Posts

चांगले चे वागा, चांगलाच विचार करा

Image
  चांगले चे वागा, चांगलाच विचार करा *कर्ण कृष्णाला विचारतो - "माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती?* *मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नव्हतो.* *परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल. कारण मी क्षत्रिय नव्हतो!* *एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.* *द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.* *कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.* *मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.* *तर मगं मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?"* *🌷कृष्णाने उत्तर दिले🌷:* *"कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.* *जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होता.* *रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.* *तुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.* *मला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्

व्यक्त व्हा...नाहीतर...

Image
व्यक्त व्हा...नाहीतर...     काल वृद्धाश्रमात गेले असताना एक लेडी आतुन बाहेर आली .. तिचं चालणं , बोलणं ७० च्या पुढचं पण वय वर्षे फक्त आणि फक्त ४६.. खुप वाईट वाटलं त्यांना पाहुन.. अप्रतिम सौंदर्य, नवरा भारताबाहेर म्हणजेच आर्थिक परिस्थिती उत्तम, सडपातळ बांधा पण त्यात बिलकुल जान नाही.. दोन मुलं या सुंदरीकडे सगळं काही आहे पण दोन मुलं आणि नवरा यापलीकडे तिला एकही मित्र किवा मैत्रीण नाही.. मुलं मोठी असल्याने ती त्यांच्या व्यापात त्यामुळे तिच्याशी बोलायला कोणी नाही Now she is underdepression.. व्यक्त व्हायला कोणी नाही .. हे सांगण्यामागे एकच कारण आहे.. कितीही उत्तम कुटुंब असलं आणि पैसा असला तरीही आपल्याला माणसं हवीतच .. आज अनेक लोक अनाथ आहेत, वृध्द मंडळी आहेत त्यांना आपल्या प्रेमाची आपल्या वेळेची गरज आहे.. प्रत्येकवेळी खुप पैसा असलाच पाहिजे असं नाही.. ज्यांना कोणाला हा प्रश्न पडत असेल त्यांनी अशा लोकांना वेळ द्या.. प्राणी आणि वयस्कर मंडळी यांच्या डोळ्यात पहा त्यांना फक्त हवय प्रेम..    मित्रांनो एकटे राहु नका.. फेसबुक वर असंखय चांगली मंडळी एकत्र येतात.. अनेक गेटटुगेदर होतात .. पार्टीज होतात.. वि

#कुत्र्याची_माणुसकी

Image
#कुत्र्याची_माणुसकी.. गेल्या दोन दिवसांपासून एक गावठी कुत्रा आमच्या दवाखान्याच्या व्हरांड्यात वारंवार येत आहे व त्याला आमचे कर्मचारी सारखे हुसकावून लावताना मी पहात आहे.दवाखान्यात ऍडमिट पेशंट ची संख्या जास्त असल्याने,हा कुत्रा कोणाबरोबर येतोय की भटका आहे, हे कळायला मार्ग नव्हता. आज सकाळी मी दवाखान्यात लवकर म्हणजे सात वाजताच आलो.बघतोय तर काय गेल्या दोन दिवसांपासून घिरट्या घालणारा हा कुत्रा, आमच्या दवाखान्याच्या चौकटीतून आत डोकावून पहात आहे.मी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला,पण तो जायला तयार नाही..शेवटी मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि कन्सलटिंग रूम मध्ये येऊन बसलो.थोड्या वेळाने मी बाहेर येऊन बघितले तर हा कुत्रा व्हरांड्यात नजर पाडून बसला आहे.माझी चाहूल लागताच तो उठून उभा राहिला आणि पुन्हा दारातून आत डोकावून पाहू लागला.मी त्याला पुन्हा हाकलणार होतो,इतक्यात मला काय वाटले कुणास ठाऊक,त्याच्या नजरेतील व्याकुळतेच्या भावनेने मीही थोडासा विचलित झालो आणि त्याच्या डोक्यावर थोपटल्यासारखे केले.शरीर यष्टीने धिप्पाड असलेल्या त्या कुत्र्याला हात लावायचे कोणाचे धाडस झाले नसते,पण मी त्याच्या डोक्यावर हात

कविता :- दिवाळी

Image
  "दिवाळी"" लखलखत्या आकाशी शोभे दिव्यांचा हार, जैसी चांदण्यात नटली नटरंगी नार, आतषबाजीने फटाक्यांच्या धरणीने केला शुंगार, पाहुन तिचा थाट, अंधारानंही फिरवली पाठ, दिवाळीत ह्या, तेवुन मना-मनात भावनांचे दिवे, प्रकाशात त्या, पाहू एक स्वप्न नवे, सोडून देवु , ऋणानुबंधाचे ते जुनेच हेवे-दावे, दिपावलीत दिव्यातलं तेल, फुलविती आयुष्याची वेल, आरोगयाचा मंत्र, धन्यांचा हार, खोलते धनोत्रयीच्या दिवशी लक्षमीचे दार, सजली सुरांची पहाट, सुवासिनींच्या मांगल्याचे घाट, शिंपडून अंगणी सडा, रांगोळी, पतिराजावर प्रीत आपली ओवाळी,                मंगेश शिवलाल बरई.

नजर

Image
 *नजर*        नजर, दिठी, दृष्टी ! मानवास परमेश्वराने दिलेली बहुमोल बाब! साऱ्या चराचर सृष्टीचं ज्ञान मानवास ज्ञानेंद्रियांद्वारे होत असतं. त्यात सर्वाधिक वाटा डोळे या ज्ञानेद्रियांचा आहे.      डोळयांना दिसणं म्हणजे दृष्टीस पडणं. त्याच अर्थानं नजरेस पडणं असं ही म्हटलं जातं. पण तरी बहुतेक नजर ही थोडी व्यापक संज्ञा असावी.    नजरेत दिसण्यासोबत भाव भावनाचं लेपणही जोडलं जातं. माणसाच्या नजरेत किती भाव- भावना दडलेल्या असतात. मानवी मेंदूत उठणारे तरंग, उमलणारे सारे भाव, मानव प्राणी नजरेनंच अधिक व्यक्त करतो. कदाचित मेंदूपासून डोळे जवळ असल्यानं ही असावं?  मेंदूतील ,काळजातील भाव चेहऱ्यावरील इतर अवयवाच्या हालचालीनं व वाचीकतेनं व्यक्त होतात! पण आतल्या मनोव्यापाराचा पसारा, आवाका मांडला जातो तो खरा नजरेनंच! तोंडाद्वारे, बोलत असुनही आपण बोलकी नजर, बोलके डोळे असंच म्हणतो!    नजरेनंच आनंद, दु:खं, श्रृंगार, वेदना, कारुण्य, सल, ममत्व, लडिवाळपणा व्यक्त होतो. मनातले, काळजातले भाव आधी डोळ्यातच झरतात मग इतर अवयवातून! दु:ख, वेदना, यातना यात आधी डोळेच झरतात, आसवांनी डबडबतात! आईचं ममत्व लहान लेकरास आईच्या डोळ्यात व

कविता : अहो गणराया...

Image
  अहो गणराया... आगमना तुमच्या गणराया केली बघा आम्ही आरास, पाहुणचारा तुमच्या मोदकांचा नैवेद्य खास, येणार तुम्ही म्हणून पसरले सगळीकडे  कसे मांगल्याचे वातावरण, अहो गणराया तुम्हीही व्हाल खुश पाहून भक्तांचे आचरण, लाभेल भक्तांना आता तुमचा सहवास, आगमना तुमच्या गणराया केली बघा आम्ही आरास, कटी झळके पितांबर, रूप तुमचे दिसे सुंदर, दिसे नजरेत तुमच्या भक्तांचा भक्तीचा हर्ष-उल्हास, आगमना तुमच्या गणराया केली बघा आम्ही आरास, अहो रिध्दी-सिध्दी नायका, विघ्नहर्ता, विनायका, राहिली संसारी आता तुमच्याच भेटीची आस, आगमना तुमच्या गणराया केली बघा आम्ही आरास.                           मंगेश शिवलाल बरई.                        हिरावाडी, पंचवटी, नाशिक ४२२००३. गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.👏👏👏

◾तिसरी - एका मुलीची गोष्ट | संजय धनगव्हाळ

Image
 तिसरी (एका मुलीची गोष्ट) *संजय धनगव्हाळ* **************** सुहास आणि माधवी यांना तब्बल बारा वर्षानंतर जाई जुई या जुळ्या मुली झाल्यात, दोघही दिसायला खुपचं सुंदर होत्या म्हणून लाडही त्यांचे तेव्हढेच कौतुकाने व्हायचे आणि काळजीही तितकीचं घेतली जायची.नवसाच्या मुली म्हटल्यावर तर अगदी राजेशाही थटाच ना! दोघांनाही लाडाकोडात वाढवले मोठ केले.सारकाही त्याच्या मना सारखचं व्हायचं.आता पाच वर्ष झाले म्हट्यावर जाई जुईला एक भाऊ असावा या अपेक्षेत असताना सुहास माधवीच्या आयुष्यात पुंन्हा तिसरी मुलगीचं आली आणि सर्वांच मनं नाराज झाले. विचार केला काय आणि झाले काय,पण हि तिसरी कन्या दिसायला छान जरी असली तरी मात्र जाईजुई ईतकी सुंदर नव्हती.सावळा,रंग सडपातळ.खरतर सुहास माधवी दोघही रंगाने गोरे असताना या तिसरीचा रंग सावळा कसा हा सर्वांना न उमजणारा प्रश्न होता.न उमजणारा काय कोड्यात टाकणाराच प्रश्न होता ना,वकिंवा काहीतरी वैद्यकिय किरण असावं असो.पण काय आलेया भोगाशी असावे साधन,या उक्तीप्रमाणे नकारार्थीपणे तिसरीला लहानाच मोठ केले.रंग सावळा झाला म्हणून काय पोटच्या पोराला एव्हढ हिणवावं ते ही आई वडिलांनी? ए काय गं,ऐ हे कर

◾कविता :- जीभेची चोचले

Image
  ' जीभेची चोचले' **************** कुठे काही चमचमीत दिसले की तोंडाला पाणी सुटतं किती खावे किती नाही  असं जीभेला खुप वाटतं जीभेवर लाळ घेळताना चोचले तिचे पुरवावेच लागतात गरमागरम खाताना  तोंड फुगवते   जीभ जळली की मग  घटाघटा पाणी प्यायचं हाश हूश करताना डोळ्यातलं पाणी पुसायचं मस्त मस्त खाण्यासाठी जीभ लई चभरं चभरं चालते चटपटीत पाहून कशी ती गोडं गोडं बोलते मनासारखं झाल की  जीभेची मजाच असते नविन नविन चव चाखून लालबुंद दिसते खाऊन झाल्यावर थंडगार पेय पिऊन  जीभ तिचा जळकेपणा   शांत करते मोठ्या फुशारकीने  मगं ती होठावरून फिरते तिला जर नाही दिले  तर मग ति घसरल्यावर कोणाच ऐकत नाही तिचे लाड पुरवल्याशिवाय ती स्वस्थ बसतं नाही *संजय धनगव्हाळ* धुळे ९४२२८९२६१८

काही कटू सुविचार

Image
  💐💐 *अशा माणसांबरोबर राहा,जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात. अशा बरोबर नको की, जे इतर माणसांबद्दल बोलतात. एकमेकांना आधार देणे हे सुद्धा एखाद्या औषधापेक्षा जास्त गुणकारी असते..कदाचित आपण दिलेला आधार कोणालातरी आशेची नवीन उमेद देईल... काही माणसं मैत्रीने खांद्यावर हात टाकतात दु:खातही कायम साथ देतात.*                         🎯 *काही माणसं गजबजलेल्या शहरासारखी असतात, गरज पडली तरच आपला विचार करतात. बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात.*  💐 *मात्र काही माणसं, पिंपळाच्या पानांसारखी असतात. जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवतात...*                                                                                  *नात्यांना अर्थ येतो तो एकमेकाला समजून घेतल्यामुळे. समजून घेतल्यामुळे मैत्री जडते. एक माणूस उलगडत जातो. मोकळा होतो.  एक मुखवटा गळून पडतो तो कदाचित आपलाही असतो.* *काही कामं खिशात हजार रुपयाची नोट असतानाही केवळ दोन रुपयांच्या चिल्लर मुळे अडून राहतात* *म्हणुन जिवनात कधीही कुणाला चिल्लर समजु नका कारण वेळ आली की प्रत्येक जण आपली किंमत दाखवुन देतो.*            *कारणं सां

दार

Image
 _*“दार-“*_ _लेखक- क्षितिज दाते, ठाणे._        एक होती “ही” आणि एक होती “ती”. दोघी समवयस्क आणि अनेक वर्ष शेजारी-शेजारी.         म्हणजे तशी “ही” राहायची पहिल्या मजल्यावर आणि “ती” दुसऱ्या. पण शेजारधर्म मात्र कायमच होता. कधी काही लागलं की हक्कानी सांगायच्या एकमेकांना. दोन्ही घरचा एक तरी डबा किंवा वाटी कायम दुसऱ्या घरी असायचीच.           एके दिवशी “ही” च्या ह्यांना पावसामुळे किराणा आणायला जमलं नव्हतं. मग काय ?? “ही” गेली वाटी घेऊन साखर आणायला “ती” च्या कडे.          “ती”नी सुद्धा “ही” चं हसत स्वागत केलं आणि दिली लगेच साखर.          “ही” चपला घालत थोडी आडोशाला काय गेली तशी “ती” जोरात पुटपुटली. “रोजचाच ताप झालाय हा.. कटकट नुसती !!”. असं म्हणत वैतागून “धाडकन” दार लावलं जोरात.           “ही” ला ऐकू गेलंच .. बहुतेक ऐकू जाण्यासाठीच जोरात बोलली होती “ती”.        मग “ही” ची पण जरा सटकलीच. तणतणत वरती आपल्या घरी आली. “एक वाटी साखर काय मागितली तर इतकं ?? “जसं काही इस्टेट मागितली “ती” ची !!”. असे ताशेरे झोडत “ही” नी दुप्पट जोरात आपलं दार लावलं. इतकंss  की खाली “ती” ला मुद्दाम ऐकू जावं. तेव्हापासून कान

अश्रुंचं मोल ...

Image
अश्रुंचं मोल ... !         जीवनाच्या पुस्तकात नानाविध प्रकरणाचा समावेश आहे.त्यातलंच एक प्रकरण म्हणजे रडणं आहे.जे जन्मताच सुरू होतं.मूल जन्माला येताच ते रडलं नाही किंवा काही सेकंद उशीरा रडलं तरी अनेक समस्या पुढं येतात.इतकं महत्त्वाचं ते प्रकरण आहे.अबोल बाळाला काही हवं नको आईला कळतं तेही रडण्यामुळेच ना  ?          जीवन हे हास्य व अश्रूचं सुंदर मिश्रण आहे.अश्रू हे केवळ हतबलता हताशपणा किंवा दुर्बलतेची निशाणी नाही तर ती ह्रदयाची निर्मळताच असते, त्यामुळेच इतरांच्याही दुःखाचे पडसाद त्यावर पडून डोळ्यात ते तरळतात. आपली काहीही चूक नसताना लोक जेव्हा विनाकारण आरोप ठेवतात, दोष देतात तेंव्हाही डोळ्यात अश्रू येतात तेही या निर्मळतेमुळेच.        लोकांवर हसायला अंगी फार मोठं शौर्य लागतं असं काही नाही पण लोकांसाठी डोळ्यात अश्रू उभे राहायला मन, मेंदू व हृदयावर उत्तम सुसंस्कारच असावे लागतात हे नाकारता येणार नाही.म्हणून ऊठसूठ रडणं योग्य नव्हे याचाही विचार करावा लागेल.हे जीवन खुप सुंदर आहे आम्ही चुकीच्या आशा अपेक्षा गरजा अवास्तव स्वप्नांच्या शरपंजरी पडलो आहोत म्हणून तर जीवनाचं रडगाणे बनून जातं .आज आमच्याकडं

◾कविता :- हिम

 हिम शुभ्र नाजुक हिम पांढरा  वाटे ओंजळीत घ्यावे जरा  स्पर्श हा गुळगुळीत  बर्फ हा घेता मुठीत  लगेच वितळे सारा  क्षणात पाणी बर्फाचे  रुपांतर अवस्थेचे  न थांबे हे कधी जरा  होईल काय क्षणांत  रुपांतर पाण्याचे बर्फात  मनी येई जरा जरा बर्फ हे जीवन जणू  कधी संपे काय म्हणू  या हव्याशा क्षणभंगुरा रमा शिरसे

◾कविता :- शेकारणी

 12) कविता -शेकारणी         शेकारणी  नेमीच येतो मग पावसाळा,घेऊन नवा सोहळा . पावसाळ्यात लागतील ,गळती घरे सांभाळा . चिखल मातीच घर ,त्याला साध्या कौलाचा छत. फक्त निवारा निवसी ,उभा संसाराचा रथ . करून घराची शेकरणी गळती काढु नकळत.... गळती लागलेत घराला ,पीचल्या पावळणीला . कोड पडलय मला, नी माझ्या परिवाराला . गळतं लागलय मनाला ,गांजलेल्या परिस्थितीला. ठिगळं लावावं जसं, फाटलेल्या सदर्याला . फाटल्या संसाराची, गळती काढु नकळत..... पडल्या पावसाचं पाणी ,मनाहुन निर्मळ . पडलं जरी आढ्यावर, वळचणीला खळखळ . गढूळ जरी वाटलं तरी, काही वेळात निवळे . हे काही कसं ,आमच्या मनाला न कळे . गढूळ झाल्या मनाची, गळती काढु नकळत.... पहील्या पावसात, काढुया चला गळती . परिस्थितीची ,संसाराची ,चंचल मनाची . संस्कृतीची, संस्कारांची ,गंजल्या बुद्धीची . माणसातील रूजलेल्या, अदृश्य सैतानाची . अमानुष वृतीची ,विकृतीची ,गळती काढु नकळत.....करून शेकारणी ,वास्तव स्वरूपाची... रचना  संतराम पाटील  केनवडे,कागल मो नं 9096769554

◾कविता :- रोज सकाळी लवकर उठायचं

 ***** रोज सकाळी लवकर उठायचं छानपैकी आरशात बघून हसायचं आरसाही आपल्याला बघेलं तोही मस्तपैकी हसेलं त्याचं हसण पाहून आपला आळस निघुन जाईल दिवसाची सुरवात एखदम झक्कास होईलं पण हो....  आपण हसलो हे मात्र  आरशाला सांगून द्यायचं कारण तो विसराळू असतो अनेकांच्या चेहऱ्यावरची मरगळ दिवसभर पुसत असतो   आहो....  या माणसांच्या गर्दीत आपण रोज किती दुःखी चेहरे बघतो नैराश्याने जडं झालेल्या चेहऱ्यासाठी कुठेतरी हासु शोधत असतो खर सांगुका.... आपला चेहरा प्रसन्न असला की दुसऱ्याला त्याच्या हेवा वाटतो हसऱ्या चेहऱ्यावरच हसणं पाहून तो नव्याने जगायला सुरवात करतो खरतर....  या जगात सुख समृद्धीचा धनी कोणीच नाही तरीही एकमेकांच हसु घेवून माणूस आनंदात दिसतो चेहऱ्यावरचे भाव आरशात बऱ्याचदा बघतो चारहीबाजूने माणसाच्या वाटेला नैराश्यच असते ठरवले तरिही चिंता विवंचना पिच्छा सोडत नसते अशावेळी सारकाही विसरून एकांतात स्वतःच हाश्यानंद करायचा आणि आपल्या जगण्याला नवा अर्थ द्यायचा कारण....  एक छोट्याशा हसण्यातून चेहऱ्यावरचे किती संदर्भ बदलतात तेव्हाकुठे मुखवट्याच्या हाश्यलकीरा सुंदर दिसतातं म्हणून हे जीवन क्षणभंगुर आहे बिनधास्त हसा

◾कविता :- लेक सासरी जाते तेव्हा

 लेक सासरी जाते तेव्हा बापाला वाटतं  माझे काळीज  माझ्यापासून दुर गेले माझ्या देहातले  एक घर रिकामे झाले लेक सासरी गेल्यावर  आईचे मनही हळवे होत असते शोकेसमधली खेळणी पाहून   लेकीच्या आठवणीत दिसते लेक सासरी जाताना  हसरा चेहरा आईचा  कधी रडका कधी भावनिक दिसतो तेंव्हा मात्र  बापाच्या डोळ्यात  अश्रुंचा पाऊस असतो   आईबाबांचा हात सोडून लेक तिच्या घरी जाते तेव्हा.... आई चारचौघात रडून घेत असते  बापाला रडायला मात्र एकांताशिवाय दुसरी जागाच नसते  लेक सासरी असताना माहेराचे आंगण लेकीवाचून सुने सुने होते ती गेल्यावर तिच्यामुळे  सासरचे घर शेभून दिसते  लेकीने मोठ होवू नये घर सोडून तिने जावू नये अस प्रत्येक आईबाबांना वाटत असते पण नाही...  ती माहेरा ची लेक आणि सासरची सून असते म्हणून तिला जावचं लागतं.. *संजय धनगव्हाळ* ९४२२८९२६१८

◾कविता :- पाऊस....

 पाऊस.... तु येणार आहेस का आलास तर जरा सावकाश ये शेतकऱ्यांची काळजी घे ते आधीच नैराश्यात जगताय खुप अपेक्षेने तुझी वाट बघताय अरे पावसा...... कितीही हात उसणवारी केली तरी शिल्लक काहीच रहात नाही  चुलीवरच्या पातेल्यात काय शिजतय येवून कोणी पहात नाही बरका पाऊस...... तू जर वेळेवर आलास ना तर त्यांच्याही आयुष्याच नंदनवन होईल सतत रडणाऱ्या चेहऱ्यावर  एकदातरी हसु येईल अरे पावसा....... कधीतरी शेकऱ्यानाही श्रीमंतासारख जगू दे त्याचेही खळेमळे धनधान्यांनी भरू दे तुला सांगतो पाठीवर हात ठेवून खोट्या सहानुभूतीचा फोटो पेपरच्या पहिल्या पानावर शेतकऱ्यांना नको असतो त्यांच्या शेतमालाला हमीभाव हवा असतो पण सायरन वाजत त्या बगळ्यांची गाडी येते भुर्रकन निघून जाते न मिळणाऱ्या मदतीची  मात्र टीव्हीवर ठळक बातमी असते  ऐकना पावसा....... तू  अवकाळी येवू नकोस  एकही शेतकऱ्याला उपाशी मारू नकोस त्याच्या पोटाला भाकर मिळाली ना की ते शेतात राबराब राबतील बघ मग कसं मातीतून सोनं उगवतील म्हणून म्हणतो पावसा जरा समजून घे ना एकदा तुझी मुसळधार बरसात होवू दे तुझ्यामुळे त्यांच्या कष्टाच्या घामाने शेतीमातीला सुगंध येईल मग तेव्हाकुठे त्यां

◾ कविता :- भेट दे श्रीहरी

 कविता  भेट दे श्रीहरी   पुंडलिकाच्या विटेवरी ,थांबलास पंढरपूरी ! नाही  चुकली एकादशी ,आषाढीची वारी !! झाला विषाणूचा कोप ,हादरली दुनिया सारी ! गळ्यात माळ हातात टाळ ,मृदुंग विनाधारी !! का ?चाललास दुर दुर ,मी तुझा माळकरी ! सांग मला भेटशील का रे ,माझ्या सावळ्या श्रीहरी //1// उद्योग व्यापार झाला चालू, तिथं नाही विषाणु ! भरला तुडुंब कुंभ मेळा ,जमले नाही किटाणु !! निवडणूक होते तेंव्हा ,कोरोणा जातो रजेवर ! हौसे नवसे पोटभरू, खिरापत खाती पोटभर !! कोसो मैल दुर तुझ्या  मी , दुर तुझी ती पंढरी ! भेटीसाठी अतुर झालो ,माझ्या सावळ्या श्रीहरी//2// तुच माय नी तुच बाप ,चाललासी तु दुर दुर ! हृदयमंदीरी तु आहेस,गवसत नाही मला सुर!! वैष्णवजन अतुर होऊन , सदा घेती गळा भेटी ! थकले नव्हते हे पाय ,आसुसले  तुझ्या साठी !!  पडे दुष्काळ आला महापुर, चुकली नाही वारी! दिंड्या पताका घेऊन आलो , भेट   सावळ्या श्रीहरी//3// रमत नाही मन माझे वेळ जात नाही घरी ! माय माझी चंद्रभागा ,चंद्रकोरी मंदिरी !!...आता  घर झालय पंढरपूर ,घरी भेटते  रखुमाई! भेट देरे विठुराया ,भक्ताना झाली घाई !! ठाई ठाई रूप लोचनी ,दृष्टी ठेव जगावरी ! सांग मल

◾कविता :- मिळेल का?लस

 कविता  : मिळेल का?लस  कोरोणाच्या महामारीत ,गेल वरीस सरल ... रोगराईच्या दहशतीने ,जग सारं हादरल !! एक घडीचा डाव सारा ,गतवर्षी बिघडला ... होळीच्या महिन्यात ,जगाचा गाडा आडला !! जगभरात आली मंदी ,माणूस ही नडला .... रोजगार गेला बेकार आली ,जगण्यात नाही रस !! मिळेल का ?साहेब ....रोजगाराची लस //1// शाळा नाही अभ्यास बंद ,घरात भुकेली पोर  टाळेबंदी साठेबाजी, चढला  महागाईचा जोर !! पैसा नाही वस्तू नाही ,एकवेळचा उपास  घरातच झालो बंदीजन, मोकळा नाही श्वास!! घरदार लेकर उपाशी ,मनही  झाले नरवस मिळेल का?साहेब ...पोटभरायची लस //2// घरभाडे वीजबील गॅस टीव्ही, बॅलन्स राशीला  सरकारी देणी ना थांबली, पुजलेत पाचवीला !! अश्वासनं बहु झाली,पावलं सरकार नवसाला  व्यवहार सारे झाले बंद ,महाग झालो पैशाला !! दारिद्र्य आलय पैसा नाही, बंद झाली नस  मिळेल का ? साहेब...पैसा मिळायची लस //3// चार टप्पे समजून ही, यंत्रणा का थांबली  नजिक धोका आसतानाही ,लस का लांबली!! श्रीमंत लोळतो गादीवर ,गादी खाली पैसा  आम्हालाच नाही आता उद्याचा भरवसा!! एक उपाशी एक तुपाशी, झालीया निराशा  सत्तेवरच्या राजाला ,चढली सत्तेची नशा !! जगता जरी आले तरी ,

◾ कविता :- हाक पावसाला ...

 कविता   .हाक $$$ पावसाला ..... जेंव्हा उन्हाळा बदलतो कुस  तेंव्हा लागायचा आसतो पाऊस ... कधी वादळ आणि सोसाट्याचा वारा  कधी बरसतो रिमझिम, कधी फक्त गारा ... सुटतो मातीचा सुगंध नासिकेत दरवळ अचानक पडतो धो धो नुसती पानगळ .... कधी उडवतो घराचे छप्पर आणि पत्रे सुद्धा  रौद्ररूपी वादळाने वृक्ष हलवी गदा गदा ... होते ढगफुटी नुसता विजेचा थरार  कडाडणारी विज करते अनेका निराधार .... काळ्या काळ्या ढगांची जमीनीला ओढ  पेरलेल्या बियाना येती कोवळं कोवळं मोड ... तहानलेली धरती साद घालीते  पावसा  भेगाळला आहे देह माझा ,लाग रात्र दिसा .... कुणब्या घरी पावसाळा, सुरू होतो जेंव्हा  गळत्या घरी राहुन म्हणे ,पाऊसच हवा .... पाणीच पाणी चोहीकडे नदी नाल्याला पुर  येरे येरे मेघराजा जाऊ नको दुर दुर .... रचना  संतराम पाटील  केनवडे ता.कागल जि कोल्हापूर  मो.नं 9096769554

◾कविता :- पेरा

 कविता: पेरा __________________________  मंजुळ वारा मोर पिसारा ,लांडोर नाच करी ! रिप रिप बरसात करती, पावसाच्या सरी !! ढगांची गर्दी देतात वर्दी ,नभात करी आवाज ! लखलखणारी विज चढवी ,नभी सोनेरी साज!!  आकाश निळे ढग काळे ,चोहीकडे अंधार ! गर्जनेची तोफ धडधडे ,जीव करी बेजार !! आसा लागतो पाऊस , करीतो पाणी पाणी ! बांध फोडुनी सडा टाकितो, रानी आणि वनी!! रिपरिप हाआवाज सरींचा ,थेंब टपोरे जरी ! त्या थेंबातुन चालत आसते, पेरणीची कुरी !! मृगामधे साधुन पेरा ,बळी परतला घरी ! पेरले ते उगवणार का ?भीती रहाते ऊरी !! अति बरसला नाही बरसला, बनतो हा काळ ! कधी ओला तर कधी कोरडा ,पाडीतो दुष्काळ !! आता मागणे एक आमचे ,साधु दे हा पेरा ! कोप नको हा तुझा आम्हावर ,साथ दे जरा !!   रचना  संतराम पाटील  केनवडे ता.कागल जि कोल्हापूर  मो.नं 9096769554

◾विशेष लेख :- टर्निंग पॅाईंट...

Image
‘टर्निंग पॅाईंट..!’             १० वर्षापूर्वी नुकत्याच लागलेल्या नवीन नोकरीवरून घरी परत येताना तो भयानक ॲक्सीडेंट झाला.डॉक्टरांनी दोन्ही हात कोपरापासून काढण्याशिवाय पर्यायच नाही हे सांगितले.फार मोठा धक्का होता तो घरच्यांसाठी. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ही घटना घडल्याने भविष्याचा विचार केला की फक्त अंधार दिसायचा. किती मेहनतीने,हुशारीने प्रतिष्ठीत आय आय टी मधे कॉम्प्युटर इंजिनीरिंग मिळवून मी सर्वोत्तम संस्थेत शिरलो होतो.खूप सारी स्वप्न घेऊन! ही घटना माझं पूर्ण आयुष्यं हादरवून टाकणारी होती. अनेक शस्रक्रियांनंतर शेवटी दोन्ही हात कृत्रिम बसवायचा सल्ला दिला डॉक्टरांनी.. घरात एकच भयाण वातावरण पसरलं होतं पण दुसरा पर्यायच नसल्याने कृत्रिम हात रोपण शस्त्रक्रीया करावीच लागली. रोज स्वत:चे असे हात बघून आयुष्यं खरंच जगायचं का ?हाच विचार मनात येऊन जायचा.  मनातून  तर जवळ जवळ संपलो होतो मी.दोन महिने झाले आणि त्या सततच्या परावलंबित्वाची, त्या सहानभूती भरलेल्या नजरांची  अक्षरशः किळस यायला लागली होती. अनेक मित्र,नातेवाईक समजवायला यायचे.आयुष्यं असं थांबवून चालत नाही जगावंच लागतं वगैरे सगळं. दुसऱ

◾कविता :- पर्यावरण

Image
            पर्यावरण             जागतिक पर्यावरण दिन ,  सर्वानी साजरा करुया ।  सर्वाच्या सुखी जीवनासाठी ,  जागोजागी झाडे लावूया ॥  निसर्ग आणि पर्यावरण ,  हाच आमचा खरा मित्र आहे ।  नैसर्गिक गोष्टींचा वापर करा ,  महती पर्यावरणाची आहे ||  स्वच्छता ठेवा गलोगल्लीत ,  निसर्ग चक्र चालेल सुरळीत ।  सुरुवात पर्यावरण रक्षणाची ,  आनंद पसरेल जगभरात ॥  पुढच्या पिढीसाठी करु आसरा ,  फळांच्या बीया पर्यावरणात पसरा ।  दारी राही वृक्षांचा पहारा ,  तेव्हाच पशुपक्षांना देऊ सहारा ||  उन्हात हवी असेल सावली ,  तर वृक्ष लावा पावलोपावली ।  अंगणात लावा वृक्षवेली ,  हिच आरोग्याची गुरुकिल्ली ||  पर्यावरणाची केली हानी ,  तर होते मनुष्य जीवनाची हानी ।  म्हणून वृक्ष लावा घरोघरी ,  तेव्हाच पर्यावरण असेल जीवनी ॥  ======================= महेन्द्र सोनेवाने “ यशोमन " गोंदिया  दिनांक : ०१/०५/२०२१ =======================

◾विशेष लेख :- पर्यावरणाचे करा रक्षण , उज्वल भविष्याचे हेच धोरण

Image
“ पर्यावरणाचे करा रक्षण , उज्वल भविष्याचे हेच धोरण ”       पर्यावरणाशी संबंधित विविध विषय , घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरुकता निर्माण करणे , पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पाऊल उचलणे असा पर्यावरण दिवस साजरा करण्या मागचा हेतू आहे म्हणून दरवर्षी आपण ५ जून हा दिवस  "जागतिक पर्यावरण दिन"  म्हणून साजरा करतो . मानव हा पर्यावरणाचाच एक कुशाग्र घटक आहे . आपण खातो ते अन्न , श्वास घेतो ती हवा , पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टीमुळे आपण पृथ्वीवर राहू शकतो . या सर्व गोष्टी आपल्याला निसर्गाकडून मिळत आहेत .       सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय स्वत : ची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे . जगातील जवळपास शंभर पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो . यामागील मुख्य उद्देश इतकाच की , जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे . जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळया पध्दतीने साजरा करता येऊ शकेल . जगा