Posts

घामाचा पैसा - बोधकथा

एका शेठजींचा मुलगा, अज्जू खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून लाडका. काम त्याला कधी करावे लागलेच नाही. असे करत करत तो एकवीस वर्षांचा झाला. शेठजींना लागली काळजी. साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? दुसर्‍याच दिवशी‍ त्यांनी मुलाला बोलावले बाहेर पडायला सांगितले. पैसा कमवून आणलं तर जेवायला मिळेल ही अट ठेवली. अज्जूला काहीच कळेना. त्याने बहिणीकडून एक रूपया मागितला. आणि दिला जाऊन शेठजींना. पण तो त्यांनी विहीरीत फेकला. दुसर्‍या दिवशी पुन्हा हीच अट ठेवली. आता अज्जू आईकडे गेला. तोही पैसा वडिलांनी फेकला. आता मात्र आला तिसरा दिवस. अज्जू दिवसभर काम शोधत फिरला. पण काम काही मिळेना. हताश होऊन गेला. काहीच सुचेना. पोटात लागले कावळे कोकलायला. शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पहात असलेला दिसला. हे पाहताक्षणीच अज्जू धावत सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहचवली. एवढे करेपर्यंत घामाघुम झाला. पण त्या माणसाने अज्जूच्या हातावर टेकवले फक्त आठ आणे. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवताच त्यांनी ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने अज्जू संतापला. म्हणाला, बाबा तुम्हाला जाणीव नाही की त

हरवलेला फोन कसा शोधायचा

तुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर ?...   असा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय कराल?   त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत   करण्यासाठी ही माहिती देत आहोत.   ती नीट वाचा आणि बिनधास्त रहा.   तुम्हीच तुमचा मोबाइल शोधून काढा.   ☑१. तुमच्या मोबाइलवर डायल   करा *#06#   ☑२. तुम्हाला आएमईआयचा (IMEI) १५ अंकी नंबर मिळेल. हा नंबर महत्वाचा आहे. तो जपून ठेवा.   ☑३. तुमचा मोबाइल चोरीला गेला तर हा १५ अंकी नंबर महत्वाची भूमिका बजावणार आहे.   ☑४. मोबाइल हरवला असेल किंवा   चोरीला गेला तर cop@vsnl.net वर   मेल करा. यामध्ये आयएमईआय (IMEI) नंबर द्या.  ☑५. मोबाइल हरवला तर   तुम्हाला पोलिसात जाण्याची गरज नाही.   ☑६. cop@vsnl.net वर मेल केल्यानंतर माहिती मिळेल.   ☑७. IMEI नंबर वरून २४ तासात   आपला मोबाइल सिम चेंज केले असेल   तरी ट्रेस होईल. मोबाइलचे सध्य   ठिकाण समजेल.   ☑८. cop@vsnl.net वर तुमचे नाव, पत्ता, मोबाइल मॉडेल, मेड इन,   शेवटचा वापरलेला सिम नंबर, तुमचा मेल आयडी, आएमईआय नंबर आवश्यक आहे.  

स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात मग खालील 253 उद्योगांची यादी पहा

स्वतःचा उद्योग करण्यासाठी पुरेशे भांडवल, संयम, आत्मविश्वास असावा लागतो. कोणताही व्यवसाय सुरू केल्यास किमान 1000 दिवस तो चालवावा.काही व्यवसायाची यादी दिली आहे ती पहा  1.इंटरनेट कॅफे                  2. फळ रसवंती गृह             3. कच-यापासून बगीचा     4. आय. क्यू. एफ. प्रकल्प     SUPPLY VEGETABLES PACKETS TO FOOD MALLS  5. एम.सी.आर. टाईल्स         6. पी.व्ही.सी. केबल              7. चहा स्टॉल                       8. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा  9. वडा पाव                       10. शटल कॉक                     11. ससे पालन                      12. ईमू पालन ( शहामृग )   13. खवा तयार करणे          14. हात कागद तयार करणे   15. चार चाकी वाहनांसाठी सेवा केंद्र  16. आटा चक्की                    17. पान दुकान                     18. भात खरेदी करणे            19. ऑटो लॉक्स कास्टिंग     20. जॉब वर्क्स                     21. रीळ मेकिंग                  22. सौर उपकरणे विक्री दुकान  23. ऑटो टयूब्ज फ्लॅप्स     24. खडू उत्पादन                25. रबर गास्केट                 26. वीट उत्पादन              

जिवनात कटु सत्याचा अनुभव आल्यानंतर डोळ्यात अश्रू का येतात ?

*देवळात एक सुंदर वाक्य लिहिलं होतं...*  "उपवास करून जर  देव खूश होत असेल  तर या जगात कित्येक  दिवस उपाशी पोटी  असणारा भिखारी हा  सर्वात जास्त सुखी राहिला  असता.  ‬देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की ....  👉 आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि  👉 स्वतःला लाथही मारू शकत नाही.  म्हणूनच.. माणसाच्या जीवनात  *"हितचिंतकांची"* आणि  *"निंदकांची"* आवश्यकता आहे....  आयुष्यात असे लोक जोडा,  जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,........  कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.  🐾पूजा करायच्या आधी …….❕  👍विश्वास ठेवायला शिका.....❗  👄बोलायच्या आधी….❕  👂ऐकायला शिका............❗  🎁खर्च करायच्या आधी….❕  💰कमवायला शिका.......❗  📝लिहायच्या आधी ……❕  😇 विचार करायला शिका....❗  हार मानण्याआधी.....❕  👉 प्रयत्न करायला शिका  आणि मरायच्या आधी .....❗  👉 जगायला शिका......❕  👉 जीवनात एवढ्याही चुका करू नका,  कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल  आणि .... रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.  🌞 जीवन जगता

जीवन जगण्यासाठी ही ABCD नक्की पाठ करा...आयुष्यात दुःख येणारच नाही...

*_  जीवन जगण्यासाठी ही ABCD नक्की पाठ करा...आयुष्यात दुःख येणारच नाही... _*  😊 *  A B C... *  Avoid Boring Company   कंटाळवाण्या व्यक्ती पासुन दुर रहा.  😊 *  D E F.. *  Don'tEntertain Fools   मुर्खांवर आपला वेळ वाया घालवु नका.  😊 *  G H I... *  Go For High Ideas   उंच विचार ठेवा.  😊 *  J K L M... *  Just Keep a Friend like Me   माझ्या सारखे मित्र ठेवा.  😊 *  N O P... *  Never Overlook the Poor n Suffering   गरीब व पिडीतांना दुर्लक्षीत करु नका.  😊 *  Q R S... *  Quit Reacting to Silly tales   मुर्खांना प्रतिक्रीया देऊ नका.  😊 *  T U V... *  Tune Urself for our Victory   स्वत:चा विजय निश्चीत करा.  😊 *  WXYZ... *  We Xpect You to Zoom ahead in life   आम्ही आपणाकडुन जिवनात पुढेच रहाल अशी आपेक्षा करतो. •       लेख कसा वाटला  कमेंट मधे नक्की लिहा.. -  Nandanshivni app

'Wings Of Fire' मराठी अनुवाद

'Wings Of Fire'  मराठी अनुवाद :- 'अग्निपंख'     भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम व समूह निर्मित तत्कालीन शक्तिशाली क्षेपणास्त्र, ज्याचं नाव, 'अग्नी !'      परकीय राष्ट्रांच्या विरोधाची क्षिती न बाळगता, सलग दोन वेळा अपयश येऊनही, प्रसारमाध्यमे, राजकीय नेतेमंडळी व संपूर्ण भारतभर होणाऱ्या टीकेच्या दबावाखाली ५०० शास्त्रज्ञांच्या धैर्यशील प्रयत्नांमुळे २२ मे १९८९ रोजी 'अग्नी' अवकाशात झेपावले !      शीर्षकाची उकल करून सांगायचं झाल्यास, 'अग्निपंख' म्हणजे 'अग्नी चे उड्डाण !'      डॉ. कलाम यांचं व्यक्तिगत आयुष्य, व्यवसायिक संघर्ष, जागतिक शस्त्रस्पर्धा, तत्कालीन राजकारण व तंत्रज्ञान यांचं वर्णन केलेलं, आपल्यातील आत्मशक्तीची जाणीव करून देणारं हे स्फूर्तिदायी खंडकाव्य तथा आत्मचरित्र !      लहानपणी ज्यांना शास्त्रज्ञ व भारताचे राष्ट्रपती म्हणून मी पाहिलं ते डॉ. कलाम एक माणूस म्हणून कसे होते हे मी 'अग्निपंख' मधून पाहिलं.       स्वयंशिस्त, चिकाटी, समयनियोजन, कार्यव्यवस्थापन, निश्चयशक्ती, धार्मिक वृत्ती व अनुभवातून शहाणं होत जाण्याची क्षमता ! डॉ.

जिवन विचार - 147

🌹 *प्रबोधन पर* 🌹 मृत्यूपूर्वी वडिल आपल्या मुलाला म्हणाले, "माझ्या आजोबांनी मला दिलेले हे घड्याळ आहे. हे जवळजवळ २०० वर्षे जुने आहे. मी ते तुला देतो, तु दागिन्यांच्या दुकानात जा. त्यांना सांग की मला ते विकायचे आहे आणि ते आपल्याला किती ऑफर देतायत ते पहा. " मुलगा दागिन्याचा दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला, आणि म्हणाला, "त्यांनी १५० रू ऑफर केले कारण ते फारच जुने आहे." वडिल म्हणाले, "आता मोहरांच्या दुकानात जा." मुलगा मोहराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येवून म्हणाला, "त्यांनी २० रू अॉफर केले कारण ते खूप खराब आहे." वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन संग्रहालयात जायला सांगितलं.  तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला.  "बाबा, क्युरेटरने या दुर्मिळ तुकड्यास त्याच्या मौल्यवान वस्तूंच्या संग्रहालयात समाविष्ट करण्यासाठी ५ लाख ची ऑफर दिली." वडिल शांतपणे स्मितहास्य करत म्हणाले,  "मला तुला हेच सांगायचे होते की योग्य ठिकाणीच तुमच योग्य मूल्य आहे. स्वतःला चूकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य नसल्यास रागावू नका. ज्यांना आपले मूल्

जीव मोजतो अखेरच्या घटका - हास्य कविता

*जीव मोजतो अखेरच्या घटका* दिसताच मोठी मालदार पार्टी ताबडतोब लग्नाची लागली आस लग्नानंतर पाहून डौलदार रूप  झाला गुदमरून मरण्याचा भास बेढब अगडबंब ती शरीरयष्टी पाय टेकवताच जाणवे भूकंप गडगडाटासम आवाज ऐकता श्वासही अवचित पुकारती संप प्रभाव म्हणू की दहशत तीची शब्द चुकीचा पडो न तोंडून क्षणार्धात जायचा जीव शरीरातून घेतलं तीने जर मिठीत आवळून पाणचट तीच्या विनोदांवरही उगा खळखळून लागतं हसावं वायफळ तीच्या बडबडीला तर जबरदस्तीनं जीवनामृत समजावं किळसवाणं जरी तीचं हसणं वाटून घ्यायचं नेहमीच मोहक गुलाबी गारव्याचं करावं नाटक सहवास जरी भासला दाहक हिंडीबाच्या या मगरमिठीतून कळे न कशी करावी सुटका नको रोजचं तडफडून मरणं जीव मोजतो अखेरच्या घटका          *प्रकाश नारायण फर्डे*            *शहापूर (ठाणे)*

हुंड्याचे भोग - हास्य कविता

*हुंड्याचे* *भोग* माय म्हणे बापूचं, वय झालं लई बापाले सुटली , माह्या लगनाची घाई  । माह्या ओठावर नोयता , मिसरुडाचा पत्ता  पोरींच्या  बापाईचा , याहाले  लागला जत्था   ।  पाहाले गेलो पोरगी ,  होती  वजनानं भारी मी होतो काराचं , थे त माह्या पक्षाही कारी । तोंडाले राकडं , अन् वटाले पेटकाभर लाली  चहा पोहे पाणी , यकाच वेळी घेऊन आली  बाप म्हणे पोरगी बाकी हाय , हुड्याचं बोला  चार बकऱ्या दोन भशी द्याहाले,  सासरा तयार झाला । लगीन झालं यकदाचं , हुंडा भी आणला संग  चार दिसातच बायको , दाखवाले लागली रंग । दोही पाय  जोडून ,  बसे  पलंगावरी  अन् रोजीस उपडे  , माही नाही आलेली मिशी  । सड्या सारवणापास्नं काम , मले कराले लावे म्हणे हुंडा घेतलास बापाकडनं , भशीकड बोट दावे । म्हणून म्हणतो राजेहो ,               हुंडा नोका घेऊ  माह्यासारख्या बायकोच्या,       लाथा नोका खाऊ  ।    ✍️ सुनिल पोटे दिघोरी  ,  चंद्रपूर   हल्ली मु. राजुरा

लॉकडाऊन मुळे - हास्य कविता

*लॉकडाऊन मुळे ..* (हास्यकविता ) बाप म्हणे मले बापू  तुह्य लगन लावू थाटात...  चांगला फेटा घ्या साठी  मंग म्या गलो हाटात... महागाच्या लग्न पञिका,  वाटल्या घरोघरी जावून... चांगले वाजे वाले बी  भाऊ आलो होतो पावून...  कोट अन् शेरवानी भाऊ  घेवून होती झाली...  नवरदेवाची गाडी बी  भाऊ बूक होती केली...  अडवॉन्स देऊन भाऊ  मंगलकार्यालय बुक केलं..  मोदीजींची बातमी पाऊन  मनलं बईन हे का झालं.. ? शुंभ मुहूर्तः पाऊन भाऊ  माह्य काळलं होतं लगन...  लावाची होती हळद हाताले  लावा लागत आहे साबन.... रंगवलं होतं सपन लग्नाचं,  माह्या हनीमुन गेला राऊन...  जागो जागी या कोरोनापाई  बईन झाला 'लॉकडाऊन'..... ... ✍ *अरूण घोरपडे, चंद्रपूर*            ह. मु. गोडपिपरी            भ्र 9657041041

लाॅकडाऊन - हास्य कविता

कवि परिचय -  रमेश कृष्णराव भोयर  गोकुलधाम  सोसायटी भद्रावती , चंद्रपूर  दि. १५/५/२०२० मो. न. ७०५८०७७७४६ कवितेचे शिर्षक. / लाॅकडाऊन / --------- ++++++++ बायको माही गुणाची मोठ्या मनाची लगन झाल्यापासून झोप नाही सुखाची वर्ष दोन झाली तरी पटून नाही रायल जीवन सारं मी तिलेच वायल धड काही वागत नाही भाव मले देत नाही सांगितलेल आयकत नाही मले काही देत नाही घरी आली तवा शेंग होती शेवग्याची आता झाली जशी भेली कोहळाची बोललो काही वसकुन ती धावते पिरमाचे दोन शब्द कधी नाही बोलत ते देवासारखा मले कोरोना पावला सरकारन म्हणे लाॅकडाऊन केला दिवसभर आता घरीच रायतो मी कामाला तिचेहातभार लावतो मी एक दिवस माह्या जवळ आली ती गुलुगुलु गोष्टी सांगत होती मले ती छत्तिसचा आकडा त्रेसष्ठ  झाला संधिचा फायदा मी घेऊन घेतला लाॅकडाऊनचा फायदा घरी माह्या झाला घरात माह्या पाळणा हलू लागला नेहमीचा खोकला सुंठीवाचून गेला कोरोनाले मी धन्यवाद दिला          रमेश कृष्णराव भोयर गोकुलधाम सोसायटी भद्रावती, चंद्रपूर     मो.न. ७०५८०७७७४६

टक्कल - हास्य कविता

कविता - टक्कल माझ्या छोट्या भावाचं बघून मी टक्कल  मी त्याच्या डोक्यावर केस  येन्यासाठी शोधली एक शक्कल डोक्यावर केस येण्यासाठी नेटवर ओपन केले गुगल  वेगवेगळे नुसके शोधले लावले त्याच्या डोक्यावर वडाच्या पारंब्या ठेचुन तेलामध्ये ठेवून  तेलही लावले बाळाच्या डोक्यावर  हळदी मध्ये गोमूत्र मिसळून  तेही झाले लावून डोक्यावर तरीही बाळाच्या डोक्यावर  आले नव्हते केस  मात्र तेवढा आली मम्मी आणि  ओरडली मला धरले माझे केस असं काय लावतेस तू बाळाला  म्हणल्यावर मी म्हणले बाळाला पडले टक्कल  त्याच्यावर केस उगवण्यासाठी लावले मम्मी म्हणाली आहे का तुला जरा अक्कल काल काय करुन डोक्याला लावले त्याच्या डोक्याला पडले नाही टकल  त्याला दाट केस येण्यासाठी वारकाकडून त्याचे करून आणले टक्कल. अनोमा दिलीप मालसमींदर. परभणी.

लग्नासाठी बायको - हास्य कविता

शीर्षक :-  लग्नासाठी बायको  बघायला गेलो लग्नासाठी बायको  दिसली ती मला जाडी  मडक्यासारखं पोट दिसे कारण, नेसता येईना साडी...  लाल भडक लिपस्टिक  तिच्या सुंदर मऊ ओठावर  सावरता येईना पदर तिला  म्हणून,नजर सारखी पोटावर... पाहून हसली जेव्हा माझ्याकडे   दात दिसले लाल-लाल  चहा घेताना वास आली  वाटलं  हा तर विमल चा कमाल...  जाडजुड ती म्हशीसारखी  मी तर शेंगे सारखा बारीक  तिच्यासमोर मी म्हणजे  वाळलेला खारीक...  झाले आता चहा - पोहे  निघायची घाई  लागली  घरात बसून वाटत होतं आता माझी वाट लागली...  हात जोडून निघालो बाहेर  आता सुटकेचा श्वास घेतला  वाचलो रे बाबा त्या जाडीपासून  नाहीतर वासेनेच ने असता जीव घेतला...    *अश्लेष माडे* *प्रीत*   मु. कोहमारा जिल्हा. गोंदिया

लगनघाई - हास्य कविता

*।।लगनघाई।।* काय सांगू भाऊ तुले हाये वय माझं भरलं अमदाच्या साली माझं लगीन हाय ठरलं  गोरी गोरी सुंदर मीनं बायको हाय पायलं किती शिकली आहेस तू इचाराचं रायलं   बाप म्हणे तिचा कायी कमी नाय खाप्याले  तळ्यामागचं दंड हाये ते होईन नं तुमाले सोनं घालीन लेकिले ढबू पायजं तेवढं देईन सुखात ठेव जा लेकिले याची हमी मात्र घेईन  झालो मीबी लई खुश झालं महा मनावानी कायलं नायी मनीन बापा एवढं सारं भेटतानी  घाई घाईत कसं बसं गेलं लगीनबी उरकून बिनकामाची बायको मात्र घरात आणली चुकून काम तिले सांगितलं तं माह्यावरच धावते  हुंड्यासाठी छळते म्हणून ठाण्याचा भेव दावते  मी सांगतो पोरहो लगण पैस्यासाठी नको कराल नाय तं महावानी तुमीबी गडदात जाऊन पडाल  कवी :  *मारोती आरेवार* *कनेरी(गडचिरोली)*

कोरोना - हास्य कविता

😃🌹🌹 *कोरोना* 🌹🌹😃 असा कसा चीनने राजा भरदिवसा गजब केला, कोणता गर्भ ईच्याभिन कोरोना पैदा झाला. किड्याकिटकुराचे लागले होते म्हणे डोहाळे , मास खाणे सोडले ,निघाले कोंबडीवाल्यांचे दिवाळे. याचे गुणसूत्र सापडत नाही ,डॉक्टरांले परेशान केला, कोणता गर्भ ईच्याभिन कोरोना पैदा झाला. कोणता दूध पाजला ,कोणाला काही माहीत नाही, वाढ लई जोरात, रांगाचा सोडून धावतच जाई . सैतान भारी गावहिंड्या, राखून पोलीस वैतागून गेला, कोणता गर्भ ईच्याभिन कोरोना पैदा झाला. ठुसक्या लेकाचा चपटनाक्या ,टांगा याच्या लांब, हात पसरून जिरवतो जगाची, कोणता हो बॉम्ब. समुद्रमंथन झाले कोठे ,कोणता हलाहल पेला , कोणता गर्भ ईच्याभिन कोरोना पैदा झाला. जलमला कोणत्या नक्षत्री ,कोणते फिरले वारे, हिंडणे झाले बंद ,घरात लपाले नाही सुधरे . बाहेर पोलीस सुजवे ,बसुबसू एका जागी मूळव्याध फुटला, कोणता गर्भ ईच्याभिन कोरोना पैदा झाला. थाळ्या वाजवलो जोरात ,वाटलं झाला असन बहिरा , भोकना कर म्हणे दिवा लावून ,सांगत होता सोयरा . टीव्हीवर याचा हैदोस पाहू पाहू ,अंग घामाने भिजला , कोणता गर्भ ईच्याभिन कोरोना पैदा झाला. 🙏लक्ष्मण खोब्रागडे 🙏 जुनासुर्ला ,ता. मूल

घोटाळा - हास्य कविता

😃😃😃😃😃😃😃 विषय-हास्य (विनोदी) काव्य स्पर्धा. 😅😅😅😅😅😅😅 शीर्षक-घोटाळा. 😁😃😃😊😃😃😃😅 स्वप्नात मज प्रश्न उमगला मी व्यास मोजू कशाचा, मज उत्तर दिले पुष्पकळीने परश्याच्या दाडीच्या केसाच.....| पुष्पकळीवर तितक्यात कावळ्याने केली विष्टा, ती मजला सांगू लागली परंतु मजला वाटली ती चेष्टा....| चाललं होतं अत्यंत सुरळीत परंतु मधुने खालला ठेचा,  शौचास पळुन पळुन झाला फार मोठा लोचा....| त्या सायंकाळी मजला चावली इंगळी, कळ सोसु कुठवर मग मुळी घेऊन आली बकुळी...| मधु हट्टवेडी कन्या तिने पाहिला शॉपिंग मॉल जाऊया म्हणता म्हणता  लावला खुर्चीला  फेविकॉल....| ऋतुजा शांतीलाल पाटील मा तालुका.

माहया लगनाची गोष्ट - हास्य कविता

स्पर्धेसाठी-हास्य कविता विषय-माहया लगनाची गोष्ट काय सांगू लेका तुले माहया लगनाची गोष्ट तुमावानी पोरी पावाले मले पडले नाही कष्ट... एक दिवस असाच बसून होतो घरामंदी पाटलाची पोरगी उभी रायली दारामंदी... तिनं पाहयल माहयाकडं लाज,लाज लाजली लाजतांना भाऊ लईच झ्याक दिसली... नजरानजर झाली अन माहं काळीज गेलं चोरीले हिंमत करून लगनाच इचारून टाकलं पोरीले..। ते बी झाली तयार मी बी होतो तयार पळून जाऊन उडवून टाकला बार... तवापासून लोक मने मले हाय रे संधीसाधू मी मनल ,काय बी मनू दे राजा राणी आपण सुखानं नांदू...। सौ.कविता संगोजवार मूल

तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं😊 - हास्य कविता

स्पर्धेसाठी कवितेच शीर्षक: तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं😊 एक दिवस कॉलेज मध्ये एका मुलीचे  नुकतेच ऍडमिशन व्हायचं ,तिला बघताच माझे मन आनंदून जायचं ,तिने हळूच माझ्याकडे बघायचं ,बघून अलगद हसायचं, मला देखील ते आवडायचं ,तीच माझ्यावर कधीच नसायचं ,पण तरीही माझ तिच्यावर  प्रेम असायचं!😊 तिने तिथुन निघुन जायचे ,मि देखील माझ्या वर्गात जाऊन बसायचं ,इतक्यात तिने माझ्या वर्गात शिरायचं ,पाहून तिला मी तिच्या शेजारी येऊन  बसायचं ,तेव्हा तिने माझ्याकडे रागाने पाहायचं ,तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं!😊 संपता लेक्चर मी तिच्याकडे हळूच जायचं, आणि तिला नोट्स मागायचं ,पण तिने मात्र चारचौघात नाही म्हणायचं, आणि त्या नाकारामुळे सगळ्यांच माझ्यावर  हसायचं, मी विचारलेल्या प्रश्नांचे वाटूळ व्हायचं, तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं !☺️ कॉलेज सुटल्यावर मी तिच्या मागे मागे तिच्या घरापर्यंत जायचं, ती सायकलीवर मि गाडीवर असायचं, सायकल चालवताना तीनं मागे मागे वळून माझ्याकडे पाहायचं, पाहून न पहिल्यासारखं कारायचं ,तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं !😊 थोड्यावेळात तीच घर यायचं, ती ने सायकलीवरून खाली उतरायचं, पुन्हा मागे

बायको माझी... - हास्य कविता

स्पर्धेसाठी:- हास्य कविता  शीर्षक:- बायको माझी... आधीचं तिचं सोज्वळ रूप   बघून वाटे जणू ती गुलाब,  पण नंतरचा भांडखोरपणा   पाहताच मला लागे जुलाब!  सुडौल जणू चवळीची शेंग  आधी जशी लागली  रवीना, आता वाढला कमरेचा घेर   आडवं वाढणं काही संपेना!  आधी वाटायचा मला तिचा  स्वभाव शांत आणि भोळा,  पण आता का सांगु दादा  दातओठ खात वटारते डोळा! आधी मारायची नजरेने  आपल्या प्रेमाचा तीर,  पण आता भाऊ सतत तिची चालू असते किरकिर! आधी असायची फक्त संसार आणि मुलांत व्यस्त, पण आता सोशलमिडियावर  घालते मिनटामिनटाला गस्त! आधी फोटो काढायचं म्हटलं   कि, हासून पदर घेई लाजत,  नि आता बाई काढते मटकत वाकड्या तोंडाची सेल्फि नाचत! कु. प्रतिक्षा (रूही)सदानंद कापगते. साकोली, जिल्हा:- भंडारा

लॉकडाऊन मधील गंमती जंमती - हास्य कविता

😜स्पर्धेसाठी विनोदी कविता😜 _________________________ शीर्षक- लॉकडाऊन मधील गंमती  जंमती                             _________________________ हल्ली घरी बसल्यापासून, बायकोची सुरू झाली हुकुमशाही. ती कोचवर बसून खा खा खाई, मी मात्र बैलासारखा राबत राही. चीनची बारीक डोळ्यांची कोरोना बाई, बघा घेऊन आली मोठं विघ्न. हातांना मेंदी ऐवजी हॅन्डवॉश लागे, आता आमच्या नशिबी कुठे लग्न?  २४ तास गादीवर उभा आडवा लोळून, आता नवीन गादी पार झिजली. रात्रभर घुबडासम राहतो जागा, आजूबाजूची सगळी मंडळी बोक्यासम निजली. संचारबंदी कायदा मोडण्याचा, ज्या महारथींना  आला माज. पोलिसदादांनी वेताच्या लाठीने, त्यांची केली खूप चांगली मसाज. पशुपक्ष्यांना बंदिस्त करणारा, स्वतः घररुपी पिंजऱ्यात उंदारासम राहतो. पशुपक्ष्यांना स्वतंत्रपणे बाहेर फिरतांना , खिडकीत बसून माकडापरी  पाहतो. तुम्ही हसण्यावारी घेऊ नका, हा लॉकडाऊनचा काळ. बांड्या नाकात कापूस येईल अन् काळया गळ्यात फुलांची माळ. ✒️ श्री. संदीप विठ्ठल जगताप, ता. शहापूर, जि. ठाणे. मो. नं. 9271684366

मी बायकोचा गडी - हास्य कविता

मी बायकोचा गडी काय सांगू भाऊ तुम्हाले मी बायकोचा गडी कंबर लागली माझी हिची धुता-धुता साडी हिची सकाळची न्याहारी आम्लेट नी अंडी मी घासतो बघा कसा खरखटी भांडी जेवनात पाहीजे तीले दहीभाताच बोनं माया मांग लागल रोजच शीळ खाऊन जीनं ईलायती कुत्र्याले काखेत प्रेमानं गौंजारते मले गावटी कुत्र्यावानीं पांदोपांदी हिंडवते एक दिस मया हातान दुधच सांडल त्या दिसी बायकोनं मले लई लई खुंदल एवढ्या सार्या झाल्या मया हुंड्यापाई दशा म्हणून धुतो भाऊ मी घरच्या कपबश्या बायको म्हणते कशी माया बापानं दिला हुंडा म्हणून करनार नाय मी घरचा काम धंदा साषंगतो तुम्हाले भाऊ तुम्ही घेऊ नका हुंडा नाहीतर मायावानी बायकोकडून घरी खुंदा हुंडा घेणार्याच्या जगात वरती नसे माना म्हणे भाऊ हुंडा देनं घेनं कायद्यान गुन्हा                 रविद्रं आत्राम           रा. नांदगाव (पोडे  ) चंद्रपूर

आयुष्य म्हणजे काय ?

🧐रोज सकाळी जीवावर उदार होऊन, अत्यंत कष्टाने अंथरुणातून शरीर उचलून दिवसाची सुरुवात करणं म्हणजे आयुष्य नव्हेतर उत्साहाने ‘आजचा दिवस माझाच आहे’ म्हणत, स्मित हास्याने जागं होणं म्हणजे आयुष्य…जुन्या कष्टदायक आठवणींना चिटकून राहून आताचा प्रत्येक क्षण वाया घालवणं म्हणजे आयुष्य नव्हेतर आलेल्या प्रत्येक क्षण त्या क्षणात राहून जगणं, त्याचा आनंद लुटणं म्हणजे आयुष्यआपल्या जीवनात घडलेल्या वाईटासाठी, परिस्थिती आणि लोकांना दोष देत राहणं म्हणजे आयुष्य नव्हेतर जे काही घडलं त्याची जबाबदारी स्वतःघेणं, त्यातून चांगलं काय ते शिकून, चांगलं घडवणं म्हणजे आयुष्यजे न मिळालं त्यासाठी सततची तक्रार करणं म्हणजे आयुष्य नव्हेतर जे काही मिळालंय त्यासाठी सातत्याने कृतज्ञ राहणं म्हणजे आयुष्यवादळ संपण्याची, पाऊस थांबण्याची वाट बघत आडोश्याला लपणं म्हणजे आयुष्य नव्हेतर बाहेर पडून, बेधुंद होऊन, पावसात मनसोक्त भिजणं म्हणजे आयुष्यWhats App, Facebook वर न पाहिलेल्या १०० मित्रांशी तासंतास गप्पा मारणं, मेसेज फॉरवर्ड करणं म्हणजे आयुष्य नव्हेतर जुन्या एखाद्या मित्राला कॉल करून, भेटून कॉलेजबाहेरच्या चहाच्या टपरीवरकटिंग पीत मनसोक्त

स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे हमखास पुस्तक व त्यांचे लेखक

नंदनशिवणी अॅप वर आपले स्वागत आहे...           पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव   प्लेईंग टू विन - सायना नेहवाल    हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे    टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख    हाफ गर्लफे्ड - चेतन भगत    प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर    आय डेअर - किरण बेदी    ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा    इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद    सनी डेज - सुनिल गावस्कर    द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग    झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील    छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत    श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई    वाट तुडविताना - उत्तम कांबळे    अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे    एकच प्याला - राम गणेश गडकरी    कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे    यमुना पर्यटन - बाबा पद्मजी    पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे    सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर    गिताई - विनोबा भावे    उचल्या - लक्ष्मण गायकवाड    उपरा - लक्ष्मण माने    एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर    भिजली वही - अरूण कोल्हटकर