Posts

◾कविता :- हिम

 हिम शुभ्र नाजुक हिम पांढरा  वाटे ओंजळीत घ्यावे जरा  स्पर्श हा गुळगुळीत  बर्फ हा घेता मुठीत  लगेच वितळे सारा  क्षणात पाणी बर्फाचे  रुपांतर अवस्थेचे  न थांबे हे कधी जरा  होईल काय क्षणांत  रुपांतर पाण्याचे बर्फात  मनी येई जरा जरा बर्फ हे जीवन जणू  कधी संपे काय म्हणू  या हव्याशा क्षणभंगुरा रमा शिरसे

◾कविता :- शेकारणी

 12) कविता -शेकारणी         शेकारणी  नेमीच येतो मग पावसाळा,घेऊन नवा सोहळा . पावसाळ्यात लागतील ,गळती घरे सांभाळा . चिखल मातीच घर ,त्याला साध्या कौलाचा छत. फक्त निवारा निवसी ,उभा संसाराचा रथ . करून घराची शेकरणी गळती काढु नकळत.... गळती लागलेत घराला ,पीचल्या पावळणीला . कोड पडलय मला, नी माझ्या परिवाराला . गळतं लागलय मनाला ,गांजलेल्या परिस्थितीला. ठिगळं लावावं जसं, फाटलेल्या सदर्याला . फाटल्या संसाराची, गळती काढु नकळत..... पडल्या पावसाचं पाणी ,मनाहुन निर्मळ . पडलं जरी आढ्यावर, वळचणीला खळखळ . गढूळ जरी वाटलं तरी, काही वेळात निवळे . हे काही कसं ,आमच्या मनाला न कळे . गढूळ झाल्या मनाची, गळती काढु नकळत.... पहील्या पावसात, काढुया चला गळती . परिस्थितीची ,संसाराची ,चंचल मनाची . संस्कृतीची, संस्कारांची ,गंजल्या बुद्धीची . माणसातील रूजलेल्या, अदृश्य सैतानाची . अमानुष वृतीची ,विकृतीची ,गळती काढु नकळत.....करून शेकारणी ,वास्तव स्वरूपाची... रचना  संतराम पाटील  केनवडे,कागल मो नं 9096769554

◾कविता :- रोज सकाळी लवकर उठायचं

 ***** रोज सकाळी लवकर उठायचं छानपैकी आरशात बघून हसायचं आरसाही आपल्याला बघेलं तोही मस्तपैकी हसेलं त्याचं हसण पाहून आपला आळस निघुन जाईल दिवसाची सुरवात एखदम झक्कास होईलं पण हो....  आपण हसलो हे मात्र  आरशाला सांगून द्यायचं कारण तो विसराळू असतो अनेकांच्या चेहऱ्यावरची मरगळ दिवसभर पुसत असतो   आहो....  या माणसांच्या गर्दीत आपण रोज किती दुःखी चेहरे बघतो नैराश्याने जडं झालेल्या चेहऱ्यासाठी कुठेतरी हासु शोधत असतो खर सांगुका.... आपला चेहरा प्रसन्न असला की दुसऱ्याला त्याच्या हेवा वाटतो हसऱ्या चेहऱ्यावरच हसणं पाहून तो नव्याने जगायला सुरवात करतो खरतर....  या जगात सुख समृद्धीचा धनी कोणीच नाही तरीही एकमेकांच हसु घेवून माणूस आनंदात दिसतो चेहऱ्यावरचे भाव आरशात बऱ्याचदा बघतो चारहीबाजूने माणसाच्या वाटेला नैराश्यच असते ठरवले तरिही चिंता विवंचना पिच्छा सोडत नसते अशावेळी सारकाही विसरून एकांतात स्वतःच हाश्यानंद करायचा आणि आपल्या जगण्याला नवा अर्थ द्यायचा कारण....  एक छोट्याशा हसण्यातून चेहऱ्यावरचे किती संदर्भ बदलतात तेव्हाकुठे मुखवट्याच्या हाश्यलकीरा सुंदर दिसतातं म्हणून हे जीवन क्षणभंगुर आहे बिनधास्त हसा

◾कविता :- लेक सासरी जाते तेव्हा

 लेक सासरी जाते तेव्हा बापाला वाटतं  माझे काळीज  माझ्यापासून दुर गेले माझ्या देहातले  एक घर रिकामे झाले लेक सासरी गेल्यावर  आईचे मनही हळवे होत असते शोकेसमधली खेळणी पाहून   लेकीच्या आठवणीत दिसते लेक सासरी जाताना  हसरा चेहरा आईचा  कधी रडका कधी भावनिक दिसतो तेंव्हा मात्र  बापाच्या डोळ्यात  अश्रुंचा पाऊस असतो   आईबाबांचा हात सोडून लेक तिच्या घरी जाते तेव्हा.... आई चारचौघात रडून घेत असते  बापाला रडायला मात्र एकांताशिवाय दुसरी जागाच नसते  लेक सासरी असताना माहेराचे आंगण लेकीवाचून सुने सुने होते ती गेल्यावर तिच्यामुळे  सासरचे घर शेभून दिसते  लेकीने मोठ होवू नये घर सोडून तिने जावू नये अस प्रत्येक आईबाबांना वाटत असते पण नाही...  ती माहेरा ची लेक आणि सासरची सून असते म्हणून तिला जावचं लागतं.. *संजय धनगव्हाळ* ९४२२८९२६१८

◾कविता :- पाऊस....

 पाऊस.... तु येणार आहेस का आलास तर जरा सावकाश ये शेतकऱ्यांची काळजी घे ते आधीच नैराश्यात जगताय खुप अपेक्षेने तुझी वाट बघताय अरे पावसा...... कितीही हात उसणवारी केली तरी शिल्लक काहीच रहात नाही  चुलीवरच्या पातेल्यात काय शिजतय येवून कोणी पहात नाही बरका पाऊस...... तू जर वेळेवर आलास ना तर त्यांच्याही आयुष्याच नंदनवन होईल सतत रडणाऱ्या चेहऱ्यावर  एकदातरी हसु येईल अरे पावसा....... कधीतरी शेकऱ्यानाही श्रीमंतासारख जगू दे त्याचेही खळेमळे धनधान्यांनी भरू दे तुला सांगतो पाठीवर हात ठेवून खोट्या सहानुभूतीचा फोटो पेपरच्या पहिल्या पानावर शेतकऱ्यांना नको असतो त्यांच्या शेतमालाला हमीभाव हवा असतो पण सायरन वाजत त्या बगळ्यांची गाडी येते भुर्रकन निघून जाते न मिळणाऱ्या मदतीची  मात्र टीव्हीवर ठळक बातमी असते  ऐकना पावसा....... तू  अवकाळी येवू नकोस  एकही शेतकऱ्याला उपाशी मारू नकोस त्याच्या पोटाला भाकर मिळाली ना की ते शेतात राबराब राबतील बघ मग कसं मातीतून सोनं उगवतील म्हणून म्हणतो पावसा जरा समजून घे ना एकदा तुझी मुसळधार बरसात होवू दे तुझ्यामुळे त्यांच्या कष्टाच्या घामाने शेतीमातीला सुगंध येईल मग तेव्हाकुठे त्यां

◾ कविता :- भेट दे श्रीहरी

 कविता  भेट दे श्रीहरी   पुंडलिकाच्या विटेवरी ,थांबलास पंढरपूरी ! नाही  चुकली एकादशी ,आषाढीची वारी !! झाला विषाणूचा कोप ,हादरली दुनिया सारी ! गळ्यात माळ हातात टाळ ,मृदुंग विनाधारी !! का ?चाललास दुर दुर ,मी तुझा माळकरी ! सांग मला भेटशील का रे ,माझ्या सावळ्या श्रीहरी //1// उद्योग व्यापार झाला चालू, तिथं नाही विषाणु ! भरला तुडुंब कुंभ मेळा ,जमले नाही किटाणु !! निवडणूक होते तेंव्हा ,कोरोणा जातो रजेवर ! हौसे नवसे पोटभरू, खिरापत खाती पोटभर !! कोसो मैल दुर तुझ्या  मी , दुर तुझी ती पंढरी ! भेटीसाठी अतुर झालो ,माझ्या सावळ्या श्रीहरी//2// तुच माय नी तुच बाप ,चाललासी तु दुर दुर ! हृदयमंदीरी तु आहेस,गवसत नाही मला सुर!! वैष्णवजन अतुर होऊन , सदा घेती गळा भेटी ! थकले नव्हते हे पाय ,आसुसले  तुझ्या साठी !!  पडे दुष्काळ आला महापुर, चुकली नाही वारी! दिंड्या पताका घेऊन आलो , भेट   सावळ्या श्रीहरी//3// रमत नाही मन माझे वेळ जात नाही घरी ! माय माझी चंद्रभागा ,चंद्रकोरी मंदिरी !!...आता  घर झालय पंढरपूर ,घरी भेटते  रखुमाई! भेट देरे विठुराया ,भक्ताना झाली घाई !! ठाई ठाई रूप लोचनी ,दृष्टी ठेव जगावरी ! सांग मल

◾कविता :- मिळेल का?लस

 कविता  : मिळेल का?लस  कोरोणाच्या महामारीत ,गेल वरीस सरल ... रोगराईच्या दहशतीने ,जग सारं हादरल !! एक घडीचा डाव सारा ,गतवर्षी बिघडला ... होळीच्या महिन्यात ,जगाचा गाडा आडला !! जगभरात आली मंदी ,माणूस ही नडला .... रोजगार गेला बेकार आली ,जगण्यात नाही रस !! मिळेल का ?साहेब ....रोजगाराची लस //1// शाळा नाही अभ्यास बंद ,घरात भुकेली पोर  टाळेबंदी साठेबाजी, चढला  महागाईचा जोर !! पैसा नाही वस्तू नाही ,एकवेळचा उपास  घरातच झालो बंदीजन, मोकळा नाही श्वास!! घरदार लेकर उपाशी ,मनही  झाले नरवस मिळेल का?साहेब ...पोटभरायची लस //2// घरभाडे वीजबील गॅस टीव्ही, बॅलन्स राशीला  सरकारी देणी ना थांबली, पुजलेत पाचवीला !! अश्वासनं बहु झाली,पावलं सरकार नवसाला  व्यवहार सारे झाले बंद ,महाग झालो पैशाला !! दारिद्र्य आलय पैसा नाही, बंद झाली नस  मिळेल का ? साहेब...पैसा मिळायची लस //3// चार टप्पे समजून ही, यंत्रणा का थांबली  नजिक धोका आसतानाही ,लस का लांबली!! श्रीमंत लोळतो गादीवर ,गादी खाली पैसा  आम्हालाच नाही आता उद्याचा भरवसा!! एक उपाशी एक तुपाशी, झालीया निराशा  सत्तेवरच्या राजाला ,चढली सत्तेची नशा !! जगता जरी आले तरी ,

◾ कविता :- हाक पावसाला ...

 कविता   .हाक $$$ पावसाला ..... जेंव्हा उन्हाळा बदलतो कुस  तेंव्हा लागायचा आसतो पाऊस ... कधी वादळ आणि सोसाट्याचा वारा  कधी बरसतो रिमझिम, कधी फक्त गारा ... सुटतो मातीचा सुगंध नासिकेत दरवळ अचानक पडतो धो धो नुसती पानगळ .... कधी उडवतो घराचे छप्पर आणि पत्रे सुद्धा  रौद्ररूपी वादळाने वृक्ष हलवी गदा गदा ... होते ढगफुटी नुसता विजेचा थरार  कडाडणारी विज करते अनेका निराधार .... काळ्या काळ्या ढगांची जमीनीला ओढ  पेरलेल्या बियाना येती कोवळं कोवळं मोड ... तहानलेली धरती साद घालीते  पावसा  भेगाळला आहे देह माझा ,लाग रात्र दिसा .... कुणब्या घरी पावसाळा, सुरू होतो जेंव्हा  गळत्या घरी राहुन म्हणे ,पाऊसच हवा .... पाणीच पाणी चोहीकडे नदी नाल्याला पुर  येरे येरे मेघराजा जाऊ नको दुर दुर .... रचना  संतराम पाटील  केनवडे ता.कागल जि कोल्हापूर  मो.नं 9096769554

◾कविता :- पेरा

 कविता: पेरा __________________________  मंजुळ वारा मोर पिसारा ,लांडोर नाच करी ! रिप रिप बरसात करती, पावसाच्या सरी !! ढगांची गर्दी देतात वर्दी ,नभात करी आवाज ! लखलखणारी विज चढवी ,नभी सोनेरी साज!!  आकाश निळे ढग काळे ,चोहीकडे अंधार ! गर्जनेची तोफ धडधडे ,जीव करी बेजार !! आसा लागतो पाऊस , करीतो पाणी पाणी ! बांध फोडुनी सडा टाकितो, रानी आणि वनी!! रिपरिप हाआवाज सरींचा ,थेंब टपोरे जरी ! त्या थेंबातुन चालत आसते, पेरणीची कुरी !! मृगामधे साधुन पेरा ,बळी परतला घरी ! पेरले ते उगवणार का ?भीती रहाते ऊरी !! अति बरसला नाही बरसला, बनतो हा काळ ! कधी ओला तर कधी कोरडा ,पाडीतो दुष्काळ !! आता मागणे एक आमचे ,साधु दे हा पेरा ! कोप नको हा तुझा आम्हावर ,साथ दे जरा !!   रचना  संतराम पाटील  केनवडे ता.कागल जि कोल्हापूर  मो.नं 9096769554

◾विशेष लेख :- टर्निंग पॅाईंट...

Image
‘टर्निंग पॅाईंट..!’             १० वर्षापूर्वी नुकत्याच लागलेल्या नवीन नोकरीवरून घरी परत येताना तो भयानक ॲक्सीडेंट झाला.डॉक्टरांनी दोन्ही हात कोपरापासून काढण्याशिवाय पर्यायच नाही हे सांगितले.फार मोठा धक्का होता तो घरच्यांसाठी. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ही घटना घडल्याने भविष्याचा विचार केला की फक्त अंधार दिसायचा. किती मेहनतीने,हुशारीने प्रतिष्ठीत आय आय टी मधे कॉम्प्युटर इंजिनीरिंग मिळवून मी सर्वोत्तम संस्थेत शिरलो होतो.खूप सारी स्वप्न घेऊन! ही घटना माझं पूर्ण आयुष्यं हादरवून टाकणारी होती. अनेक शस्रक्रियांनंतर शेवटी दोन्ही हात कृत्रिम बसवायचा सल्ला दिला डॉक्टरांनी.. घरात एकच भयाण वातावरण पसरलं होतं पण दुसरा पर्यायच नसल्याने कृत्रिम हात रोपण शस्त्रक्रीया करावीच लागली. रोज स्वत:चे असे हात बघून आयुष्यं खरंच जगायचं का ?हाच विचार मनात येऊन जायचा.  मनातून  तर जवळ जवळ संपलो होतो मी.दोन महिने झाले आणि त्या सततच्या परावलंबित्वाची, त्या सहानभूती भरलेल्या नजरांची  अक्षरशः किळस यायला लागली होती. अनेक मित्र,नातेवाईक समजवायला यायचे.आयुष्यं असं थांबवून चालत नाही जगावंच लागतं वगैरे सगळं. दुसऱ

◾कविता :- पर्यावरण

Image
            पर्यावरण             जागतिक पर्यावरण दिन ,  सर्वानी साजरा करुया ।  सर्वाच्या सुखी जीवनासाठी ,  जागोजागी झाडे लावूया ॥  निसर्ग आणि पर्यावरण ,  हाच आमचा खरा मित्र आहे ।  नैसर्गिक गोष्टींचा वापर करा ,  महती पर्यावरणाची आहे ||  स्वच्छता ठेवा गलोगल्लीत ,  निसर्ग चक्र चालेल सुरळीत ।  सुरुवात पर्यावरण रक्षणाची ,  आनंद पसरेल जगभरात ॥  पुढच्या पिढीसाठी करु आसरा ,  फळांच्या बीया पर्यावरणात पसरा ।  दारी राही वृक्षांचा पहारा ,  तेव्हाच पशुपक्षांना देऊ सहारा ||  उन्हात हवी असेल सावली ,  तर वृक्ष लावा पावलोपावली ।  अंगणात लावा वृक्षवेली ,  हिच आरोग्याची गुरुकिल्ली ||  पर्यावरणाची केली हानी ,  तर होते मनुष्य जीवनाची हानी ।  म्हणून वृक्ष लावा घरोघरी ,  तेव्हाच पर्यावरण असेल जीवनी ॥  ======================= महेन्द्र सोनेवाने “ यशोमन " गोंदिया  दिनांक : ०१/०५/२०२१ =======================

◾विशेष लेख :- पर्यावरणाचे करा रक्षण , उज्वल भविष्याचे हेच धोरण

Image
“ पर्यावरणाचे करा रक्षण , उज्वल भविष्याचे हेच धोरण ”       पर्यावरणाशी संबंधित विविध विषय , घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरुकता निर्माण करणे , पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पाऊल उचलणे असा पर्यावरण दिवस साजरा करण्या मागचा हेतू आहे म्हणून दरवर्षी आपण ५ जून हा दिवस  "जागतिक पर्यावरण दिन"  म्हणून साजरा करतो . मानव हा पर्यावरणाचाच एक कुशाग्र घटक आहे . आपण खातो ते अन्न , श्वास घेतो ती हवा , पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टीमुळे आपण पृथ्वीवर राहू शकतो . या सर्व गोष्टी आपल्याला निसर्गाकडून मिळत आहेत .       सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय स्वत : ची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे . जगातील जवळपास शंभर पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो . यामागील मुख्य उद्देश इतकाच की , जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे . जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळया पध्दतीने साजरा करता येऊ शकेल . जगा

◾जीवन परिचय :- राम गणेश गडकरी

Image
 प्रसिध्द साहित्यिकांचा परिचय देणारा संकलनात्मक लेख               राम गणेश गडकरी                   राम गणेश गडकरी हे मराठीचे नाटककार , कवी आणि विनोदी लेखक होते . त्याचे तीन टोपण नाव होते . गोविंदाग्रज , बाळकराम आणि सवाई नाटकी . त्यांचा जन्म २६ मे १८८५ ला गणदेवी , जिल्हा नवसारी , गुजरात येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव गणेश वासूदेव गडकरी व आईचे नाव सरस्वतीबाई गणेश गडकरी होते . त्याना दोन भार्या होत्या पैकी प्रथम सीताबाई व दुसरी रमाबाई . ते भारतीय होते . त्यांनी कविता , नाटके व विनोदी कथा लिहिलेल्या आहेत . त्यांचे प्रसिध्द साहित्यामध्ये नाटके फार प्रसिध्द झालीत . "एकच प्याला", "प्रेमसन्यास" , “पुण्यप्रभाव" , "भावबंधान" या नाटकांना प्रेक्षकांनी आपली चांगली पसंती दिली आहे .       गोविंदाग्रज या टोपण नावाने राम गणेश गडकरी यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या . आणि बाळकराम हया टोपण नावाने काही विनोदी लेख लिहिले . हया साहित्याच्या जोडीला त्यांच्या दोन अपुरी राहिलेली नाटके होती ती “राजसन्यास" आणि  "वेड्यांचा बाजार" .  राम गणेश गडकरी यांना महारा

◾कविता :- ग्रामनिर्माण

Image
गावाला कराया सुखी शांती ,  मिटवून कुटील , दृष्ट जातील ।  गावकऱ्यांचा संघटन मजबुत करुन ,  गावाला नंदनवन करता येईल ||  त्यागी व निधडयांना पुढारी करावे लोकांनी आपले दुःख त्यांना सांगावे ।  अपराध्यांना समजवून शिक्षा करुन ,  त्याला गावासाठी वठणीवर आणावे ॥  दया क्षमा शांती निर्भयता असावी ,  जीव गेला तरी निर्दयी नसावे ।  जिथे निर्दयीपणाची गरज असावी ,  तिथे मन दगडापेक्षाही कठिण असावे ॥  दयाधर्म , दानधर्म रहस्य जानून घ्यावे ,  लोकांना ओळखून जवळ घेऊ नये ।  चोरांना , कामचोर बुवांना , ऐतखाऊंना, कधी दानधर्म करु नये ॥  समाजद्रोह्यांचे करुनी दमन ,  सज्ज करु या संरक्षण ।  दुष्ट, बदमाशाला करुन प्रतिकार ,  गरीबास द्यावे गौरव नि सन्मान ॥  जो बंधुभावाने सर्वाशी वागतो ,  सुखाच्या वेळीही अहंकार टाळतो ।  आपत्तीतही संयमाने वागतो , अशा लोकांनीच ग्रामनिर्माण होतो ॥  ----------------------- महेन्द्र सोनेवाने , “यशोमन" गोंदिया दिनांक : ३०/०४/२०२१ ----------–------------ ____________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾कविता :- सर्वानी झाडे लावूया

Image
 जागतिक पर्यावरण दिन ,  सर्वानी साजरा करुया ।  सर्वाच्या सुखी जीवनासाठी ,  जागोजागी झाडे लावूया ॥  निसर्ग आणि पर्यावरण ,  हाच आमचा खरा मित्र आहे ।  नैसर्गिक गोष्टींचा वापर करा ,  महती पर्यावरणाची आहे ||  स्वच्छता ठेवा गलोगल्लीत ,  निसर्ग चक्र चालेल सुरळीत ।  सुरुवात पर्यावरण रक्षणाची ,  आनंद पसरेल जगभरात ॥  पुढच्या पिढीसाठी करु आसरा ,  फळांच्या बीया पर्यावरणात पसरा ।  दारी राही वृक्षांचा पहारा ,  तेव्हाच पशुपक्षांना देऊ सहारा ||  उन्हात हवी असेल सावली ,  तर वृक्ष लावा पावलोपावली ।  अंगणात लावा वृक्षवेली ,  हिच आरोग्याची गुरुकिल्ली ||  पर्यावरणाची केली हानी ,  तर होते मनुष्य जीवनाची हानी ।  म्हणून वृक्ष लावा घरोघरी ,  तेव्हाच पर्यावरण असेल जीवनी ॥  ======================= महेन्द्र सोनेवाने “ यशोमन " गोंदिया  दिनांक : ०१/०५/२०२१ ======================= ____________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

संपूर्ण महामृत्युंजय मंत्र

◾विशेष लेख :- या गोजीरवाण्या घरात....

Image
 'या गोजीरवाण्या घरात.....' संजय धनगव्हाळ ****************** आलो...आ...लो.. थांबा जरा,एकसारखं दार काय ठोकताय....कोण... आपण ? 'मी राणे'....! 'हो का!मग बाहेर भिंतीवर घंटीची कळ अर्थात बटन लावलय ते नको का दाबायला दार ठोकताय तर'..... 'विद्यूतप्रवाह खंडीत झाल्या मुळे कळ अर्थात बटण दाबुनही घंटी वाजली नाही म्हणून मी दार ठोकले मग काय...' 'बरं बरं आपले येथे येण्याचे काय प्रयोजन, कशासाठी आलात आपण फक्त राणेच आहात की आणखी काही त्यापुढे नाव आहे...म्हणजे कसं आहे ते मंत्री महोदय नारायण राण्यांचे तुम्ही नातलग नसला तर मला नावाने होकारायला बरं वाटेल नाहीतर मग राणे साहेब म्हणून तुमचा सन्मान करायला बरे काय'! 'माझ नाव अजय' 'आता कस बरं या ..आत या...'आहो आपण मराठी माणस आहोत संक्षिप्तमधे नाव सागंण्याची प्रथा आपणच मोडायला नको का?नाही तर काय नाव सारखे असले म्हणजे एखाद्या व्हि आय पी कुटुंबातील आसल्याचा गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.' 'माझ्याकडे पाहुन तुम्हाला वाटंत का  मी व्हिआयपी कुटुंबातला आसेल म्हणून'. 'आहो राणे हल्ली माणसे अ

आगळ्या वेगळ्या वैचारिक पद्धतीने महासंग्रामध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती थाटामाटात साजरी

Image
 आगळ्या वेगळ्या वैचारिक पद्धतीने महासंग्रामध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती थाटामाटात साजरी श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते |  यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि || आज दिनांक 14 मे 2021, धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती. जवळपास तीन-चारशे वर्षांचा कालावधी उलटून गेला, परंतु आजही ह्या भूमीवर, पूर्ण विश्वात स्वतंत्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार करोडो ॠदयात तेवत आहेत. अशा जगप्रसिध्द, स्वाभिमानी राजाला मानाचा मुजरा. महासंग्राम ऑफिशीयल ग्रुप प्रस्तुत " वैचारिक संभाजी महाराज जयंती ". ह्या महामारीच्या काळात महासंग्राम मध्ये वैचारिक पद्धतीने शंभूराजे यांची जयंती साजरी करण्यात आली.  महासंग्राम चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संग्राम संतोष सलगर (INTERNATIONAL YOUTH LEADER, AYIMUN) यांचा हा आगळी वेगळी संकल्पना. कार्यक्रमाला सुरूवात ठीक सकाळी 09 वाजता झाली. सुरवातीला संस्थापक अध्यक्ष यांनी प्रमुख अतिथी यांचं स्वागत करून त्यांचा अल्पसा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी 1) मा. श्री. सुजय सुंदरराव देसाई [ लेखक- शंभूजागर (15 पुरस्कार, 5 देश, 6 राज्य