Posts

Showing posts from November, 2020

◼️ बोधकथा :- उकराल माती तर पिकतील मोती

Image
        एक गाव होतं.कामेगाव त्याच नाव .गाव कसं ? खेडेगावच म्हणा ना ! इनमिन  तीस - चाळीस घरे असतील तिथे . सगळ्यांना शेतीवाडी भरपूर.किसन नावाचा शेतकरी तिथेच रहायला होता.चांगली चाळीस एकर शेती होती त्याला.राधा त्याची बायको.दोघेही घाम गाळून शेतीत राबायचे.देवानं चारं लेकरं दिली पदरात त्यांच्या.पोरांवर त्यांचा खूप जीव.राधा तर पोरच आहेत म्हणून लाड करायची. किसन म्हणायचा ,"अगं राधे,लै लाडकोड नगं करू .जरा त्यांना बी कष्टाची जाणीव व्हवू दे ." पण आईचा जीव कुठं ऐकतय ? ती आपली दुर्लक्ष करायची . पोरं शिकतील,मोठी सायब , नोकरदार होतील , असे स्वप्न ती बघायची.दिवसामागून दिवस चालले.पोरं लाडानं शेफारली.वयानं मोठी झाली पण कामं करायची त्यांना माहीत नव्हती.आळशी बनले सारेच.         किसनच्या हातात आता काठी आली.राधेच्या पण डोळ्यांवर चष्मा आला.लेकरांच्या काळजीने ,विचाराने तिला बेचैन व्हायचे.ती किसनकडे तिच्या भावनांचा निचरा करायची.एके दिवशी अचानक किसनची तब्येत बिघडली.त्याने पोरा़ंना जवळ बोलावले आणि म्हणाला,"बाबांनो , मला आता बोलावणं आलंय , माझ्या मा...

◼️ बोधकथा :- घरोघरी मातीच्याच चुली

Image
  प्रेरणा साहित्यिक परिवार तर्फे आयोजित म्हणीवर आधारित बोधकथा स्पर्धा मीनलचे लग्न (घरोघरी मातीच्या चुली) घरोघरी मातीच्याच चुली          रामराव एकदाचा या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्याच्या तयारीनेच शेतात आले होते. त्यांचे शेत गावा पासून थोडेसे दूर नदीच्या काठी होते. सुंदर वृक्षवेली, नदीचा खळखळता प्रवाह, दाट झाडी यामुळे तो परिसर एकांतप्रिय लोकांसाठी अतिशय आवडता होता. प्रेमी युगुले त्या ठिकाणी प्रेमाराधना करण्यासाठी हमखास तेथे यायचे. कधी तरी ते रामरावांच्या नजरेलाही पडायचे.          गणपतरावांची मुलगी पळून गेल्यापासून रोज पारावर याबद्धल चर्चा व्हायची. प्रत्येकजण एक दुसऱ्याला दोषी ठरवायचा. मुलांवर चांगले संस्कार करता येत नाही का? आई वडील झोपा काढतात का? असे सवाल चर्चेमध्ये असायचे. ज्याच्या मुलीचे किंवा मुलाचे प्रकरण पुढे येईल त्याला मेल्याहून मेल्या सारखे व्हायचे. जो जास्त साव होऊन बोलायचा त्याचेच एखादे प्रकरण दुसऱ्या आठवड्यात समोर यायचे. रामरावचे शेत जवळ असल्यामुळे त्यांना बऱ्याच प्रकरणांची माहिती सगळ्यात अगोदर मिळा...

◼️ बोधकथा :- आपलेच दात आपलेच ओठ

  ही कथा भारतीय जासुस च्या जीवनावर असणार आहे. त्याचे नाव रवींद्र कौशिक आहे. रवींद्रचा जन्म 11 एप्रिल 1952 ला झाला. त्याला नाटक करायची खूप आवड होती. एकदा तो लखनऊ मध्ये नाटक करते वेळी रॉ च्या अधिकार्‍यांनी पाहीले आणि विचारले तू रॉ साठी काम करशील का? तो म्हणाला माझ्या देशासाठी मी काही पण करू शकतो .मग काय त्याला जासुस बनवण्याची तयारी _दिल्लीत_ सुरू करण्यात आली आणि तो त्यात पास पण झाला. नंतर त्याला पाकिस्तानात पाठविण्यात आले. त्याने तिथे उत्तम कामगिरी केली. त्याला सगळेजण ब्लॅक टायगर म्हणून ओळखले जाउ लागले. पण इतक्यात भारतीय सरकार कडून खूप मोठी चूक झाली. ती म्हणजे त्यांच्या तो चुकीचा निर्णय, तो असा की त्यांनी आणखी एक जासुस पाठवण्याचा. तो जासुस पाकिस्तानात येताच त्याला पाकिस्तानी लष्कराने पकडले. आणि त्याने सर्व काही खरे-खरे सांगून टाकले इतकेच नव्हे तर त्याने रवींद्रच पण नाव सांगीतले. पाकिस्तानी लष्करानी रवींद्रला अटक केले आणि जन्मठेपेची शिक्षा दिली.  तात्पर्य : आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. लेखक :- करण चंदेल

◼️ बोधकथा :- भाव तेथे देव

         ईश्वराची पूजा म्हणजे अज्ञानातून मुक्ती, अंधश्रद्धा तिलांजली,संस्कारांना उजाळा,विद्येची उपासना ,जिभेवर गोडीअमृताची तर डोळ्यात भक्तीची निरांजने तेवत ठेवण्याचा उत्तम मार्ग होय.गेल्या सहा महिन्यांपासून आपण करोना या व्हायरस विरोधात झुंजत आहोत .आपण सर्वांनी मिळून या महामारी विरोधात शांतपणे घरात राहून सहकार्य करायचे आहे.        नरसिंगपूर निरा भीमा नदीच्या संगमावर वसलेले एक छोटे गाव आहे त्या गावात नरसिंहाचे मोठे दगडी मंदिर आहे.त्या मंदिरात रोज पूजा, आरती, नेवैद्य सारे काही जे गुरुजी करायचे त्यांना बडवे म्हणतात.ते रोज नित्य नियमाने पुजा आरती नेवैद्य करत आहे. पण लॉक डाऊन मुळे सर्व मंदिरे बंद करण्यात आली अर्थात हे करणेच योग्य होते.पण बडवे काकांना मंदिरात जाऊन देवाचे सर्व काही करण्याची सवय गेली चाळीस वर्षांपूर्वी पासून सुरु होती, मंदिरात शांत वातावरण असायचे त्यामुळे तेथेच  जप करीत असत          आता शासनाने सर्व धार्मिक ठिकाणे बंद केल्यामुळे बडवे काकांना आता वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडला. चार दिवस खूप विचार के...

◼️ बोधकथा :- काळ आला पण वेळ आली नाही.

  कथा :- रामू नावाचा शेतकरी अतिशय गरीब होता. तो आपल्या शेतात माल पिकवून  आपलं आणि कुटुंबाचं उदरभरण करायचा. तो दररोज शेतात जायचा, आणि सायंकाळी घराकडे यायचा. अशी ही रामूची क्रिया दररोज असायची, नेहमीप्रमाणे रामू सकाळी शेताकडे गेला शेतात जाऊन रामूने गुरांना चारा पाणी केले; आणि आपल्या कामात गुंतला पाहता पाहता दुपार झाली सूर्य डोक्यावर आला, ऊन खूप तीव्र होते; आणि रामूला भूकही लागली होती. तेव्हा राम सावलीच्या दिशेने झाडाकडे निघाला . तेवढ्यात एक वाघ ही सावलीच्या दिशेने झाडाकडे निघाला वाघाला पाहून रामू दचकला आता रामू ला पुढे जाता येत नव्हते; म्हणून रामू मागच्या दिशेने निघाला. तेवढ्यात वाघाची नजर रामु वर पडली आता मात्र पुढे रामु  पळू  लागला आणि मागे वाघ पळत पळत रामू एका विहिरीवर जाऊन थांबला. रामूने विचार केला विहिरीत उडी मारून जीव वाचवू, आणि वाघा पासून सुटका सोडवू तेवढ्यात रामूने विहिरीत न पाहता उडी मारली पण; दैवाचा घात विहिरीत मात्र पाण्याचा एकही थेंब नव्हता, आता रामू खूप घाबरला रामू ला मुक्काम मारही लागला , डोके फुटले, रक्तबंबाळ झाला . तब्बल दोन तास रामू विहिरीत राहिल...

◼️ बोधकथा :- एकीचे बळ मिळते फळ

एका जंगलाभध्ये बरेच प्राणी, पक्षी रहात होते.. त्यात वाघ, सिंह, हत्ती, जिराफ, रानगवे,  हरिणे, माकडे हे सर्व आपापल्या कळपा बरोबर.. थव्यां बरोबर आनंदाने रहात होते.  त्या जंगलात एक तळे होते.  त्या तळ्यावर सर्व प्राणी पाणी पिण्यासाठी येत असत.    एकदा काय झाले,  रानगव्यांचा कळप पाणी पिण्यासाठी तळ्यावर आला.  त्यात तरुण, म्हातारे रानगवे होते. तसेच त्यांची छोटी छोटी बछडीही होती.  सर्वांनी आनंदाने पोटभर पाणी प्यायले.  पाणी पिऊन तो कळप परत जायला लागला.. तेंव्हा दबा धरून 2-3 वाघ शिकार करण्या- साठी बसलेले त्यांनी पाहिले..  त्या बरोबर सर्व रानगवे धावू लागले.. बछडीही धावू लागली..पण त्यात एक छोटे बछडे होते. त्याला काही जोरात धावता येईना..ते तळ्याच्या काठाने पळत असल्याने त्याचा पाय घसरला व  ते पाण्यात पडले. झालं!! वाघांना वाटलं चला आपल्याला आता आयतीच शिकार मिळालीये.. पण त्या बछड्याचा आवाज ऐकून ते रानगवे थांबले.. त्यांनी पाहिले की.. बछड्याला आता ते वाघ मारणार.. म्हणून ते जोरात परत मागे फिरले व वाघांवर धावून गेले.. सर्वांनी मिळून वाघांवर हल्ला ...

◼️ बोधकथा :- टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही

 पुरुषोत्तम आज चार वाजताच उठला. तसाही तो रोज साडेपाचला उठतच असे.अचानक वडील गेल्याने दोन बहिणी आणि एका भावाची जबाबदारी अंगावर येऊन पडली. वडीलाःचे वयही फार नव्हते. शेतातून परत येताना उसाच्या ट्रकने त्यांना उडवले आणि जागच्याजागीच मृत्यू आला.       घरातले सर्च हबकले. सुमित्रा तर अचानक बसलेल्या धक्क्याने थिजूनच गेली. डोळ्यात टिपूस येईना. शेवटी पोरे जवळ गेल्यावर एकच कल्लोळ उठला.लहान कच्ची बच्ची शाळा शिकणारी.सुमित्रा कधीतरी शेतावर जाऊन नव-याला कामात मदत करायची .पण संपूर्ण शेती सांभाळण्याचे ज्ञान तिला नव्हते. मोठा मुलगा पुरुषोत्तम ह्याला  घरची जबाबदारी येऊन पडल्याने शेती करणे भागच होते.      पुरुषोत्तम व इतरही भावंडे अभ्यासाला हुशार!!पुरुषोत्तम आईला म्हणाला " आई मी बघेन शेतीचे सर्व. तू नको काळजी करु. मला माहिती करुन दे म्हणजे जमून जाईल.  बन्या आणि शकू शिकतायंत ,शिकू देत." पुरुषोत्तम वर्गातला हुशार विद्यार्थी . त्याला शाळा सोडावीलागल्यावर , गुरुजींनाच खूप वाईट वाटले. " तू रात्री येत जा.मी शिकवत जाईन तुला.शनिवार , रविवार दुपारी शिकवत जाईन.तू श...

◼️ बोधकथा :- देवाने दिले कर्माने नेले

 एका गावात एक अत्यंत गरीब माणूस राहत होता अत्यंत हालाखीची परिस्थितीत  जीवन जगत होता, एकदा भगवान शंकर आणि पार्वती माता आकाशमार्गे जात असताना पार्वती मातेस,  त्या गरीब माणसांची  दया आली,  पार्वती माता  भगवान शंकरानां म्हणाली , ह्या गरीब माणसाला काहीतरी मदत करा भगवान शंकर म्हणाले याच्या नशिबात नाही ते पार्वती माता  नाराज झाली. शंकराने तिला समजूत काढण्यासाठी व्यक्तीची मदत करण्याचे ठरवले ‌.देवाने काही अंतरावर सोन्याने भरलेल्या मोहराचा हंडा ठेवला.गरीब माणूस  पुढे चालत होता ,त्याला  रस्त्याने जात असताना एक आंधळा व्यक्ती जात असताना दिसला, गरीब माणसाला वाटले की आपणही डोळे मिटून  त्याच्यासारखे चालून बघावे,  तो चालू लागला त्यांच्यापुढे काही अतंरावर  शंकराने  सोन्याची भरलेल्या मोहराचा हंडा ठेवला होता, तो त्यास ठेचकाळत डोळे झाकून  तो पुढे  निघून गेला .                             ............... तात्पर्य :- वेळ काळ कोणाचा कसा येईल सांगता येत नाह...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

  एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की 'तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल'. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो. इंद्र त्याला म्हणतो, की 'तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. ‍ तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो. त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास ? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

  ★★★★★★★★★★★★★★★★★★           सखाराम व लक्ष्मी हे दोघे पती-पत्नी हे एका गावामध्ये त्यांच्या 9 वर्षाच्या मुलासोबत राहत असतात. त्यांचा मुलगा श्रेयस हा अभ्यासात खूप हुशार होता पण तितकाच खोडकर ही होता. तो  आईचे कधीच ऐकत नसे. पण तो आपल्या वडिलांचे मात्र ऐकत असे.            श्रेयसला नवनवीन गोष्टी शिकायला खूप आवडतं असे. श्रेयस एकुलता एक असल्यामुळे त्याला दोघेसुद्धा काहीही बोलत नसत. तो लाडात वाढला होता.              त्या गावामध्येच त्याच्या वडिलांचे एक छोटेसे इस्त्रीचे दुकान होते. ते नेहमी आपल्या घरचं काम आटपले की आपल्या दुकानात नियमित जात असत.  जेव्हा श्रेयसच्या शाळेला सुट्टी असायची तेव्हा तो वडिलांच्या बरोबर दुकानात जाऊन बसत असे. वडील काय करतात याचे निरीक्षण करत असे. त्याला सारखे वाटत असे की आपणास आपल्या वडिलांसारखे कपड्यांना इस्त्री करण्यास जमेल का ?  तो जेव्हा जेव्हा दुकानात जाई, तेव्हा तेव्हा त्याच्या मनात सारखा हाच प्रश्न येत असे.           एके दिव...

◼️ बोधकथा :- देव तारी त्याला कोण मारी...

चिन्मयने " श्रीमानयोगी " चे शेवटचे पान वाचून पुस्तक बंद केले. त्याचे मन छत्रपति शिवाजी महाराजांचा काळात रमून गेले होते. काही केल्या त्याचे मन इतिहासातून बाहेर यायला तयार नव्हते. पाठीत एक धपाटा पडल्यावर तो धाडकन वर्तमानात आला आणि त्याने वळून बघितले तर त्याची आई हातात पैसे आणि पिशवी घेऊन उभी होती. "अरे किती हाका मारायच्या. काय झोपला होतास का काय. ह्या चार वस्तू बाजारातून घेऊन ये. आत्ता पाहुणे घरात येतील. जा पटकन." "जशी आज्ञा आईसाहेब." असे म्हणून चिन्मयने आईला त्रिवार मुजरा केला आणि बाजारात गेला. चिन्मय पुण्यात आबासाहेब गरवारे महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात होता. लहानपणापासून त्याला ऐतिहासिक कादंबऱ्या वाचायची फार आवड. इतिहासात तो इतका रमून जायचा की त्याला जगाचा पूर्ण विसर पडायचा. छत्रपति शिवाजी महाराज म्हणजे त्याचे आराध्य दैवत. लहानपणापासून तो ऐतिहासिक नाटकात काम करायचा. अगदी मनापासून आणि भूमिकेत समरसून. त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळायची. त्याचे नशिब एवढे बलवत्तर की ह्या वर्षी त्याची फिरोदिया करंडकच्या चमूमधे निवड झाली आणि ...

◼️ बोधकथा :- झाकली मुठ सव्वा लाखाची...

       मराठीचा तास वर्गात चालू होता. शिक्षिक मुलांना एक एक करुन म्हणी व त्याचा अर्थ समजवित होते. मराठी माध्यामचा तीसरी चौथी इयत्तेचा वर्ग.       शिक्षिकांनी म्हण वाचली .झाकली मुठ  सव्वा लाखाची .व म्हणाले," जो पर्यत  चोरी उघकडीस येत नाही  वा गुपित उघडकीस येत नाही, तो वर गुपित ठेवलेल्या वचनांना वा शब्दांना ..मान असतो ..विश्वास असतो. "     वर्गात मंदा विचारात पडली ...तिची शाळा व घर अगदी जवळ होते. इतके की धावत जाऊन घरी दोन मिनीटात परत शाळेत येऊ शकायची. तिच्या मैत्रीणीची घरे लांब होती. त्या रोज 2/3 आणे कधी कधी घेऊन यायच्या व शाळेजवळ विकायला बसणा- या फेरी वाल्याकडून कधी लिमलेटची गोळी ...कधी दाणे फुटाणे ....तर कधी विलायती चिंच विकत घ्यायच्या. मंदाला पण सहज एकदा मन झाले तिने घरून कपाटातून 1 आणा घेतला. हो घरात आई वडील तिचे कधी बंद कपाट ठेवत नव्हते . त्या मुळे सोईचे झाले .  तिने पण तिला जे मनात आले ते  फेरीवाल्याकडून विकत घेतले व त्या घेतलेल्या वस्तूचा आनंद घेतला. पण मग पुन्हा  हात सरसावला असे करता असता तिने घेतले...

◼️ बोधकथा :- बळी तो कान पिळी

Image
एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात बरेच प्राणी राहत होते. एके दिवशी अस्वल, लांडगा, कोल्हा, सिंह शिकारीसाठी एकत्र निघाले. सिंह त्या तुकडीचे नेतृत्व करत होता. जंगलात फिरता फिरता त्यांना एक म्हैस दिसली.. ..... त्या चौघांनी मिळून अथक प्रयत्नाने म्हशीला पकडले.. आणि ठार मारले.. कोल्ह्याने म्हशीच्या मासाचे चार समान भाग केले. प्रत्येक जण हर्षाने नाचत होता. आज आपल्याला भरपूर शिकार मिळाली. चला!!आपण आता त्याच्यावर येथेच्छ ताव मारु.!!  आपल्याला मिळालेल्या वाटेचे खाण्यासाठी सगळेजण  उतावीळ झालेले होते.. "आशाळभूत" नजरेने ... म्हशीच्या मांसाकडे बघत होते.. ..... इतक्या जंगलचा राजा सिंह याने मोठी गर्जना केली." तो म्हणाला" ते भाग बाजूला ठेवा. "मी काय सांगतो आहे ते तुम्ही नीट ऐका.." ..... सगळेजण चमकले... वनराजाचे म्हणणे शांतपणे ऐकून लागले.. दोस्त हो!! यातील एका भागावर माझा हक्क आहे.. कारण शिकारीत मी तुमच्या बरोबर सहभागी झालो.  सगळे म्हणाले अगदी बरोबर ....दुसऱ्या भागावर ही माझाच अधिकार आहे कारण शिकार करताना मी तुमचं नेतृत्व केलं होतं. सगळेजण म्हणाले अगदी बरोबर ... त...

◼️ कविता :- खेळ मांडला | मराठीचे शिलेदार कविता समूह

Image
✍️ खेळ मांडला ⚱️ लहानपणी खेळायचो खेळ नित्य भातुकलीचा  भांडीकुंडी ती  खेळताना खूप आनंद मिळायचा !! बालपण ते बालपण असते खेळकर क्षण लोभ नसतो कसला निखळ आनंदी क्षण !! मोठे झालेवर पाहे खरा खरा संसार आहे स्वप्न मनी बाळगताना साकारण्याचा क्षण पाहे!! खेळ मांडला आहे देवा सत्याला न्याय मिळावा जे खरंच कष्ट घेतात तयांचा विजय व्हावा !! न्यायाच्या मार्गातील सारे अडथळे दूरची करा प्रामाणिकाची कीव करा न्यायाचे छत्र हाती धरा !! ✍️ सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे(झेंडे) म्हसवड नं २ कुकुडवाड ता माण जि सातारा सदस्या मराठीचे शिलेदार समूह .                🔷🔸🔷🔸🔷🔸🔷🔸🔷🔸🔷

◼️ ललित लेख :- श्रीमंत

Image
श्रीमंत मला नेहमी असं वाटायचं की च्यायला जाम पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो... नंतर नंतर माझ्या लक्षात आलं पैसा आला की तो "पैसेवाला" नक्की होतो पण "श्रीमंत" होतोच असं नाहीये... श्रीमंत या शब्दाची व्याख्या खुप मोठी आहे. वेदांमध्ये जी "श्री" नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी निराळी आहे... श्री या संज्ञेत पैसा, यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यात अनुस्युत आहेत... फक्त पैसा नव्हे. हे लक्षात आल्यावर मी आसपासच्या काही मंडळींचं निरिक्षण केलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरंच यार पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कन्सेप्ट्स आहेत... गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होताच पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता... अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची "फिकीर नाही"... अलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीचं वळण न लावल्यामुळे तो पैसा घरात लाथेलोटेसारखा असला तरी त्याला नियोजन नाही... बेफिकीरी, व्यसनाधिनता, उधळपट्टी, वागणूकीत अहंकार, ब...

◼️ कविता :- खरे काय ?..

खरे काय ? विज्ञानाने ज्ञानापेक्षा अज्ञानाचा व्यापार केला लक्ष्मीप्राप्तीसाठी इथे शारदेचा बाजार केला ।  किती लुटावे रुग्णाला ते करार येथे पक्के झाले आयुष्याची कमाई लाटून वाटणीचे टक्के झाले । भित्यापाठी ब्रह्मव्हायरस हे सूत्र येथे जमून गेले विकून आशा धन मोजता नफेखोरही दमून गेले । खरेच लस का येईल कधी  की ते ही होते कांगावे करण्या सारवासारव तो ही डंका होता? सांगावे । मला वाटते नव्हेच व्हायरस नव्हेच कसली महामारी मुठीत राखण्या जगरहाटी कुणी बळे लादली लाचारी । कवी :-   अरविंद परुळेकर, विरार

◼️ ललित लेख :- दिवाळी

Image
दिवाळी ची चाहूल लागली की घराघरांत साफसफाई, रंगरंगोटी जणू स्वच्छ, निर्मळ घर आणि मन हा सुंदर संदेश च घेऊन येते दिवाळी.. 👌🏻 सणाचा राजा 4-5 दिवस सणाला उधाण आले असते. सफाई नंतर घराघरांत सुरू होतो तो फराळ.... गोडवा एकवटेला लाडू, 👌🏻आत पोटात गोडवा साठवून वरून खुशखुशीत असलेली ओल्या नारळाच्या करंज्या 😋 चटकदार चिवडा, 🤩 खमंग चकली, 😍 गोड आणि खारे शंकरपाळी, 🥰कुरकुरीत शेव, 🥳 खसखस लावलेले अनारसे, 😎 यांचा सुगंध, सगळ्या ची चव जिभेवर रेंगाळणारी, फराळ तोंडात टाकताच विरघळणारे मन.... फराळाची मजा त्रृप्त करणारी 😊. हि दिवाळी वेगळी फराळ होऊ द्या चरच.... झाले ना👌🏻👍🏻 नंतर खरेदी बायकाचा जिव्हाळयाची,,,, सगळ्यांना कपडे नवीन,पुजेसाठी लागणार सामुग्री, रांगोळ्या खरेदी, नवीन वस्तू, नवीन दागिना असो खरेदीला उधाण 🥳  पहिला दिवस वसूबारस गाय आणि वासरू प्राण्याची पुजा करा. प्राण्याचा आदर करा. सांगणारी महान संस्कृती. मग रांगच लागते धनत्रयोदशी, पाठोपाठ नरकचतुर्दशी, लक्ष्मी पुजन.... घरातल्या जिवंत लक्ष्मी चा आदर करा आपोआप लक्ष्मी घरी सुखात नांदतेच. नंतर पाडवा, बलिप्रतिपदा साडेतीन मुहर्तातला 1 मुहूर्त. पती...

◼️ दिनविशेष :- भाऊबीजेची कथा

Image
सूर्याला दोन अपत्य होती. मुलाचे नाव यम आणि मुलगी यमुना अशी त्याची नावे होत. सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला खूप कमी जात असे. यमाला माहीत होते की तो मृत्यूची देवता आहे म्हणून आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्या वर कोणतेही संकट यायला नको आणि म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा. यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे त्यांच्या घरी येणे अजिबात आवडत नव्हते, पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती लहानपणापासून एकत्र राहिलेले, पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नसे, आणि त्यामुळेच यमुनेचे यमाला खूप कळकळीची विनंती केली. त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले. ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला, तो दिवस म्हणजेच कार्तिक शुध्द द्वितीया होय..!! यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुने नेे त्याचे अगदी आनंदाने आदरतिथ्य केले. पाटावर बसवून त्याला ओवाळले..! यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला, यम...

◼️ कविता :- पणती होऊ या

Image
मराठीचे शिलेदार समूहावर प्रकाशित झालेल्या इतर कविता विकलेली माणुसकी आत्मपरीक्षण माझ्या मामाचे गाव विजयानंद पणती होऊ या ____________________________________ पणती होऊ या पणती होऊ या प्रकाश देऊ या ज्ञानाचा दिवा हा घरोघरी लाऊ या !! प्रेमाचे हे बंध  घट्ट बांधू या नाते प्रेमाचे हे जपूनची ठेऊ या !! आनंद देऊ या आनंद घेऊ या आनंदाचे क्षण  वारंवार पाहू या !! पणती होऊ या जपून ठेऊ या अंधार असता प्रकाशीत होऊ या !! पणती होऊ या  अंगणी तेवत उजळत राहू अंगण उजळू या !! ✍️सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे (झेंडे)  म्हसवड नं 2 कुकुडवाड ता माण जि सातारा ©सदस्या मराठीचे शिलेदार समूह. 🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️ आधाराची घट्ट जोड अन् ममतेचा ओलावा जपू या आशेची नवंकिरण देणारी इवलीशी  पणती होवू या//धृ// दाटलाय चोहीकडे आज एकाकीपणाचा अंधकार पातक कर्मांनी जगती या माजलाय खूप हाहाकार घाबऱ्या जीवास विसावा अन्  प्रेमाचा हात देवू या विश्वासाने  व्यक्त होणारी इवलीशी  पणती होवू या //१// समतोल ढा...