अश्रुंचं मोल ...
अश्रुंचं मोल ... ! जीवनाच्या पुस्तकात नानाविध प्रकरणाचा समावेश आहे.त्यातलंच एक प्रकरण म्हणजे रडणं आहे.जे जन्मताच सुरू होतं.मूल जन्माला येताच ते रडलं नाही किंवा काही सेकंद उशीरा रडलं तरी अनेक समस्या पुढं येतात.इतकं महत्त्वाचं ते प्रकरण आहे.अबोल बाळाला काही हवं नको आईला कळतं तेही रडण्यामुळेच ना ? जीवन हे हास्य व अश्रूचं सुंदर मिश्रण आहे.अश्रू हे केवळ हतबलता हताशपणा किंवा दुर्बलतेची निशाणी नाही तर ती ह्रदयाची निर्मळताच असते, त्यामुळेच इतरांच्याही दुःखाचे पडसाद त्यावर पडून डोळ्यात ते तरळतात. आपली काहीही चूक नसताना लोक जेव्हा विनाकारण आरोप ठेवतात, दोष देतात तेंव्हाही डोळ्यात अश्रू येतात तेही या निर्मळतेमुळेच. लोकांवर हसायला अंगी फार मोठं शौर्य लागतं असं काही नाही पण लोकांसाठी डोळ्यात अश्रू उभे राहायला मन, मेंदू व हृदयावर उत्तम सुसंस्कारच असावे लागतात हे नाकारता येणार नाही.म्हणून ऊठसूठ रडणं योग्य नव्हे याचाही विचार करावा लागेल.हे जीवन खुप सुंदर आहे आम्ही चुकीच्या आशा अपेक्षा गरजा अवास्तव स्वप्नांच्या शरपंजरी पडलो आहोत म्हणून तर जीवनाचं रडगाणे बनून जातं .आज आमच्याकडं