Posts

दूरदृष्टी - कविता

Image
( येणाऱ्या भावी भविष्यासाठी आजची दुरदृष्टी ही खूप महत्त्वाची असते , अशीच एक खालील कविता. ) दुरदृष्टी ठेवून प्रत्येकाने लावा एकेक झाड तरच येणार्या संकटावर करता येईल मात वृक्षतोड झाली चहुकडे प्रदुषण वाढले बहू समतोल साधण्या निसर्गाचा एकेक झाड लावू प्राणवायुचे घटते प्रमाण वृक्षतोडीमुळे फार भविष्यात जगणे कठीण करा थोडा विचार कधी अवर्षण,कधी अतिवर्षण असमतोलाचे हे कारण जलसंपत्ती वाचविण्यास निकडीचे आहे वृक्षारोपण सजीव जीवनात वाढले धोके विविध आजारांचे निरोगी राहण्या जीवन वृक्षसंवर्धन आहे निकडीचे जीवसृष्टीला विनाशाकडे जाण्यापासून थांबवा राखण्या निसर्गाचा समतोल झाडे लावा,झाडे जगवा कवयित्री : कु.सुलोचना मुरलीधर लडवे साईनगर,अमरावती सदस्या,मराठीचे शिलेदार समूह ( एक टीप : सदर कविता मराठीचे शिलेदार कविता संग्रह या समूहातून घेतली आहे . कवितेचे सर्व हक्क कवयित्रीच्या स्वाधीन) आमच्या वेबसाइटवर तुमची कविता टाकण्यासाठी खालील व्हाट्सअप वर सेंड करावी व्हाट्सअप नंबर ला टच करा Whatsapp Number

क्रिया तशी प्रतिक्रिया - बोधकथा

💧💧💧💧🕉💧💧💧💧 क्रिया तशी प्रतिक्रिया ---------------- एक स्त्री आपल्या आलिशान कारने हायवे वरून शहराकडे जात असते. अचानक तिची कार बंद पडते. आकाश ही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त करण्याची काहीच माहिती नसते.ती इकडे तिकडे मदतीसाठी कोणी आहे का ते  पाहते तिला कोणीच दिसत नाही. मदतीसाठी इतर गाडयांना हात दाखविते पण कोणताच गाडीचालक थांबत नाही. बराच वेळ जातो आता मात्र तिच्या डोळ्यात काळजीने पाण्याच्या धारा लागतात. तेवढयात सखाराम नावाचा माणूस तिच्या जवळ येतो . त्याला पाहून ती स्त्री प्रथम घाबरते .पण सखाराम म्हणतो घाबरू नका ताई मी प्रयत्न करून पाहतो आणि गाडी दुरूस्तीच्या कामाकडे वळतो. थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या स्त्रीची कार सुरू होते.ती स्त्रि सखाराम ला खूप खूप धन्यवाद देते आणि सखाराम ला म्हणते "तुम्ही माझी खूप मोठी अडचण सोडविली मी त्या बदल्यात सांगा तुम्हाला किती रुपये देऊ"?तेंव्हा सखाराम म्हणतो काही नको , हे माझे काम नव्हतेच मी तर तुम्हाला मदत केली. मलाही एका माणसाने मदत केली होती आणि त्याचा कोणताही मोबदला त्यांनी न घेता आपणही इतरांना अशीच मदत

जीवन विचार 150

दहा वेळा विचार करा  जर उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात! पण जर तो जिवंत असेल तर त्याला मारल्याशिवाय चैन पडत नाही.जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात. पण तो जिवंत असेल तर त्यास जागीच ठार. मारतात.जर आई-वडील फोटोत असतील तर त्यांची पूजा करतात पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही.! फक्त हेच मला समजत नाही की जीवना पासून इतका द्वेष आणि दगडा बद्दल इतकं प्रेम का आहे? लोक विचार करतात मृत लोकांना  खांदा देणे पुण्याचे काम आहे. तर मग जिवंत माणसांना मदत करणे  पुण्य समजलो तर जीवनभर किती खूष रहाल!एकदा निट विचार करून पहा!  आयुष्य सुंदर आहे.🤗 🙏🙏🙏🙏             असेच लेख.            वाचण्यासाठी आमचा ब्लॉग          फॉलो करा              

शिवकालीन वजने(मापे)

Image
 * अठवे - शेराचा 1/8  * अडशेरि - अडीच शेर  * अदपाव - अर्धा पावशेर  * अदमण - अर्धा मण  * अदशेर - अर्धा शेर  * अधोली - अर्धी पायली  * अंजली - ओजळभर पानी  * आटके - अर्धा शेर  * आढक - चार शेर, पायली  * कर्ष - सोळा माषांचे एक परीमाण  * कार्त - पाव रत्तल  * किळवे - अर्धा छटाक, अर्धे निवळे  * कुडव - आठ शेर  * कुंभ - वीस खंडी  * कोथळी - मुंबईत 6 मणांची गोनी  * कोड - खंडी, वीस मण  * कोळवे - शेराचा अष्ठमांश  * खारी - 16 द्रोण, एक खंडी  * गरांव - अर्ध गूंज माप  * गिधवे - धान्य मोजन्याचे एक माप  * गुंज -  एक वजन परिमाण  * चंपा - दोन शेर धान्याचे माप   * चवाटके - छटाक  * चवाळामण - एक प्रकारचा मण  * चाटंक - पांच तोळे वजनाचे परिमाण  * चाळीसा - चाळीस शेरांचे माप  * चिटके - अर्ध्या कोळव्याचे माप  * चिपटे - पावशेराचे माप  * चिमटी - हाताचा अंगठा व तर्जनी याच्या पकडित मावनारा पदार्थ  * चिळवे - कोळव्याचा निम्मा भाग  * चोथवा - एक पायली  * चौटके - चार टाकांचे माप,छाटाक, चवटके  * चौशेरी - चार शेरांचे माप  * छटाकी - छटाक  * छतिसी - छत्तीस परिमानाचे वजन  * टवणा - पांच शेरांचे माप  * टांक

◼️बोधकथा :- निसर्गाचे न फिटणारे ऋण

Image
कथेचे शीर्षक :   निसर्गाचे न फिटणारे ऋण...   कथेचे स्वरूप :   संवाद     कथेतील पात्र : १.अरुण  २.रोहन  ३.रामुकाका  ४.पाटील सर ▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️ अरुण आणि रोहन शाळेला निघाली असतात त्यांच्या सोबत रामुकाका पण शेतापर्यंत चालत येतात त्यांच्या खांद्यावर कुऱ्हाडी पाहून रोहन विचारतो ?  रोहन :  काका हि कुराड कशासाठी नेत आहात . काका : अरे रोहन ही कुराड जनावराच्या गोठ्यासाठी कुरमड आणाया जात आहे . अरुण : काका त्यासाठी तुम्हाला झाड तोडावे लागेल .   काका : हो रे अरुण पण हे सर्व का विचारतोस .   अरुण : याचे कारण काका कदाचित तुम्हाला माहीत असेल नसेल पण मी सांगतो ,आज पृथ्वीतलावर सजीव सृष्टी असण्याचे एकमेव कारण वृक्ष आहेत .   काका : अरे उगाच काय म्हणतो.     रोहन : अरुण खरं बोलतो काका झाडं आहेत ,म्हणून पाणी पडतं ,झाडं आहेत म्हणून सजीव जगतात ,त्यांनी निर्माण केलेल्या ऑक्सीजन वरच, खरंतर आपल्याला निसर्गाचे कधीच ऋण  फेडता येणार नाहीत. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या हिश्‍श्‍याचे एक तरी झाड नक्की लावावे. तुम्ही विचार करा काका ऑक्सीजन नसते तर माणूस जगू शकला असता का ? "असे जर असते तर अमेर

मराठी माणूस मागे असण्याची २3 कारणे

Image
मराठी माणूस स्पर्धेच्या युगात मागे का पडतो आहे, आर्थिकद्रुष्ट्या का कमकुवत होत आहे, बेकारी व गरिबी का वाढतच चालली आहे, मी हि त्यावर बरेच संशोधन केले व माझ्या निरीक्षणातून व शेकडो लोकांशी संपर्क साधून २3 कारणे शोधून काढली, जी मराठी माणसांनी समजून घ्यावीत . आपण स्वतःला विचारावित व त्यावर स्वतःच उपाय योजना करावी . ह्या गोष्टी सकारात्मकतेने घेतील हि विनंती. मागासलेपणाची २3 कारणे - १) कमी प्रवास  -     प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही , अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही  २) अति राजकारण - मराठी सामाज राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो . व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का ?  ३) दोनच हाथ कमवणारे -   सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे .  ४) सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला  -   कुटुंबात एकी नसते बाप एका दिशेला,मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ त

स्वप्न काय असते

Image
स्वप्न जरूर पाहावी परंतु त्या स्वप्नांमध्ये स्वताला कधीच विसरू नये तसेच आपल्यांनाही कधी विसरू नये.स्वप्न पूर्तीसाठी सतत झटावं परंतु स्वप्न पूर्ण जर झाली नाहीत तर खचूनही जावू नये.कारण काळासोबत सर्व काही बदलत असते.प्रत्येक वेळेला सफलता हाताला येतेच किंवा येईल हे अजिबातच अपेक्षित नसते . जीवनात कधी चढ येतील तर कधी उतार ..पण ह्या चढ उतारात खचून जाण्याच कारण नाही.संयमाने जर घेतले तर जीवनाचे चढ उतार सहज पार होतील.आणि जीवन हळूहळू लक्षा कडे मार्गस्थ होईल.बर्याच अशा गोष्टी आहेत प्रयत्न करूनही फलीत होत नाहीत.म्हणून प्रयत्न सोडता येत नाहीत.दुखातही सुखाचा आभास असतोच . फक्त तो जाणवत नाही.पायात काटा रूतला तर दुःख होतेच परंतु तो काटा काढण्याचं सुख पण असतेच.आलेल्या दुःखाला मागे टाकण्यातच सुख असते परंतु ते फारसं जाणवत नाही.वेदना संवेदना म्हणजे जीवन ..या वेदना संवेदनांच्या हयातीतच आपण स्वप्न पाहतो.त्या मुळे कधी स्वप्न पूर्ण होतील तर कधी नाही.. म्हणून अपेक्षा ह्या अपेक्षे पुरत्याच असाव्या . अनाठायी अपेक्षा जेव्हा भंग पावतात तेव्हा मात्र येणारी नरवसता जीवघेणी असते.हि नरवसता येवूच नये यासाठी स्व

खरं पारखणे

*ऐश्वर्या राय* एखादा साबुन प्रमोट करत असेल तर  तो आपण खरेदी करतो.  *शिल्पा शेट्टी* एखादा शाम्पू प्रमोट करत असेल तर  तो आपण खरेदी करतो.  *ऋतिक रोशन* एखादा deo प्रमोट करत असेल तर  तो आपण खरेदी करतो.  *परंतु . . . .* आपला *मित्र किव्वा कोणी नातेवाईक* काही बिजिनेस करत असेल तर आपण त्याचा कडून काहीच खरेदी करत नाही.  आपण ज्यांना ओळखत नाही त्यांची फक्त एक जाहिरात पाहून ते प्रॉडक्ट खरेदी करतो आणि ज्यांना *आपण जन्मा पासून ओळखतो* जे सर्व साधारण जीवन जगतात आहे त्यांना सहकार्य नाही करत त्यांच *प्रॉडक्ट नाही घेत त्यांना प्रमोट नाही करत*   आपल्या कडे *हजारो कारण* असू शकतात *मित्रा कडून किव्वा नातेवाईक* कडून खरेदी नाही करायचे,  ते सर्व सोडून आज पासून फक्त आणि फक्त *मित्र किव्वा नातेवाईक* ला प्रमोट करू त्यांच्या कडूनच हवी ती  वस्तू खरेदी करू भले ही जास्त पैसे दयावे लागले तरी चालेल त्यांनाच *आत्मनिर्भय बनवू मोठे बनवू* जे पेहलेच *मोठे मोठे सेलिब्रेटी* आहेत ज्यांचा अफाट *पैसा बँक बॅलन्स प्रॉपर्टी आहे* त्यांना पुन्हा मोठे करण्याने काय होणार  आपले विचार बदला आपल्याच  *मित्र किव्वा नातेवाईक ला प्रमोट करा मोठ

वेसन - कविता

1. मनास ठेवण्या काबूत पहिली बांधावी त्यास वेसण  योगसाधना,ध्यानधारणा करुन जगावे आरोग्यमय जीवन गुराढोरांना ठेवण्या काबूत,  नाकात बांधतात दोरीची वेसण   हुंदडणाऱ्या बैलमनावर करावे लागते तसेच सुसंस्काराचे शिंपण जेव्हा सैरवैर चोहीकडे भरकटत  रहाते आपले वढाळ अस्वस्थमन  तेव्हाच समाजात अन्याय,अत्याचाराचे  घडते धुंवाधार प्रदर्शन अश्लील,हीन कुविचारांनी जेव्हा  आपले ग्रासले जाते तनमन त्याला काबूत ठेवण्यासाठी अंगिकारावा सकारात्मक दृष्टिकोन आजच्या भावीपिढीवर जेव्हा विद्यार्थीदशेतच  आत्मनिर्भर सद्विचारांचे घालू आपण वेसण  तेव्हाच ही भावीपिढी होईल आत्मनिर्भर  अन् सुसज्ज होतील करण्या स्वतःचे आत्मपरीक्षण  सौ.रेखा बांदल, पुणे. सदस्य मराठीचे शिलेदार समुह. 2. मनाचे द्वंद् माझ्या मला न कळले म्हणून माझ्याविरुद्ध त्याने बंड पुकारले चंचल मन हे झरे वाहती वाट मिळेल तिकडे आता जमिनीवर तर लगेच क्षितिजा पलिकडे..... .. त्यांच्यामते,भावना त्याच्या मला कळतं नाही कळल्याचं तरी फारसे वाव देत नाही वाढत वय माझं तो स्वीकारत नाही त्याचं सुसाट पळण, मला पटत नाही..... वय चाललंय  भविष्याकडे मन पळतय भूतकाळकडे म्हणून केलंय  मी त्याला

अहिंसा का वास्तविक स्वरूप

Image
💐*अहिंसा का वास्तविक स्वरूप*.........👌          *अहिंसा का मतलव केवल किसी के प्राणों का रक्षण ही नहीं किसी के प्रण का और किसी के उसूलों का रक्षण करना भी है। अहिंसा, अर्थात वो मानसिकता जिसमे प्रत्येक व्यक्ति को अपने विचारों की अभिव्यक्ति का अधिकार हो।*          *किसी व्यक्ति को अपनी इच्छा का कर्म करने का अधिकार मिले चाहे ना मिले पर अपनी इच्छा को अभिव्यक्त करने का अधिकार जरूर होना चाहिए। अहिंसा का सम्बन्ध किसी के शरीर को आघात पहुँचाने से ही नहीं किसी के दिल को आघात पहुँचाने से भी है।*           *किसी के दिल को दुखाना भी बहुत बड़ी हिंसा है। गोली से तो शरीर जख्मी होता है आदमी की ख़राब वोली से आत्मा तक हिल जाती है। अतः अहिंसा केवल आचार में ही नहीं विचार और बोली में भी रखना परमावश्यक है।*          ।।जय श्री राधे कृष्णा जी।।                         असेच लेख.            वाचण्यासाठी आमचा ब्लॉग          फॉलो करा              

काही सत्य गोष्टी

Image
_👉 *दूध को दुखी करो तो दही बनता है|*_ _👉 *दही को सताने से मक्खन बनता है|*_ _👉 *मक्खन को सताने से घी बनता है|*_ _👉 *दूध से महंगा दही है,दही से महंगा मक्खन है,और मक्खन से महंगा घी है|*_ _👉 *किन्तु इन चारों का रंग एक ही है सफेद|*_ _👉 *इसका अर्थ है बाऱ- बार दुख और संकट आने पर भी जो इंसान अपना रंग नहीं बदलता,समाज में उसका ही मूल्य बढ़ता है|*_ _👉 *दूध* उपयोगी है किंतु एक ही दिन के लिए, फिर वो *खराब* हो जाता है....!!_ _👉 *दूध* में एक बूंद *छाछ* डालने से वह *दही* बन जाता है जो केवल दो और दिन *टिकता* है....!!_ _👉 *दही* का मंथन करने पर *मक्खन* बन जाती है, यह और तीन दिन टिकता है....!!_ _👉 *मक्खन* को उबालकर *घी* बनता है, *घी* कभी खराब नहीं होता....!!_ _👉एक ही दिन में बिगड़ने वाले *दूध* में कभी नहीं बिगड़ने वाला *घी* छिपा है....!!_ _👉इसी तरह आपका *मन* भी अथाह *शक्तियों* से भरा है, उसमें कुछ_ _*सकारात्मक विचार* डालो अपने आपको *मथो* अर्थात *चिंतन* करो....अपने *जीवन* को और *तपाओ* और तब देखना_ _👉 *आप कभी हार नहीं मानने वाले सदाबहार व्यक्ति बन जाओगे....!!*_                      

🤔तुम्हाला माहीत आहे का ? राज्यपाल आमदार नसलेल्या व्यक्तीलाही मुख्यमंत्री बनवू शकतात

Image
🤔 *तुम्हाला माहीत आहे का ? राज्यपाल आमदार नसलेल्या व्यक्तीलाही मुख्यमंत्री बनवू शकतात, ते असे* 💁‍♂️ नवीन सरकार निर्माण करण्याच्या प्रक्रियेत राज्यपालांचे महत्व घटनात्मकदृष्ट्या अनन्य साधारण आहे, जाणून घेऊया राज्यपालांच्या अधिकाराविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी... 🏫 संसदीय शासन पद्धतीत रूढ झालेल्या संकेतानुसार राज्यपाल हे विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करत असतात.  📓 मात्र, राज्यघटनेमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड आणि नियुक्तीविषयी कोणतीही विशेष पद्धत सांगितलेली नाही. कलम १६४ मध्ये फक्त एवढेच म्हटले आहे की, राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील. ⌛ विधानसभेमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नसते, त्यावेळी सर्वात मोठ्या पक्षाच्या किंवा युतीच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल शपथ देतात आणि त्यांना एका महिन्याच्या आत विश्वासदर्शक ठराव घेण्यास सांगितले जाते.  👑 ठराव जिंकल्यास ते मुख्यमंत्री म्हणून कायम राहतात. अशा प्रकारे राज्यपालांनी स्वेच्छाधिकार वापरल्याची भारतात उदाहरणे आहेत. 🧐 मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यापूर्वी त्याने बह

ब्लॉगर महिन्याला किती पैसे कमावतात

Image
ब्लॉगर्स किती पैसे कमावतात याचा एक निश्चित आकडा सांगणं तसं कठीण आहे .  कारण लिखाणाचाच भाग असलं तरी ब्लॉगिंग हे आता एक परिपूर्ण वेगळं क्षेत्र झालेलं आहे .  त्यातून मिळाणारा आर्थिक फायदाही चांगला आहे .  त्यामुळे लिहिण्याची पध्दत ,  जनमानसात असलेलं स्थान ,  अनुसरण करणारी लोकं आणि स्वत :  घेत असलेली मेहनत या सगळ्यांची गोळाबेरीज अंतिम आकडा ठरवत असते .  एक मात्र निश्चित आहे ,  ब्लॉगिंगचं उत्तम ज्ञान असणारी आणि त्याकडे अतिशय गंभीरपणे बघणारी व्यक्ती महिन्याला एखादी नोकरी करणा - या किंवा व्यवसाय करणा - या व्यक्तीपेक्षाही खूप चांगले पैसे कमावू शकते .  तरीही पैशांच्या बाबतीत सांगायचंच झाल्यास ,  चांगले ब्लॉगर महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रूपये सहज कमावतात . भाषा  :   हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्यावरून ब्लॉगचा संचार आणि वाचकवर्गाची संख्या ठरते. संगणकाची प्राथमिक भाषा इंग्रजी असल्याने आणि भरपूर मजकूर त्याच भाषेत असल्याने सहाजिकच इंग्रजीत ब्लॉगिंग करणा-यांना भरपूर मागणी आहे. या भाषेत जगभरात मजकूर वाचला, शोधला आणि लिहिला जात असल्याने सहाजिकच त्यात भरपूर पैसे आहेत. इंग्रजीच्या

🌱●प्रेरणा कशास म्हणतात?●🌱

Image
writer : arun chavan *न्यूटनच्या वर्गात* *त्याच्या व्यतिरिक्त* *अजूनही ५० विद्यार्थी होते...!!!!* *आईन्स्टाईनचा वर्गही* *काही रिकामा नव्हता...!!!!* *बाबासाहेब तर वर्गाबाहेर* *बसून नुसतंच ऐकायचे...!!!!* *यांच्या मास्तरांनी* *सगळ्या वर्गाला एकसारखेच* *ज्ञान दिले होते...!!!!* *मग त्यांच्यातले* *"हे एकएकटेच"* *एवढे का शिकले...???* *तुकोबा ज्ञानोबा तर* *शाळेतच गेले नव्हते...!!!!* *शिवबांनी युद्धनीती* *कुठल्या मास्तर कडे* *शिकली होती...???* *तेंडुलकरच्या मास्तरांनी* *किती सेंच्युरी मारल्या होत्या...???* *आंबेडकरांच्या मास्तरांना* *किती घटना लिहिण्याचा* *अनुभव होता...???* *हे सगळेच शिकले* *कारण त्यांना* *शिकायचे होते...!!!!* *मास्तरांचे "क्वालिफिकेशन"* *त्यांच्या दृष्टीने गौण होते...!!!!* *सिलॅबसचे बंधन त्यांनी* *स्वतःस घातले नव्हते...!!!!* *आम्ही त्यांना* *देव मानून मोकळे होतो* *आणि आमचेच हात बांधून ठेवतो...!!!!* *आमच्या अपयशाचे खापर* *आमच्याच मास्तरांच्या* *अज्ञानावर फोडून* *मोकळे होतो...!!!!* *भरपूर फी घेणाऱ्यांना* *ज्ञानी म्हणतो आणि* *त्यांचे खाजगी क्लास ला

व्हॉट्सअ‍ॅप वर लवकरच उपलब्ध होणार हे खास फिचर.. कितीही जुने मेसेज शोधा एका मिनिटात !

👌🏼 _*व्हॉट्सअ‍ॅप वर लवकरच उपलब्ध होणार हे खास फिचर.. कितीही जुने मेसेज शोधा एका मिनिटात !*_   🔎 _व्हॉट्सअ‍ॅप सातत्यानं युझर्ससाठी नवीन फिचर्स आणि सिक्युरिटी फिचर्स लाँच करत असतं. बऱ्याचदा आपल्याला जुन्या मेसेजचा संदर्भ हवा असतो तेव्हा तो मिळत नाही अशावेळी तो शोधणं अधिक कठीण होऊन जातं. यासाठी कंपनीकडून खास फिचर्स लाँच करण्यात येणार आहे. लवकरच आपल्याला तारखेनुसार मेसेज शोधता येणार आहे._ 🗓️ _त्यामध्ये एका कॅलेंडर आयकॉनला व्हॉट्सअ‍ॅप सोबत जोडण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्याला हे अ‍ॅप वापरताना कॅलेंडर आयकॉन दिसेल. या कॅलेंडरच्या मदतीनं तुम्ही कितीही जुने मेसेज एका मिनिटात शोधू शकणार आहात. तुम्हाला तारीख निवडायची आहे. त्या तारखेला तुम्ही कोणाशी आणि काय बोललात याचे तपशील पाहता येणार आहेत._ 💬 _सध्या या फिचरवर टेस्टिंग सुरू असून सर्वात पहिल्यांदा हे फिचर आयफोन आणि त्यानंतर अँड्रॉइड फोनसाठी लाँच करण्यात येणार आहे. wabetainfo ने दिलेल्या वृत्तानुसार या फिचरवर सध्या काम सुरू आहे. या फिचरचं टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर युझर्सला याचा लाभ घेता येणार आहे._

🙆‍♂️भोलानाथ नाही आता गूगलनाथ - कविता

*🙆‍♂️भोलानाथ नाही आता गूगलनाथ*        मुलांची दिवसभर ऑनलाईन शाळेत कॉम्प्युटर समोर बसून होणारी (मानसिक) दमछाक बघून भोलानाथची आठवण झाली. पण सध्या सगळे प्रश्न आपण एकालाच विचारतो.. कोणाला? खाली वाचा. सांग सांग गूगलनाथ माऊस अडकेल काय, कॉम्प्युटर हा बंद पडून सुट्टी मिळेल काय? सांग सांग गूगलनाथ... गूगलनाथ, बाईंचा माईक बिघडेल काय, ओरडून ओरडून शिकवताना घसा बसेल काय? गूगलनाssथ, गूगलनाथ!... गूगलनाथ, गूगलनाथ खरं सांग एकदा आठवड्यातून वायफाय बंद पडेल का रे तीनदा गूगलनाssथ, गूगलनाथ!... गूगलनाथ उद्या आहे गणिताचा पेपर वीज पडून इंटरनेटची तुटेल का रे केबल? गूगलनाssथ, गूगलनाथ!... गूगलनाथ, गंमत केली, असू देत ना पेपर पण शाळेच्या मातीमध्ये फोडू दे की ढोपर गूगलनाssथ, गूगलनाथ!... गूगलनाथ पुरे झाली स्क्रीनवरची शाळा मित्र नाही, दंगा नाही, आलाय रे कंटाळा  गूगलनाssथ, गूगलनाथ!...

🙏🏻देव आहे की नाही ?

देव आहे की नाही हे माहित नाही पन एक अशी शक्ती अस्तित्वात आहे जी आपल्या पाप पुण्या चा अचूक हिशेब ठेवते आणि त्याची फळ आपल्याला जिवंत असतानाच देते  आपल्या एकूण यूनिवर्स चा विचार केला तर मात्र आपण देव आहे असेच समजून येते कारण इतके मोठे ब्रम्हांड अस्तित्वात असणे हे खुप मोठे आश्रर्य आहे आणि हे ब्रम्हांड इतके मोठे आहे की प्रकाशाची गति 300000 KM प्रति सेकंड आहे तरी सुद्धा करोडो ताऱ्यांचा प्रकाश अजुन आपल्या पृथ्वि पर्यन्त पोहचला नाही आहे आणि याच्या उत्पत्तिला लाख लाख करोड़ वर्ष झाली आहे तरी ती सूर्यकिरणें अजुन प्रवास च करत आहेत यावरून आपण अंदाज लावू शकतो की खरच हे देव करतो आहे की निसर्ग आणि हो ज्यावेळी HIKS BOZHON नावाची पार्टिकल चा शोध लागला तेव्हा साइंटिस्ट ने सुद्धा त्याला गॉड पार्टिकल हे नाव दिले .   पृथ्वि च सोडून दया पन हा विचार करा की हे सारे ब्रम्हांड इतके परफेक्ट काम कसे काय करते कोणी तरी आहे जो हे सगळे विश्व संभाळात आहे कोणत्या नविन शोध लागेपर्यन्त आपन असे समजू शकता की खरच देव आहे

👀शत्रूच्या मनात धडकी भरवणारे भारताचे पाच special forces!

Image
भारताच्या स्पेशल फोर्सेस या थेट भारतीय लष्कराच्या नियंत्रणाखाली असतात आणि स्पेशल ऑपरेशन्ससाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार केले जाते. भारताच्या याच स्पेशल फोर्सेसबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.  मार्कोस मरीन कमांडोजचे संक्षिप्त स्वरूप म्हणजे मार्कोस! हे भारतीय नौदलाचे स्पेशल युनिट म्हणून ओळखले जाते. ही फोर्स कोणत्याही दुर्गम भागामध्ये ऑपरेशन पूर्णत्वास नेऊ शकते परंतु मरीन एनव्हाररमेंटमध्ये त्यांचे स्पेशलायझेशन आहे. १९४७ पासून मार्कोस देशाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. दहशतवाद्यांशी लढणे, नौदला सोबत युद्धात सहभाग आणि संकटात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये मार्कोसने नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. शत्रू देश आणि दहशतवाद्यांमध्ये मार्कोसची मोठी भीती आहे. वेळोवेळी मार्कोस इतर देशांसोबत स्पेशल ट्रेनिंगमध्ये देखील सहभागी होते.  *  पारा कमांडोज *  भारताच्या सर्वोत्तम स्पेशल फोर्सपैकी एक फोर्स म्हणजे पारा कमांडोज ! भारतीय लष्कराचे युनिट म्हणून १९६५ मध्ये या फोर्सची स्थापना करण्यात आली. होस्टेज रेस्क्यू, काउंटर टेररिज्म, पर्सनल रिकवरी यांसारख्या परिस्थिती हाताळण्य

🌜🌛चंद्राची माहिती

🌕 *  चंद्राची माहिती * 🌕  ***********************  पृथ्वीचा उपग्रह म्हणून चंद्र आपल्याला माहित आहे. अवकाशातील सर्वात जवळची वस्तू व रोज रात्री साथसंगत करत प्रकाशणारी सर्वात मोठी वस्तू म्हणूनही चंद्र जवळचा वाटतो. पण हा चंद्र परप्रकाशी आहे, हे सांगितल्यावरच लक्षात येते. चंद्र आकाशात नसेल ती रात्र म्हणजे अमावस्येची रात्र आपल्याला नकोशी वाटते. याउलट पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात फेरफटका करायला, गप्पा मारायला कोणीही आनंदाने तयार असते.  सूर्यमालिकेतील ग्रहांना उपग्रह आहेत त्यांची निर्मिती बहुधा ग्रहांबरोबरच झाली असावी. चंद्र हा पृथ्वीच्या साथसंगतीनेच वावरतो. पृथभोवती २९.५३ दिवसांतच प्रदक्षिणा घालत याच्या पृथ्वीबरोबर सूर्यप्रदक्षिणाही चालू असतात. पण यात एक मोठा फरक आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो व बरोबर तेवढ्याच वेळात स्वतःभोवती देखील फिरतो ! त्यामुळे पृथ्वीवरून चंद्राची फक्त एकच बाजू सतत दिसत असते. याचा परिणाम तापमानावरही होतो. सूर्याच्या बाजूचे तापमान खूपच उष्ण म्हणजे १२० अंश सेंटीग्रेड असते तर दुसऱ्या बाजूला उणे १५३ अंश सेंटीग्रेड इतके अतिथंड तापमान राहते.  चंद्राचा आ