Posts

◼️ कविता :- ग्रुपचे नाते

Image
ग्रूपचेे नातं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जपायचं नातं म्हणून,  निर्माण केला ग्रुप.. सगळेच आपले म्हणून, भावना जपा खूप..   कोणी दिला रिप्लाय, म्हणून हुरळून जायचं नाही.. आणि नाही दिला रिप्लाय,  म्हणून खंत मानायची नाही.. सर्वांची मतं कायम, एकसारखी असतील कशी.. नकारार्थी, सकारार्थी, प्रत्येकाची वेगळी अशी.. राखायची असेल अबाधित,  एकमेकांची साथ.. तर द्यावाच लागतो सर्वांना, प्रेमाचा हात.. प्रत्येकाचं मत,  वेगळं असायलाच हवं.. तरच घडेल इथे,  रोज काहीतरी नवं.. काय बरं होईल,  नावडत्या जोकवर हसलं तर.. मनातल्या भावना झाकून, थोडसं फसलं तर.. फक्त एकच करा मित्रांनो, वेळ काढा थोडा.. प्रत्येक जण असावा, दुसऱ्यासाठी वेडा.. कधी गडबड, कधी बडबड, कधी बरीच शांतता.. दाखवून द्या ना एकदा, अंतरंगातील एकात्मता..  दुरावलेल्या दोन मनांत, एक पूल बांधणारा.. एखादा असतोच ना, निखळणारे दुवे सांधणारा.. ग्रुप असो नात्यांचा, वा असो तो मित्रांचा.. आपल्या हजेरीने बनवा, स्वप्नांमधल्या चित्रांचा..                        🙏 पुर्ण ग्रुपला समर्पित🙏 आवडल्यास नक्की पुढच्या ग्रुप वर शेयर करा  

◼️ कविता :- महाभारत अजून चालू आहे...

Image
🔸आपुलकी🔸 ➖➖➖➖➖➖➖➖➖ महाभारत अजून चालू आहे फक्त पात्र बदलले आहेत जीवन संघर्षाच्या नाटकातले फक्त मुखवटे बदलले आहेत दिसतील घायाळ अश्वत्थामा  दुःख उरात घेऊन फिरताना किती तरी मिळतील भीष्म केवळ वाचनासाठी जागताना आजही सर्वत्र दिसतात कर्ण नियतीने क्रुर सूड उगवलेले आपल्याच मनातून खचलेले वाईट संगतीने वाट चुकलेले स्वार्थी दुर्योधन ही आहेतच आपल्यात भांडण लावणारे दोन चार इंच जमिनीसाठी  नातेसंबंधांचा ही जीव घेणारे जीवन मोठं संघर्षमय आहे  इथे प्रत्येकालाच लढायचयं चक्रव्यहातल्या अभिमन्यूला मायेने धीरानेच सोडवायचंय इथे एकाकी पडलेत सर्वच एक दुसऱ्याची गरज आहे राज्य महाराज्य नको आता जराशी आपुलकी हवी आहे काळ बदलला वेळ बदलली आता तुम्ही ही थोडे बदला हो महाभारताचा बोध घेऊनी त्या आपल्यात आपुलकी वाढवा हो          

◼️ ललित लेख :- मनाची अफाट शक्ती

Image
लु ईस या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात वयाच्या  ५-१५ वर्षांपर्यंत त्यांच्यावर भरपूर शारीरिक अत्याचार झाले. यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका नकारात्मक होता की हे संपर्ण जगच वाईट आहे. सर्व पुरुष हे घाणेरडेच असतात व मी जगायला लायक नाही. ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’  होतात व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके वाचत. पुढे वयाच्या ४० व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात येते की ज्यांनी हे कृत्य करायचं ते करून निघूनही गेले; त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. त्रास (कॅन्सर) कोणाला झालाय तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी धरून ठेवल्या आहेत. जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? तर आपल्या दृष्टीने नक्कीच नाही. पण ‘लुईस हे’ यांनी मनाची स्वच्छता केली. त्या सर्व व्यक्तींविषयी मनात असलेला सर्व राग बाहेर काढून त्या सर्वांना मनापासून माफ केले व कोणतेही ऑपरेशन (शस्त्रक्रिया) न करता त्

◼️ ललित लेख :- सरपंच कसा असावा ?

Image
  सरपंच कसा असावा ? ________________________________ स रपंच ,  एक गावाचा नायक. सरपंच एक गावातील राजा असतो, गावातील विकासक असतो, गावातील पहिला व्यक्ती असतो, तो गावची शान असतो, तो गावातला   पहिला जनसेवक असतो, मि त्रांनो सरपंच असाच निवडा जो गावाची सेवा करेल, असा नाही की जो स्वतःचा मेवा करेल . सरपंच कोणाला पण करा पण हे एकदा वाचा 👇👇👇     लक्ष्य ग्राम पंचायत                सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्या,सदस्य,पँनल प्रमुख कसा असावा, कसा नसावा . ✅ गावामधील लोकांमध्ये भांडण लावून स्वतःची पोळी भाजनारा नसावा जर गावात भांडणे झाली तर ती मिटवणारा असावा नाही की वाढवणारा नसावा.      ✅ गावचा होणारा सरपंच सदस्य हा गावात रहाणारा असावा,जेव्हा गावाला अडचण असेल तेव्हा वेळेवर मदत करणारा असावा.  ✅ जर गावामध्ये भीषण दुष्काळ पडलेला असताना शासन कडून दोन टँकर असताना गावात एकच टँकर कधी तरी टाकणारा वरून उपकाराची भाषा करणारा नसावा कारण ते त्याचे कर्तव्य आहे.  ✅ गावाच्या विकासासाठी आलेला 14 वा वित्त आयोग निधी सर्व मिळून म्हणजे सरपंच,ग्रामसेवक,आणि स्वयंघोषित लोकल नेते,आदी जन वाटून खाणारे नसा

◼️कविता :- जीवन प्रवास

Image
निघालो प्रवासा, सोबतीला साथी. मनी नाही भिती, कसलीच...धृ डोईवर नभ, धरेवर पाय. हीच माझी माय, भासे मज...१ कष्ट रात दिस, जीवन प्रवास. फुलवून खास, वाढविला...२ दिसे सुखी जन, भरले नयन. सुखावले मन, आनंदाने...३ सुखाचा सागर, करुया जागर. मायेचा पाझर, काळजात...४   ✍️ खंदारे सुर्यभान गुणाजी    मु.पो.जलधारा ता.किनवट      संवाद- 9673804554

◼️ संगीत :- राज कपूर यांच्या पिक्चर मधील जीवनावरील 6 सुपरहिट गाणे... | Raj Kapoor's top 6 superhit song on the life

Image
भारतीय सिनेमा जगातले सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पैकी राज कपूर एक... मित्र व त्यांच्या सिनेमांचे करावे तितके कौतुक व वर्णन कमी आहे . मित्रांनो राजकपूर भारतात तसेच रशियामध्ये पण खूपच लोकप्रिय होते आणि आहेत.. ___________________________ .. _____________________________ वरील गाणे कसे वाटले कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास मित्राला व प्रियजनांना नक्की पाठवा 👇 गाणे पाठवण्यासाठी खालच्या बाजूला दाखवलेल्या व्हाट्सअप ला touch करा आणि शेअर करा  _________________________________ 💐🌸💐

◼️ कविता :- मी कुणाला कळलो नाही | ✍️सुरेश भट ...

Image
मी कुणाला कळलो नाही        --------------------------------------- मित्र कोण आणि शत्रू कोण          गणित साधे कळले नाही.. नाही भेटला कोण असा         ज्याने मला छळले नाही... सुगंध सारा वाटीत गेलो           मी कधीच दरवळलो नाही.. ऋतू नाही असा कोणता            ज्यात मी होरपळलो नाही.. केला सामना वादळाशी         त्याच्या पासून पळालो नाही.. सामोरा गेलो संकटाना            त्यांना पाहून वळलो नाही.. पचऊन टाकले दु:ख सारे          कधीच मी हळहळलो नाही.. आले जीवनी सुख जरी            कधीच मी हुरळलो नाही.. कधी ना सोडली कास सत्याची      खोट्यात कधीच मळलो नाही... रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण        मी कुणाला कळलोच नाही...!        मी कुणाला कळलोच नाही...!  ‌‌‌            कवी  : सुरेश भट ___________________________ सुरेश भट यांच्या इतर कविता कवी श्री सुरेश भट यांची एक अप्रतिम कविता वाचण्यात आली व मनाला खुप भावली म्हणून शेअर करीत आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की शेअर करा

◼️ कविता :- किल्ली

Image
किल्ली / चावी 🌸💐🌸 कधी ओळखशील स्वतःला अरे भल्या माणसा देवाजीने किल्ली देऊन पाठविला बाहुला जसा नाही दिसत ती तरी तोच सर्व घडवितो त्या हुकूम जगती या तू पळतो नि थांबतो पाप पुण्य दुःख दैन्य जरी तुजला कळते पाहून ते मन बघ रे तुझे कधी ना ढळते राग लोभ मोह द्वेष असेल जरी अंतरी तुला ना कळते कधी गोष्ट कोणती बरी मन बुध्दीची चावी त्या परमेशा हाती  त्यानुसार जगावे लागते  या जगती प्रार्थना करून सांग झणी तू  त्या देवाला जरी चावी हाती तुझ्या कल्याण करी प्रतिपाळा चावीने तुझ्या विश्वातील अशुभ सारे घालवावे सत्य शिव नि सुंदराचे नित्य अधिराज्य असावे ... केशीराज शरदकुमार सुमन -ज्ञानेश्वर वेदपाठक                  [  मंद्रुपकर   ]                                      सोलापूर                    _______________________________                   

◼️ ललित लेख :- आयुष्यात शनीची साडेसाती गरजेची...

Image
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄ साडेसाती भोगलेली माणसं ही नंतर नक्कीच यशस्वी होतात. संगीत क्षेत्र नाट्यक्षेत्र, खेळाडू क्षेत्र, यामध्ये यश साडेसाती मध्ये मिळालेली आहे. (पंडित भीमसेन जोशी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकरने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केले, यां सर्वांना उत्कृष्ट पुरस्कार मिळाले साडेसाती मध्येच. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी साडेसाती मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले. चटका बसलेला माणूस ताकही फुंकून पितो, म्हणजे येणाऱ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट सावधानपणे केली पाहिजे याची जाणीव साडेसातीच करून देते. खरं कोण खोटं कोण याचा उलगडा करते. साडेसाती मध्ये होणारे आघात हे माणसाचे मन बळकट करतात. म्हणूनच माणूस चांगल्या काळात येणाऱ्या बारीक-सारीक संकटांना तोंड देऊ शकतो. या जगात बरेच सक्सेसफुल माणसे म्हणतात, मला या जगाने खूप काही शिकवले,  ते फक्त साडेसाती मुळेच असते. मन सशक्त करते आणी संकटांना न घाबरण्याची बळही साडेसाती देते. साडेसाती माणसाला कष्टावर विश्वास ठेवायला शिकवते ना की नशीबावर. साडेसाती माणसाला प्रपंचातील इतर माणसांची लबाडी ओळखायला शिकवते. तात्का

◼️ शेअर बाजार :- स्टॉक मार्केटमध्ये टिकून राहण्याचे चार नियम!..

Image
--------------------------------------------- थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतून – स्टॉक मार्केटमध्ये टिकून राहण्याचे चार नियम!.. ----------------------------------------------- अमेरीकेत डेमोक्रॅटीक पक्षाला बहुमत मिळाले आणि जो बिडेन राष्ट्राध्यक्ष बनणार हे निश्चित झाल्यामूळे सगळेच शेअर बाजार एकदम जबरदस्त उसळले. संध्याकाळी ग्रुपमधल्या एका सदस्याचा मॅसेज आला. “सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आय टी सी चा शेअर एकशे त्रेसष्ट रुपयांना घेतला होता, आज त्याची किंमत एकशे चौऱ्याहत्तर झाली आहे.” “चांगले प्रॉफिट होत आहे, सेल करू का थांबू”? हे वाचून मला एकदम एक वाक्य आठवले. वॉरेन बफेचे भागीदार चार्ल्स मुंगर एकदा म्हणाले होते, “अनेक लोकांना कंपाऊंडींग म्हणजे चक्रवाढाची जादू माहित असते, पण चक्रवाढाची जादू अनूभवण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो, तो त्यांच्याकडे नसतो, म्हणून ते कंपाऊंडींगचे सुत्र अंमलात० आणून ते श्रीमंत होऊ शकत नाहीत.” शेअर खरेदी केला की लगेच तो भरभर वाढावा आणि पटकन विकून कधी एकदा आपण भरभक्कम प्रॉफिट कमवून खिशात टाकतो, अशी प्रत्येकालाच गडबड असते.   आणि ह्या झटपट क

◼️ कविता :- माझ्या मामाचे गाव

Image
________________________ मांगीतुंगीच्या पायथ्याशी  हिरव्या शालूनं नटलेलं माझ्या मामाचं गाव आहे पंचक्रोशीत गाजलेलं.. वळणा वळणाची वाट डोंगर रांगांचा तो थाट शेलबारीचा लागे घाट तिथे पक्ष्यांचा किलबिलाट आजी आजोबांची छाया मामा मामीची प्रेमळ माया एका पंगतीत बसवती दुध तूप लोणी खाया.. शेते मामाची बहरलेली पक्षी आम्हां साद घाली सूर पारंब्यांचे चाले डाव वडपिंपळाच्या पाराखाली मोसम नदीच्या किनारी पानाफुलांत रमायचो. आंबे चिंचा बोरं आम्ही चोरून तिथं खायचो.. किर्तन हरिपाठाचा गजर आपुलकीचा मनी भाव.. असे डेरेदार आणि भारदार आहे माझ्या मामाचे गाव.. सौ.सविता पाटील ठाकरे सिलवासा,दादरा नगर हवेली ©️प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह 🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂🌳🚂 *अजिंक्यतारा पायथ्याशी* *गाजले जगी नाव* *सप्ततारा भव्य सातारा* *माझ्या मामाचे गाव...||१||* *उंच सप्त डोंगरांमध्ये* *शहर टुमदार* *इतिहास घडविलेले* *खड्ग धारदार...||२||* *कला साहित्य नि शिक्षण* *परिपूर्ण सा-यांनी*   *बदलली दिशा अवघी* *वाहणाऱ्या वा-यांनी...||३||* *राजधानी ही स्वराज्याची* *भूमी शूर वीरांची* *इथेच सदा निर्मियेली* *काव्ये थ