Posts

◾विशेष लेख :- शुभ दुपार... एक लेख अवश्य वाचा | prayerna Blog

Image
रोजच्यासारखा अलार्म १५ मिनिटं स्नुझ केला आणि कूस बदलली. बघते, तर समोर खुर्चीत हा बसलेला. पिटुकला, गोजीरा. गोड हसून म्हणाला, 'सुप्रभात. ओळ्खलस का मला?' मी गोंधळलेलीच. तोच म्हणाला, 'दिवसरात्र माझा उद्धार करत असतेस आणि मला ओळखलं नाहीस? मी कोरोना.'  मला हसायलाच आलं. 'तोंड पाहिलंयस आरश्यात? तो कोरोना किती भयंकर दिसतो! अक्राळ विक्राळ चेहरा, आग ओकणारे डोळे. ईई. पाहिलंय मी न्युज चॅनल्स वर'... 'तुझा अजून ह्या चॅनेल्सवर विश्वास आहे???' त्याने इतकं ठासून विचारलं की मी वरमलेच. दुसऱ्या क्षणी तंतरली ना माझी. 'बापरे! माझा मास्क कुठाय.... स.. स.. सॅनिटायझर???'  'किती हायपर होत्येस? इतक्या वेळात काही केलं का मी तुला? सोशल डिस्टन्स ठेवून बसलोय ना? ऐक, मला कौंसेलिंग हवंय. खूप डिप्रेशनमध्ये आहे मी.'  फेकू नकोस.तुला कसलं डोंबलाच डिप्रेशन?'  'सगळे राग राग करतात माझा. नकोसा झालोय मी सगळ्यांना. सारखं गो कोरोना गो. माझ्या मित्रांनी पण टाकलंय मला!!'😢   'तूझे मित्र??'  'मग! Falsifarum, vivax , h1n1 ,HIV, ebola, ecoli... कुणी

◾विशेष लेख :- गोष्ट भाकरीची ...

Image
भाकरीची गोष्ट.....  काल सहज फेसबुक चाळत असताना चुलीवरच्या खरपुस भाकरी चे फोटो बघून मला दहा वर्षांपूर्वीची गमतीशीर घटना  आठवली , संध्याकाळची वेळ होती , मी माझ्या एका मित्राबरोबर सिंहगड रोड ने जात होतो,हिंगण्या च्या स्टॉप च्या अलीकडे एक किलोमीटर असताना पुढे वाहतुकीच्या कोंडी मुळे गाडी थांबवावी लागली , इतक्यात आमची नजर रस्त्यावर खडी फोडणाऱ्या कुटुंबाच्या पाला कडे गेली ( पाल म्हणजे तात्पुरती ताडपत्रीची झोपडी ),तिथे तीन दगडाच्या मांडलेल्या चुलीसमोर त्या झोपडीची मालकीण भाकरी भाजत होती,नवरा शेजारच्या बाजेवर जुन्या वर्तमानपत्राचा चुरगळलेला कागद वाचत बसला होता,त्या बाजेखाली त्याचा छोटा मुलगा एका तुटलेल्या खेळण्या बरोबर खेळण्यात दंग झाला होता,वाहतूक अजून काही सुरळीत होत नव्हती,माझा मित्र,जो एका कंपनीचा मालक होता,अगदी टक लावून त्या टम्म फुगणाऱ्या बाजरीच्या भाकरीकडे बघत होता,एव्हाना त्या भाकरीचा खमंग दरवळ आमच्या कारच्या खिडकीतून आत येत होता, माझ्या मित्राने कधीतरी लहानपणी आपल्या खेड्यातील मित्राकडे अशी खरपूस भाकरी खाल्ली होती व त्या भाकरीची चव तो अजूनही विसरला नव्हता, त्या नंतर मात्

◾जीवन :- विचार नं.154

Image
दु:ख तर प्रत्येकाच्याच नशिबात लिहलेले असते. पण प्रत्येकाची त्या दुःखाला सामोरे जाण्याची , ते दुःख पचवून घेण्याची पद्दत वेगवेगळी असते. जो व्यक्ती त्याच्या दुःखाचा जास्त विचार करतो अन् सतत त्या दुःखाला बिलघून राहतो त्याला त्या दुःखाचा खूप ञास होतो. म्हणून दुःख कीती मोठे आहे आणि त्याची मर्यादा ठरवणे हे ही आपल्याच हातात असते. म्हणून सर्व दःख विसरुन हे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.. कारण हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते_ आयुष्य खुप सुंदर आहे., फक्त तुम्ही ते जगायला शिका..........

बोधकथा :- संवाद देवाशी

Image
देवासमोर उभा होतो हताश मी हात जोडून डोळ्यामध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडून “देवा !” मी म्हणालो, “काय करू कळत नाही” ... “प्रश्नाच उत्तर मिळत नाही” “विश्वास ठेव” देव म्हणाला “देवा सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत” “विश्वास ठेव” देव म्हणाला “देवा आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही तर कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे याचा तुझ्याकडे काय पुरावा ? ” शांतपणे हसत देव मला म्हणाला “पक्षी उडतो आकाशात, आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा, खाली न पडण्यावर” “मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो विश्वास असतो तेव्हा तुझा रोप जन्म घेण्यावर” “बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत, विश्वास असतो त्याचा, तिने साम्भाळून घेण्यावर” “उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मीटतो, विश्वास असतो तेंव्हा तुझा पुन्हा प्रकाश होण्यावर” “आज माझ्या दारी येऊन, आपलं मनातलं दुखः घेऊन, विश्वास आहे तुझा कारण मी हाक ऐकण्यावर” “असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात” “आजची स्थिती अशीच राहील,असं कुठेही लिहिलेल नाही उद्याच चित्र कसं राहील, तू काहीच पाहीले

कविता :- आई तुझे लेकरू

Image
आई तुझे लेकरू आज खूप एकटे पडले  तुझ्या स्पर्शासाठी ते खूप आज रडले !!  तुझ्या मायेच्या सागराने मला  कधी वादळ तर कधी किनारे दाखवले !!  तुझ्याच छायेत माझे घर असू दे  असे नेहमीच वाटायचे  तू जवळ नसताना मनात काहूर माजायचे !!    आज तुला सोडून मी जगायला शिकतोय  एकटे पडलो इथे सगळेच मला डिवचतात !!    सांगायची तू कथा मी अर्थ आज जाणतोय  नसतो कुणी आपले हे मी खरचं पहातोय !!    जवळ करतात इथे आणि दरीमध्ये सोडतात  जीव कधी जाईल ह्याची ते वाटच पाहतात !!    आई मला घे जवळ मला सोबतच राहू दे  तुझ्याच डोळ्यांनी हे जग मज पाहू दे !!    धन्य झालो मी जी तू मला भेटलीस  असे वाटतं देवांशीच मैत्री मी गाठली .... !!    आई !! तू आहेस माझी आई !!

बोधकथा :- आधीच्या पिढीने शिकवले

Image
मी अजूनही शिकतोय ! दोन्हीची कॉकटेल बनवली तर आयुष्य सुखाचे होईल !! आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो; नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतोय. आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो; नंतरच्या पिढीकडून डिजिटली नवीन नाती जोडायला शिकतोय. आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो; नंतरच्या पिढीकडून मन भरून जगायला शिकतोय. आधीच्या पिढीने, Use and use more मधली उपयुक्तता शिकवली; नंतरच्या पिढीकडून Use and throw मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय. आईकडून पिकनिकलाही घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला शिकलो; मुलांकडून घरात असतानाही पिकनिक एंजॉय करायला* शिकलोय. आधीच्या पिढीबरोबर *निरांजन लावून दिवा उजळून वाढदिवस साजरा केला;* नंतरच्या पिढीबरोबर मेणबत्ती विझवून अंधार करून वाढदिवस साजरा करायला लागलो. आधीच्या पिढीने बिंबवले, घरचेच लोणी सर्वात उत्तम; नंतरची पिढी पटवून देत आहे, अमूल बटरला पर्याय नाही‌. थोडक्यात काय, आधीच्या पिढीने शिकवले, अधिक वर्षे कसे जगायचे ते; तर नंतरची पिढी शिकवत आहे, मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते !! 🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐

जीवन विचार - 152

Image
जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा आयुष्य सुंदर असते पण जेव्हा तुमच्यामुळे इतरांना आनंद होतो तेव्हा आयुष्य सार्थकी लागते . आपल्यामुळे कधीही कोणाच्याही डोळ्यात पाणी येऊ देऊ नका . हसावता नाही आलं तरी अश्रूंचे कारण बनू नका . दुसऱ्यांच्या दुवा घ्या तळतळाट नको .            फक्त गरज पडल्यावर आठवण काढणाऱ्या माणसांवर कधीच रागवू नका .. कारण काही माणसं देवाचीही आठवण तेव्हाच काढतात जेव्हा त्यांना कोणताच पर्याय दिसत नसतो .          संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होय . दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे . जेव्हा आपण दुसऱ्यासाठी दिवा लावतो तेव्हा आपलीही वाट उजळून निघते . फक्त माणूसकी जपायला शिका सर्व नाती आपोआप निभावली जातील .  🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴

बोधकथा :- प्रार्थना

Image
आत्म्याचा आवाज... परमात्म्या पर्यंत घेऊन जाणारा... संदेशवाहक... म्हणजे.... प्रार्थना ...🌷      एक गरीब, वृद्ध महिला एका भाजीवाल्याच्या दुकानात गेली..... तिच्यापाशी भाजी विकत घेण्यासाठी पैसे नव्हते....  तिने दुकानदाराला विनंती केली.... तिच्यापाशी पैसे नसल्याने त्याने तिला आज उधारीवर भाजी द्यावी.... पण दुकानदार काही या साठी तयार झाला नाही...  तिने त्याला अनेक वेळा उधारीवर भाजी देण्यासाठी विनंती केली.... शेवटी चिडून तो म्हणाला, "ए म्हातारे, तुझ्यापाशी पैसे नसतील तर मग तुझ्याजवळील अशी एखादी किंमती वस्तू तराजूत टाक की जिच्या मोबदल्यात मी तुला त्या वस्तूच्या वजनाइतकी भाजी देईन....       ती वृद्ध महिला थोडी विचारात पडली.... तिच्यापाशी देण्यासारखे काही नव्हतेच ... तर ती बिचारी देणार तरी कुठून ?.... थोड्या वेळाने तिने तिच्याजवळील एक कोरा, चुरगाळलेला कागदाचा तुकडा काढला .... त्यावर काहीतरी खरडले आणि तो तुकडाच तिने तराजूच्या पारड्यात टाकला.... हे पाहून दुकानदाराला हसू आले.... त्याने थोडी भाजी हाती घेऊन तराजूच्या दुसऱ्या पारड्यात टाकली आणि नवलच घडले..... कागदाचा कपटा टाकलेले पारड

बोधकथा :- ब्राह्मण आणि पत्नी

Image
एका ब्राम्हणाने पत्नीला विचारले... " पाणी छान आणि थंड आहे. आपल्या घरात फ्रिज नाही, कुठुन आणलेस..?" पत्नीः-  "शेजारच्या कुंभारा कडुन.!" ब्राम्हण ः-   काय..? त्या शुद्राचे पाणी मला पाजलेस, तुला लाज वाटत नाही...? आपण ब्राम्हण आहोत... आपल्याला शुद्राचे काही चालत नाही..?" पत्नीः- (घाबरली व म्हणाली) " मला माफ करा, या पुढे अशी चुक होणार नाही.... [दुस-या दिवशी.] ब्राम्हण ः-  "अग...  जेवायला वाढ..!" पत्नीः  "काही-नाही..!" ब्राम्हण ः-  "काय...? पोळी केली नाही..?" पत्नीः- " नाही....!  कारण... तवा व चुल शुद्र लोहाराने  व चुल कुंभाराने बनवलेली असल्याने मी त्या वस्तू  फेकून दिल्या..!" ब्राम्हण ः- "वेडी आहेस काय..? बरं दुध आण..!" पत्नीः-  "मी दुध फेकुन दिले  कारण....  ते शुद्र गवळ्याने दिले.  मी म्हटले  'उद्या पासुन दुध आणू नकाे' आम्हांला शुद्रांचे काही चालत नाही..!" बाम्हणः बर मी बाहेर चाललोय माझी चप्पल कुठे आहे.....??? पत्नीः ते मी बाहेर टाकले. . ब्राम्हण : का????? पत्नी : ते चप्पल तुम्हाला

आयुष्यात सुधारणा करू‍ शकणाऱ्या या पाच सवयी

Image
 ------------------------------------ आयुष्यात सुधारणा करू‍ शकणाऱ्या या पाच सवयी --------------------------------------- १) व्यायाम आणि ध्यान धारणा करा . तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल . तुमचा रागावर ताबा येईल आणि तुम्ही रिलॅक्स होता. २) पहाटे उठल्यावर तुमचं अंथरूण आणि खोली स्वच्छ करा . तुम्हाला ही लहान गोष्ट केल्यावर बाकीचे काम करायला प्रेरणा मिळेल. आळस सोडा . ३) अती विचार करणे सोडा . दुसऱ्याला नाही , तर याचा तुम्हालाच मानसिक त्रास होईल . तुमचा कामात लक्ष लागणार नाही . ४) प्रत्येक गोष्टीला पुरेपूर वेळ मिळायला एक वेळापत्रक बनवा.  तुमचे सर्व काम सुटसुटीत होईल आणि तुम्हाला शिस्त पाळणे उपयोगी पडेल . ५) दिवसातला किमान अर्धा तास तुमच्या आवडीचा छंद साठी द्या . ह्या सवयी तुम्हाला नक्कीच सुधारणा करायला मदत करतील ---------------------------------------------- 🌹 श्री   स्वामी परिवार 🌹 -----------------------------------------------

नाते :- जीवनातील महत्वाचा भाग

Image
  ❤️❤️ नाती  ❤️❤️ कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, अनेकजण ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण वजा केलं होत ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच... भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली. त्यांची एखादी कृती, चूक हा जणू काही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली हे कळलंच नाही. नाजूक नात्यांना शेवटी अहंकार नाही, तर मायेच्या ओलाव्याचीच गरज असते. आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की, भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होत.... भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो... भावना दुखावली असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो. अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला नंतर दिली तरी त्याच दुःख म्हणून त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आण

माहिती :- जांभई देण्याचे फायदे

 दररोजच्या जीवनात आपण 'जांभई' देतांना इतरांना पाहतो. तसेच 'जांभई'चा अनुभव आपण स्वत:ही घेतलेला आहेच म्हणा. 'जांभई' येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. झोपी जाण्यापूर्वी अथवा झोपेतून उठल्या- उठल्या आपण तोंड व शरीर वेडेवाकडे करून जांभई देतो. मात्र ही जांभई येण्‍याचे कारण काय? हा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना!  एखाद्या वेळी अधिक थकतो. तेव्हा आपल्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. तेव्हा या प्राणवायूची कमी ही 'जांभई' भरून काढत असते, असे मानले जाते. तर जांभई' ही आपला मेंदू थंड ठेवण्यासाठी येते, असा दावा बरमिंघटन विद्यापीठातील अभ्यासकांनी केलाय.  ' जांभई' का येते? याचे मागील कारण शोधून काढण्यासाठी अभ्यासकांनी पोपटांवर परीक्षण केले होते. त्यांनी परिक्षणासाठी अतिशय उष्ण, कमी उष्ण व सामान्य वातावरण, अशा स्थळांची निवड करून प्रत्येक वातावरणात पोपटांना काही तास ठेवले.  कमी व सामान्य वातावरणातील पोपटांना जांभई आली नाही. मा‍त्र उष्ण वातावरणातील पोपटांना वारंवार जांभई येत असल्याचे त्यांच्या निदर्शणास आले.  त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जेव्हा सामान्य तापमानात अ

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

Image
  एक सत्य घटना विक्रम साराभाई यांच्यासोबत घडलेली स काळची वेळ होती.. त्रिवेंद्रमचा समुद्र किनारा शांत वाटत होता. फारशी गर्दी नव्हती. काही लोकांचीच ये-जा होती.  एक बऱ्यापैकी वृद्ध गृहस्थ किनाऱ्यावर आसन टाकून एकाग्रतेने श्रीमद् भगवत गीता वाचत होते.  तेवढ्यात एक  उच्च शिक्षित पण देव धर्म न मानणारा तरुण तिथे येऊन त्यांच्याजवळ मुद्दाम टिंगल करण्याच्या उद्देशाने बसला, आणि त्या तरुणाने टोमणे मारायला सुरुवात केली. गीता वाचणारी व्यक्ती मात्र शांत होती.  तो तरुण म्हणाला, एवढा वेळ जर अभ्यास करून देशासाठी काही केले असते तर आज देश कुठल्या कुठे प्रगती पथावर उंच गेला असता.   त्या व्यक्तीने ते एक पान वाचून पूर्ण केले व त्या तरुणास अगदी शांतपणे माहिती विचारली की कुठून आलास, शिक्षण किती , व पुढे काय करणार आहेस ? इ. त्या तरुणाने थोडेसे गुर्मीतच उत्तर दिले की तो कलकत्याहून आला आहे. सायन्सचा उच्च शिक्षित आहे आणि भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेत पुढील संशोधन करण्यासाठी आला आहे..  पुढे मोठ्या तुसडेपणाने  - तुम्ही बसा इथे पोथ्या पुराणे वाचत, तुम्हाला देशाची काळजी नाही, वगैरे वगैरे त्याने बरीच मुक्ता

निबंध :- दगड

Image
शाळेत बाई म्हणाल्या : आपल्या आवडत्या विषयावर निबंध लिहा.. एका मुलाने निबंध लिहिला... विषय -                   दगड                     ____________________________________ 'दगड' म्हणजे 'देव' असतो.. कारण तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे असतो.. पाहीलं तर दिसतो.. अनोळख्या गल्लीत तो कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो.. हायवे वर गाव केव्हा लागणार आहे ते दाखवतो.. घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो.. स्वैयंपाक घरात आईला वाटण करून देतो..  मुलांना झाडावरच्या कैऱ्या, चिंचा पाडून देतो.. कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून भळाभळा रक्त काढतो आणि आपल्या शत्रूची जाणीव करून देतो.. माथेफिरू तरुणांच्या हाती लागला तर,, काचा फोडून त्याचा राग शांत करतो.. रस्त्यावरच्या मजुराचं पोट सांभाळण्यासाठी स्वत:ला फोडुन घेतो.. शिल्पकाराच्या मनातलं सौंदर्य साकार करण्यासाठी छिन्निचे घाव सहन करतो.. शेतकऱ्याला झाडाखाली क्षणभर विसावा देतो.. बालपणी तर स्टंप, ठिकऱ्या, लगोरी अशी अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळतो.. सतत आपल्या मदतीला धावून येतो, देवा'सारखा.. मला सांगा,, 'देव' सोडून कोणी करेल का आपल्यास