Posts

◼️ हास्य कविता :- उपाय ...✍️शामला पंडित

Image
  ◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆       उपाय  ◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆ मनाला लागली हुरहूर वाढे वजन वय भरभरून शोधले उपाय कित्येक सदा राहण्या चिरतरुण ॥१॥ सकाळ संध्याकाळ नेमे शतपावली,व्यायाम पळापळी चार-सहा  फळांचे रस घेई व्यायामानंतर प्रत्येकवेळी ॥२॥ सकाळी नाश्ता ,चहा सात्विक थाळी तीन वेळा  आहार कमीत कमी केला फलाहार मात्र चारदा वेगळा  ॥३॥ जिभेवर नियंत्रण म्हणून बोलणे ही केले कमी पोटावर पट्टा घालतेय बारिक दिसण्या नेहमी॥४॥ श्वास आलोम विलोम  सूर्यनमस्कार करी सहन असे किती केले उपाय बाई कमी होता होईना वजन ॥५॥ रामदेवबाबा पतंजली काढा बालाजींचे वैद्दिकी घेऊन ऋषाली व्यायामशाळा  सारेच गेले माझ्यापुढे थकून ॥६॥ ◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆ . सौ. शामला पंडित ( दीक्षित ) पूर्णानगर, चिंचवड 7276866795 ◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆ 🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸

ईच काउन डोकं भडकते - हास्य कविता

झाडीबोली साहित्य मंडळ स्पर्धेकरता कविता १५/०५/२०२० विषय हास्य विनोदी काव्य स्पर्धा राजेश लक्ष्मण वऱ्हाडे रा कसुरा ता बाळापूर जि अकोला ९९२११२५२३९ ईच काउन डोकं भडकते सोयरे मायबाप येता विषय होतो नेहमीच हिचा इच्छेचा अक्षय येऊन नेहमी मायबापावर अडते ईच काउन डोकं भडकते    प्रशंसा रोज करतो ईची भांडण्यापेक्षा अबोला बरा    मग शब्द येतात माझ्यावर तुमचं प्रेम नाही ते करा    काय करा चार माणसात शब्द देते आपली उडवते    ईच काउन डोक भडकते घरात काय कमी नाही पडू देत तरी तिचे गराणे माय-बाप सांगता येत ठेचून बसून मारून डोक जाम लढवते ईच काउन डोक भडकते    आपण येण्याआधी जणू उकरून ठेवते भांडण    माया ममता दूर ठेवते जशी झरे गेले आठुण    सांगितले ते सर्व आना म्हणते पोरांना ही भडकवते    ईच काउन डोक भडकते उतमात करते किंमत न कोणत्या गोष्टीची हरामाची जणू समजत मोलमजुरी कष्टाची आपला राग लेकरावर नसता आपण चांगले बदडते ईच काउन डोक भडकते    समजुतदारी विश्वास माया ममतेने वागणे    माहेर-सासर दोन्हीही प्रेमाने नाळ बांधणे    आदर्श घ्यावा असे सुन प्रेम सासूचे वाढवते    ईच काउन डोक भडकते

लॉकडाउन मधली बायको - हास्य कविता

झाडीबोली साहित्य मुख्य समूहाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय हास्य स्पर्धा.. स्पर्धेसाठी *लॉकडाउन मधली बायको* काय सांगू लोकहो तुम्हाले लॉकडाउन मधल्या व्यथा माझ्याकडून काम करवून घेती त्याच्यानेच भडकतो माथा.... स्वयंपाक बनविणे, भांडे घासणे या सर्वाचा माझ्यावर ओझा कपडे धुणी,पोरांच्या आंघोळी करण्याचा पडला सारा बोझा.... प्रेमात वागणारी बायको अशी का वागते माझ्याशी झोपेत असतांनाच चाय मागते दम देते आणून दे उशाशी... जोराने ओरडून सांगते त्यामुळे येई पोटात गोळा काम ऐकले तर ठीक म्हणते नाहीतर रागाने वटारते डोळा.... काम केले तरच मला भाऊ पोटभर खावाले जेवण देते अन्यथा पोराबारांसह आम्हाला उपाशीच रातभर झोपवते.... लॉकडाउन फळा नाही आला कामाच्या वांद्यात उतरला माज लॉकडाउन मधली बायको माझ्यावरच करते आहे राज.... ✒️श्री दुशांत बाबुराव निमकर       चक फुटाणा,चंद्रपूर

बाळंतपण - हास्य कविता

झाडीबोली साहित्य मंडळ हास्य काव्य स्पर्धा दिनांक १५-५-२०२०  विषय - हास्य विनोदी काव्य स्पर्धा स्पर्धेसाठी शीर्षक बाळंतपण सुरू झाली अचानक मळमळ,  पोटात माझ्या आली कळ , दारासमोर ॲम्बुलन्स आली, सगळ्यांची धावाधाव झाली, घरच्यांनी नेलं डायरेक्ट ससून, डॉक्टरांनी सांगितलं मला तपासून, गोड बातमी आहे म्हणाले, माझे डोळे पांढरे झाले, माणसाला कसे दिवस गेले? आई म्हणाली तुला मूल व्हावे म्हणून मी नवस केले, माझ्या सर्वांगाला फुटला घाम, कोणी म्हटले मुलगी झाली तर सीता, मुलगा झाला तर राम, मी बायकोला म्हटलं हे असं कसं झालं, गरोदर होण माझ्या नशिबी आल, म्हणता म्हणता नऊ महिने झाले,  अन् ऑपरेशन थिएटरला मला ॲडमिट केले, तिथे दिवे सारे ऑन झाले, अन् मला चटके बसू लागले, बायको म्हटली उठा आता तोंडावर ऊन आले, डोळे उघडून बघतो तर सारे मला हसू लागले, बायको म्हटली काय हे आळशी, कामधंद्याच बाजूलाच राहिलं, तुम्हाला सांगतो माझ्या बाळंतपणाचं  स्वप्न मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. स्पर्धक - भरत नारायण बारी पत्ता - बिजलीनगर,चिंचवड,पुणे. मोबाईल - 9028505164

विनोदी काव्य - हास्य कविता

स्पर्धेकरिता  हास्यविनोदी काव्य ------------------- पळत पळत गेलो गावाला नवरी मुलगी ती ठरवायला !  एक सोडून चार त्या मुली प्रत्येकीचा अंदाज निराळा !१!  पहिली मुलगी अति सुंदर काही तिला कळेना अंतर !  कमल नयनी असे कोमल दृष्टी नसे दिसेना निरंतर !२!  दुसरी मुलगी फारच छान अप्रतिम रूप लावी ध्यान ! बोलण्यास ती नाही तयार  न शिकल्याने दिसे अज्ञान !३!  तिसरी मुलगी लावण्यवती  सौंदर्य तिचे सारेच वर्णिती !  प्रश्न विचारता नाही उत्तर  कधीच नसे शब्द बोलती !४!  चौथी मुलगी फार गुणवती रंग सावळा गाणे ती गाती !  आवडली म्हणतानाच कळे स्वतःच्या पायाने चालेना ती !५!  मुलगी पाहण्याची हौस मोठी कशी झाली ही फटफजिती !  मग ठरवले एकच त्यादिवशी  घाई ना करायची लग्नासाठी !६!  ------------------- -श्री.श्रीगणेश पुरूषोत्तम शेंडे.  मु.पो.भुईंज ता.वाई जि.सातारा. भ्रमणध्वनी - 8605139140.

बायको - हास्य कविता

० बायको ०                दोस्ताइले सांगतो मी, घाबरत नाही बायकोले. बायको माही हिटलर, काय सांगू कोणाले. बिन पाण्यानं माही, हजामत होते रोज. ईले पहासाठी मीनं, केवढी केली होती खोज. लगन झाल्यापासून, माहं तिले पटत नाही. सांगकाम्या व्हावं, असं मले तरी वाटत नाही. तिच्या मनासारखं झालं नाही, ती मस्तनच चिडते. डोस्क्याचे केस धरून माहेवाले, माह्या उरावर बसते. पण माह एकच तंत्र, आपण आपलं चुपचाप शांत. माय मने मले तू शांत राय, ती करलचं आकांत. माईचा माह्या सल्ला, फायदेशीरच ठरला. बा नं केलेला प्रयोग , हा एकच इलाज उरला. विझण्यापूर्वी दिवा जसा,भकभक करून पेटते. मग स्वयंपाक नाही पाणी नाही उगीमूगी लेटते. पोट्टे म्हणते बाबा, माय कायले झोपली? मी कायले सांगतो, माही इतर पितर घेवून थकली. कसंतरी स्वयंपाकाचं ,जमते राव मले. मग पोट्टे आनं मी उठवतो ,हालवू हालवू तिले. तुम्ही माहं ऐकत नाही म्हणून, मारते कशी ताण. आता नाही बोलणार म्हून, धरतो दोन्ही कान. बायको कडचे नातलग सारे ओलिताचे धनी. माह्या कोरडवाहू रिश्तेदाराईले पाजल कोण पाणी. राजे हो लग्न एक जुवा आनं आपण त्यातले जोकर. बरं झालं बरं, नाही तर ज्यांन जोडून देलं ,त्याच्या

प्रेमाचा चहा - हास्य कविता

स्पर्धेसाठी हास्यकाव्य (झाडीबोलीत) पिरमाचा चाया जई पहा ती मालं पाण्यामंदी पायतेस कुसंगात करुनस्यानी काहा असी वागतेस  असा काहा सभाव तुजा हेकळवानाचा जीवाले टोचतेत तुज्या सबदाच्या टोचा झरते माजा मळका अना तू बाकी हासतेस... इसरुन गेलीस तईचे तू पिरमाचे बोल तू येक्याजागी उबी अना माजा गेला तोल मालं सोळून देतेस ना पाया त्याज्या पळतेस... तुज्यासंगा बोलना मालं बहुभारी पळते राग तुजा आवरना जीव माजा मळमळते मी सांगतो येक अना तू भल्तेस आयकतेस... तू काईच्याबाई बोल्तेस,तुलं नसे आठ्ठोन तुजे सप्पे लप्डे ठेवलू मनामंदी साठ्ठोन मी नाई भुलं कईच,मंग तू काहा भुलतेस... कसा पाजूवं तुलं मी पिरमाचा चाया आतंवरी सांगलू थो सप्पा गेला वाया डोक्स्यात नाई बरं,हिरदयात कई भरतेस... अनिल पिट्टलवार ग्रामगीताचार्य  भद्रावती जिल्हा चंद्रपूर  9850492877

छंद - हास्य कविता

हास्य कविता स्पर्धेसाठी             *छंद* मला बाई गाण्याचा भारीच छंद करू नका कुणी माझे गाणे बंद गाणे माझे ऐकून पळतात लहान मुले  म्हातारी कोतारी जागच्या जागी डुले  डुलता डुलता कधी लुडके कळतच नाही  गाणे माझे कुणाला मुळी आवडतच नाही शेजारचे काका आले एकदा घरी म्हणले मला फारच सुंदर गातेस पोरी आनंद माझा गगनात मावेनासा झाला  काकांच्या रुपात जणु मोठा रसिकच आला काका म्हणले रेडिओसाठी प्रयत्न आहेत माझे रेडिओवर प्रसारित करावे गाणे बाळा तुझे  रेडिओवर तू गाणे गाशील जेव्हा  मुस्कट तरी दाबता येईल रेडिओचं तेव्हा असे कसे सगळे मला अरसिकच भेटतात गाणे माझे ऐकून दूर दूर पळतात मी नाही करणार बाई गाणे माझे बंद कारण मला मुळी गायनाचा भारीच छंद      *सौ अपर्णा सोवळे*         *यवतमाळ*

बायकांच लाॅकडाउन - हास्य कविता

हास्य काव्य स्पर्धेसाठी कविता  दि.15 05 2020 बायकांच लाॅकडाउन या लाॅकडाउनने सा-या बायका लागल्या चिडायला दिवसभर काम करून  रात्री येती रडायला  उठलं की झाडू हातात केर लागती काढायला  लाद्या पुसून यांची कंबर लागते मोडायला  चहा नाश्त्यासाठी सगळे  टाहो लागती फोडायला  या उभ्याच किचनमधे  भाकरी पोळ्या बडवायला दिवसभर खाण्याची चंगळ भांडी लागतात पडायला  यांच्या येई जीवावर मग खरकटं काढायला  राग आला सा-यांचा की धरते धूण्याच्या दगडाला बदा बदा सा-यांचे कपडे लागते बदडायला कामं आवरून सारी जरा जाते पडायला  आज काही नवीन कर पोरं लागती ओरडायला  पडल्या पडल्या मग मोबाईल लागते उघडायला  नव नवीन रेसिपीज लागते ती सापडायला किचनमधे होतात सुरू नवीन प्रयोग घडायला काही जमतात पदार्थ  काही लागतात बिघडायला जमलेल्या पदार्थांचे फोटो लागते काढायला  वरचेवर पदार्थांचे स्टेटस लागती पडायला  ब्यूटी पार्लर किट्टी पार्टी  स्वप्ने लागती पडायला  वाट पाहते मनोमनी  लाॅकडाउन उघडायला  सौ.मंजूषा सुंदर लटपटे पुणे 9923035503

सुऱ्या रायला कुवारा - हास्य कविता

स्पर्धेसाठी-- विषय- हास्यकाव्य शीर्षक- *..सुऱ्या रायला कुवारा* मास्तर म्हणून काम करते नाव त्याचं सुऱ्या एक नाही, दोन नाही पोरी पायल्या तेरा.. पयली पोरगी पायतांनी सुऱ्या मोटा लाजे मनामंदी त्याचा कसा बेंड बाजा वाजे.. पोरगी पाहे सुऱ्याकडं सुऱ्या पायाकडं पाहे आंगामधून त्याच्या घामाचा लोट वाहे प्रश्न विचारे मामा आरे लाजते काऊन असा? अश्या तुह्या वागण्यानं पोरगी समजलं तुले पिसा रागारागानं सुऱ्यानं पायलं पोरीकडं पोरगी बोले भलत्याले नजर तिची सूऱ्याकडं वाटलं सुऱ्याले पोरगी घेत असल त्याची फिरकी मंग समजलं त्याले पोरगी होती पुरी तिरकी तवा कोटी कळला त्याले नशिबाचा फेरा... खोटं काढू काढू सुऱ्यानं पोरी पायल्या बारा फिरू फिरू शेवटी आता नंबर आला तेरा तेरावी पोरगी सुऱ्याच्या मनामंदी भरली पण तेव्हड्यात त्याची कालर एका जनानं धरली सुऱ्या मने बापाले मी इले नाही सोडीन बाप म्हणे, सोड बे नाहीतं लवर तिचा झोडीन सूऱ्याले पुढं बसला मंग जबरदस्त धक्का आता नाही पायीन पोरी विचार केला पक्का अशी झाली कथा अन सूऱ्या रायला कुवारा.. एक नाही दोन नाही पोरी पाह्यला तेरा...                          - *प्रशांत भंडारे*            

खुला करा न् जी लाॕकडाऊन - हास्य कविता

हास्य काव्य स्पर्धा आयोजित ... हास्य /विनोदी काव्यलेखन !           दि.  १५ मे २०२० ------------------------------------ स्पर्धेकरीता हास्य कविता..     ( झाडीबोली भाषेत....) ------------------------------------ !! खुला करा न् जी लाॕकडाऊन !!      """""""""""""*****""""""""""""" बोंबलू-बोंबलू सांगत होती बायरं नोको निंगू ,बायरं नोको निंगू आयकनं कसा व्ं ? थो नवरा हो.. गेला बायरं ! पोलिसांनी बदडले -पाठीवर दांडू. बेससं झोंबला असनं व्ं बाप्पा ! रायते-रायते न् अण्णा ! अण्णा !! म्हणते.. शेकून देते न् वं चांगलीस तेल पाणी तरी बाप्पा ! डोरे वटारुन पायते . म्हणली होती लाडीगोडीनं... घरात राऊन् ,घरात खाऊन् त् येलपाड्या.. म्हणे बाप्पा ! चूप रायतेस ? का कानफटात देऊ ? दोनक्ं हप्ते बाई... कसा तरी रायला असनं व्ं घरी मंग म्हणे- खर्रा, तंबाकाशीवाय  माज्या जीवाले करमत नाही. ताव आणेन् व्ं राजासारखा... म्हणे..माले कोणो व्ं काहो करते ! हयर्रा - गयर्रा समजलीस का ? माज्यासारखा माणूस घरा

💁‍♂तीचा नी माझ्यातला फरक - हास्य कविता

स्पर्धेसाठी विषय:- तिझ्या नी माझ्यातला फरक. ती दुधbag म्हणते मी दुधपुडा म्हणतो, ती मोबाईल म्हणते मी फोन म्हणतो, ती टेबल म्हणते मी बाक म्हणतो, ती विंडो म्हणते मी खिडकी म्हणतो, ती calculation म्हणते मी हिशोब म्हणतो, ती लव्ह म्हणते मी प्रेम म्हणतो, ती पर्स म्हणते मी काखेतली पिशवी म्हणतो, ती पाकीट म्हणते मी बटवा म्हणतो, ती पोळी म्हणते मी चपाती म्हणतो, ती लिप्स म्हणते मी ओठ म्हणतो, ती फिलींग्ज म्हणते मी भावना म्हणतो, ती "hmm" म्हणते मी निर्लज्ज "आणखी काय?" विचारत राहतो, ती ब्लाॅक करते अन् अन् मी "गुगल पे"वरून मेसेज करतो, ती "लाॅकडाऊन" म्हणते मी "ताळेबंद" म्हणतो, ती कोटींचं गणित मांडते मी पैशांचं कोडं सोडवतो,  खरतरं शेवटी अधुरच राहिल हे मिलन कारण ती मिटींग म्हणते अन् मी भेट म्हणतो. नाव:- किरण बंडू पवार  मो. नं:- 8830055656.  गाव:- कळंब, ता. कळंब. जि. उस्मानाबाद.

कॉलेज कुमार - हास्य कविता

*हास्य काव्य स्पर्धा*              *हास्य कविता*___ *कॉलेज कुमार*                   तंग पॅन्ट वर डगला।  केसांची कट करतो पगला ।  फाटलेली पॅन्ट काय ही फॅशन।  दळभद्री ठिगळे नुसते मेले अवलक्षण।  ते काय अवतार घाली वरमुडा  भारी।  जशी चालली कबड्डी खेळायला स्वारी।  वसुंधरेवर पहा मुरडत आल्या अप्सरा। कमी कपड्यात अटीट्युडचा  फाजील पसारा।  इम्प्रेशन साठी पैसा उधळतात। शिक्षणाच्या नावाखाली मजा मारतात।  सोबतीने ड्रिंक झोडू --चला चारमिनार ओढू।  एकमेकांवर वेगळेच इम्प्रेशन पाडू।  मुलींचे तर काय सांगावे सौंदर्याचा नखरा भारी । स्वतःला समजतात जणू ऐश्वर्या कुमारी।  सुसंस्कार झाले फस्त, रात्रीचे इंटरनेट खेळ चाले।  स्मार्ट फोन पालकांचे हे दुर्लक्षीत सोहाळे।  हे कॉलेज कुमार __काय-- अन कुमारी काय-- हे कधी सुधारणार--- हे कधी सुधारणार?  हे अजून बिघडणार ---हे अजून बिघडणार ---  "काय म्हणता सारस्वतांनो"- कळतय पण वळत नाही कोणीच ऐकत नाही।  पालकांनो सु संस्काराचा लावा लगाम ।तेव्हाच तयार होतील सीताराम।²--------  धन्यवाद  *सौ रंजना महेंद्र बोरा*  *आशु कवयत्री*  *सिन्नर जिल्हा नाशिक*

माह्या सायीचं लगीन - हास्य कविता

*🖊️ स्पर्धेत.. हास्य कविता..* *शीर्षक.. माह्या सायीचं लगीन* *काय सांगू राजे हो तुमाले मी* *माह्या साईच्या लग्नाची मजा* *सगळे होते खुशीत राजे हो*  *अन मले भेटली होती सजा.*! 1!  *नवरीची बहीण मले म्हणे दाजी*  *काऊन तोंड इचकून बसता*   *सगळेच हायेत खुशीत अन*   *तुम्ही नाराज काऊन दिसता.*! 2!   *म्या मनलं तिले साई असते* *दाजीची आधी  घरवाली*  *तिच्या लग्नात सांगा मले तुम्ही* *मी  कसा राहू राजे हो खुशाली.*! 3 !  *नवरदेवाची वरात आली दारी* *चांगलीच त्याईची आवभगत केली* *नटून थटून नवरी होऊन राजे हो* *मायी सायी मांडवात आली .*! 4 !     *बायको म्हणे तुमचीबी बईन हाय* *चला अकशीदा टाका डोकशावर* *माये डोये आले भरून पण म्या* *माहया मनाले घातला आवर*.! 5!  *तवापासून  राजे हो मी माह्या*  *सायीले  माही  बहीणचं मानतो* *दिवाइले साइले आणतो घरी* *लुगडं चोळी घेऊन सासरी धाडतो.*! 6.!  ***************************** *🖊️ सौ. शारदा मालपाणी.* *(काव्य शारदा )*©️®️ *अमरावती.*

🐝मूर्ख मुलगा आणि मध माशी - बोधकथा

एका गावात एक लाकूडतोड्या होता. तो खूप मेहनती होता. लाकूडतोड्याचे वय झाल्यामुळे त्याला जास्त काम होत नसे. एके दिवशी एक मधमाशी त्याच्याभोवती गुणगुणू लागते. लाकूडतोड्याचे डोके पाहून त्याच्या डोक्यावर बसते आणि लाकूडतोड्याला चावे घेऊ लागते. लाकूडतोड्या मधमाशीला हाताने झटकून टाकतो. पण ती मधमाशी कसली ? मधमाशी पुन्हा लाकूडतोड्याच्या डोक्यावर बसून त्याला चावू लागली. आता मात्र लाकूडतोड्या खूप चिडतो. लाकूडतोड्या त्याच्या मुलाला बोलावतो आणि सांगतो. बाळ, या मधमाशीला मार बर, मला खूप त्रास देत आहे. लाकूडतोड्याचा मुलगा वडिलांचे ऐकणारा असतो, पण खूप मूर्ख असतो. वडिलांच्या डोक्यावर मागच्या बाजूला मधमाशी बसलेली असते. मुलगा एक काठी घेतो व वडिलांच्या मागे जातो. सर्व ताकत एकवटून डोक्यावर बसलेल्या मधमाशीच्या अंगावर जोरदार काठीचा प्रहर करतो. मधमाशी तिथून उडून जाते आणि काठी लाकूडतोड्याच्या डोक्यात बसते. लाकूडतोड्या जखमी होतो. अशा मूर्ख मुलाचा प्रताप सुताराला भोगावा लागतो. तात्पर्य - आती शहाणा त्याचा बैल रिकामा "

🤣हि पोस्ट वाचल्यावर नक्की हसाल

😁😁😁नक्की वाचा पोट धरून हसा......  एकदा एक भारतीय नोकरीसाठी अमेरिकेत गेलेला.  काही दिवस खटपट करून त्याला एका सुपर मॉलमध्ये सेल्समन म्हणून नोकरी मिळाली. मालकाने त्याला बोलावले व पूर्वानुभवाबद्दल चौकशी करून त्याला नोकरी दिली. दुस-या दिवशी तो गृहस्थ कामावर आला.  दिवसभर काम भरपूर करावं लागेल असे मालकाने सांगितले. मॅालची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ अशी होती. पहिल्या दिवसाचे काम संपल्यावर मालक त्याच्याकडे आला व "किती ग्राहक केले" *असे विचारले. त्या भारतीयाने सांगितले की फक्त एकच ग्राहक केला मालक चिडला व म्हणाला" बाकीच्यांनी प्रत्येकी पंधरा ते वीस ग्राहक केले आणि तू फक्त एक ??" तुझा असा परफॅार्मन्स असेल तर मला तुझ्या बाबत विचार करावा लागेल. " मालक चिडूनच पुढे म्हणाले, "किती डॅालरचा व्यवसाय केलास ?" कारण एका ग्राहकाकडून असे कितीसे मिळाले असतील असा विचार मालकाने केला.  तो गृहस्थ म्हणाला, "दीड लाख डॉलर !" क्काय ! मालक जवळजवळ ओरडलाच ! बाकीचे सेल्समनही अचंबित झाले  मालक म्हणाले," काय विकलेस तू त्याला ?" तो म्हणाला, "एक मासे पकडायचा गळ विक

हि पोस्ट वाचल्यावर तुम्हाला तुमचे मोल नक्की कळेल

कोणी कोणतेही धर्मशास्त्र वाचले नाहि तरी चालेल पण एकदा "शरिरशास्त्र" चा अभ्यास करावा. ( वैज्ञानिक मानवी शरिराचं अभ्यास करुन थक्क झाले आहेत ) *मानव शरिर अदभुत आहे.* *मजबुत फुफ्फुस* आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाहि येत. जर फुफ्फुसाला खेचुन लांब केल तर तो टेनिस कोर्टचा एक हिस्सा पुर्ण व्यापुन टाकेल. *अशी कोणतीही फॅक्टरी नाही* आपले शरिर दर सेकंदाला २५ करोड नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जा पेक्षा जास्त रक्त कोषीकांचे उत्पादन होते. सतत शरिरात २५०० अब्ज रक्त कोषीका असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषीका असतात. *लाखो किलोमीटर चा प्रवास* मानवाचे रक्त शरिरात दररोज १९२००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरिरात साधारण पणे ५.६ लीटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा संपुर्ण शरिराचे भ्रमण करतो. *धडधड* तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १००००० वेळा घडकतं. वर्ष भरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. ह्रदयंच पंम्पिग चा दाब एवढा जास्त असतो कीरक्ताची चिळकांडी ३० फुट वर उडु शकतो. *सर्व कॅमेरे आणि दूर्बिण निष्फळ* मानवाचे डोळे एक करोड रंगाना ओळखुन लह

उद्योग क्षेत्र कसा निवडावा यावर काही लेख

व्यवसाय कोणता करावा, असा प्रश्‍न बर्‍याचदा विचारला जातो. परंतु आपल्या आसपास अनेक व्यवसाय असतात. आपल्या परिसरावर नजर फिरवली तर आपल्याला जी जी गोष्ट दिसते ती प्रत्येक गोष्ट एक व्यवसायच असते. पण आपण त्याकडे व्यवसाय म्हणून बघत नाही. ज्याची वृत्ती, प्रवृत्ती उद्योजकतेची असते त्याला मात्र प्रत्येक ठिकाणी व्यवसायच दिसतात आणि तो त्यातला कोणताही व्यवसाय करण्यास धजावतो. एकदा अशीच एक उद्योजक प्रवृत्तीची व्यक्ती स्वत:ची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी एका डॉक्टरकडे गेली होती. त्याने डॉक्टरकडे जाऊन पाहिले तेव्हा रुग्णांची बरीच मोठी रांग लागलेली दिसली. त्याला रांगेत थांबावे   लागले आणि त्याचा नंबर लागण्यास पाऊण तास लागला. मात्र तो रांगेतला पाऊण तास तो निवांत बसला नाही. त्याने आजूबाजूला नजर टाकली, काही निरीक्षणे केली आणि काही नोंदी केल्या. त्याचा नंबर लागून तो डॉक्टरसमोर तपासणीसाठी बसला तेव्हा त्याने आधी पाऊण तासभर केलेल्या निरीक्षणाचा कागद त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाल्या, मी गेला पाऊण तास तुमच्या रुग्णालयाचे निरीक्षण केले असून रुग्णालयाशी संबंधित असे किती व्यवसाय करता येतात याच्या नोंदी केल्या आहेत. मल

पक्षी मरतांना कुठे जातात?

🐦🐧🕊🦅🦆 नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा मी केलेला अनुवाद ...! प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर बसुन नेहमीप्रमाणे आजुबाजुच्या घनदाट वटवृक्षांवर  चिवचिवाट करणार्‍या माझ्या सोयर्‍यांना ऐकत होतो. सर्वच जण तिथे कायमचेच रहिवासी होतो. माझी सकाळ आणि त्यांचे वटवृक्षांमधुन चिवचिवणे हा दररौजचा उपक्रम. त्या दिवशी मात्र माझ्या मनात माहित नाही पणगेली कित्येक वर्षे मी या माझ्या मित्रांना चिवचिवाट करतांना, भांडतांना ,मारामार्‍या करतांना बघीतलेय पण आजपर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंवा अजुन  कुठे आमच्या काँलनीच्या परिसरात मृतावस्थेत  पडलाय असे बघीतले नाही . किंबहुना जगात कुठेही असा मृत पक्षी मिळालाय असे आढळत नाही. हा एखाद्या मांजरीने मारुन निष्काळजी पणे सोडुन दिलेले अवशेष किंवा एखाद्या अपघातात चिरडलेले पक्षी बर्‍याच वेळा दिसले असतिल पण नैसर्गीक मेलेला पक्षि आजपर्यत तरी कुठेच आढळत नाही.  मग पक्षी काय अमर असतात का ? की त्यांना नैसर्गीक मरण यैतच नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे मी गुगल वर पण शोधायचा प्रयत्न केला. पण गुगलने पण काही तर्कशुध्द उत्तर दीले नाही. अ

माणूस हसण्याची शक्ती विसरला तर ?

जगात कुठेही नाही एवढा हास्याचा प्रचंड साठा तुमच्या आमच्या जीवनात आणि सभोवताली असतो;परंतु तो बघण्याची दृष्टी आपणाजवळ नाही ती निर्माण झाल्यास आपले जीवन एकदम बदलून जाईल. आता हसायला कुणाला आवडत नाही ? पण इथे वेळ कोणाकडे आहे ? चार क्षण निवांत मिळतील तर शपथ.सगळ्यांचेच जीवन धावपळीचे झाले आहे.इथे हसायचे म्हंटले तरी लोकांच्या जीवावर येते काहीना तर हसायचे म्हंटले तर रडायलाच येते!  मानवात जे नाही त्याची भरपाई म्हणून देवाने कल्पनाशक्ती दिली आणि जे आहे ते सुखमय ह्वावे यासाठी विनोदबुद्धी दिली.  जीवनात सदा सुखी व आनंदी असावे असे वाटणे स्वाभाविक आहे परंतु वास्तवात तसे होत नाही आणि वास्तव सुसह्य फक्त 'विनोद'च करू शकतो.कारण हसल्याने निर्भेळ आनंद मिळतो आणि मनाचे आरोग्य उत्तम राहते.ताणतणाव कमी करण्याचे कधीही आणि कुठेही उपयोगी पडेल असे साधन म्हणजे विनोद!   विनोदाला कोणी बाप नसतो पण ते सर्व औरस असतात.काही विनोद सहजस्फुर्तीचे आणि काही समयसुचकतेचे द्योतक असतात.अगदी एका शब्दानेही हास्याचे फुलोरे उडताना आपण कित्येकदा अनुभवले असेल.किंवा एखाद्या विनोदाला आपण 'क्या टायमिंग है बॉस' अशी कॉम्प्लिमेंट

अध्यात्म म्हणजे काय ?

*अध्यात्म म्हणजे काय* ?  *अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.*  *अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.*  *अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे.*  *अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागण.*  *अध्यात्म म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे.*  *अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.*  *अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.*  *अध्यात्म म्हणजे मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे.*  *अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे.*  *अध्यात्म म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव जोपासणे.*  *अध्यात्म म्हणजे सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे.*  *अध्यात्म म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.*  *अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे.*  *अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे.*  *अध्यात्म म्हणजे आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे.*  *अध्यात्म म्हणजे गरजुवंतांना यथा शक्ती आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे.*  *अध्यात्म म्हणजे आपल्या बरोबर इ

आपण आनंदी आहोत का ?

   जगातला सर्वात आनंदी देश कोणता,' हा विषय घेऊन एक सर्वेक्षण केलं तेव्हा 2018 या चालू वर्षी फिनलॅंडचा नंबर पहिला होता. भारताचा 133वा.  आपण आनंदी आहोत का? आपण आनंदी राहण्यासाठी काय करायला हवं? एकदा पालक झालो, की आपण 24 x 7 पालक असतो. आई-बाबा झाल्याचा आनंद काही जगावेगळा असतो. मुलांमुळं आपण पुन्हा एकदा मूल होतो. त्यांच्या नजरेतून जग बघतो. मजा, गंमत, आनंद असतोच; पण विविध आव्हानांना तोंड द्यावं लागतं, हेही नाकारून चालणार नाही. ती आव्हानं पेलताना आणि या समस्या सोडवताना कस लागतो. कारण प्रत्येक मूल वेगळं असतं, तसं या समस्याही वेगळ्या असतात. आपण काही पालकत्वाची "पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री' घेतलेली नसते. जेवढ्या वयाचं आपलं मोठं मूल, तेच आपलं पालक म्हणून वय. समजा, आपण तीस वर्ष वयाची एक सज्ञान, जबाबदार, उच्चशिक्षित, नोकरदार वगैरे सन्माननीय व्यक्ती असू; पण आपलं मोठं मूल चार महिने असेल, तर आपलं "पालकवय' चार महिने इतकंच असतं. आपण यात नवे असतो. त्यामुळं कधीकधी ताण येणार, नक्की पुढं काय करायचं हे कळत नाही. समजा दोन मुलं असली, तरी दोन्ही मुलं आपल्याला वेगवेगळा पेपर सोडवायला देऊच शकतात

पाण्यात मासा कसा झोपतो ? नक्की वाचा...

Image
खरंतर , पाण्यातला मासा झोप घेतो कसा,  जावो त्याच्या वंशा तेव्हाच कळे।  पण शास्त्रज्ञ सांगतात,  मासा पाण्यात झोपतो.. पण तो माणसांसारखा किंवा इतर प्राण्यांसारखा काही भिंतीला/जमिनीला चिटकून झोपत नाही बघा... मासा पोहता पोहताच स्थिर होतो आणि मग झोपेच्या अवस्थेत जातो. काही मासे आडोशाला जाऊन कशाचा तरी आधार घेऊन झोपतात. इतर प्राणी आणि मासा यांच्या झोपेच्या चक्रात बरेच अंतर असते बघा... काही मासे दिवसा झोपतात तर काही रात्री. बऱ्याच माशांना पापणी नसते(शार्क माशाला पापण्या असतात) त्यामुळे लोक म्हणतात कि मासे डोळे उघडे ठेऊन झोपतात. डॉल्फिनच्या झोपेच्या बाबतील एक मजेशीर गोष्ट आहे. डॉल्फिन पाण्यात गाढ झोपी जाऊन शकत नाही, कारण त्याला श्वास घेण्यासाठी पाण्याबाहेर यावे लागते. मग डॉल्फिन आपला अर्धा मेंदू बंद करतो..आणि झोपतो. बाकीचा अर्धा मेंदू जागा राहतो आणि डॉल्फिनला पोहायला मदत करून श्वास घेण्यासाठी मदत करतो.

😱एका मिनिटामध्ये इंटरनेटवर काय होते?

*_😱एका मिनिटामध्ये इंटरनेटवर काय होते?_*   _____________________  💁‍♂४,२०३,३६,००,००० म्हणजेच ४ अरब २०३ कोटी ३६ लाख फेसबुक लॉगइन्स होतात.   😆१५,९८४,००,००,००० म्हणजेच १५ अरब ९८४ कोटी गुगल सर्च केले जातात   💁‍♂१६४,१६०,००,००, ००० म्हणजेच १६४ अरब १६० कोटी व्हॉट्सअप मेसेजेस पाठवले जातात   💁‍♂८०७,८४०,००,००,००० म्हणजेच ८०७ अरब, ८४० कोटी ईमेल्स पाठवले जातात   💁‍♂दर मिनटाला १.८ कोटी टेक्स्ट मेसेजेस पाठवले जातात   💁‍♂दर मिनटाला युट्यूबवर ४३ लाख व्हिडीओ पाहिले जातात   💁‍♂दर मिनटाला १ लाख ७४ हजार इन्स्टाग्राम स्क्रोल केले जातात   💁‍♂दर मिनटाला ४ लाख ८१ हजार ट्विटस केले जातात   💁‍♂दर मिनटाला १.१ कोटी टिंडर स्वॅप केले जातात   💁‍♂दर मिनटाला ९ लाख ३६ हजार ट्विट पाहिले जातात   💁‍♂दर मिनटाला २५ हजार gif इमेजेस मेसेंजरवरून पाठवल्या जातात   💁‍♂दर मिनटाला २ कोटी ४० लाख स्नॅप्स स्नॅपचॅटवर क्रिएट केले जातात   💁‍♂दर मिनटाला ३ लाख ७५ हजार अॅप्स डाऊनलोड केले जातात   *_❗इंटरनेटवर चालणाऱ्या घडामोडींची आकडेवारी ही क्षणाक्षणाला सातत्याने बदलत असते.तरीही जास्तीत जास्त अचूक आकडेवारी देण्याचा प्रयत्न करण्

काही सर्वोत्कृष्ट चित्रपटाची नावे/ यादी

1. डॉ. प्रकाश बाबा आमटे  2. रायडींग दी बुलेट - मानसीक भितीदायक विचारांचे मस्त प्रतिबींब  3. द मिस्ट - एखाद्या अस्मानी संकटातुन सुटकेसाठी माणसांचा समुह कसा रिअ‍ॅक्ट करतो सुरुवात २०१२ सारखी वाटेल पण शेवट अप्रतीम.  4. लगान  5. जजबा  6. चक दे इंडिया  7. बिनधास्त  8. तानी  9. The Pursuit of Happyness  10. Cast away  11. The Terminal  12.  ३ Idiots  13. the secret  14. Enemy at the gates  15. लास्ट हॉली डे  16. आपला माणूस

सर्वोत्कृष्ट 100 मराठी पुस्तकं

०१.) ययाती = वि. स. खांडेकर    ०२.) वळीव = शंकर पाटील   ०३.) एक होता कार्वर = वीणा गवाणकर   ०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती   ०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात   ०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले   ०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर   ०८.) तीन मुले = साने गुरुजी   ०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.   १०.) आय डेअर = किरण बेदी   ११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे   १२.) मृत्युंजय = शिवाजी सावंत   १३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे   १४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे   १५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर   १६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद   १७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद   १८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू   १९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार  २०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर   २१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान   २२.) राजयोग = स्वामी विवेकानंद   २३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद   २४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी   २५.) योगासने = व. ग. देवकुळे   २६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिं

बारावी नंतर करिअर निवडण्यासाठी काही कोर्स

बारावीच्या  विद्यार्थ्यांसाठी           For XII Students               ***********        Science Courses (3 Years)                ===============  🔵 BSc Physics  🔵 BSc Chemistry,  🔵 BSc Botany,  🔵 BSc Zoology,  🔵 BSc Computer science  🔵 BSc Mathematics  🔵 BSc PCM,  🔵 BSc CBZ,  🔵 BSc Forestry,  🔵 BSc Dietician & Nutritionist,  🔵 BSc Home Science,  🔵 BSc Agriculture Science  🔵 BSc Horticulture,  🔵 BSc Sericulture,  🔵 BSc Oceanography,  🔵 BSc Melsorology,  🔵 BSc Arthopology,  🔵 BSc Forensic Science  🔵 BSc Food technology,  🔵 BSc Diary Technology,  🔵 BSc Hotel Management,  🔵 Bsc Fashion Design,  🔵 BSc, Mass Communication,  🔵 BSc Electronic Media,  🔵 BSc Multimedia,  🔵 BSc 3D Animation,  And Many More..........            Commerce Courses                 ===============  ☄CA Chatted Account  ☄CMA Cost Management Account  ☄CS Company Secretary (Foundation)  ☄B.Com Regular,  ☄B.Com Taxation &Tax Procedure  ☄B.Com Travel & Tourism  ☄B.Com Bank Management