◾जीवन परिचय :- राम गणेश गडकरी
प्रसिध्द साहित्यिकांचा परिचय देणारा संकलनात्मक लेख राम गणेश गडकरी राम गणेश गडकरी हे मराठीचे नाटककार , कवी आणि विनोदी लेखक होते . त्याचे तीन टोपण नाव होते . गोविंदाग्रज , बाळकराम आणि सवाई नाटकी . त्यांचा जन्म २६ मे १८८५ ला गणदेवी , जिल्हा नवसारी , गुजरात येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव गणेश वासूदेव गडकरी व आईचे नाव सरस्वतीबाई गणेश गडकरी होते . त्याना दोन भार्या होत्या पैकी प्रथम सीताबाई व दुसरी रमाबाई . ते भारतीय होते . त्यांनी कविता , नाटके व विनोदी कथा लिहिलेल्या आहेत . त्यांचे प्रसिध्द साहित्यामध्ये नाटके फार प्रसिध्द झालीत . "एकच प्याला", "प्रेमसन्यास" , “पुण्यप्रभाव" , "भावबंधान" या नाटकांना प्रेक्षकांनी आपली चांगली पसंती दिली आहे . गोविंदाग्रज या टोपण नावाने राम गणेश गडकरी यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या . आणि बाळकराम हया टोपण नावाने काही विनोदी लेख लिहिले . हया साहित्याच्या जोडीला त्यांच्या दोन अपुरी राहिलेली नाटके होती ती “राजसन्यास" आणि "वेड्यांचा बाजार" . राम गणेश गडकरी यांना महारा