Posts

Showing posts from July, 2020

दूरदृष्टी - कविता

Image
( येणाऱ्या भावी भविष्यासाठी आजची दुरदृष्टी ही खूप महत्त्वाची असते , अशीच एक खालील कविता. ) दुरदृष्टी ठेवून प्रत्येकाने लावा एकेक झाड तरच येणार्या संकटावर करता येईल मात वृक्षतोड झाली चहुकडे प्रदुषण वाढले बहू समतोल साधण्या निसर्गाचा एकेक झाड लावू प्राणवायुचे घटते प्रमाण वृक्षतोडीमुळे फार भविष्यात जगणे कठीण करा थोडा विचार कधी अवर्षण,कधी अतिवर्षण असमतोलाचे हे कारण जलसंपत्ती वाचविण्यास निकडीचे आहे वृक्षारोपण सजीव जीवनात वाढले धोके विविध आजारांचे निरोगी राहण्या जीवन वृक्षसंवर्धन आहे निकडीचे जीवसृष्टीला विनाशाकडे जाण्यापासून थांबवा राखण्या निसर्गाचा समतोल झाडे लावा,झाडे जगवा कवयित्री : कु.सुलोचना मुरलीधर लडवे साईनगर,अमरावती सदस्या,मराठीचे शिलेदार समूह ( एक टीप : सदर कविता मराठीचे शिलेदार कविता संग्रह या समूहातून घेतली आहे . कवितेचे सर्व हक्क कवयित्रीच्या स्वाधीन) आमच्या वेबसाइटवर तुमची कविता टाकण्यासाठी खालील व्हाट्सअप वर सेंड करावी व्हाट्सअप नंबर ला टच करा Whatsapp Number

क्रिया तशी प्रतिक्रिया - बोधकथा

💧💧💧💧🕉💧💧💧💧 क्रिया तशी प्रतिक्रिया ---------------- एक स्त्री आपल्या आलिशान कारने हायवे वरून शहराकडे जात असते. अचानक तिची कार बंद पडते. आकाश ही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त करण्याची काहीच माहिती नसते.ती इकडे तिकडे मदतीसाठी कोणी आहे का ते  पाहते तिला कोणीच दिसत नाही. मदतीसाठी इतर गाडयांना हात दाखविते पण कोणताच गाडीचालक थांबत नाही. बराच वेळ जातो आता मात्र तिच्या डोळ्यात काळजीने पाण्याच्या धारा लागतात. तेवढयात सखाराम नावाचा माणूस तिच्या जवळ येतो . त्याला पाहून ती स्त्री प्रथम घाबरते .पण सखाराम म्हणतो घाबरू नका ताई मी प्रयत्न करून पाहतो आणि गाडी दुरूस्तीच्या कामाकडे वळतो. थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या स्त्रीची कार सुरू होते.ती स्त्रि सखाराम ला खूप खूप धन्यवाद देते आणि सखाराम ला म्हणते "तुम्ही माझी खूप मोठी अडचण सोडविली मी त्या बदल्यात सांगा तुम्हाला किती रुपये देऊ"?तेंव्हा सखाराम म्हणतो काही नको , हे माझे काम नव्हतेच मी तर तुम्हाला मदत केली. मलाही एका माणसाने मदत केली होती आणि त्याचा कोणताही मोबदला त्यांनी न घेता आपणही इतरांना अशीच मदत

जीवन विचार 150

दहा वेळा विचार करा  जर उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात! पण जर तो जिवंत असेल तर त्याला मारल्याशिवाय चैन पडत नाही.जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात. पण तो जिवंत असेल तर त्यास जागीच ठार. मारतात.जर आई-वडील फोटोत असतील तर त्यांची पूजा करतात पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही.! फक्त हेच मला समजत नाही की जीवना पासून इतका द्वेष आणि दगडा बद्दल इतकं प्रेम का आहे? लोक विचार करतात मृत लोकांना  खांदा देणे पुण्याचे काम आहे. तर मग जिवंत माणसांना मदत करणे  पुण्य समजलो तर जीवनभर किती खूष रहाल!एकदा निट विचार करून पहा!  आयुष्य सुंदर आहे.🤗 🙏🙏🙏🙏             असेच लेख.            वाचण्यासाठी आमचा ब्लॉग          फॉलो करा              

शिवकालीन वजने(मापे)

Image
 * अठवे - शेराचा 1/8  * अडशेरि - अडीच शेर  * अदपाव - अर्धा पावशेर  * अदमण - अर्धा मण  * अदशेर - अर्धा शेर  * अधोली - अर्धी पायली  * अंजली - ओजळभर पानी  * आटके - अर्धा शेर  * आढक - चार शेर, पायली  * कर्ष - सोळा माषांचे एक परीमाण  * कार्त - पाव रत्तल  * किळवे - अर्धा छटाक, अर्धे निवळे  * कुडव - आठ शेर  * कुंभ - वीस खंडी  * कोथळी - मुंबईत 6 मणांची गोनी  * कोड - खंडी, वीस मण  * कोळवे - शेराचा अष्ठमांश  * खारी - 16 द्रोण, एक खंडी  * गरांव - अर्ध गूंज माप  * गिधवे - धान्य मोजन्याचे एक माप  * गुंज -  एक वजन परिमाण  * चंपा - दोन शेर धान्याचे माप   * चवाटके - छटाक  * चवाळामण - एक प्रकारचा मण  * चाटंक - पांच तोळे वजनाचे परिमाण  * चाळीसा - चाळीस शेरांचे माप  * चिटके - अर्ध्या कोळव्याचे माप  * चिपटे - पावशेराचे माप  * चिमटी - हाताचा अंगठा व तर्जनी याच्या पकडित मावनारा पदार्थ  * चिळवे - कोळव्याचा निम्मा भाग  * चोथवा - एक पायली  * चौटके - चार टाकांचे माप,छाटाक, चवटके  * चौशेरी - चार शेरांचे माप  * छटाकी - छटाक  * छतिसी - छत्तीस परिमानाचे वजन  * टवणा - पांच शेरांचे माप  * टांक

◼️बोधकथा :- निसर्गाचे न फिटणारे ऋण

Image
कथेचे शीर्षक :   निसर्गाचे न फिटणारे ऋण...   कथेचे स्वरूप :   संवाद     कथेतील पात्र : १.अरुण  २.रोहन  ३.रामुकाका  ४.पाटील सर ▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️ अरुण आणि रोहन शाळेला निघाली असतात त्यांच्या सोबत रामुकाका पण शेतापर्यंत चालत येतात त्यांच्या खांद्यावर कुऱ्हाडी पाहून रोहन विचारतो ?  रोहन :  काका हि कुराड कशासाठी नेत आहात . काका : अरे रोहन ही कुराड जनावराच्या गोठ्यासाठी कुरमड आणाया जात आहे . अरुण : काका त्यासाठी तुम्हाला झाड तोडावे लागेल .   काका : हो रे अरुण पण हे सर्व का विचारतोस .   अरुण : याचे कारण काका कदाचित तुम्हाला माहीत असेल नसेल पण मी सांगतो ,आज पृथ्वीतलावर सजीव सृष्टी असण्याचे एकमेव कारण वृक्ष आहेत .   काका : अरे उगाच काय म्हणतो.     रोहन : अरुण खरं बोलतो काका झाडं आहेत ,म्हणून पाणी पडतं ,झाडं आहेत म्हणून सजीव जगतात ,त्यांनी निर्माण केलेल्या ऑक्सीजन वरच, खरंतर आपल्याला निसर्गाचे कधीच ऋण  फेडता येणार नाहीत. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या हिश्‍श्‍याचे एक तरी झाड नक्की लावावे. तुम्ही विचार करा काका ऑक्सीजन नसते तर माणूस जगू शकला असता का ? "असे जर असते तर अमेर

मराठी माणूस मागे असण्याची २3 कारणे

Image
मराठी माणूस स्पर्धेच्या युगात मागे का पडतो आहे, आर्थिकद्रुष्ट्या का कमकुवत होत आहे, बेकारी व गरिबी का वाढतच चालली आहे, मी हि त्यावर बरेच संशोधन केले व माझ्या निरीक्षणातून व शेकडो लोकांशी संपर्क साधून २3 कारणे शोधून काढली, जी मराठी माणसांनी समजून घ्यावीत . आपण स्वतःला विचारावित व त्यावर स्वतःच उपाय योजना करावी . ह्या गोष्टी सकारात्मकतेने घेतील हि विनंती. मागासलेपणाची २3 कारणे - १) कमी प्रवास  -     प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही , अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही  २) अति राजकारण - मराठी सामाज राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो . व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का ?  ३) दोनच हाथ कमवणारे -   सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे .  ४) सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला  -   कुटुंबात एकी नसते बाप एका दिशेला,मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ त

स्वप्न काय असते

Image
स्वप्न जरूर पाहावी परंतु त्या स्वप्नांमध्ये स्वताला कधीच विसरू नये तसेच आपल्यांनाही कधी विसरू नये.स्वप्न पूर्तीसाठी सतत झटावं परंतु स्वप्न पूर्ण जर झाली नाहीत तर खचूनही जावू नये.कारण काळासोबत सर्व काही बदलत असते.प्रत्येक वेळेला सफलता हाताला येतेच किंवा येईल हे अजिबातच अपेक्षित नसते . जीवनात कधी चढ येतील तर कधी उतार ..पण ह्या चढ उतारात खचून जाण्याच कारण नाही.संयमाने जर घेतले तर जीवनाचे चढ उतार सहज पार होतील.आणि जीवन हळूहळू लक्षा कडे मार्गस्थ होईल.बर्याच अशा गोष्टी आहेत प्रयत्न करूनही फलीत होत नाहीत.म्हणून प्रयत्न सोडता येत नाहीत.दुखातही सुखाचा आभास असतोच . फक्त तो जाणवत नाही.पायात काटा रूतला तर दुःख होतेच परंतु तो काटा काढण्याचं सुख पण असतेच.आलेल्या दुःखाला मागे टाकण्यातच सुख असते परंतु ते फारसं जाणवत नाही.वेदना संवेदना म्हणजे जीवन ..या वेदना संवेदनांच्या हयातीतच आपण स्वप्न पाहतो.त्या मुळे कधी स्वप्न पूर्ण होतील तर कधी नाही.. म्हणून अपेक्षा ह्या अपेक्षे पुरत्याच असाव्या . अनाठायी अपेक्षा जेव्हा भंग पावतात तेव्हा मात्र येणारी नरवसता जीवघेणी असते.हि नरवसता येवूच नये यासाठी स्व

खरं पारखणे

*ऐश्वर्या राय* एखादा साबुन प्रमोट करत असेल तर  तो आपण खरेदी करतो.  *शिल्पा शेट्टी* एखादा शाम्पू प्रमोट करत असेल तर  तो आपण खरेदी करतो.  *ऋतिक रोशन* एखादा deo प्रमोट करत असेल तर  तो आपण खरेदी करतो.  *परंतु . . . .* आपला *मित्र किव्वा कोणी नातेवाईक* काही बिजिनेस करत असेल तर आपण त्याचा कडून काहीच खरेदी करत नाही.  आपण ज्यांना ओळखत नाही त्यांची फक्त एक जाहिरात पाहून ते प्रॉडक्ट खरेदी करतो आणि ज्यांना *आपण जन्मा पासून ओळखतो* जे सर्व साधारण जीवन जगतात आहे त्यांना सहकार्य नाही करत त्यांच *प्रॉडक्ट नाही घेत त्यांना प्रमोट नाही करत*   आपल्या कडे *हजारो कारण* असू शकतात *मित्रा कडून किव्वा नातेवाईक* कडून खरेदी नाही करायचे,  ते सर्व सोडून आज पासून फक्त आणि फक्त *मित्र किव्वा नातेवाईक* ला प्रमोट करू त्यांच्या कडूनच हवी ती  वस्तू खरेदी करू भले ही जास्त पैसे दयावे लागले तरी चालेल त्यांनाच *आत्मनिर्भय बनवू मोठे बनवू* जे पेहलेच *मोठे मोठे सेलिब्रेटी* आहेत ज्यांचा अफाट *पैसा बँक बॅलन्स प्रॉपर्टी आहे* त्यांना पुन्हा मोठे करण्याने काय होणार  आपले विचार बदला आपल्याच  *मित्र किव्वा नातेवाईक ला प्रमोट करा मोठ

वेसन - कविता

1. मनास ठेवण्या काबूत पहिली बांधावी त्यास वेसण  योगसाधना,ध्यानधारणा करुन जगावे आरोग्यमय जीवन गुराढोरांना ठेवण्या काबूत,  नाकात बांधतात दोरीची वेसण   हुंदडणाऱ्या बैलमनावर करावे लागते तसेच सुसंस्काराचे शिंपण जेव्हा सैरवैर चोहीकडे भरकटत  रहाते आपले वढाळ अस्वस्थमन  तेव्हाच समाजात अन्याय,अत्याचाराचे  घडते धुंवाधार प्रदर्शन अश्लील,हीन कुविचारांनी जेव्हा  आपले ग्रासले जाते तनमन त्याला काबूत ठेवण्यासाठी अंगिकारावा सकारात्मक दृष्टिकोन आजच्या भावीपिढीवर जेव्हा विद्यार्थीदशेतच  आत्मनिर्भर सद्विचारांचे घालू आपण वेसण  तेव्हाच ही भावीपिढी होईल आत्मनिर्भर  अन् सुसज्ज होतील करण्या स्वतःचे आत्मपरीक्षण  सौ.रेखा बांदल, पुणे. सदस्य मराठीचे शिलेदार समुह. 2. मनाचे द्वंद् माझ्या मला न कळले म्हणून माझ्याविरुद्ध त्याने बंड पुकारले चंचल मन हे झरे वाहती वाट मिळेल तिकडे आता जमिनीवर तर लगेच क्षितिजा पलिकडे..... .. त्यांच्यामते,भावना त्याच्या मला कळतं नाही कळल्याचं तरी फारसे वाव देत नाही वाढत वय माझं तो स्वीकारत नाही त्याचं सुसाट पळण, मला पटत नाही..... वय चाललंय  भविष्याकडे मन पळतय भूतकाळकडे म्हणून केलंय  मी त्याला