Posts

◾विशेष लेख :- मराठी भाषेची थोरवी...

Image
🌸 मराठी भाषेची थोरवी          मराठी भाषा ही सर्वांग सुंदर भाषा आहे.मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षा ही जास्त आहे. मराठी भाषेतून आपण आपले विचार खूप व्यवस्थितपणे व विस्तृतपणे मांडू शकतो. मराठी  भाषा समजण्यासाठी सोपी आहे. मराठी भाषेला खूप मोठा इतिहास आहे.मराठी भाषेला खूप मोठी संत परंपरा लाभलेली आहे. मराठी भाषेत एक प्रकारचे माधुर्य आहे. मराठी भाषेचे सौंदर्य अवर्णनीय असून, मराठी भाषा ही अल्लड, अवखळ, प्रवाही असून तिला अनेक रंगछटा आहेत.          खूप सार्‍या साहित्यिकांनी मराठी भाषेत वेगवेगळ्या विषयावर खूपमोठ्या प्रमाणावर लेखन केलेले आहे. मराठीभाषा ही रसपूर्ण,अर्थपूर्ण, लाडिक, प्रेमळ शृंगारिक चंचल, शितल, ओजस्वी असून प्रसंगी  ती दाहकहि बनते.आपणाला जे काही समोरच्या व्यक्तीला सांगावयाचे आहे किंवा आपले मत मांडायचे आहे  ते आपण मराठी भाषेत खूप छानपणे अत्यंत मोजक्या शब्दात सांगू शकतो किंवा मांडू शकतो. मराठी भाषेतील शब्दांची ताकद प्रचंड आहे.        मराठी भाषा खूपच देखणी, गोजिरी आहे. मराठी भाषेत एक प्रकारचा मायेचा ओलावा आहे.  मराठी भाषेची थोरवी खूप मोठी आहे.मराठी भाषेत खूप सार्‍या बोलीभाषा आहेत. जे क

◾कविता :- लिहितच राहीन मी... | Marathi poem | R. R. Wagh

Image
लि हितच राहिन मी हि न्दोळेच मनातले त या जीवनात जे मी च वीनेच भोगलेले रा बताना कर्मगती ही च उर्जा येते कशी न वलाई करी मती मी च मात करे कशी स्वा नुभवे सांगतो मी नु रलोच 'मी' अर्पिला भ गवंता चरणी मी व से मोद 'मी' भोगिला बो ध घेता बोध वृत्ती ध री वाट योग्य रिती ज्या चे समाधान चित्ती ला भ खरा याच रिती घ्या वयाचे ज्याला तोच य थामती ओढावतो चा लू लागे मार्गी तोच तो च मग सुखावतो घे ता बोध लागे शोध ई श्वराशी जवळीक ल डिवाळ तोच बघ च राचरी सोयरीक निर्मिती:- रा.र.वाघ,धुळे. (मो.नं.७५०७४७०२६१)

◾मुक्तछंद :- विठोबा | सौ.अनुपमा आनंद हुलगेरी

Image
              विठोबा               माझी विठाई विठाई,  कशी होऊ तुझी उतराई, माझी रुक्माई रुक्माई, आनंदे नाचे वाळवंटी,  अरे दिसला दिसला माझे  विठाईचा कळस दिसला,  आनंदाला पार नाही राहिला, चला  बीगी बीगी  रुक्माई ने नेसला  गर्द रंगाचा शालू, तिचे रूप लावण्या देखण्या जोगे, नजर लागू नये म्हणून हा सर्व  सावळा  शृंगार.    कवयत्री :सौ. अनुपमा हुलगेरी जूगती पर्ल रेसिडेन्सी जुळे सोलापूर ___________________________________ ती हळूहळू मोठी होत जाते तिच्या  स्वप्नान बरोबर.. लग्न ठरते.. माप ओलांडते.. घरी येते.. तिचे स्वतःच् मागचे माहेरचे विसरून ती पूर्णपणे  सासरच्या रंगात  रंगते.. हळूहळू सगळी स्वप्न विरून  जातात.. मग कधी तरी छोट्या छोट्या आनंदी   गोष्टी मध्ये मध्ये ति सुख मानते.. एक स्त्री माहेरच्या आनंदी सुखदायी वातावरणाला सोडून सासरची  सेवा करायला येते.. सगळे नातेसंबंध विसरून सासरच्या माणसाला आपलेसे करते.. एक लहान मुलगी  15-16 वयाच्या उंबरठयावर सुंदर स्वप्न बघत असते.. हृदयाची हाक आहे.. प्लीज तिला जगू द्या.. 8 मार्च हा महिला दिन उत्साहाने🎉 साजरा करूया.. 🙏🌸🙏 कवयित्री सौ.अनुपमा आनंद हुलगेरी

◾कविता :- नागडाच आहे काय तुजपाशी...

Image
नागडाच आहे काय तुजपाशी ना गडाच आहे काय तुजपाशी ग र्वानेच म्हणे बळे धनराशी डा गण्याच देती बोल या मनाशी च मत्कार श्रेष्ठ मानी तो मनाशी आ हे कठीणच माया मायाजाळ हे च भुललासे चुकलेले बाळ का ळ केंव्हा कोठे करेल घायाळ य थास्थित मनी वसेना दयाळ तु ष्ट होता जीव मस्त मस्तावला ज नी बोलतांना बोले बळावला पा श मायेचाच पाशे पाशविला शी घ्र चढे मद मदे माजविला श्वा सातच माझ्या देव वसलेला सा थ संगतीत असे रमलेला त या प्रेमवस्त्रे मी रे झाकलेला रे खी रेघोट्याच भक्ती भाळलेला मा झा भार वाही भारदस्त देव झा ला वेडा तोही घाली भक्ती खेव दे तो ध्यान असे क्षण ना विसरु व से मागे पुढे त्याचे मी लेकरु नां दतोच सुखे जरी मी नागडा द येनेच त्याच्या नसे मी उघडा तो च होता संगे आहे नी राहील य थामती भक्ती फळत राहील                                  निर्मिती:-                                  कवी - रा.र.वाघ,धुळे.                           (मो.नं.७५०७४७०२६१) here Amazon.in Widgets

◾कविता :- अंतरीची सुंदरता..

Image
अंतरीची सुंदरता.... अं तरीची सुंदरता त नावर विलसते री तसर विखरता ची रकाल खुलवते सुं दरता सुंदरच द क्ष सदा मनोहारी र मे मन हे खरच ता ळमेळ मोदकारी बा हेरील खाणाखुणा हे च मुळ अंतरीचे र हातसे उणादुणा ही च खुण खंत साचे उ णिवच येते पुढे म नी जर खोटे असे ल क्ष्य असो डोळ्यापुढे ते च सदा सत्य वसे स त्य जर अंतरात क री नाश नर्काचाच लां ब नाही ते मनात ना न्दे जीव स्वर्गातच आ नंदच द्यावा घ्यावा नं दलाल सांगे गीता दा वी बोध तोच घ्यावा ने ई पैलतिरा पिता आ नंदच मुळ असे पो हूनच पैलतिरा आ हे साधनच खासे प दोपदी ऐलतिरा खु णावते नाम मात्र ल गोलग घेई भार व से तन मनी पात्र ते च जीवनाचे सार                         निर्मिती:-                       कवी -  रा.र.वाघ,धुळे.                 (मो.नं. ७५०७४७०२६१)

◾कविता :- नवरा माझा

Image
  नवरा माझा      पहिले होता कुंकवाचा धनी, आता मात्र, तो आहे फक्त...... माझ्यासाठी ब्लॅक अँण्ड व्हाइट मनी, पहिले होता तो, माझ्या घराचा पहारेकरी, आता मात्र, आहे नुसताच तो... माझ्या प्रेमाचा वाटेकरी, त्याच्यामुळे बसली आमच्या विस्कटलेल्या संसाराची घडी, आता मात्र, नुसताच आहे तो... माझ्यासाठी एक 'घरगडी', पहिले होता तो माझ्यासाठी, संकटी धावुन येणारा 'देव', आता मात्र, वाटतो मला तो... नको-नकोशी वाटणारी 'ठेव', म्हणायचे पहिले मी, त्याला आदराने 'पंत', आता मात्र, तो झाला... माझ्या सहनशिलतेचा अंत, पहिले होता, नवरा माझा भोळा, आता मात्र, वाटतो तो मला... संसारी माझ्या, आकार-उकार नसलेला फक्त एक... मातीचा 'गोळा',               मंगेश शिवलाल बरंई.        पंचवटी, नाशिक ४२२००३.

◾ललित लेख :- स्ञी

Image
   आज स्त्रियांचा जन्मच मुळात नाकारतला जातो. पण स्त्रीयांमुळेच कुटुंबाचा वंशाचा वारसा पुढे-पुढे चालत राहतो हे समाज सोयिस्करपणे आज विसरला आहे. एक स्त्रीच पुर्ण कुटुंबाला शिक्षित करु शकते. आई बनुन, एका वटवुक्षाच्या सावलीप्रमाणे कुटुंबाचा मानसिक आधार बनुन.      ऐतिहासिक काळापासून आईचं महत्त्व सर्वपरिचित आहे. महाराष्ट्राचे लढवय्या राज्यकते शुरवीर शिवाजी महाराजांची आई जिजाऊबाई ह्या शिस्तप्रिय आई म्हणून ओळखल्या जात. त्यांच्या ह्या शिस्तप्रियतेचा फार मोठा वाटा शिवाजी महाराजांच्या यशात आहे. तसेच साने गुरजींच्या कथेतील शामची आई तिच्याविषयी कितीही लिहिले तरी शब्द अपुरेच पडतील. ती तर साक्षात वात्सल्याची मुर्तीच होती. असे इतिहासातील कितीतरी दाखले आपल्याला देता येतील.      स्त्री ही विविध भावनांनी नटलेली आहे. दैवानं मातुत्वाचं दान तिच्या पदरात टाकून तिचं श्रेष्ठत्व सिद्ध केल़ं आहे. तिच्या मनात वात्सल्याची भावना  निर्माण केली.स्त्रीच्या या विविध भावनांच्या शुंगारानं स्त्रीचं सौदर्य आधिकच खुलून दिसतं.      आई या शब्दात मुळातच आप आणि ईश्वर म्हणजे संपूर्ण जग सामावलेल आहे. संस्काराची पहिली पायरी ही

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

Image
नमस्कार  मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर               ( डॉ, राजेंद्र भारुड )_       ___ माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात  भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं.  जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती  प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती. अभिनेता अमीर खान आणि मी  मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामं करण्यासाठीच. एकदा परीक्षा होती. ओटय़ावर बसून अभ्यास करत होतो. दारू प्यायला आल

◾कविता :- जय जिजाऊ

Image
‼ ' मराठीचे शिलेदार कविता ' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'कविता लेखन '.‼ ➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖ मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम ➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖        🙏विषय :- जय जिजाऊ🙏        🎋दिनांक:- १२ जानेवारी २०२१ 🎋 💫💠💫💠💫💠💫 एक उरली ठिणगी    लाख पेटल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पनाची नवीन पहाट आज हि झाली नवचैतन्याची नवकल्पनांची आरोळी सुरू झाली स्वराज्याचा ध्यास घेऊनी स्त्रियांत तो उतरविला शान मान महाराष्ट्र उतरूनी जिजाऊंनी लाख लाख पूत्र मावळे उभे करूनी आशीर्वादाचे पारडे जड केले तर या माऊलीने अशी असावी माता जिचा वाटावा अभिमान पूत्र घडवीला ऐसा जो राष्ट्राची शान मान दान चंदन प्रेमाने झिजूनी वंदनात शिथिलता आणली योगी न होता उपयोग  आल्यात्या जिजाऊ... प्रभावा पेक्षा स्वभावाने  जिंकून दिले महाराष्ट्रला मर्दमराठ्याना अखंड  स्वराज्याची सावली धन्य ती जिजाऊ..... तुझ्या भेटीची ओढ लागली अंतरी मस्तक टेकविले मी तुझ्या चरणावर ती धन्य धन्य झाला सह्याद्री कनकन  जय जिजाऊ कोटी कोटी प्रणाम   सौ कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर  सदस्य मराठीचे शिलेदार समूह  🚩🏇