दोनवर्षानी महीनाभराची सुट्टी घेवून आपल्या गावी येणार होता. सागर येतोय म्हटल्यावर तर आईवडीलांनाच नाहीतर मित्रपरिवार व गावकऱ्यांनाही आनंद झाला होता. सागर येण्याची,त्याला बघण्याची,अनेकांना ओढ लागली होती.मग काय ठरल्याप्रमाणे सागर गावात दाखल झाला आणि त्याला भेटण्यासाठी एकच गर्दी केली.अवघड नौकरी असली तरी मिल्ट्रीत जावून सागरमधे खुपच बदल झाला होता तब्येतही धष्टपुष्ट झाली होती.महीन्याभरात खूप गप्पा झाल्यात आणि सुट्टी संपल्यानंतर सागर पुन्हा आपल्या नौकरीच्या ठिकाणी रूजू झाल. नौकरी लागून सहा वर्ष झालीत आता सागरच लग्न केले पाहिजे म्हणून त्याच्यासाठी वधू शोध सुरु झाला.प्रतिष्ठेप्रमाणे

नात्यागोत्यातील अनेक आमंत्रण येवू लागलीत. त्यासाठी अधेमधे सागर सुटी काढून गावाकडे मुलगी बघायला यायचा पण प्रत्येक स्थळाला सागरचा नाकारच असायचा.सागरने नकार देण्याच कारण काही कळायचे नाही.त्याच्या अशा वागण्याने आई वडिलांनाही चिंता वाटायला लगली पुन्हा पुन्हा नकार देण्यामुळे आता कोणी आमंत्रणही देत नव्हते.मग बऱ्याच कालावधी नंतर एक चांगल स्थळ आले मुलगी शिकलेली शिवाय सुदंर तसेच सागरला शोभेल व घरात सर्वांना आवडेल अशीच होती.आता काही जरी झाल तरी नकार न देता बऱ्याबोलाने लग्नाला होकार द्यायचाच अशी तंबी देवून.सागर मुलगी बघायला आला त्याला मुलगी आवडली होतो.औपचारिक बोलणी झाली तत्पूर्वी सागरने त्या मुलीशी बोलण्याची ईच्छा व्यक्त केली.त्याप्रमाणे

 ते दोघ लाजरेबुजरे होवून एका खोलीत बसले काही वेळ नजर चुकवून एकमेकांना पाहू लागले त्यानंतर मग सागरने तिच्याशी सविस्तर बोलायला सुरवात केली.

अं.... मी तुला आवडलो की नाही मला माहीत नाही पण तू मला खूप आवडलीस शिवाय माझ्या बद्दल तुला माहीत झालच असेल तुझा होकार नकार काय असेल,तू काय ठरवल ते तुलाच माहीत.पण तुला एक सांगु का तू सुदंर आहे शिकलेली आहेस ठरवल तर माझ्या पेक्षाही तुला चांगल्या नोकरचा मुलगा मिळेल.तेव्हा माझ्याशी लग्न करून तू तुझ आयुष्य खराब नको करूस,माझी नौकरी दशसेवेची जरी असली तरी माझ्या आयुष्याचा काहीच भरोसा देता येत नाही.घरापासून हजारो मैल दुर जेथे खायालातर जावूच द्या जिवंत राहण्याचीही शाश्वती नाही अशा ठिकाणी मला ऱ्हावं लगते.कोणाची भेट नाही की बोलणे नाही. केव्हा काय होईल काहीच सांगता येत नाही.कोण कुठून कसा हल्ला करेल काहीच माहीत नसते.सतत मनात भिती आणि डोक्यावर मरणाची टांगती तलवार.देशासाठी  बलिदान होण्याची शपथ घेतली आहे.मेलो तर पाणी पाजवायला जवळपास कोणी नसतं.लोक म्हणतात देशाच्या सीमेवर सैनिक तैनात असतात म्हणून देश आणि देशातील माणसे सुरक्षित आहे.पण जे रात्री सुरक्षित झोपतात त्यांना माहीत नसते की  देशाच रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या वाटेला कधीच सुखाची झोप येत नाही.सतत डोळ्यात तेल घालून जागाव लगतं दुश्मनांवर नजर ठेवून घातपात होणार नाही यासाठी सतर्क रहावं लागतं.कोणत्याही क्षणी काहीही होवू शकते.जगलो तर सुखाने  नाहीतर तिरंग्यात लपेटून शव  घरी येतं.देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या आम्हा सैनिकांचे असुनही कोणीच नातेवाईक नसतात,काहीच स्वप्न नसतात हौसमौज नसते,कुठलाच सण उत्सव नाही की दिवाळी दसरा माहीत नाही. गोडधोड खाने नाही,हौसमौज नाही. घरच्यांची खूप आठवण येत असते पण मन मारून डोळ्यातून अश्रू येवू न देता स्वतःच स्वतःच सांत्वन करून  आठवण दुर ठेवावी लागते.खूप कठीण असत गं एका सैनिकाच आयुष्य.त्याहून कठीण असत एका सैनिकाची विधवा पत्नी होवून जगणं.शहीद झ्याल्यानंतर त्याच्या परिवाराला,कुटंबीयांना त्यांच्या मुलांना त्यांच पुढच आयुष्य जगणं त्याच्यासाठी खूप अवघड असतं गं.एक घरातला कर्ता पुरुष गेल्यावर त्यांची होणारी वाताहत मला चांगलीच माहीत आहे.विधवेचा पदर डोक्यावर घेवून जगणाऱ्या विर पत्नींच्या आयुष्याची तर  कल्पनाच करू शकतं नाही,तुला सागंतो असे कतितरी शहीद विरजवान यांचे शव या हातानी त्यांच्या म्हाताऱ्या आईवडीलांच्या,त्यांच्या पत्नींच्या स्वाधीन केलेत.नौकरीच्या पहिल्याच दिवशी तो सैनिक शहीद झालेला असतो.नशीब बलवत्तर तर एखादीच सुखरुप घरी परततो नाहीतर.त्याला विरमरण आहेच समजायचं.कारण मला माहीत आहे मी केव्हाही शहीत होवू शकतो कोणत्याही मिनीटाला कुठूनही माझ्यावर बोळीबार होण्याची शक्यता नाकारत येत नाही.

म्हणून म्हणतो कदाचित तू मला पसंतही कले तरी मी तुला सांगतो आयुष्य खूप सुदंर आहे आणि हे आयुष्य तुला खूप जगायच आहे.यासाठी तू माझा विचार आग्रही धरू नकोस,आयुष्य तुझं आहे निर्णय तुला घ्यायचा आहे.तुझ्या हौसमौज तुझे स्वप्न तुझ्या ईच्छा अपेक्षांना तिलांजनी नको देवूस,मला नाकारून तू तुझ्या पध्दतीने जगून आयुष्याचा आनंद घे.बस एव्हढच मला सांगायच आहे.

      आगदी खर आहे तुम्ही जे म्हणता ते बरोबरच आहे आयुष्य माझ आहे आणि ते कसं जगायच कोणासोबत जगायच ते मलाच ठरवायच आहे. माझेही काही स्वप्न आहेत हौसमौज आहे त्याचा आनंद तर मला घेतलाच पाहिजे आणि खर सांगायच झाल तर चांगला नवरा मिळावा म्हणून प्रत्येक मुलीच्या काही अपेक्षा असतात.पण कोणाच कुणाशी आयुष्य जुळेल हे कोणत्याही मुलामुलीला माहीत नसते  लग्नगाठी या स्वर्गातूनच बांधून येतात तेव्हा माझ्या मनात नकार होकार येण न येण ही श्रींची ईच्छा पण माझ लग्न जर तुमच्याशीच होणार असेलतर तेथे आपण काहीच करू 

शकणार नाही.आता राहिला प्रश्न तुमच्या नौकरीचा तर एका सैनीकाची पत्नी होण्याच भाग्य जर माझ्या वाटेला येत असेल तर ते मी कशाला नाकारू? आईवडील,बायको, मुलांपासून हजारो मैल दुरवर भारतमातेच्या रक्षणासाठी जो जवान स्वताच्या जीवाची बाजी लावून तो देशसेवेसाठी समर्पित होतो शहिद होतो,अशा विरपुरूषाची पत्नी होण्याच सौभाग्य फार कमी लोकांच्या वाटेला येत.मग माझ्या वाटेला येत असलेल्या सौभाग्य मी का नकार द्यायचा.सैनीक प्राणाची आहुती देवू शकतो.मग झालच आपल लग्न आणि त्यानंतर जर वैधव्य माझ्या वाटेला आल तर एका विरसैनिकाची विधवा पत्नी होवून जगणे म्हणजे तिचे आयुष्य देशासाठीच समर्पित नाही का? आहो या सारखा सन्मान दुसरा नसेल.

माझ्या आयुष्याच जेव्हायच ते होईल पण तुमच्या नावाचा कुंकू स्वाभिमानाने जर माझ्या कपाळावर उजळणार असेल तर तुमची विधवा पत्नी होण्याचाही गर्व मला असणार आहे.तुम्ही तुमच आयुष्य देश

सेवेसाठी वाहीलं तसचं माझही आयुष्य तुमच्यासाठीच  भारतमातेच्या सेवेसाठी असणार आहे.आणि माझा देवा वरच नाही तर  भारतमातेवर या देशावरही विश्वास आहे की तुम्ही सुखरूपच असणार असाल तुम्हाला काहीच होणार नाही. तुम्ही विर आहात आणि विरसैनिकांसारखेच या देशाची सेवा कराल

आपला संसार सुखासीनच असणार आहे तेव्हा मी लग्न करेल तर तुमच्याशीच. लग्नानंतर तुम्ही देशाची सेवा करा मी माझ्या कुटुंबाच,तुमच्या आईवडीलांच व कुंकवाचं रक्षण करेल......काय!

 आणि मग काय तिने त्याच्याशी लग्न केले.....


*संजय धनगव्हाळ*

धुळे

९४२२८९२६१८

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !