Posts

Showing posts from April, 2020

सुख म्हणजे काय ?

सुख मानन्यावर आहे सुखाची परिभाषा वेगळीच आहे सुख असतं तेव्हा सुखाची किंमत कळत नाही जेव्हा दुःख आलें की सुखांची किंमत कळते तर दुःख आहे तर सुख आहे.  सुख दुःखात समाधान  आनंद असतं ते कळत देखील नाही आपल्याला आपण जे काही करतो चांगल  वाईट त्यातच सुख असतं  समाधान आनंद याच्यात सुख आहे सुख पैशांनी विकत घेऊ शकत नाही

जीवनाचा खरा अर्थ काय ?

जीवनाचा खरा अर्थ  जीवन म्हणजे सुखी जीवन  जीवन म्हणजे जीवनात काही चांगल्या गोष्टी घडल्या कि ते आनंदी जीवन  दुःख आले नाही तर ते  जीवन बेचव अळणी  तसं जेवणात मीठ  नसेल तर जेवण बेचव अळणी जेवणं लागतं   तसंच  दुःखाचे आहे दुःख आलें कि सुखी जीवनाचा अर्थ कळतो    जीवनात नेहमीच आनंदी रहाते जीवन खुप सुंदर आहे   आनंदी जीवन जगा हाच खरा जीवनाचा अर्थ आहे.

आपण का जगतो ?

आपण जगतो आपल्या माणसाठी  आपण जगतो आपल्या साठी  आपल्याला जो जन्म मिळाला आहे तो सार्थकी लावण्यासाठी  आपण जगतो काही चांगले कर्म करण्यासाठी  आपल्याला जगण्यासाठी जन्म एकदाच मिळतो   ते जगत असताना आपण कोणासाठी तरी जगतो  त्याचा आनंद काही वेगळाच असतो  आनंद हा आपल्या जगण्याची उमेद उर्जा निर्माण करतात . आपण जगतो आपल्या माणसाठी आणि आपल्यासाठी जगतो  आपण जगतो तेव्हा सुख दुःख येतं तेव्हा हे जगणं जगतो तेव्हा आपल्याला आनंद ही होतों दुःख होतो हे खरे जगणं जगतो आपण.

मन म्हणजे काय ?

Image
मन म्हणजे हे आपलं मंदिर आहे मन हे आपल्याला जगण्यासाठी उर्जा देते.आज आपण विचार करतो हे मनातुन येत असतात मन आपल्याला स्थिर पण ठेवतो कधी अस्थिर करतो आपण विचार करतो तेव्हा मनातुन येत तेव्हा आपण सकरत्मक नकारात्मक विचार करणारा म्हणजे आपलं मन आज आपण आपल्या मनाशी बोलत असतो काही ठरवतं असतो ते मन करवून घेत मन हे आपले सर्वस्व आहे  मन आपल्याला सर्व काही दिशा ही दाखवणं आपण दुसऱ्या चं ऐकतो पण ऐकतो ते आपल्या मनाचे  मराठीत म्हण आहे ऐकावे जणांचे करावे मनाचे.  मन हे सर्व काही आहे मन हि उर्जा आहे. ______________________________________ 📍 मन 📍 मन म्हणजे काय हो ? त्याला कोणी पाहिलं नाही ? कसं असते ते माहीत नाही ? पण त्याला खूप मान सन्मान असतो. कधी ते लिक्विड असतं , " मन भरलं नाही " असं म्हणतो आपण.. कधी ते सॉलिड असतं , " मनावर खूप ओझं आहे " *कधी ते घर होतं , " मेरे मन में रहने वाली "* *कधी ते तहानलेलं असतं , " मेरा मन तेरा प्यासा "* *कोणी त्याला मोराची उपमा देतं , " मन मोराचा कसा पिसारा फुलला "* *असं हे मन आयुष्यभर आपल्याला झूलवत ठ

नेहमी आनंदी राहण्यासाठी काय करावे ?

नेहमी आनंदी राहण्यासाठी आपल्याला सकाळी उठल्यावर ठरवावे माझा आजचा दिवस छान जाणार आहे आनंदी जाणार आहे.  आपल्या आयुष्यात नेहमीच आनंदी राहता येत नाही त्याच्यामध्ये थोडी थोडी निराशा येतेच म्हणतातना आशा आहे तिथे निराशा येते   पण नेहमीच आशा ठेवून वागावे म्हणजे आनंदी राहु शकतो  आनंदी राहण्यासाठी नेहमी हसुन खेळुन राहावे  आपलं मन जे आहे चांगल्या पद्धतीने रमवावे म्हणजेच आनंदी राहु शकतो . आनंदी राहणं आपल्या हातात आहे आपणच ठरवाव कि मला आनंदी राहायचं आहे.आपल्याला आनंदी राहायचं आहे निराशेला बाजुला सारावे आणि आनंदी राहावे.

जिवन विचार - 135

जीवन कंटाळवाण  वाटत हे बरोबर आहे आपल्या आयुष्यात काही चुकीचे घडत चालले आपल्या मनासारखे काहीच घडले नाही तेव्हा कंटाळा येतो   आपण खेळ खेळतो आणि आपल्याला कंटाळा आला तर सोडून देतो बरोबर तो खेळ आहे तरीपण आपण दुऱ्या वेळेस तोच खेळ पुन्हा खेळतो   पण जीवनात कंटाळा येऊन कसं चालेल. जीवन जर कंटाळवाणे झाले तर जीवन कसे जगणार  आपल्याला चांगले जीवन जगायचे आहे म्हणुन कंटाळ्याला येऊ देऊ नका  आपल्याला जीवनात काहीतरी करण्यासाठी आपला जन्म झाला आहे तो चांगल्या कामासाठी सार्थकी लावा आयुष्यात चांगले काम करा हे सर्व जर केलं आपण कंटाळा येणारच नाही.

माणसाने जीवन कसे जगावे !

माणसाने जीवन कसे जगावे तर मन मोकळे पणाने जगावे दिलखुलास जगावे  माणसाचं जीवन सुख दुःखाने व्यापलेला आहे तर जीवनात सुखाची  तूलना करत नाही  पण दुःख मात्र आले की त्याच आपण लगेच भावु करतो  दुखाला मागे सारून पुढे जायचं त्यालाच आपण जीवन म्हणतो दुःख सहन केल्याशिवाय सुख आपल्याला मिळत नाही सुख दुःख सहन केल्याशिवाय जीवनाचा अर्थ कळतो  आणि त्याच्यातुन आनंद मिळतो ते जीवन  सुख दुःख आनंदाने जगायचे माणसाने जीवन सर्व  प्रकारचे जीवन जगावे आनंदी जीवन मस्ती मजा मस्करी मोह माया  या मोहमायेत जगावे  माणसाला जन्म एकदाच मिळतो तो जन्म सत्कारणी लावावे जीवनाचा आनंद घेत जगावे.

स्वतःमधील चुका कशा शोधायच्या ?

स्वत: मधील चुक आपल्याला कळत नाही    त्यासाठी आपल्या बरोबर दुसरी व्यक्ती जेव्हा बोलत असते  तेव्हा आपल्या बोलण्यावर आणि आपण बोलतो ते आपल्या ला बरोबर वाटत असते पम बरोबर च्या व्यक्तीला चुकीचे  वाटते तरी पण आपल्याला चुका कळत नाही  पण काही वेळेस असं होतं की आपल्या चुका उशीरा कळतात पण कधी कधी वेळ निघुन जाते  म्हणुन बोलते वेळी आपल्या बोलण्यात कडे आणि  दुसऱ्या चर्या बोलण्याकडे लक्ष केंद्रित करावे  म्हणजेच आपल्या बोलण्यातून चुका होत नाही आणि ते आपल्याला कळत कि आपण बरोबरच बोललो हे आपल्याला कळतं  पण आपल्या कडून चुकीचे बोलले जाते  ते म्हणजेच कधी कधी असं होतं की आपण काही विषय मुद्दा काय आहे ते बघत नाही आणि बोलुन मोकळे होतो ते पण घाई घाई मध्ये बोलतो तेव्हा आपली चूक लक्षात येत नाही तरी माझंच बरोबर आहे असंच बोलतो आपली चुक आपल्या सोबत असणारी व्यक्ती निदर्शनास आणून देतात तेव्हा कुठे आपण विचार करतो आणि कळते की चुकले  बोलताना आपली चुक आपण मान्य करत नाही  पण आपली चुक आपल्या विचाराने कळते आणि दुसऱ्या च्या मदतीने आपली चुक कळते.

मनावर ताबा कसा ठेवायचा ?

माणसाचे मन हे क्षणात बदलणारे आणि चंचल असते. एकाच वेळी माणसाच्या मनात अनेक विचार येऊन स्थिरावतात.  अशा वेळी मनावर ताबा मिळविण्याकरिता ध्यान साधना हाच एक सर्वोत्तम उपाय आहे.   माणसाचे मन हे क्षणात बदलणारे आणि चंचल असते. एकाच वेळी माणसाच्या मनात अनेक विचार येऊन स्थिरावतात. अशा वेळी मनावर ताबा मिळविण्याकरिता ध्यान साधना हाच एक सर्वोत्तम उपाय आहे.   अजून एक पद्धत ज्याने मन शांत केले जाऊ शकते, ती म्हणजे, अलिप्तपणा. भौतिक जगात जरी वावरत असलो तरी त्याच्याशी अलिप्तपणा बाळगणे. मनाला नियंत्रित करण्यासाठी जाणीवपूर्वक स्वप्नस्थिती (कॉन्शियस ड्रिमिंग) आणि जाणीवपूर्वक झोपेची (कॉन्शिअस स्लीप) आवश्यकता आहे.  एखाद्या माणसाने राग-द्वेष यांचा त्याग केला असेल, किंवा भौतिक मोह मायेतून मुक्त झाला असेल तो मनुष्य चित्तविक्षेपांचे शमन करण्यात यशस्वी होतो.  मानवाचे जीवन समृद्ध आणि सुंदर होण्यासाठी तसेच मानवी कल्याणासाठी बुद्धविचार खूप महत्त्वाचे आहेत. या विचारातूनच आयुष्यात आनंद आणि सुख प्राप्त होते. मनावर संयम मिळविण्याकरिता गौतम बुद्धांनी समाधीचा पुरस्कार केला. अशी समाधी शिकवली, जिचा मूलाधार निसर्गनियम आहे. श

स्वतंत्रता - बोधकथा

प्रतापरावांच घरी एक पोपट होता. प्रतापराव जे जे शिकवतील तसे तो बोलायचा. स्वातंत्रच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रतापरावांनी त्याला  नवा शब्द शिकविला होता. ‘स्वतंत्रता, स्वतंत्रता, स्वतंत्रता.’   पोपटाने ते शब्द चांगलेच आत्मसात केले होते. तेव्हापासून तो तसे बोलतही होता. एकदा प्रतापरावांकडे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या    प्रतिसरकारमधील स्वातंत्र्यसैनिक पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी त्या पोपटाचे आक्रंदन ऐकले. त्यांना झोपच लागेना. कारण त्यांनी   बेचाळीसच्या लढय़ात कारावास भोगला होता आणि त्यांना ‘स्वतंत्रता’ या शब्दाचे मोल माहीत होते. अखेर रात्री ते उठले. हळूच पिंजरा उघडून तंनी पोपटाला धरले. बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पोपट एका पायाने पिंजरा घट्ट धरून होता. शेवटी कसेतरी त्यांनी त्या  पोपटाला बाहेर काढले आणि मोकळ्या हवेत सोडले. त्या रात्री त्यांना शांत झोप लागली. सकाळी उठून पाहातात तर पिंजर्‍याचे दार उघडे होते. पण आत पोपट होता. आणि बोलत होता, ‘स्वतंत्रता, स्वतंत्रता, स्वतंत्रता.’   तात्पर्य : जे सत्य स्वत:ला गवसलेले नसते त्याचा जीवनाला काडीमात्र उपयोग नसत

स्वावलंबनाचे धडे - बोधकथा

https://elfsight.com/as sets/templates/social-share-buttons/messengers.jpg?v=1 सहदेव महाराज व त्यांचे दोन शिष्य पांडुरंग व प्रताप हे दोघेजण वासोट्याच्या जंगलात फिरत होते. नागेश्वरीकडे जाण्याची वाट त्या जंगलात न सापडल्याने फिरून फिरून ते सारेजण दमले होते. अंधारूनही आले होते. काय करावे याचा विचार सुरू असतानाच अचानक त्यांना डरकाळी ऐकू आली. वाघाच्या त्या नुसत्या डरकाळीनेच सारेजण गर्भगळित झाले.  पांडुरंग महाराजांच्या पाठीशी लपण्याचा प्रयत्न करू लागला. तर प्रताप झाडावर चढण्याचा प्रयत्न करू लागला. ते पाहून सहदेव महाराजांनी प्रतापचा हात धरला. ते त्याला म्हणाले, ‘अरे, पळतोस कुठे? थांब, आपण तिघे मिळून परमेश्वराची प्रार्थना करूया. तो प्रसन्न होईल आणि मग या संकटापासून आपले रक्षण करील.’  हे ऐकून आपला हात सोडवून घेत प्रताप म्हणाला, ‘महाराज, आपणच आम्हाला स्वावलंबनाचे धडे दिलेत ना? मग जे काम आम्ही स्वत: करू शकतो त्याला परमेश्वराची, तो येण्याची आणि प्रसन्न होण्याची गरजच काय?’ तात्पर्य : प्रयत्नांच्या अभावी केवळ प्रार्थना केली तर परिणाम शून्य.

सत्ता संपत्ती चा मोह अमर्यादित असतो - बोधकथा

मानवी मस्तक आणि पोलादी पाय असणारा तो राक्षसी वृत्तीचा प्राणी जेव्हा सहदेवसमोर आला, तेव्हा त्यालाही जरा आश्चर्य वाटले. जंगलातून भ्रमंती करताना असा माणूस भेटेल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. सहदेवने त्याला त्याची दिनर्चा, आहार यांविषयी विचारले, तेव्हा तो प्राणी म्हणाला, ‘मी भुखंड खातो आणि समुद्राचे पाणी पितो, तसा मी अत्यंत सुखी आहे. सर्व भौतिक सुविधा मला उपलब्ध आहेत, माझ्या या आहारासाठी मी अनेक भूखंड आरक्षित केले आहेत. पण तरीही मला भविष्याची चिंता छळते आहे.’ यावर सहदेव म्हणाला, ‘कस बां? अशी चिंता तुला का पडावी?’ तो अजब माणूस म्हणाला, ‘आज जरी मला प्रचंड जमीन व अमर्याद पाणी उपलब्ध असले तरी हे सारे गिळंकृत केल्यानंतर काय खाऊ, हा प्रश्न मला छळतो आहे.’   तात्पर्य - सत्ता, संपत्ती आणि सन्मान यांचा लोभही असाच अमर्याद असतो, तो कधीच संपत नाही.

गर्व आणि अहंकार - बोधकथा

रामकृष्ण परमहंस आपल भक्तांसमोर प्रवचन देत होते. ते म्हणत होते, हे पहा, तुमच्यासमोर मी बसलेलो आहे, हे तुम्ही पाहता. पण मी एखादे वस्त्र माझसमोर धरले, तर मी तुम्हाला दिसणार नाही. तथापि, पूर्वीप्रमाणेच मी तुमच्याजवळ आहे. कपडय़ाआड असल्याने तुमच्या   दृष्टीस मात्र पडू शकणार नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने अदृश्य होईन. तसाच परमेश्वरसुद्धा तुमच्या-माझ्या सर्वांच्या जवळ असतो. परंतु अहंकाराच्या पडद्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. तुम्ही आपल्या डोळ्यांसमोर लहानसा कापडाचा तुकडा जरी धरला, तरी समोरचा मोठा पर्वत दृष्टीला अगोचर होईल.   तात्पर्यं - अहंकार आणि गर्व यांचा पडदा जोपर्यंत आपण बाजूला करीत नाही, तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार, ज्ञानप्राप्ती आपणाला होणार नाही.

सदगुणावर कर बसवा - बोधकथा

Image
एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला,  'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्राणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धती ठरेना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजारवरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्‌गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.' तात्पर्य  : आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्‌गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असतो.

जनकराजाचा ज्ञानी अलिप्तपणा - बोधकथा

जनकराजाच्या ज्ञानी अलिप्तपणाची ही कथा. राजा जनक कीर्तन ऐकणत दंग होता. कीर्तन अगदी रंगात आले होते. इतक्यात एक रक्षक धावत आला आणि त्याने जनकाच्या कानात हळूच सांगितले, ‘महाराज! राजवाडय़ाला आग लागली आहे.’ जनक म्हणाला, ‘मी कीर्तन ऐकतो आहे. देवाची भक्ती करतो आहे. आत्ता काही सांगू नको. नंतर ये.’ थोडा वेळ गेला. रक्षक पुन्हा धावत आला. म्हणाला, ‘महाराज!आग भडकली आहे. कोठीघरार्पत थोडय़ा वेळातच पसरेल.’ तरीही जनक स्तब्धच होता. कीर्तन सुरूच होते. तेवढय़ात रक्षकाने तिसरी बातमी आणली, ‘महाराज! आपला राजवाडा जवळजवळ जळून खाक झाला आहे आणि आता आग शहरात पसरण्याची शक्यता आहे. सार्‍या प्रजेची घरं जळून खाक होतील.’ हे ऐकल्यावर मात्र जनक ताडकन् उठला. म्हणाला, ‘किर्तन थांबवा. मी गावात जातो. सगळ्या प्रजेच्या रक्षणाची काळजी मला घ्यावी लागेल. ती माझी जबाबदारी आहे.’ म्हणजे राजाला स्वत:च राजवाडय़ाचे दु:ख नव्हते. प्रजेचा जीव मालमत्ता त्याला  वाचवायची होती. तात्पर्य - कर्तव्याला लिप्त आणि स्वत:च्या सुखसोयीशी अलिप्त राहिले तरच व्यक्तीचा लौकिक शतकानुशतके राहतो.

तंटा - बोधकथा

दोघां भावात जमिनीवरून तंटा निङ्र्काण झाला. मामला कोर्टात पोहोचला. त्यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रूपये वाटणीमध्ये आले होते. न्यायाधीशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले. श्रीमंत भाऊ म्हणाला, माझा भाऊ प्रत्येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला. न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली. तो म्हणाला, माझ्या वाडवडिलांनी देणगी दिली म्हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्येक कामात माझा सहभाग असल्याने नोकरांची बोलण्याची हिंमत होत नव्हती. आता जेव्हा याच्याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत याने स्वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे. यावर न्यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व श्री

चांगले आचरण - बोधकथा

दोन तरुण साधू उंच डोंगरावर असणार्‍या आपल्या मठाकडे निघाले होते. रस्त्यामध्ये एक ओढा होता. त्या ओढय़ाच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती. त्या तरुणीलाही तो ओढा पार करून गावात जायचे होते. पण ओढय़ाला असणार्‍या पाण्यामुळे ती तो ओढा पार करू शकत नव्हती. तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचे होते. दोन साधूंपैकी एका साधूने हे पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी मिळून तो ओढा पार केला. तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली. दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले. ज्या साधूने तरुणीला खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही.  त्या साधूने दुसर्‍या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला म्हणाला, मित्रा! बराच वेळ मी पाहतो आहे पण तुला काही तरी खुपते आहे. तेव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग. तो दुसरा साधू म्हणाला, हे मित्रा, आपल्या संप्रदायामध्ये स्त्रीस्पर्श सुद्धा वज्र्य आहे. तरी तू त्या स्त्रीला खांद्यावर बसवून ओढा पार केलास हे काही मला आ

ज्ञानी व अज्ञानी - बोधकथा

Image
आगगाडीचा प्रवास करीत असताना, एका प्राध्यापकाला आपल्या शेजारी एक आडाणी शेतकरी बसला असल्याचं आढळून आलं. स्वत:च्या ज्ञानाची घमेंड बाळगणारा तो प्राध्यापक थोडय़ाच वेळात त्या आडाणी शेतकर्‍याची थट्टा करून आजूबाजूच्या बसलेल्या प्रवाशांची करमणूक करू लागला. थोडा वेळ ती थट्टा निमूटपणे सहन केल्यावर तो शेतकरी त्या प्राध्यापकाला म्हणाला, साहेब, काही झालं तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अज्ञानी. तरीसुद्धा आपला गाडीतला वेळ चांगला जावा, म्हणून आपण एकमेकांना कोडी घालूया. मी आडाणी व गरीब असल्याने कोडं सोडवण्यात जर मी हरलो, तर मी तुम्हाला फक्त पाच रुपये द्यायचे आणि जर तुम्ही हरलात, तर तुम्ही मात्र मला पंचवीस रुपये द्यायचे. आहे कबूल? हे ऐकून तो प्राध्यापक आनंदला आणि अवतीभवतीच्या सहप्रवांशावर छाप मारायलाही सुसंधी आपल्याकडे आपणहून चालून आली आहे असा विचार करून त्या शेतकर्‍याला म्हणाला, तुझी कल्पना मला मान्य आहे. पहिलं कोड, तू मला घाल.   शेतकर्‍यानं विचारलं, ज्याला उडताना तीन पाय, चालताना दोन पाय आणि बसला असता फक्त एक पाय असतो, असा पक्षी कोणता? या कोडय़ाचं उत्तर देता न आल्यानं प्राध्यापक

कोणाला कमी समजू नये - बोधकथा

प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितांमागे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत. थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा म्हणून स्वीकार करून घ्या. जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला, भाऊ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो.  त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपडय़ात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खूश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले, पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा. मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे. पंडित म्हणाले, बरं भाऊ, तुम्ही गरीब दिसता पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो. या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला

जाणून घ्या एका आमदाराचे वेतन किती?

खासदार आणि आमदारांच्या वेतनाबद्दल नेहमीच चर्चा होत असते. खासदार-आमदारांना मिळणारे वेतन व भत्ते हे जास्त असल्याचा सामान्य नागरिकांचा आक्षेप असतो. त्याच वेळी लोकप्रतिनिधींना मात्र हे वेतन व भत्ते कमीच वाटतात.  राज्य सरकारमधील प्रधान सचिवाला अनुज्ञेय असलेले वेतन व भत्ते आमदारांना देण्याची तरतूद आहे. अर्थात प्रधान सचिवाला सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणाऱ्या वेतन व भत्त्यांनुसार सदस्यांना तेवढी रक्कम दिली जाते. केंद्रात व राज्यात सातवा वेतन आयोग लागू झाल्याने प्रधान सचिवांच्या वेतन व भत्त्यांमध्ये वाढ झाली असणार. नव्याने निवडून येणाऱ्या आमदारांकडून वेतन व भत्त्यांमध्ये वाढ करण्याची मागणी होऊ शकते.  राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना दरमहा १ लाख ८३ हजार ४४० रुपये एवढे वेतन व भत्ते मिळतात. याशिवाय आणखी काही सोयीसुविधा मिळतात. दरमहा दोन लाखांपेक्षा जास्त वेतन, भत्ते व अन्य सुविधांच्या माध्यमातून आमदारांना मिळत असतात.  आमदारांचे वेतन, भत्ते व अन्य सुविधा यांची संक्षिप्त माहिती  मूळ वेतन – ६७ हजार  महागाई भत्ता – ८८,४४० (मूळ वेतनाच्या १३२ टक्के)  दूरध्वनी भत्ता – आठ हजार  स्टेशनर

जिवन विचार - 134

✍🏻स्वप्नं अशी बघा की पंखाना बळ येईल  ✍🏻मैत्री अशी करा की  जग आपलं होईल  ✍🏻अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल ✍🏻माणूस असे बना की माणूसकी नतमस्तक होईल ✍🏻शिष्य असे बना की जगाला    शिकवता येईल ✍🏻प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल ✍🏻प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल आणि ✍🏻एकमेकांना सहकार्य इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल ...  ❣

आपल्या देशाचे नाव भारत कसे पडले जाणून घ्या

भारताला भारत हे नाव कसे मिळाले याविषयी दोन कथा प्रसिद्ध आहेत. काही जाणकारांच्या मते चंद्रवंशी राजा दुष्यंत आणि विश्वामित्राची कन्या शकुंतला यांचा मुलगा भरत ! याच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे संबोधल्या जाते.  ऋग्वेदानुसार भारताचे नाव सूर्यवंशी राजा भरताच्या नावावरून पडले आहे. ऋग्वेदाची व्याख्या करणाऱ्या वेदाभ्यासकांच्या मते मनूवंशज ऋषभदेवांचे दोन पुत्र होते भरत आणि बाहुबली ! बाहुबलीच्या वैराग्य प्राप्तीनंतर भरताला चक्रवर्ती सम्राट बनविण्यात आले.  आणि तेंव्हापासून आपल्या देशाला भारतवर्ष असे म्हंटल्या जाऊ लागले. आणि भरताचे सर्व वंशज आणि या देशातील मूळ रहिवाश्यांना भारती असे म्हंटल्या  गेले.  आणि बहुदा यामुळेच कौरव आणि पांडवांच्यात झालेल्या युद्धाला महाभारत असे संबोधल्या गेले असावे. कारण महाभारताची समीक्षा करणाऱ्यांच्या मते महाभारताचे युद्ध भारतीयांच्या हक्काकरता लढल्या गेल्याने त्याला महाभारताचे युद्ध हे नाव देण्यात आले. सदर माहिती माझा पेपर वृत्तपत्र तुन घेतली आहे

जिवन विचार - १३३

जिवन एक सुख दुःखाचा भोगावया  लागणारा खेळ आहे, सुख दु:खात फरक येवढा आहे  व्यक्त केल्यास दुःख आहे व व्यक्त करणा गेल्यास सुख आहे. . . आनंदात राहा सुखाने रहा 

शांततेचा फायदा - बोधकथा

✍  एकदा एका शेतकऱ्याला जाणवले की त्याचे हातातील घड्याळ धान्याच्या कोठारात हरवले आहे.  जरी ते एक सामान्य घड्याळ होते तरी त्याचे लेखी त्याला अफाट भाावनिक मूल्य होते.  बराच वेळ गवतात सर्वत्र शोधल्यावरही त्याला ते सापडेना.  मग त्यांनी कोठाराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांच्या गटाला घड्याळ शोधण्यासाठी बोलावले व त्यानी त्या मुलांना वचन दिले की जो कोण त्याचे घड्याळ शोधून देईल,त्याला बक्षिस मिळेल.... .  बक्षिस मिळेल,  हे ऐकून सगळी मुले  कोठारात लगबगीने गेली, गवताच्या चारी बाजूने शोधायला लागली  पण त्यांना घड्याळ कुठेही सापडेना.  नेमके जेंव्हा त्या शेतकर्याने घड्याळाचा शोध घेण्याचे थांबवायचे ठरवले तेव्हा एक मुलगा त्याच्या जवळ जाऊन शेतकर्याकडे शोधण्याची एक संधी मागू लागला.  शेतकरी त्याच्याकडे बघून विचार करू लागला की "बिघडले कुठे...!  हा मुलगा प्रामाणिक दिसतोय. देऊ या त्याला एक संधी.......  शेतकर्याने त्या छोट्या मुलाला घड्याळाचा शोध घेण्यासाठी कोठारात पाठवले.  थोड्याच वेळात तो मुलगा हातात घड्याळ घेऊन नाचत नाचतच बाहेर आला.  शेतकऱ्याला आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले.........!  त्याने त्या मुलाल

पक्ष्यांची सभा - कविता

🌳 *पक्ष्यांची सभा** 🦚 झाडावर भरली पक्षांची सभा मोर  नाचरा ,मधोमध उभा--- म्हणाला, माणसास काय झाले? खूपच दिसतात दिनवाने--- पोपट म्हणाला मी गल्लीत पाहिले सुनसान दिसले, नवलच वाटले--- चिऊताई म्हणाली, घाई घाई दूध भाताचा घास मिळतच नाही- कावळा म्हणालाआज दशक्रियेला काव काव ऐकू नाही येत मला--- घार म्हणे ,उंच आभाळी मी गेले एकही विमान नाही घरघरले--- वाहने,कंपनी मॉलही बंद प्रदूषण थांबले न जाणे काय झाले माणसावर असे कसे संकट आले जीव घेण्या कोरोनाने,तया,ग्रासले सर्व पक्षांनी युक्ती केली देवाची एकत्र प्रार्थना म्हटली-- म्हणून पाखरांची काळजी घ्या ठेऊ नका उपाशी अन्न पाणी दया श्रीम शिला पाटील चांदवड नाशिक

स्वतःसाठी जगताना - कविता

🌹स्वतःसाठी जगताना...🌹    👇👇👇👇👇👇    स्वतःसाठी जगताना..    दुस-यांसाठी जगून बघ..    स्वतःच्या आनंदापेक्षा..    दुस-यांना आनंद देऊन बघ..    स्वतःसाठी जगताना ...    मरुन जातो माणूस बघ..    दुस-यांसाठी जगणारा..    मरुनही जगतो माणूस बघ….    स्वतःसाठी जगताना...    स्वार्थाचा नगारा फुलतो बघ..    दुस-यांसाठी जगताना.…    परमार्थ उठून दिसतो बघ..    स्वतःसाठी जगताना...    हजारवेळा मरतो बघ...    दुस-यांसाठी जगताना..    मरुनही अजरामर होतो बघ..    स्वतःसाठी जगताना...    मी आणि माझच बघतो बघ..    दुस-यांसाठी जगताना...    तुम्ही आणि आपणच उरतो बघ    स्वतःसाठी जगताना.…    स्वार्थाचा इमला वाढतो बघ...    दुस-यांसाठी जगताना...    परमार्थ उठून दिसतो बघ….    तरही माणूस आज ....    स्वतःसाठीच जगतोय...    मी माझ आणि माझ्यासाठीच    सर्वकाही नक्की साठवतोय..    पण त्याला हे कुठ माहित..    तो साठवितोय ते नश्वर आहे..    एक दिवस इथच सोडून..    सर्वाना जाव लागणार आहे ...    म्हणून आजच्या माणासा..    मी माझ आणि माझ्यापासून    जरा तरी दूर व्हो..    इथ काहीच नाही माझ त

माझी देवपूजा - कविता

🛕 *माझी देवपूजा* 🛕 पहाट झाली ,भूपाळी रंगली राखुमाईच्या दारी ,पणती लागली सोहळ्यात पूजा ,अभ्यंगस्नान फुलारीत पुष्परास सुगंधी छान भक्त मांदियाळी ,काकडारतीला पंचारती, समई ,तुझीया पूजेला-- धूप, दीप ,उदबत्ती ,नंदादीप सभोवती सुगंध दरवळला अवनी आसमंती-- निरांजनीची वात कापूराचा सुवास देवताम्हण समोरी पळी पंचामृताची खास---- झेंडू मोगऱ्याची पुष्पमाला, सुगंधी अत्तराची कुपी ,तुळशीमाला वैजयंती---- सहान ,चंदनखोड ,उटी चंदनाची माथा सप्तधान्याचा भोग ,तुजसाठी पंढरीनाथा---- पंचपाळी ,हळदी ,कुंकू ,अक्षता राखुमाईच्या माथी अभीरबुक्का ,पांडुरंगा करंड्याची झाली दाटी---- नित्य करू आरती,घंटा नाद मंदिरात तुझे रुप चित्ती राहो,माझीया अंतरात रांगोळी पिढेपाट ,सजला नैवेदया चा थाट दयावे धुवोनिया ताट,, प्रसादाची वाट---- श्रीम. शिला पाटील .चांदवड. नाशिक.

जाणून घ्या शरीरातील जिवाणूंचे फायदे - आरोग्य

प्रथम बॅक्टेरियाला मराठीत जिवाणू म्हणतात. शरीरात जिवाणूंचे दोन प्रकार पडतात, एक गट चांगल्या जिवाणूंचा असतो तर दुसरा वाईट जिवाणूंचा. जे चांगले असतात ते बऱ्याच पचनसंस्थेसंबंधी क्रियांमध्ये मदत करतात. जसे की खाल्लेल्या अन्नातून विविध जीवनसत्वे मिळवायचे प्रमुख काम चांगले जिवाणू करतात. त्वचेवर देखील बऱ्याच प्रकारचे जिवाणू असतात हे त्वचेचे बाहेरील बुरशी किंवा इतर वाईट जिवाणूंपासून संरक्षण करतात. म्हणून आपल्या शरीरात हे जिवाणू असणे खूप गरजेचे असते. एका प्रयोगानुसार एका डुकरांवर प्रयोग करण्यात आला. काही डुकरांना जिवाणू समवेत ठेवण्यात आले आणि काहींना जिवाणू रहित ठेवण्यात आलं. जिवाणू रहित डुकरे होते ते खूप अशक्त बनले व त्यांचा मृत्यू लवकर झाला. म्हणून माणसाच्या शरीरामध्ये जिवाणू म्हणजेच बॅक्टेरिया असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु फक्त चांगले बॅक्टेरिया असणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण वाईट बॅक्टेरिया हे शरीराला घातक ठरू शकतात.

जपानमध्ये होते हिंदू दैवतांची पूजा - देव धर्म

🔹 जपानमध्ये होते हिंदू दैवतांची पूजा, जतन केला जातोय भारतीय वारसा!🔹  आपणांपैकी फार कमी जणांना हे माहिती असेल की जपानमध्ये कमीत कमी २० हिंदू दैवतं नियमीत पूजिले जातात.  सरस्वती मातेची अगणित मंदिरं जपानमध्ये आहेत. सरस्वती शिवाय लक्ष्मी माता, इंद्रदेव, ब्रह्मा, गणेश ह्यांची उपासना जपानमध्ये प्रामुख्याने होते. एवढंच नाही, तर भारतीय हिंदू ज्या दैवतांना विसरून गेले आहेत, त्यांचीसुद्धा जपानमध्ये आराधना केली जाते.  जपान फाउंडेशन आणि चित्रपट निर्माते तथा art-historian – Benoy K Behl ह्यांनी जपानमधल्या Indian Museum मध्ये काही दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन आयोजित केलं होतं,  ह्या फोटोंमधून जपानचं भारतीय पुरातन वारस्यासोबत असलेलं नातं दिसलं.  Behl आपल्या research मधे म्हणतात, “गौतम बुद्धांच्या शिकवणीचा जपानी जीवनमानावर प्रभाव आहे. रोज अनेक लोक बौद्ध मंदिरांमध्ये जातात. गौतम बुद्धांशिवाय अनेक पुरातन भारतीय देवतांची आराधना जपानमध्ये होत असते. (ह्यामुळे) भारतीयांना जपानमध्ये घरी (भारतात) असल्यासारखं वाटतं.  जपानने भारतीय वारसा जपल्याचं एक उदाहरण म्हणजे ६ व्या शतकातील संस्कृतची “सिद्धम” लिपी भारतातून न

चहा विकून महिन्याला ५ लाख कमावणारा ‘आयटीवाला

Image
☕ चहा विकून महिन्याला ५ लाख कमावणारा ‘आयटीवाला’   ‘चहासाठी काय पण’* असे म्हणणारे अनेक वेडे या जगात सापडतील. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका ‘चायवाली’ने तिच्या देशात चहाचे हॉटेल सुरू केले. यातून तिने कोट्यावधी रूपयांचा नफा मिळवल्याचे तुम्ही वाचले असेल. आता हे झाले परदेशीतील चहासाठी वेडे असण्याचे उदाहरण. पण, महाराष्ट्रातील नागपूरमध्येही एक इंजिनिअर जोडपे चहासाठी वेडे आहेत. या जोडप्याने चहा विकण्यासाठी पुण्यातील आयटी कंपनीतील नोकरीला रामराम ठोकून एक ‘चहा व्हिला’ उभारला आहे.                नितीन बियानी आणि पूजा बियानी असे या जोडप्याचे नाव आहे. या जोडप्याचे एकमेकांवर असलेल्या प्रेमापेक्षाही जास्त प्रेम चहावर आहे. म्हणूनच आयटी कंपनीतील १५ लाख पगाराची नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. नोकरी सोडून नागपूरात आल्यावर बियानी जोडप्याने ‘चाय व्हिला, रिफ्रेश युवरसेल्फ’ या नावाचे टी-शॉप सुरू केले. या व्हिलामध्ये चहा आणि कॉफीचे १५ प्रकार उपलब्ध आहेत.आमच्या या दुकानात अनेक प्रकारचे स्नॅक्सही मिळतात. आम्ही व्हॉट्स ॲप आणि झोमॅटोवरूनही ऑर्डर स्वीकारतो. ऑफीस, हॉस्पिटल आणिबँकेत चहा पो

झोप येत नाही ? जाणून घ्या उपाय ...

Image
1. डोळ्याला दमवण्यासाठी वाचन करा   लहानपणी अभ्यास करताना बंद होणाऱ्या डोळ्यांना उघडे ठेवणे फार अवघड जायचे. आठवतय? त्यातूनच आयडिया घेऊन डॉ. विन्टर यांनी असे सुचवले की झोपण्यापूर्वी एखादे पुस्तक, मॅगॅझिन वाचायला घ्या, पण हो… झोप उडवणारे काही वाचू नका. बेडरूममधील लाइटस  अत्यंत मंद असावेत. फक्त पुस्तकांवर पडेल असे लाइटस वापरा.  2. डोके वापरा :   आपले विचार विचलीत करणारी इलेक्ट्रॉनिक्  साधने, उदा. मोबाइल, टॅबलेटस शक्यतो दूर ठेवा. रात्रीच्या वेळी मोबाइल स्क्रीनचा उजेड झोप न लागण्याचे कारण असू शकते.  महत्त्वाचे म्हणजे डोक्यामध्ये एखाद्या स्वप्नवत गोष्टीचा विचार करा. काल्पनिक ही चालेल. जसे, की तुम्ही सहलीला गेला… तुम्हाला एखादे पारितोषिक मिळाले.. इ.  त्या विचारात रमा. पहा मग कधी झोप लागली कळणार देखील नाही.  3. पडून रहा :   ​  झोप लागत नाही म्हणून बसून वा उभे राहून काही काम करत राहू नका. बुध्दीला तुमच्या उभे राहण्याने झोपायचे नाही असा सिग्नल जातो. म्हणून आपली पाठ टेका भले झोप येत नाही असे वाटले तरी.  4. रात्री उगाचच लाईट लाऊन घरभर फिरू नका :   ​  झोपेत

तंबाखू सोडण्यासाठी घरगुती उपाय - उपाय आणि अपाय

तंबाखूचं सेवन आरोग्याला धोकादायक आहे. तंबाखू अनेक स्वरूपामध्ये बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये गुटखा, सुपारीपासून केमिकलयुक्त सुपारीचा समावेश आहे.  तंबाखूच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका बळावतो. तोंडाचा कॅन्सर होण्यामागे तंबाखू हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे आरोग्याला हानीकारक असणार्‍या या व्यसनातून मुक्तता मिळवणं गरजेचे आहे. तंबाखूचं व्यसन सोडण्याची इच्छा अनेकांना असते मात्र नशेच्या गर्तेमध्ये अडकलेल्यांना हे सोडवणं कठीण होऊ न बसतं  तंबाखू सोडण्याचे घरगुती उपाय -   तंबाखू सोडण्यासाठी अनेक घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. प्रामुख्याने तुम्हांला इच्छाशक्तीची गरज असते. जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही तंबाखूच्या व्यसनापासून दूर जाऊ शकता.  तंबाखूचं व्यसन सोडायचं असेल तर ओव्यासोबत लिंबाचा रस मिसळून त्यामध्ये काळं मीठ मिसळा. हे मिश्रण दोन दिवस ठेवल्यानंतर जेव्हा तंबाखू खाण्याची इच्छा होईल तेव्हा हे मिश्रण खावे.  बडीशेपाची भरड आणि खडीसाखरेचे मिश्रण बनवा. हे मिश्रण हळूहळू चघळा. यामुळे तंबाखू खाण्याच्या इच्छेवर मात करणं सुकर होते.

जिवन जगत असताना जीवनात कसा बदल करावा -आयुष्य /जिवन विचार

Image
विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे असतात. निसर्गाने माणसाला विचारशक्ती अगदी मुक्त हस्ताने बहाल केली आहे. इतर कोणत्याही प्राण्याकडे विचार करण्याची अथवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची शक्ती नाही. विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. कारण विचार हे सतत मनात स्फुरत असतात. मानसशास्त्रानुसार माणूस दिवसभरात अंदाजे साठ हजार विचार करतो. या विचारांपैकी काही विचार तुम्ही जाणिवपूर्वक करता तर काही विचार तुमच्या विचारसरणीनुसार, संस्कारानुसार तुमच्या मनात स्फुरत असतात. काही विचार हे लहानपणापासून तुमच्यावर झालेले संस्कार, संगत आणि शिक्षण यानुसार तुमच्या मनात निर्माण होत असतात. मात्र तुम्ही चांगले अथवा वाईट कोणतेही विचार केले तरी त्या विचारांचा तुमच्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते. थोडक्यात माणूस जरी काही काम न करता अगदी रिकामा जरी बसला असेल तरी त्यावेळी त्याच्या मनात विचार सुरूच असतात. अगदी सकाळी जाग आल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस विचारच करत असतो. एखादे काम करत असतानादेखील बॅक ऑफ

जाणून घ्या शरद पवार साहेबांचा एक किस्सा

दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या आवारात एक झाड होतं. ते नेमकं अशा जागी होतं की त्यामुळे इमारतीत येणं अवघड व्हायचं. या झाडामुळे जागेला कुंपण घालता येत नव्हतं. झाड पाडलं तर कुंपण आणि प्रवेशद्वार अशा दोन्ही गोष्टी होणार होत्या पण नगरपालिका ते झाड पाडण्यास परवानगी देत नव्हती.  त्यावेळी शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. ते काही तरी करतील म्हणून पदाधिकारी त्यांच्याकडे गेले. शंकररावांनी , " छेछे, हे बेकायदेशीर काम आहे. झाड न पाडण्याचा नियम आहे, तो तोडता येणार नाही. नियम आहे त्याचे पालन झाले पाहिजे. झाड पाडता येणार नाही. मी यात मध्यस्ती करू शकत नाही. प्रवेशद्वार दुसरीकडे काढा " असा सल्ला दिला ,पदाधिकार्यांनी त्यांना नकाशे दाखवले जी दहाफुट चिंचोळी जागा आहे तिच्या मध्यावरच हे झाड आहे , हे पाडले तरच कुंपण आणि प्रवेशद्वार बांधता येईल ,अन्यथा खूप गैरसोय होईल हे शंकररावांना पटवण्याचा प्रयत्न केला ,पण ते काही ऐकूनच घेईनात. बेकायदेशीर कामाला मी कधीही होकार देणार नाही असे ठणकावून सांगत त्यांनी पदाधिकार्यांना मार्गी लावले.  त्या दिवशी शरद पवार नेमके दिल्लीत होते. जिथे गृहमंत्री काही करू शकत नाही

रावन खरंच ज्ञानी होता का? - देव/धर्म

  रामायणातील अशी काही सत्यं जी दाखवतात रावणा सारखा ‘ज्ञानी’ पुरुष सापडणे कठीण!    सत्याने असत्यावर केलेला विजय म्हणजे रामायण असे आपण लहानपणापासून ऐकत आलो. रावण हा ह्या कथेतील व्हिलन. त्याचे वाईट रूप नेहमी चर्चिल्या जाते, पण याच रावणाच्या ज्ञानासमोर देव देखील नतमस्तक व्हायचे हे आपल्यातील अनेकांना ठाऊक नाही.  अर्थात – इथे रावणाचे उदात्तीकरण करण्याचा कोणताही हेतू नाही, उलट मोठ्या दुर्गुणांमुळे  इतर सद्गुण कसे निरुपयोगी ठरतात – हे आपण रावणाकडून शिकावं – हा ह्या लेखामागचा हेतू!  आपल्याच रामायणातील रावणाबद्दलची अशी काही सत्यं – जी दाखवतात की “असा” ज्ञानी पुरुष सापडणे कठीण!  *▪  वेदांचे अफाट ज्ञान असलेला रावण *  रावणाला वेदांचा जाणकार होता. साम वेदामध्ये निपुण होता. रावणाने शिवतांडव, युद्धीषा तंत्र आणि प्रकुठा कामधेनु सारख्या ग्रंथांची रचना केली आहे.  ᵐᵃʰⁱᵗⁱ  इतकेच नाही तर वेद आत्मसात करण्याचे ’पद-पथ’ नावाचे जे तंत्र होते त्यात रावण पारंगत होता.              *▪  आयुर्वेदाचे ज्ञान *  रावणाने आयुर्वेदावर ‘अर्क प्रकाश’ नावाचा एक महान ग्रंथ लिहिला होता. ह्या ग्रंथात, आयुर्वेदाची भरप

जाणून घ्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी २६ गुरुमंत्र

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परफेक्ट गुरूमंत्र..  1. *Empower smiling*.  _चेहऱ्यावर हास्य असू द्या_  2. *Relax yourself*.  आरामशीर / तणावमुक्त रहा  3. *Have a clear understanding*.  आपले विचारात सुस्पष्टता असू द्या  4. *Avoid misconceived thoughts*.  गैरसमज / चुकीचे समज टाळा  5 *Prompt decision - making*.  तात्काळ निर्णयक्षमता  6. *Avoid inferiority complex*.  न्यूनगंड बाळगू नका  7. *Believe yourself*.  स्वतःवर विश्वास ठेवा  8. *Be inspirational*.  प्रेरणादायी रहा  9. *Develop challenging attitude*.  आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित करा  10. *Be a positive thinker*.  सकारात्मक विचार ठेवा  11. *Have self – encouragement*.  स्वयंप्रेरित रहा  12. *Avoid procrastination*.  चालढकल (दिरंगाई) टाळा  13. *Learn lessons from others*.  इतरांकडून प्रेरणा घ्या  14. *Dont lose your spirit*.  हिंमत / धीर सोडू नका  15. *Think about time-use*.  वेळेचे काटेकोर नियोजन करा  16. *Be smart at all costs*.  नेहमी चाणाक्ष रहा  17. *Be a goal setter*.  ध्येय निश्चित करा  18. *Be punctual*.  तत्पर रहा  19. *Focus Inv