◾विशेष लेख :- शुभ दुपार... एक लेख अवश्य वाचा | prayerna Blog
रोजच्यासारखा अलार्म १५ मिनिटं स्नुझ केला आणि कूस बदलली. बघते, तर समोर खुर्चीत हा बसलेला. पिटुकला, गोजीरा. गोड हसून म्हणाला, 'सुप्रभात. ओळ्खलस का मला?' मी गोंधळलेलीच. तोच म्हणाला, 'दिवसरात्र माझा उद्धार करत असतेस आणि मला ओळखलं नाहीस? मी कोरोना.' मला हसायलाच आलं. 'तोंड पाहिलंयस आरश्यात? तो कोरोना किती भयंकर दिसतो! अक्राळ विक्राळ चेहरा, आग ओकणारे डोळे. ईई. पाहिलंय मी न्युज चॅनल्स वर'... 'तुझा अजून ह्या चॅनेल्सवर विश्वास आहे???' त्याने इतकं ठासून विचारलं की मी वरमलेच. दुसऱ्या क्षणी तंतरली ना माझी. 'बापरे! माझा मास्क कुठाय.... स.. स.. सॅनिटायझर???' 'किती हायपर होत्येस? इतक्या वेळात काही केलं का मी तुला? सोशल डिस्टन्स ठेवून बसलोय ना? ऐक, मला कौंसेलिंग हवंय. खूप डिप्रेशनमध्ये आहे मी.' फेकू नकोस.तुला कसलं डोंबलाच डिप्रेशन?' 'सगळे राग राग करतात माझा. नकोसा झालोय मी सगळ्यांना. सारखं गो कोरोना गो. माझ्या मित्रांनी पण टाकलंय मला!!'😢 'तूझे मित्र??' 'मग! Falsifarum, vivax , h1n1 ,HIV, ebola, ecoli... कुणी