Posts

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

Image
  हिरव्या हिरव्या श्रावणात *************** हिरव्या हिरव्या श्रावणात बरसती पाऊस धारा अंगाभोवती पिंगा घालतो गार गार वारा हिरव्या हिरव्या श्रावणात हिरवे झाले रान हिरव्या हिरव्या डोंगराचे किती गाऊ गुणगान हिरव्या हिरव्या श्रावणात पाऊस झाला शिरजोर खळखळ वाहे झरे झिरवे थुईथुई नाचतो मोर हिरव्या हिरव्या श्रावणात काय हिरवळीचा थाट हिरवळीच्या कुशीत  शिरली नागमोडी वाट हिरव्या हिरव्या श्रावणात गारव्याची मिठी दऱ्याखोऱ्यात झाली झाडे झुडपांची दाटी हिरव्या हिरव्या श्रावणात मैना मंजूळ गाणे गाते चिंबचिंब भिजताना कळी हळूच उमलते हिरव्या हिरव्या श्रावणत बहर फुलांचा फुलतो पाना फुलांच्या वेलीवर झुला लाजाळूचा झुलतो हिरव्या हिरव्या श्रावणात सुगंध देते माती निळ्या निळ्या आभाळात पाखरे सैरभैर होती हिरव्या हिरव्य श्रावणात झाले कोवळे ऊन इंद्रधनुच्या सप्तरंगात उजळून गेला श्रावण संजय धनगव्हळ ९४२२८९२६१८

पावसा तू येणार आहेस का ... | मराठी कविता | संजय धनगव्हाळ Prayena.blogspot.com

Image
 ' पावसा तू येणार आहेस का' (संजय धनगव्हाळ) ***************** पावसा तू येणार आहेस का येशील तर भरपूर ये सरींना हळूवार घेवून ये कधीतरी शेतकऱ्यांच्या आयुष्यातही आनंदाच्या लहरी बरसू दे तो रोज मरत असतो राबराब राबत असतो घाम कष्टाचा गाळूनही पिकतं नाही  तो स्वतःसाठी कधी  जगतं नाही त्यालाही कधीतरी जगू दे त्याच्याही आयुष्यात आनंदाच्या लहरी बरसू दे दिवाळी दसरा सणवार त्याला कधी माहीत नाही कधी तो चांगले कपडेही  घालत नाही कर्जाचे ओझे कायम त्याच्या डोक्यावर असते या ओझ्याचा आभार आतातरी कमी होवू दे त्याच्याही आयुष्यात आनंदाच्या लहरी बरसू दे पावसा एकदा त्याच्या  घरी येवून बघं त्याच्यासारख तू ही  जगून बघं कसरती तो जगत असतो अर्धपोटी उपाशी रहातो त्याच्या सरणावर हारतुरे देणारे लाईनीत उभे असतात पेपरच्या पहिल्या पानावर बरेच दिसतात त्याची राख झाल्यावर सारेच पाठ फिरवतात तेव्हा पावसा आता तू त्यांना छळू नकोस रागाने पाहू नकोस त्यांच्याही घरी समृद्धीच्या पणत्या पेटू दे शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाच्या लहरी बरसु दे *संजय धनगव्हाळ* ९४२२८९२६१८ www.FMmarathi.in ...

कविता : वटपौर्णिमा ....| Vatpornima | संतराम पाटील

Image
कविता : वटपौर्णिमा  😏😏😏😏🌽😏😏😏🎎 कशाला हवा जन्मोजन्मी एक पती  या जन्मी एक वडाच झाड लाव  त्याच्या सावलीला बसाल सगळे  तु आणि तुझे सगळेच गाव..... वाडाच्या फांद्या फुलं फळे पारंब्या देतील सर्वांना आरोग्यदायी दवा  प्रदुषण मुक्ती करण्या देतील  शुध्द निर्भेळ ऑक्सीजन युक्त हवा ... तोडु नका फांद्या गुंडाळु नका दोरा  मारूनका फेरी करू नका उपास  अंधश्रद्धा कवटाळुनी न बसता  करा थोडा पर्यावरणाचा अभ्यास.... सावित्री ज्योतीच्या लेकी तुम्ही  अंधभक्ती आज्ञान सगळं विसरा वडा पिंपळाच्या फांद्या पुजण्या पेक्षा  वृक्ष जगवण्यासाठी वृक्षा रोपण करा .... एक वृक्ष देईल शुध्द निर्भेळ हवा  जगण्यासाठी तुम्हा ऑक्शीजन हवा  वटपौर्णिमा आली संकल्प करा नवा  एक वटवृक्ष लावा पतीसह मिळेल.....शुध्द हवा.... कवी: संतराम पाटील  9096769554

तिला त्याचे खरे प्रेम कळलेच नाही... | लघु कथा | संजय धनगव्हाळ

Image
 लघु कथा तिला त्याचे खरे प्रेम कळलेच नाही (संजय धनगव्हाळ) ****************** तो तिला बघायचा ती त्याला टाळायची असे बरेच दिवस चालले. मग एकदिवस त्याने तिच्याजवळ त्याचे प्रेम व्यक्त केले. तिने त्याला नकार दिला.मग काही वर्षांनी तिला त्याने स्वतःची एक किडनी देवून तिचे प्राण वाचवले.ज्याने किडनी दिली त्याचे नाव न सांगता हातावर 'जय हो' असे गोंधलेले असल्याचं डॉक्टरांनी सांगीतल्यावर तर तिला जबरदस्त धक्काच बसला.करण ज्याने हातावर 'जय हो' असे लिहले होते त्या जय होळकरने कॉलेजला असताना तिला प्रपोज केले होते पण तिने त्याला नकार दिला होता आणि आता त्याच 'जय होळकर'अर्थात 'जय हो ने' तिला स्वतःची एक किडनी दान करून तिचे प्राण वाचवले.त्याला नकार देण्याचा आता तिला पश्चताप होतोय. अर्थात तिने त्याला नकार देवूनही त्याने स्वतःची किडनी दान करून आजही तिच्यावर असलेलं प्रेम सिध्द केले म्हणजे तिने प्रेमास नकार देवूनही तो जिंकला आणि त्याची किडनी घेवून तिचे प्राण वाचल्यावरही तिचा पराभव झाला. तिला त्याचे खरे प्रेम कळलेच नव्हते. आता ती त्याला शोधतेय.......

एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता ...

Image
``` एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ... तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले, भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला " महाशय तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ?  काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यात जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही "  आणि  मोठ्याने हसू लागला .... हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ... तो घरी गेला ....  त्याने मुलाला विचारले " बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? " " सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला " हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ? म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!  माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते ..  तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!! मुलगा म्हणाला राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ... रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो ..  त्याच्या सोबत गावातील सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात ....  राजा ए...

आठवण | मराठी कविता | मंगेश शिवलाल बरई

Image
 'आठवण' येता  मला कधीतरी, तुझी सखे आठवण, जीव माझा तळमळे, जातो कोरडा श्रावण, येता मला कधीतरी, तुझी सखे आठवण, स्वप्न ते पुन्हा आठवे,  निशा हसे सुगरण, येता मला कधीतरी, तुझी सखे  आठवण, माझे मलाच कळेना, करी जीव वणवण, येता मला कधीतरी, तुझी सखे आठवण, क्षण काही जीवनात, राही थोडे दडपण, येता मला कधीतरी, तुझी सखे आठवण, जातो विसरून मीच माझे तन, मन, धन. मंगेश शिवलाल बरई. हिरावाडी, पंचवटी, नाशिक -४२२००३.

मी फुल्याची सावित्री हाय ! मराठी कविता | संतराम नाना पाटील

Image
अंतर राष्ट्रीय महिला दिनानिमीत माझे हे काव्य पुष्प    कविता : : मी फुल्याची सावित्री हाय !! झेलुनी अंगावर दगड धोंडे  शेणही मारीती गाव गुंडे  तोडीत गुलामीच्या श्रुखंला  शिकले नी शिकवली शाळा  नव्हता तेंव्हा खडु नी फळा  सोडा परंपरा रिती भात जुनी  अगं बायानो मी सत्यवानाची नाही  मी फुल्याची सावित्री हाय गं .....!!                         रेड्यांच्या तोंडी वेद बोलायचं                    मुक्या होत्या आम्ही सगळ्या जनी                          सती जायचं गेल्यावर पती                       विचारात नसायचे तेंव्हा कुणी                       शिकुन सवरुन शहाण्या झाल्या                        विसरू नका हा ई...

ईथे तिथे तिची उंच उंच भरारी असते | Marathi Poem | संजय धनगव्हाळ

Image
  जागतिक महिला दिना निमित्ताने संजय धनगव्हाळ ******************* ईथे तिथे तिची उंच उंच भरारी असते पाऊल पुढे टाकल्यावर ती माघारी होत नसते वाट अवघड आसली तरी तिला कसलीच भिती वाटत नाही गरूड झेप घेताना स्वप्नांची गती ती  थांबवत नाही सन्मान तिचा होत नसला तरी ती अपमानाची पर्वा करत नसते आलेत अडथळे कितीही तरी ती सावधपवित्रा घेत असते आता ती कुठेही मागे नाही जिथे जाईल तिथे तिचा सहभाग असतो खांद्याला खांदा लावून तिचाही पुढाकार दिसतो अशक्य तिला काहीच नाही शक्य करण्याची हिंमत तिच्यात आली आहे स्वकर्तुत्वाने लढण्यास ती सज्ज झाली आहे कितीही घायाळ झाली   तरी ती कुठेही थांबत नाही ध्येयसिद्धीचा ध्वज हातात घेवून ती आत्मसन्मानाला झुकू देत नाही शिल सय्यम संस्कार त्यागाची ही सुंदर मूर्ती स्वतःसाठी कमीनी् परिवारासाठीच जास्त जगते  दिव्याची वात ही घरात उजेड देता देता आयुष्यभर जळत आसते म्हणून... नको पायात तिच्या बंधनाची बेडी तीलाह गगन भरारी घेवू द्या छत्रपतींच्या स्वराज्यातील या जिजाऊंच्या लेकींना एक नवा इतिहास लिहू द्या *संजय धनगव्हाळ* धुळे ९४२२८९२६१८ << माझे इतर लेख वाचण्यासाठी येथे...

आणि तिने त्याच्याशीच लग्न केले | एका सैनिकाच्या आयुष्याची भावनिक कथा | संजय धनगव्हाळ

 'आणि तिने त्याच्याशीच लग्न केले' एका सैनिकाच्या आयुष्याची भावनिक कथा (संजय धनगव्हाळ) ****************** जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच आयुष्यात  काहीतरी ध्येय असतं एक स्वप्न असतं कुणाला मोठा अधीकारी व्हायचं असतर तर कुणाला राजकारण,नाहीततर समाजीक कार्यात सक्रिय व्हायचं असते.प्रत्येकाची काही ना काही ईच्छा असुन तो त्याच अनुषंगाने वाटचाल करत असतो.पण सागरने देशसेवेसाठी स्वतःला अर्पण करायच ठरवले आणि त्याप्रमाणे तो प्राथमिक प्रशिक्षण घेवू लागला.देशसेवा त्याच्या नसानसात भिनली होती जेव्हा जेव्हा समाजकंटका कडून देशावर आपत्ती यायची किंवा काही घातपात घडवून यायचा त्यावेळी सागरची देशभक्त उफाळून यायची त्याच्या अंगातल रक्त उकळायचं आपण देशासाठी काहीतरी केलेच पाहिजे म्हणून तो खूपच भावनिक व्हायचा. खर तर सागर हा वामनरावांचा एकुलता एक मुलगा घरची परिस्थिती उत्तम वामनराव सदन बागायतदार शेतकरी,व समाजकार्यातही नावाजलेले,पैशांची आवक भरपूर कुठेच काही कमी नाही.काही न करता नुस्त बसून जरी खाल्ले तरी सागर त्याचे आयुष्य सुखासुखी  घालवू शकला असता. पण एखाद्याने जे ठरवले ते त्याला स्वस्थ बसु देत नाही.अस...

कुठेच दिसत नाही | संजय धनगव्हाळ | मराठी कविता

 कुठेच दिसत नाही एकनाथ तुकाराम नामदेव कुठेच दिसत नाही भगतसिंग राजगुरू सुखदेव  कोण होते हे संत महंत देशभक्त कोणालाही सागंता  येणार नाही अरे या महामहिंचे  नाव घेतल्याशिवाय सुर्योदय होणार नाही पण आता काळ बदलला माणूस बदलला बदलली माणसाची मती कुठेच दिसत नाही संस्कार  आणि संस्कृती कोणाला कळेल या  राष्ट्रमातेच्या वेदना यातना गर्भार झालेल्या जखमा तिला झाकता आल्या नाही अश्रु पुसायला तिच्या डोक्यावर पदरही ठेवला नाही हा शांततेचा देश आता  अशांत झाला आहे अनैतीकच्या जाळ्यात विणला गेला आहे आता हा देशा पुन्हा  सुजलाम सुफलामता होण्यासाठी कोणीच होवू शकत नाही सावरकर आणि कोणालाच होता  येणार नाही टिळक गोखले आगरकर *संजय धनगव्हाळ* धुळे ९४२२८९२६१८

ओढाताणीच राजकारण | कविता | संजय धनगव्हाळ

 सत्तेवर कोणीही असुदेत ओढाताणीच राजकारण  लगेच सुरू होते सत्तेसाठीच तर नेत्यांची  आदलाबदली होत रहाते एकतर  सत्ता आल्यावर  दिलेली आश्वासन  त्यांना आठवत नाही विकासाचा बोलबाला  कुठेच दिसत एकमेकांवर आरोप करून एकमेकांचे घोटाळे बाहेर  काढतात जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवून घेतात   आहो ईथे रोज आधंळे  घोटाळे होतात कोणी भ्रष्टाचार तर कोणी  अत्याचार करतात कुठे खुन तर कुठे घातपात  घडतो तर कुणाच्यातरी मागे चौकशीचा फेरा फिरतो एव्हढ्या मोठ्या देशात राज्यकर्त्यांशिवाय सुरक्षित कोणीच नाही निवडणूक जवळ आल्याशिवाय हात कोणी जोडत नाही सत्ता मिळवण्यासाठीच तर  एकमेकांवर आरोप करून  स्वच्छ प्रतिमेचे पुरावे देतात स्वतःच काळ कर्तृत्व कोणाला कळू नये म्हणून देवदर्शनाला जातात या देशात दिवसेंदिवस   राजकारणी श्रीमंत  तर जनता गरीब होते रहाते एका मतामुळेच तर  सत्तेवर असणाऱ्यांची संपत्ती वाढते  या लोकांनी कितीही  चिखलफेक केला तरी त्यांचा नुसता देखावा असतो आरडाओरडा करून  बदं खोलीत तो त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो ...

विश्वात श्रेष्ठ आहे ती सर्वदा मराठी | मराठी भाषा दिवस कविता | योगेश चाळके

 मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! मुक्तासुत अर्थात योगेश चाळके हृदयात नित्य पुजतो मी ज्ञानदा मराठी विश्वात श्रेष्ठ आहे ती सर्वदा मराठी अनमोल लाभली मज धनसंपदा मराठी ओठांवरी फुलू दे भाषा सदा मराठी इतिहास शौर्यशाली मज सांगते मराठी सुविचार स्वाभिमानी समजावते मराठी संस्कार नित्य मौलिक मज दावते मराठी महती परंपरांची साकारते मराठी नृत्यात मुग्ध होई...नृत्यांगना मराठी गाण्यातुनी फुलवते संवेदना मराठी देवालयात घुमते ती प्रार्थना मराठी स्मरणार्थ भावनांची आराधना मराठी साकारल्या कथा अन् कादंबरी मराठी रुळल्या अनेक ओव्या ओठांवरी मराठी रुजल्यात प्रेमकविता हृदयावरी मराठी गौळण अभंग पुजती त्या पंढरी मराठी रस वीर रोज देई शक्ती  इथे मराठी कायम मनात करते वस्ती इथे मराठी वदती चरित्र कायम महती इथे मराठी करते मनामनावर भक्ती इथे मराठी कणखर मुळात आहे बळवंत ही मराठी सुखदुःख पेलणारी ती आग्रही मराठी ना वाकली जरापण ती कालही मराठी झुकणार ना उद्याही ना आजही मराठी अलवार स्पर्श आहे शब्दामधे मराठी श्वासासमान आहे जगण्यामधे मराठी झुंजारपण टिकवते देहामधे मराठी जपली म्हणून भाषा हृदयामधे मराठी

रात्री आवर्जून लाईट असते | मराठी कविता | संजय धनगव्हाळ

 रात्री आवर्जून लाईट असते म्हणून अंधार पांघरूण शेतकरी शेतात जातो पाण्यावाचून तळमळणाऱ्या  पिकांना पाणी पाजवतो तहाणलेली पिक घटाघटा पाणी पिऊन उभारी घेतात त्या चांदण्यारात्री शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरच हासु बघतात पाणी कुशीत शिरून  सुगंध मातीला येतो मान उंचावून बघणाऱ्या  पिंकाना  दादा माया लावतो त्या गर्द काळोखातही नसते त्याला कसलीच भिती वाट पहात असते तहाणलेली माती औत खांद्यावर घेवून  वाट शेताची धरतो माती कपाळी लावून मातीत राबतो घाम कष्टाचा उपसून मातीत सोन उमलते भाव मिळत नाही पिकाला दोष नशीबाला असते गाठ भुकेला मारून  शेतकरी कसातरी जगतो काळोख पांघरून स्वप्न सुखाचे बघतो फाटक्या थोतराला  बांधून वेदना  व्याथा त्याच्या कुणा  सांगत नाही शेतीमातीत जगणारा शेतकरी दुःख त्याच मातीला  कळू देत नाही *संजय धनगव्हाळ* धूळे ९४२२८९२६१८

चांगले चे वागा, चांगलाच विचार करा

Image
  चांगले चे वागा, चांगलाच विचार करा *कर्ण कृष्णाला विचारतो - "माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती?* *मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नव्हतो.* *परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल. कारण मी क्षत्रिय नव्हतो!* *एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.* *द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.* *कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.* *मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.* *तर मगं मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?"* *🌷कृष्णाने उत्तर दिले🌷:* *"कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.* *जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होता.* *रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.* *तुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.* *मला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्...

व्यक्त व्हा...नाहीतर...

Image
व्यक्त व्हा...नाहीतर...     काल वृद्धाश्रमात गेले असताना एक लेडी आतुन बाहेर आली .. तिचं चालणं , बोलणं ७० च्या पुढचं पण वय वर्षे फक्त आणि फक्त ४६.. खुप वाईट वाटलं त्यांना पाहुन.. अप्रतिम सौंदर्य, नवरा भारताबाहेर म्हणजेच आर्थिक परिस्थिती उत्तम, सडपातळ बांधा पण त्यात बिलकुल जान नाही.. दोन मुलं या सुंदरीकडे सगळं काही आहे पण दोन मुलं आणि नवरा यापलीकडे तिला एकही मित्र किवा मैत्रीण नाही.. मुलं मोठी असल्याने ती त्यांच्या व्यापात त्यामुळे तिच्याशी बोलायला कोणी नाही Now she is underdepression.. व्यक्त व्हायला कोणी नाही .. हे सांगण्यामागे एकच कारण आहे.. कितीही उत्तम कुटुंब असलं आणि पैसा असला तरीही आपल्याला माणसं हवीतच .. आज अनेक लोक अनाथ आहेत, वृध्द मंडळी आहेत त्यांना आपल्या प्रेमाची आपल्या वेळेची गरज आहे.. प्रत्येकवेळी खुप पैसा असलाच पाहिजे असं नाही.. ज्यांना कोणाला हा प्रश्न पडत असेल त्यांनी अशा लोकांना वेळ द्या.. प्राणी आणि वयस्कर मंडळी यांच्या डोळ्यात पहा त्यांना फक्त हवय प्रेम..    मित्रांनो एकटे राहु नका.. फेसबुक वर असंखय चांगली मंडळी एकत्र येतात.. अनेक गेटटुगेदर होतात .....

#कुत्र्याची_माणुसकी

Image
#कुत्र्याची_माणुसकी.. गेल्या दोन दिवसांपासून एक गावठी कुत्रा आमच्या दवाखान्याच्या व्हरांड्यात वारंवार येत आहे व त्याला आमचे कर्मचारी सारखे हुसकावून लावताना मी पहात आहे.दवाखान्यात ऍडमिट पेशंट ची संख्या जास्त असल्याने,हा कुत्रा कोणाबरोबर येतोय की भटका आहे, हे कळायला मार्ग नव्हता. आज सकाळी मी दवाखान्यात लवकर म्हणजे सात वाजताच आलो.बघतोय तर काय गेल्या दोन दिवसांपासून घिरट्या घालणारा हा कुत्रा, आमच्या दवाखान्याच्या चौकटीतून आत डोकावून पहात आहे.मी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला,पण तो जायला तयार नाही..शेवटी मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि कन्सलटिंग रूम मध्ये येऊन बसलो.थोड्या वेळाने मी बाहेर येऊन बघितले तर हा कुत्रा व्हरांड्यात नजर पाडून बसला आहे.माझी चाहूल लागताच तो उठून उभा राहिला आणि पुन्हा दारातून आत डोकावून पाहू लागला.मी त्याला पुन्हा हाकलणार होतो,इतक्यात मला काय वाटले कुणास ठाऊक,त्याच्या नजरेतील व्याकुळतेच्या भावनेने मीही थोडासा विचलित झालो आणि त्याच्या डोक्यावर थोपटल्यासारखे केले.शरीर यष्टीने धिप्पाड असलेल्या त्या कुत्र्याला हात लावायचे कोणाचे धाडस झाले नसते,पण मी त्याच्या डोक्यावर हात ...

कविता :- दिवाळी

Image
  "दिवाळी"" लखलखत्या आकाशी शोभे दिव्यांचा हार, जैसी चांदण्यात नटली नटरंगी नार, आतषबाजीने फटाक्यांच्या धरणीने केला शुंगार, पाहुन तिचा थाट, अंधारानंही फिरवली पाठ, दिवाळीत ह्या, तेवुन मना-मनात भावनांचे दिवे, प्रकाशात त्या, पाहू एक स्वप्न नवे, सोडून देवु , ऋणानुबंधाचे ते जुनेच हेवे-दावे, दिपावलीत दिव्यातलं तेल, फुलविती आयुष्याची वेल, आरोगयाचा मंत्र, धन्यांचा हार, खोलते धनोत्रयीच्या दिवशी लक्षमीचे दार, सजली सुरांची पहाट, सुवासिनींच्या मांगल्याचे घाट, शिंपडून अंगणी सडा, रांगोळी, पतिराजावर प्रीत आपली ओवाळी,                मंगेश शिवलाल बरई.

नजर

Image
 *नजर*        नजर, दिठी, दृष्टी ! मानवास परमेश्वराने दिलेली बहुमोल बाब! साऱ्या चराचर सृष्टीचं ज्ञान मानवास ज्ञानेंद्रियांद्वारे होत असतं. त्यात सर्वाधिक वाटा डोळे या ज्ञानेद्रियांचा आहे.      डोळयांना दिसणं म्हणजे दृष्टीस पडणं. त्याच अर्थानं नजरेस पडणं असं ही म्हटलं जातं. पण तरी बहुतेक नजर ही थोडी व्यापक संज्ञा असावी.    नजरेत दिसण्यासोबत भाव भावनाचं लेपणही जोडलं जातं. माणसाच्या नजरेत किती भाव- भावना दडलेल्या असतात. मानवी मेंदूत उठणारे तरंग, उमलणारे सारे भाव, मानव प्राणी नजरेनंच अधिक व्यक्त करतो. कदाचित मेंदूपासून डोळे जवळ असल्यानं ही असावं?  मेंदूतील ,काळजातील भाव चेहऱ्यावरील इतर अवयवाच्या हालचालीनं व वाचीकतेनं व्यक्त होतात! पण आतल्या मनोव्यापाराचा पसारा, आवाका मांडला जातो तो खरा नजरेनंच! तोंडाद्वारे, बोलत असुनही आपण बोलकी नजर, बोलके डोळे असंच म्हणतो!    नजरेनंच आनंद, दु:खं, श्रृंगार, वेदना, कारुण्य, सल, ममत्व, लडिवाळपणा व्यक्त होतो. मनातले, काळजातले भाव आधी डोळ्यातच झरतात मग इतर अवयवातून! दु:ख, वेदना, यातना यात आधी डोळेच...

कविता : अहो गणराया...

Image
  अहो गणराया... आगमना तुमच्या गणराया केली बघा आम्ही आरास, पाहुणचारा तुमच्या मोदकांचा नैवेद्य खास, येणार तुम्ही म्हणून पसरले सगळीकडे  कसे मांगल्याचे वातावरण, अहो गणराया तुम्हीही व्हाल खुश पाहून भक्तांचे आचरण, लाभेल भक्तांना आता तुमचा सहवास, आगमना तुमच्या गणराया केली बघा आम्ही आरास, कटी झळके पितांबर, रूप तुमचे दिसे सुंदर, दिसे नजरेत तुमच्या भक्तांचा भक्तीचा हर्ष-उल्हास, आगमना तुमच्या गणराया केली बघा आम्ही आरास, अहो रिध्दी-सिध्दी नायका, विघ्नहर्ता, विनायका, राहिली संसारी आता तुमच्याच भेटीची आस, आगमना तुमच्या गणराया केली बघा आम्ही आरास.                           मंगेश शिवलाल बरई.                        हिरावाडी, पंचवटी, नाशिक ४२२००३. गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.👏👏👏

◾तिसरी - एका मुलीची गोष्ट | संजय धनगव्हाळ

Image
 तिसरी (एका मुलीची गोष्ट) *संजय धनगव्हाळ* **************** सुहास आणि माधवी यांना तब्बल बारा वर्षानंतर जाई जुई या जुळ्या मुली झाल्यात, दोघही दिसायला खुपचं सुंदर होत्या म्हणून लाडही त्यांचे तेव्हढेच कौतुकाने व्हायचे आणि काळजीही तितकीचं घेतली जायची.नवसाच्या मुली म्हटल्यावर तर अगदी राजेशाही थटाच ना! दोघांनाही लाडाकोडात वाढवले मोठ केले.सारकाही त्याच्या मना सारखचं व्हायचं.आता पाच वर्ष झाले म्हट्यावर जाई जुईला एक भाऊ असावा या अपेक्षेत असताना सुहास माधवीच्या आयुष्यात पुंन्हा तिसरी मुलगीचं आली आणि सर्वांच मनं नाराज झाले. विचार केला काय आणि झाले काय,पण हि तिसरी कन्या दिसायला छान जरी असली तरी मात्र जाईजुई ईतकी सुंदर नव्हती.सावळा,रंग सडपातळ.खरतर सुहास माधवी दोघही रंगाने गोरे असताना या तिसरीचा रंग सावळा कसा हा सर्वांना न उमजणारा प्रश्न होता.न उमजणारा काय कोड्यात टाकणाराच प्रश्न होता ना,वकिंवा काहीतरी वैद्यकिय किरण असावं असो.पण काय आलेया भोगाशी असावे साधन,या उक्तीप्रमाणे नकारार्थीपणे तिसरीला लहानाच मोठ केले.रंग सावळा झाला म्हणून काय पोटच्या पोराला एव्हढ हिणवावं ते ही आई वडिलांनी? ए काय गं,ऐ हे...